#मराठी

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि Obscenity(बीभत्सता/अश्लीलता)

भारतीय दंड विधान (IPC) २९२ मध्ये 'Obscene म्हणजे बीभत्स' साहित्य मुद्रित, चित्रित किंवा अभिनित स्वरूपात प्रसिद्ध करण्यास, वाटण्यास, विकण्यास किंवा जवळ बाळगण्यास गुन्हा मानण्यात आले आहे.
यातून धार्मिक साहित्य, विज्ञान, कला, कलाकुसरक्षेत्र किंवा निव्वळ माहितीप्रद साहित्य गुन्हा मानले जाऊ नये अशी तरतूद आहे.

1965 साली बुकस्टोर मालक असलेल्या रणजित उदेशी यांच्याकडे डि.एच.लॉरेन्स यांची "लेडी चार्टर्लीज् लव्हर" हि कादंबरी आढळून आली. अनेक देशांमधे बिभत्स कंटेंट...
असल्यामुळे हि कादंबरी बॅन करण्यात आली होती. याप्रकरणी रणजीत उदेशी यांच्यावर IPC 292 नुसार गुन्हा दाखल झाला व त्यांना सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने दोषी ठरवले. मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले.उदेशी यांनी IPC 292 च्या संविधानिक वैधतेला आव्हान दिले होते.
यावर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. चीफ जस्टीस हदयतुल्ला यांनी लिहिलेल्या निर्णयात म्हंटले आहे कि अनुच्छेद 19(a) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे. अनुच्छेद 19(2) मधे त्यावरील वाजवी बंधने देण्यात आलेली आहेत. 292 हे बीभत्सतेशी संबंधित असुन ते..
नैतिकता व सभ्याता या अंतर्गत येणारे असल्यामुळे कलम 292 हे घटनात्मकरित्या वैध म्हणता येईल. काही ठिकाणी जसे मेडिकल सायन्स ची पुस्तके ज्यात intimate illustrations हे गरजेचे असु शकतात त्यामुळे त्यांना बीभत्स म्हणता येणार नाही असे स्पष्ट केले गेले.
Obscenityची IPCमधे कुठेही व्याख्या
दिलेली नाही. ती ठरवण्यासाठी कोर्टाने हिकलीन टेस्ट चा आधार घेतला. इंग्लंडमधल्या रेगिना वि. हिक्लीन (1868) केस मधे या टेस्टचा उदय झाला. It reads as "deprave and corrupt those whose minds are open to such immoral influences, and into whose hands a publication of this sort may fall.
थोडक्यात सोपं म्हणजे "...ज्यामुळे अनैतिक प्रभाव होऊन परिणाम होऊ शकतो असे" या टेस्टनुसार असे म्हणले गेले की obscenity ठरवताना कलाकृतीचा संपूर्ण विचार करावा परंतु त्यातील फक्त एखादं स्पेसिफिक कंटेंट/कृती यावरून सुद्धा Obscenity ठरवता येईल.
कला आणि Obscenity यांचा विचार करताना कोर्टाने म्हंटले कि कृतीतील कलात्मक गुण अश्याप्रकारे दिसले पाहिजेत कि त्यामुळे Obscenity झाकोळून गेली पाहिजे. हिक्लिन टेस्टनुसार कोर्टाने लेडी चार्टर्ली लव्हर हि कादंबरी Obscene ठरवली व रणजीत उदेशी यांचे अपील फेटाळून लावले.
1969 साली असेच अजून एक प्रकरण पुढे आले. चंद्रकांत काकोडकर यांनी रंभा मासिकात एक कथा लिहिली होती. त्यावर आक्षेप घेऊन त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. सत्रन्यायालयाने व उच्चन्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले. यावर सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली कि..
Obscenity ठरवताना कलाकृतीचा संपुर्ण विचार करायला हवा. ही हिक्लिन टेस्ट पेक्षा पुढची भूमिका होती जिथे स्पेसिफिक भागावरून Obscenity ठरवण्याचे मत होते. कोर्टाने पूढे म्हंटले कि प्रत्येक देशाचे प्रत्येक सोसायटीचे स्टँडर्ड वेगवेगळे असू शकतात. भारतातही सोसायटीचे स्टँडर्ड हे झपाट्याने..
बदलत आहेत यांचा विचार व्हायला हवा. या भूमिकेतून कोर्टाने प्रकरणाची चिकित्सा केली असता त्यांना काकोडकर यांच्या कथेत काही बीभत्स लिखाण आढळून आले नाही त्यामुळे त्यांना निर्दोष ठरवले गेले.

समरेश बोस यांच्यावर प्रजापती या कादंबरी मुळे 292 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
लोवर व हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर 1986 साली सुप्रीम कोर्टाने त्या कादंबरीला Obscene म्हणता येणार नाही असा निर्णय दिला. या केस मधे कोर्टाने Vulgar आणि Obscene मधे फरक केला आहे. कोर्टाने म्हंटले आहे कि A vulgar writing is not necessarily obscene. Vulgarity arouses...
feeling of disgust and revulsion and also boredom but doesnot have the effect of depraving, debasing and corrupting the morals ofany reader of the novel !

कट टू 2014.. Stern मासिकाने बोरिस बेकर व त्याची प्रेयसी बारबरा यांच्यावर एक स्टोरी केली होती जी फोटोसहित...
आनंदबाजार पत्रिकेत छापून आली होती. मॅगझीन आणि वृत्तपत्रावर 292नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खालच्या कोर्टाने केस रद्द करण्यास नकार दिल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. 2014 साली यावर जस्टीस सिक्रि व राधाकृष्णन यांनी निर्णय दिला. इथे कोर्टाने हिक्लिन टेस्ट नाकारली आहे व..
कम्युनिटी स्टँडर्ड टेस्ट स्वीकारली आहे. कोर्टा चे मत आहे कि Obscenity ठरवताना कलाकृतीकडे सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने कंटेम्पररी कम्युनिटी स्टँडर्डनुसार बघायला हवे. तसेच त्या मागचा काँटेक्स्ट आणि मेसेज सुद्धा विचारात घ्यायला हवा. बोरिस बेकर ने इथे त्याच्या..
कृष्णवर्णीय प्रेयसीसोबत फोटो काढला आहे. मुलाखतीत त्याने जर्मनीमधल्या रेशिअल भेदभावच्या अनुभवाबद्दल भाष्य केले आहे. त्या आर्टिकल मधे तो स्वतःच म्हनला आहे कि " फोटो धक्कादायक असू शकतो पण मला सांगायचे आहे कि इंटर-रेशिअल रिलेशनशिप इज ओके !" फोटोतून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की
त्वचेच्या रंगापेक्षा प्रेम महत्वाचे आहे. त्यामुळे या फोटोला Obscene म्हणता येणार नाही असा निर्णय कोर्टाने दिला.

2018 मधे मल्याळम मासिकात बाळाला दूध पाजनाऱ्या आईचा कव्हर फोटो आला होता. यावर तेव्हा वाद झाला होता. केस सुद्धा दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात केरळ हायकोर्टने..
प्रोग्रेसिव्ह जजमेंट दिले आहे. कोर्टाने म्हंटले आहे कि What may be obscene to some may be artistic to other; one man’s vulgarity is another man’s lyric ! इथेही कोर्टाने कंटेपररी कम्युनिटी स्टँडर्ड चा विचार केला आहे. कोर्टाने नमूद केले आहे कि कालानुरूप Obscenity चे स्टँडर्ड..
प्रगत होत आले आहेत. या ठिकाणी बाळाला दुध पाजणाऱ्या कव्हर फोटोत काहीही obscene नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

अजुन एक इंटरेस्टिंग केस म्हणजे 1995 साली अभिनेत्री ममता कुलकर्णी चा Stardust मॅगझीनवर कव्हर फोटो आला होता. याफोटोवर आक्षेप घेऊन तिच्यावर 292 अंतर्गत केस दाखल करण्यात..
आली. 2003 साली यावर निर्णय देताना मुंबई उच्चन्यायालयाने म्हंटले आहे कि Obscenity ही रिलेटीव टर्म आहे. समाजाच्या एका सेक्शनला जे Obscene वाटू शकतं ते दुसऱ्याला वाटेलच असे नाही. Obscenity हि विचार करण्यावर अवलंबून आहे कि व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे कश्याप्रकारे बघते. कोर्टाने इथे..
नमूद केले आहे कि खूप Conservative, अतीसंवेदनशील भूमिका घेऊन चालनार नाही. आजच्या काळात लैंगिक शिक्षणाचा विचार आता पूढे आलेला आहे. सामान्य मानवी गोष्टीबाबत समाज खुलेपणाने विचार करतो. त्यामुळे खुप Conservative अप्रोच हा कालसुसंगत असे नमूद करत न्यायालयाने केस रद्द केली.
कुठलेही लिखाण/कलाकृती याचा अर्थ लावताना त्याचा आशय-विषय,पार्श्वभूमी, उद्देश,कलात्मक गुण,त्यातला संदेश याचा सर्वांगीण व बदलत्या काळाच्या अनुषंगाने अधिक लिबरल असा विचार होणे गरजेचे आहे.
कलात्मक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना वाजवी बंधनाच्या तुलनेत झुकते माप मिळायला हवे !

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Gajanan Gaikwad !

Gajanan Gaikwad ! Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Gaju3112

10 Sep
#मराठी

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय बेंच ने मराठा आरक्षणाच्या वैधतेचा प्रश्न घटनापिठाकडे सोपवला व आरक्षणाच्या अंमलबजावणीस् स्थिगिती दिली आहे. असे करण्यामागे कोर्टाने 22 पानांच्या निकालपत्रात काय भूमिका/तर्क दिला आहे हे बघायला हवे...
आरक्षनाच्या बाजूने असलेल्या पक्षकारांकडून ज्यात राज्यसरकार पण आले असे मांडण्यात आले कि 102व्या घटनादुरुस्ती संबंधी प्रश्न पहिल्यांदा कोर्टासमोर आले आहेत. EWS आरक्षणाच्या घटनादुरुस्तीनंतर तसेच बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे इंदिरा साहनी केस नव्याने बघण्याची गरज आहे.
EWS आरक्षणासंबंधी व पंजाब मधील आरक्षणासंबंधी प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील घटनापीठाकडे वर्ग करावा. याला आरक्षणास् आव्हान देणाऱ्यांतर्फे विरोध करण्यात आला कि 50 टक्क्याची मर्यादा हि इंदिरा साहनी केस मधे ठरवण्यात आली आहे..
Read 16 tweets
2 Sep
#मराठी

My Lord's Legacy !!

सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्टीस अरुण मिश्रा आज निवृत्त झाले आहेत. सुप्रीम कोर्टात त्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. दरम्यान त्यांनी अनेक हायप्रोफाईल, राजकीयदृष्टीने संवेदनशील अशी प्रकरणे हाताळली. यात त्यांनी दिलेले निर्णय काही वेळा
वादग्रस्त ठरले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्थरांमधून त्याबद्दल क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उदाहरण बघायचे झाले तर..

1.सहारा बिर्ला डायरी केस : 2013-14 मधे इनकम टॅक्स ऑफिस ने सहारा-बिर्ला यांच्या ऑफिस वर रेड टाकल्या होत्या. त्यात त्यांना काही डॉक्युमेंटस् मिळाले होते ज्यात..
हाय प्रोफाइल राजकारणी लोकांची नावे होती. कॉमन कॉज या NGOने या डॉक्युमेंटस् ची चौकशी व्हावी म्हणून याचिका केली होती. अशा लुज डॉक्युमेंटस् च्या आधारे संविधानिक पदंवरील व्यक्तींची चौकशी होऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी हि याचिका फेटाळून लावली.
Read 23 tweets
1 Sep
#मराठी

डॉ.काफील खान, NSA आणि उच्च न्यायालय !

CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉ. काफील खान यांना ऊ.प्र. सरकारने अटक केली होती. पूढे त्यांना NSA ऍक्ट अंतर्गत डिटेन करण्यात आलं. याविरोधात त्यांच्या आईच्या वतीने हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आला होती.
याप्रकरनी आज जस्टीस गोविंद माथूर व जस्टीस सौमित्र सिंग यांनी निर्णय दिला आहे. 42 पानांच्या निकालपत्रात सम्पूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे.
12 डिसेंबर 2019 रोजी काफिल खान यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठासमोर CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या गॅदरिंग मधे भाषण दिले होते.
13 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 29 जानेवारी 2020 रोजी त्यांना अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारी ला त्यांना चीफ मजिस्ट्रेट यांनी जामीन दिला. 10 तारखेला जामीन देऊनही त्यांना सोडले नाही. 13 फेब ला मजिस्ट्रेट ने पुन्हा त्यांना सोडण्याचे आदेश दिले.
Read 23 tweets
22 Aug
#म

कोरोना, तब्लिघ, मिडिया आणि मुंबई उच्चन्यायालय !

मार्च महिन्याच्या शेवटी जेव्हा कोरोना देशात हातपाय पसरत होता तेव्हा दिल्लीतील निझामुद्दीन मरकज येथील तब्लिघ जमातचा कार्यक्रम सुरू असल्याचे प्रकरण समोर आले. अपेक्षेप्रमाणे देशातील मिडिया या विषयावर तुटून पडली.
या कार्यक्रमाला आलेले अनेक लोकं हे विदेशातून आलेले होते. मिडीयाने जणू या लोकांनीच कोरोना भारतात आणला आणि हेच कोरोना पसरवण्यास् कारणीभूत असल्याचे चित्र रंगवले. पुढे केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ठिकठिकाणी तब्लिघ जमातच्या लोकांवर पोलिसांकरवी IPCच्या वेगवेगळ्या कलमाखाली तसेच...
आपत्ती व्यवस्थापन कायदा व एपीडिमिक डिसिजेस ऍक्ट अंतर्गत केसेस दाखल करण्यात आल्या. अहमदनगर मधल्या पोलीस स्टेशन्स मधे सुद्धा तब्लिघ जमतच्या लोकांवर व त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक मशिदीच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले. या लोकांनी या सर्व केसेस रद्द करण्यात याव्यात..
Read 19 tweets
19 Aug
#म

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. जस्टीस ऋषिकेश रॉय यांनी लिहिलेल्या 35 पानांच्या निकालपत्रातील महत्वाचे मुद्दे -

- मुंबई पोलिसांकडून तपासादरम्यान काही चूक झाली आहे असे प्रथमदर्शनी वाटंत नाही.

- बिहार पोलीसांच्या तपासात अडथळा आणणे टाळायला..
हवे होते.

- CrPC सेक्शन 406 मधे फक्त केस ट्रान्स्फर केली जाऊ शकते, इन्वेस्टिंगेशन ट्रान्स्फर करता येत नाही.

- मुंबई पोलिसांनी कोणताही FIR दाखल केलेला नाही. त्यांचा तपास मर्यादित स्वरूपात होता.
- ललिता कुमारी जजमेंट नुसार पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्यात FIR नोंदवणे अनिवार्य आहे.त्यानुसार पटना पोलिसांनी FIR रजिस्टर केली होती. FIR मधे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि आर्थिक गैरव्यवहारांबद्दल उल्लेख आहे, या मुद्द्यावर पटना पोलिसांना ज्यूरिसडिक्शन आहे.पटना मधे रजिस्टर झालेल्या..
Read 8 tweets
14 Aug
#म
#मराठी
प्रशांत भुषण यांच्या न्यायालयचा अवमान प्रकरणातील 108 पानांचे निकालपत्र नुकतेच वाचुन काढले. विशेष म्हणावे असे त्यात काहीही लिहिलेले नाही, कुठल्याही बाजूने ! सदर प्रकरणाची तथ्ये, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट आणि याआधीची संबंधित प्रकरणे यांचं फक्त प्लेन रिडिंग करण्यात आलं आहे.
न्यायव्यवस्था टिकेपासून अलिप्त राहू शकत नाही. मात्र सदर टिका हि चुकीच्या माहितीवर,चुकीच्या पद्धतीने, न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी व जनतेच्या मनातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या स्वरूपाची असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
न्यायव्यवस्थेवरील सामन्य लोकांची श्रद्धा व ते निष्पक्ष व निर्भिड पणे न्यायदानाचे काम करतील हा विश्वास व्यवस्थेचा पाया आहे. न्यायवस्थेवरील या पब्लिक कॉन्फिडन्सला जर कुणी धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणे गरजेचे आहे. कंटेप्ट हा कोर्टाची Majesty आणि Dignity
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!