'घराची कळा अंगण सांगतं...!'
फ्लॅट सिस्टिमला अंगण नसतं.. कळा कुठून येईल?
आजही गावाकडं जायचं म्हणलं की मन आसमंतात उधळायला लागतं.. कदाचित ही गावाकडच्या अंगणाची ओढ रक्तातच असते.
आज कोजागिरी.. आज घरचे सगळे हट्टाने अंगणात जमून गप्पाटप्पात रंगतात.. चंद्राची दुधात वाट बघत.❤ #म
एरवीही आम्ही अंगणातच जेवायचो..त्यामुळे त्यावेळी कोजागिरीचं फारसं काही वाटायचं नाही..
आज त्या अंगणात आम्ही नाही.. मी नाही..ताई नाही.. आज्जी तर या जगातच नाही.. मन फार पिळवटून जातं.. त्या आठवणींनी. अंगण ही अशाच दुःखाच्या कोशात आज असणार.
त्याच्या अंगाखांद्यावर बिलगलेलो आम्ही.. लहानाचे मोठे त्याच्याच मांडीवर झालो.. आज त्या अंगणाची आर्त हाक...डोळे ओसंडून वाहायला लावते.
कोजागिरीच्या दिवशी हसत खेळत रात सरायची..आज त्यातील मजा हरवलीय.. व्यस्त झालो आपण सगळे..त्या दुधाळ दिवसांनी आता तावूनसुलाखून व्यस्ततेची साय पांघरलीय.
गावाकडच्या सोप्याची सर इथल्या हॉल ला कशी येईल? प्रश्नच नुसते..उत्तरं काय याजन्मी मिळायचे नाहीत. सैपाक घरात जेवण बनवणारी माझी आई.. पावलांच्या आवाजावरून बाहेर कोण आलंय ते ओळखायची.. आज तिला फ्लॅट ची बेल वाजली की कावरीबावरी झालेली पहाताना खूप त्रास होतो..
कोजागिरीच्या दिवशी अशा गावाकडच्या आठवणी ताज्या होतात.. दरवर्षीचंच हे. घायाळ झालेलं मन मग थकून नरम पडतं.. पुढच्या वर्षीची वाट बघत..!
आज्जी नेहमी म्हणायची.."माणसानं कितीबी मोठं व्हावं..कुठंबी फिरावं..पण एवढंबी दूर जाऊनी की आठवणींच्या डोहात अडकणं होईल." बरोबर होती आज्जी.❤
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड#म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..
अत्याचार आणि मानसिक त्रास स्त्रियांना देणं ही रीत बनलीय आता.खऱ्या समाजात आपण स्त्रियांना जगण्यास लायक ठेवले नाही.याचे महत्वाचे कारण आपण स्त्रीस माणूस म्हणून पहाण्याची दृष्टी हरवली.त्याचा परिपाक स्त्री म्हणजे चॉकलेट.कोणीही त्याचा आस्वाद घ्यावा.इतक्या नीच पातळीवर समाज उतरला. #थ्रेड
एकाच वेळी आपण सध्या दोन समाजात जगत वावरत आहोत..एक खरा समाज आणि दुसरा आभासी म्हणजे समाजमाध्यमीय समाज. पहिल्यात आपण स्त्रीची अवस्था 'न भूतो न भविष्यती' इतकी दयनीय आणि वाईट केलीय.. NCRB चा डेटा आपण पाहिला तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल.. ही वस्तुस्थिती आहे.
खऱ्या समाजातील ही अवस्था इथे समाजमाध्यमातून ही पहायला मिळते..कारण खरा समाज ज्या माणसांचा(?) बनला बनवला गेलाय तीच विकृत माणसं इथंही जगत वावरत आहेत.
गेले काही दिवस ज्या पद्धतीने सिक्रेट मेसेज या नावाखाली तमाशा या समाजमाध्यमातून सुरुय तो पहाता.आपली नैतिकता किती बालिश हा प्रश्न पडतो.
'जो समाज मांजर आडवी गेली म्हणून कर्मकर्तव्य थांबवतो,त्या समाजाचे भविष्य बोके ठरवतात.'
आपल्या समाजास ज्याला त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला. अलीकडे तर 'माणसात देव पाहण्यासाठी' रिघच लागलेली दिसते. असो #म#थ्रेड
माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी जी आत्मशक्ती असावी लागते..तिचा तुटवडा हल्ली जास्तच जाणवू लागला आहे.. म्हणून आपण त्या आत्मशक्तीस पर्याय म्हणून ही देवत्वाची ढाल समोर केलीय..एकदा का व्यक्ती किंवा वस्तूला देवत्व दिलं की समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासाठी आपण मोकळे असतो.
माणसात देव पहा..या संकल्पनेचा बेधडक चुकीचा तेवढा अर्थ आपण घेतला. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येएवढ्या देवांचाही बाजार इथं भरवला गेला.. ही वस्तुस्थिती आहे. एखादी परंपरा काय? त्यामागे उद्देश काय? आज त्याची उपयुक्तता काय? त्या रूढी परंपरेत बदल हवेत का? असे विचार हल्ली पडत नाहीत.
खूप छान डॉक्टर मॅडम..नाती हे जर झाड असेल तर भावना या त्यासाठीच्या कल्चर आहेत. आपल्याला काहीतरी गोष्ट छळतीय ही गोष्ट लक्षात येऊन नात्यातील व्यक्तीसोबत ती वाटून घेणं महत्वाचं..व.पु चे विचार क्षणिकतेसाठी वाचायचे नसतात..त्याचा वापर आशा काही कामासाठी होईल का पहायला हवं.
व्यक्ती कोणीही असो.ती मायेच्या स्पर्शाची भुकेली असते..तो कनेक्ट वेळेत नाही मिळाला की परिस्थिती गंभीर बनत जाते..EQ वाढवायचे उपाय कसे आमलात आणायचे ज्याची त्याची पद्धत वेगळी असू शकते..फळ मात्र समृद्ध जीवन हेच मिळायला हव..हे प्रत्येकाने लक्षात ठेवा..
कारण,भावभावनांच्या खेळात हार जित नसते..तिथं एकतर असणं किंवा डायरेक्ट नसणं हेच असतं. या स्टेजला पोहचण्याअगोदर एकदा आपल्या मनात आपल्या जीवनाची कल्पना स्पष्ट असावी..म्हणजे भावनांना आवर घालायला सोपे जाते. अन्यथा वाहवत जाऊन शेवटी बुडून अंत होतो. ते टाळायला हवं आपण..
सध्या मी सांगली-सोलापूर बॉर्डरवर नागज या परिसरात आहे.. रात्री मुक्काम येथील डोंगराच्या कुशीत एका शेतकऱ्याच्या घरी होता. काल सगळीकडे दिवसभर पावसाने झोडपून काढलेच होते..इथंही आहेच पाऊस पण तुलनेने थोडासा कमी वाटला. #म#थ्रेड
मी रात्री 11 च्या सुमारास पाहिलं..तेंव्हा वाऱ्याची दशा आणि दिशा..ढगांची घनता..यावरून काहीतरी आक्रीत पाऊस बरसेल याचा अंदाज बांधूनच झोपी गेलो. रात्री 12 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत एकसारखा मुसळधार पाऊस ढासळला. परिसरातील तालीची रानं धुवून गेली.. ओढ्यावरील रस्ता धुवून गेला..तो बंद.
ज्या ठिकाणी पाणी यायला..एकसलग खूप मोठा पाऊस पडावा लागतो..त्याठिकाणी ही पाणी पोहचलं.
या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत गेल्यावर्षी इतका पाऊस पडूनही इतकं पाणी लागलं न्हवतं..त्याठिकाणी ही पाण्याचा लोंढा वाहत होता.. आशा परिस्थितीत आजची सकाळ उजडली.. लाईटने अगोदरच जीव सोडला होता..
आपण काय वाचतो? कसं वाचतो? हे महत्त्वाचं आहेच.पण त्याहून महत्वाचं आहे वाचलेलं किती आत्मसात करतो. बरोबर ना?
या सगळ्यांपेक्षा मला वाटतं महत्वाचं आहे आपलं वैचारिक अधिष्ठान निर्माण होण्यात आपण वाचलेला ऐवज किती उपयोगी पडतो ते.
सध्या वाचकांची कमी नाहीय.कमी आहे ती वेगळीच. ती काय? #म 1/n
आपल्या समाजास एकांगी विचार करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला.ती सवय आपल्याला लागलीय हे ही आपल्या लक्षात न येणे ही आपली दुखरी नस.वेगवेगळ्या सामाजिक समस्येसाठी उपाय शोधत असताना या दुखऱ्या नसेवर दाब पडतो ही वस्तुस्थिती आहे..मग कळ लागलेला समाज मूळ समस्येशी फारकत घेतो. 2/n
ही एकांगी विचार करण्याची अंगभूत सवय आता सवय न राहता तीच जगणं झालीय.हे निरीक्षण आहे..मग वाचनाने आपणास फक्त एका प्रचलित विचारांची क्षमता दिलीय का? आपण स्वतःची विचार क्षमता विकसित करण्यात कुठं कमी पडलो? त्यासाठी एखादा ऐवज वाचत असताना मी काय इंटेशन ठेऊन वाचतोय? हे महत्त्वाचं आहे.3/n