"The duty of a true patriot is to protect his country from his Government."

हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड #म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.
कारण, जो या सरकारी व्यवस्थापनाचा म्होरक्या आहे..त्यालाच मॅनेजमेंट कशाशी खातात हे माहिती नसेल तर या परिस्थितीचे विश्लेषण ही करावयास नको..
उठता बसता हे ज्यांच्या नावाने जप करतात..त्या सीमेवरील जवानांची सध्याची अवस्था काय आहे? याची कल्पना आपल्याला सुजाण नागरिक म्हणून आहे काय?
'राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो.' हे विख्यात लेखक बर्नार्ड शॉ यांनी बहुतेक भारतीयांकडे बघून तर लिहलं नसावं ना? ही रास्त शंका हल्ली जास्तच बळ धरतीय.
एक देश म्हणून आपली वाटचाल काय असावी हा प्रश्न फक्त राजकारण्यांच्यावर सोपवण्याइतका बिनमहत्वाचा नाही हे या समाजाला कधी कळेल?
आत्ता काल परवा एक फतवा आला..फटाके बंदीचा.. आपल्याकडे एक बरं असतं.. ज्या गोष्टीवर बंदी ती गोष्ट सहज उपलब्ध असते. दारू, गुटखा, तंबाखू, गांजा, चरस, प्लास्टिक आणि आत्ताचे फटाके..ही यादी काही पहिली नाही आणि आपला वकुब पाहता शेवटची असणं शक्यच नाही.
कारण, समाज म्हणून असलेली आपली परंपरा.
नियम पाळण्यासाठी असतात हे नियम पाळणाऱ्यांना कळत नसेल तर नसेल पण ते बनवणार्यांनाही कळू नये? म्हणजे फटाके उत्पादन सुरू.वितरण सुरू.विकत घ्यायला बंधन नाही..पण फटाके फोडायला बंदी. हे असले अजागळ वर्तन सरकार म्हणवणाऱ्या प्राण्यासच शोभेल. प्रश्न फक्त त्या प्राण्याचा नाही..तो आपलाही आहे.
वर उल्लेखलेल्या कोविड, शहीद जवान आणि इतर बंदी.या सगळ्यात समान धागा आहे. समाजभान हरवलेलं समाजमन.
'सरकार नावाच्या अजस्त्र प्राण्यावर अंकुश ठेवायचा असेल तर माहूत म्हणून जनतेनं अगोदर त्या प्राण्यावर मांड ठोकायला हवी.'
हे जोपर्यंत आपण करणार नाही.तोपर्यंत हा भक्त संप्रदाय फोफावत राहील.
आज आपण सरकार किंवा तत्सम यंत्रणांची समीक्षा चांगलं किंवा वाईट या आधारे न करता.. थेट 'ते विरुद्ध आपण' या सदराखाली करतो.. त्यामुळे या समाजाने तटस्थपणाचा तोल सोडून दिलेला आहे.तो तोल आपण जोपर्यंत सावरत नाही तोपर्यंत ही सरकारं अशीच पिऊन भेलकांडलेल्या अवस्थेत झोकांड्या देत राहतील.
विषय कोणताही असो..सरकार आणि समाज यांची नाळ जुळलेली अलिकडल्या काही दशकात पाहायला मिळाली नाही..हे असं का? याचा विचार करायला आपल्याला सवड नाही..ती नाही..कारण आपल्याला आवड उरली नाही..आपल्याला ती गोष्ट नावडती झाली कारण ती नाळ जुळण्यासारखी वातावरण निर्मिती झाली नाही.
आज जे वातावरण आहे.त्याबरहुकूम बोलायचं झालं तर.सरकार आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू नसून एकाच नाण्याच्या एकच बाजू आहेत. अस म्हणावं लागेल.कारण सरकार या व्यवस्थेमागे असलेला समाजाचा वचक आता राहिला नाही.सरकार म्हणेल ती पूर्वदिशा हे समाज आता मान्य करू लागलाय.. मग ते चूक का असेना.
हा पायंडा घातक आहे..हे ज्यांनी सांगायचं..तेच आज वाजंत्रीच्या भूमिकेत आहेत..त्यामुळे समाज म्हणजे भरकटुन दिशाहीन झालेल्या गलबतासमान दिसतोय..त्यास आता प्रतीक्षा आहे आता दिपस्तंभाची..तो दीपस्तंभ उभा करण्याची जबाबदारी आता आपण युथ ने घ्यायला हवी.
अन्यथा हा अंधार हेच जगणं बनण्याचा धोका संभवतो आहे. ❤

@Omkara_Mali @SahilVastad @Nilesh_P_Z @DrVidyaDeshmukh

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

24 Nov
'काळ इतका मोठा असतो. की, काळाच्या पटावर तू आणि मी एक ठिपका आहोत ठिपका.!'

बरोबर..देऊळ मध्ये आण्णा केश्याला सांगत असतात.

या ठिपक्यांना जोडण्यात माणूस आपलं आयुष्य खर्च करतो..अगदी निर्भयपणे.
तरीही त्याला एक भीती असतेच..लोक काय म्हणतील.!

तू बदललायस! गर्भित अर्थ आहे यात. #थ्रेड #म
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
Read 15 tweets
23 Nov
'बलविर पाशा को एड्स होगा क्या?'

काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड #म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
Read 8 tweets
18 Nov
प्रेम ही भावना काही एका भौतिक आकर्षणापलीकडे असते..प्रेम आणि लैंगिकता याविषयीचे अवघडलेपण या समाजाचे जुने दुखणे आहे.. असाध्य रोगास जालीम औषध आवश्यक असते..ते देण्यासाठी प्रथम वैद्यक सुदीत असावा लागतो..
सध्याचा समाजिक वैद्यक ही वैद्यकीय जबाबदारी टाळतोय..❤
त्याचे परिणाम रुग्ण दगावण्याबरोबरच.. थेट या वैद्यकाची कारकीर्द संपुष्टात होण्यात होऊ शकतात. हे फार गंभीर आहे.. कारण ही अवघडलेपणाची सेवासुश्रुशा पेलण्याइतपत हा समाज पोक्त होणार कधी हा सवाल अनुत्तरित आहे अजून.. त्या सवलास जबाब ही तगडाच हवा.. तो मिळणे सद्यस्थितीत दुरापास्त आहे.
कारण, या समाजाची दांभिकपणाची क्षमता.. अतिउच्च परमाणू तंत्रज्ञानाने विकसित असलेला अणुबॉम्ब जसे जीवांचे भेदरवून हालहाल करेल.. त्याहून अधिक जीवांचे नुकसान या भारतीय समाजाच्या दांभिकपणाने केले. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी समाजाचे जे काही नुकसान झाले.. त्याचे मोजमाप केवळ अशक्य.
Read 4 tweets
15 Nov
काल देव स्वप्नात आला होता..!

नेहमीचंच त्याचं गाऱ्हाणं...देवपणाची भीती वाटायला लागलीय म्हणत होता..
फक्त चोच द्यायचं काम माझं आहे..चारा ज्याचा त्याने शोधायचा असतो.. असंही काहीतरी पुटपुटत बसला होता..❤ #थ्रेड #म
मी हसत म्हणलं..भक्तांच्या मांदियाळीत पुरता फसलायस गड्या तू..
मग खजील होत म्हणाला..माझ्या जागी कधीतरी बसून बघ..मी काय भोगतोय तुला कळेल..

मी म्हणलं झालंय काय?
आता मी कुठे राहू? चार सहा महिने मंदिरात निवांत होतो..
मी म्हणलं..तो प्रश्न तू निर्माण केलायस तुझं तू निस्तार.
यावर हसत देव म्हणाला..हे तुझं बरंय.भक्तांच्या दाढेला मला एकट्याला देतोयस तू.

मी- मी तुला मागेच म्हणलं होतं ना..तू काय या दगडांच्या राजकारणात अडकू नको म्हणून..पण तू ऐकलं का त्यावेळी?

मी अडकलो न्हवतो..मला अडकवलं होतं.. भक्तांनी.

भक्तही तुला अडकवतात तर मग सोडून दे तू देवपण.
Read 6 tweets
12 Nov
'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'

हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म #थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।

सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।

सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।

जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।

नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
Read 13 tweets
6 Nov
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!