'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'
हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म#थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।
सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।
जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।
नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
दादला मारून आहुती देईन, मोकळी कर गं मला - भवानी आई।
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला॥
काय अप्रतिम भारुड आहे हे..गर्भितार्थ देणारं हे साहित्य रोज पहाटे कानठळ्या बसवणार असेल तर माणसं आतूनच निर्मळ व्हायला सुरुवात होईल ना..!
संत एकनाथ महाराजांनी साडे तीनशे च्या आसपास भारुडे लिहली..सगळीच्यासगळी समाजास आत्म सुखाचा संदेश देणारी ठरली. आपलं समाजमन त्यापासून साक्षात बेदखल राहिलं.. हे आपल्या समाजाचं दुर्दैव..
अभंग, भारुडे, गवळणी हे साहित्य आपण वारकरी संप्रदायापुरते मर्यादित ठेवले..
सगळ्याच गोष्टींकडे पहाण्यासाठी आपल्याकडे एक चष्मा तयार असतो.. आपण त्याच चष्म्यातून पाहून काहीएक अर्थ त्या गोष्टींविषयी लावत असतो..
आज कृष्णाचं उदाहरण घ्या.. कृष्ण होऊन गेला किंवा नाही.. यात फरक नाही पडत..पण साहित्यात त्या निमित्ताने काहीएक जीवनमूलक तत्वज्ञान तयार झाले.
ते तत्वज्ञान आपल्याला जर आनंदी जीवन जगायला योग्य मार्ग दाखवणार असेल..तर मला त्याविषयी त्वेष बाळगण्याची काहीच गरज नसेल.. हीच बाब इतर धर्मीय साहित्याबद्दल ही आहे. आज कृष्ण केवळ आपण प्रेम आणि दांडिया एव्हढ्यापुरता मर्यादित केला..ही आपली अक्षम्य चूक होती..
संत माऊली असतील की जगद्गुरू संत तुकोबाराय असतील समकालीन इतर सगळेच संत..त्यांनी जे ज्ञानमूलक साहित्य निर्माण करून ठेवले..त्यास या पृथ्वीतलावर तोड नाही..पण आपण कोण्या शेक्सपिअरसाठी नटून बसलो.. अर्थात शेक्सपिअर महानच होता.पण आपण आपल्या हातचे सोडून पळत्यामागे किती धावणार? प्रश्न आहे.
आज संत साहित्यातील एक ओवी Phd साठी घ्यावी लागते..म्हणतात.. किती ताकद असेल त्या लेखनात? कुठून आली असेल ही प्रगल्भता? ती ताकद आणि ती प्रगल्भता तत्कालीन सामाजिक परिस्थितीतून आली..त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वरवर वेगळी वाटत असली तरी फारसा फरक नाहीय.सुज्ञाना पटेल हे वाक्य.
मग प्रश्न आहे.. त्या संत साहित्यातून आपण नेमकं शिकलो काय? आज तीन चारशे वर्ष झाली असतील हे साहित्य होऊन.. ती साहित्य निर्माण परंपरा आपण पाळली नाही ती नाही..निदान त्यातून काहीएक शिकवण घेऊन समाजास सुखी करण्याचा अट्टाहास ही आपण करू नये..
ही लक्षणं काही महासत्ता होण्याची स्वप्न पहाणाऱ्या समाजास महासत्ता होऊ देतील असं वाटत नाही.
'समाज नंतर सुधारेल अगोदर व्यक्तीने स्वतः आतून सुधारायला हवे.' त्यासाठी फक्त संत साहित्य न्हवे तर मिळेल तो मार्ग ज्याचा त्याने आपलासा करावा.
तर हा समाज उद्या 'याची देही याची डोळा' जिवंत दिसेल..
अन्यथा हल्ली जी काही खुळचटपणाची जबाबदारी राज्यसंस्थेने आणि संविधानिक संस्थांनी उचलली आहे.. त्यास आवरणे कठीण आहे.
ती जबाबदारी पेलण्यासाठी समाजास आतून निर्मळ व्हावे लागेल. त्यासाठी असे काही प्रयत्न तरी व्हायला हवेत.❤
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
या चार शब्दांच्या वाक्यावर आपण जे आयुष्य काढतो ना.त्या आयुष्याला सरतेशेवटी चार पै ही किंमत राहत नाही.आज आपण जे काही निर्णय चार लोकांना भिऊन घेत नाही ना.त्यामुळे आपल्याच जीवनाचा हिशोब हच्च्याहच्च्याने चुकत जातो आणि शेवटी आपल्या हाती शून्य मिळते. #थ्रेड#म
हे जे चार लोक आपण म्हणतो ना. ते ना आपल्या सुखात असतात ना दुःखात.एकवेळ ते आपल्या सुखात आपल्या सोबत दिसतील पण असतीलच अस नाही.दुःखाचा तर विषयच नाही. मग त्यांचा विचार करून मी माझं जीवन का व्यतीत करावं? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला हवा.अन्यथा आठरा पगड जातीचा आपला समाज असाच राहील.
आज एकुणात माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्याचं आकलन या बाहेरच्या लोकांना किती झालेलं असतं?मी कितीही मेहनत घेऊन काही चांगलं करायचं म्हणलं आणि चांगलं केलं तरीही हा समाज जर मला नावं ठेवणार असेल तर या समाजाची ऐशितैशी करायलाच हवी.हा ठाम निश्चय आता गरजेचा आहे.त्याशिवाय आयुष्य जगायचं कस?
भाषा काही कधी मरत नसते..तिला मारलं जातं.. तिला वापरणाऱ्याकडून.
भाषा माणसांना एकत्र जरी आणत असली तरी मानसामानसात दरी ही भाषेमुळेच येते.. आपल्याकडील बेळगाव-कारवार वाद असो की जागतिक पातळीवरील ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश वाद असो. #थ्रेड
भाषेचा वापर करून वर्चस्व निर्माण करणे हाच सगळीकडे समान धागा आहे. आपली भाषा संकटात आहे हे ब्रिटिशांनाही आता राहून राहून वाटू लागलंय.. कारण अमेरिकन इंग्लिशचा वाढता पगडा.
आपल्याकडे इंग्रजी यायला हवी यासाठी आटापिटा सुरू असतो..नेमकं त्याच भाषेविषयी काळजी आता ब्रिटिशांना वाटू लागलीय.
भाषा ही काही बाजारू वस्तू नाहीय..की तिचा तुटवडा निर्माण व्हायला..
भाषेच्या बाबतीत एक सरळ तत्व आहे..जी भाषा अधिक उदरनिर्वाह देईल ती भाषा जगभर आपलीशी केली जाईल. उदरनिर्वाह देण्याची क्षमता ही सदृढ अर्थव्यवस्थेत नेहमीच असते..त्याबरहुकूम त्या अर्थव्यवस्थेची भाषा ही जगभर पसरते.
आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड#म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..
अत्याचार आणि मानसिक त्रास स्त्रियांना देणं ही रीत बनलीय आता.खऱ्या समाजात आपण स्त्रियांना जगण्यास लायक ठेवले नाही.याचे महत्वाचे कारण आपण स्त्रीस माणूस म्हणून पहाण्याची दृष्टी हरवली.त्याचा परिपाक स्त्री म्हणजे चॉकलेट.कोणीही त्याचा आस्वाद घ्यावा.इतक्या नीच पातळीवर समाज उतरला. #थ्रेड
एकाच वेळी आपण सध्या दोन समाजात जगत वावरत आहोत..एक खरा समाज आणि दुसरा आभासी म्हणजे समाजमाध्यमीय समाज. पहिल्यात आपण स्त्रीची अवस्था 'न भूतो न भविष्यती' इतकी दयनीय आणि वाईट केलीय.. NCRB चा डेटा आपण पाहिला तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल.. ही वस्तुस्थिती आहे.
खऱ्या समाजातील ही अवस्था इथे समाजमाध्यमातून ही पहायला मिळते..कारण खरा समाज ज्या माणसांचा(?) बनला बनवला गेलाय तीच विकृत माणसं इथंही जगत वावरत आहेत.
गेले काही दिवस ज्या पद्धतीने सिक्रेट मेसेज या नावाखाली तमाशा या समाजमाध्यमातून सुरुय तो पहाता.आपली नैतिकता किती बालिश हा प्रश्न पडतो.
'घराची कळा अंगण सांगतं...!'
फ्लॅट सिस्टिमला अंगण नसतं.. कळा कुठून येईल?
आजही गावाकडं जायचं म्हणलं की मन आसमंतात उधळायला लागतं.. कदाचित ही गावाकडच्या अंगणाची ओढ रक्तातच असते.
आज कोजागिरी.. आज घरचे सगळे हट्टाने अंगणात जमून गप्पाटप्पात रंगतात.. चंद्राची दुधात वाट बघत.❤ #म
एरवीही आम्ही अंगणातच जेवायचो..त्यामुळे त्यावेळी कोजागिरीचं फारसं काही वाटायचं नाही..
आज त्या अंगणात आम्ही नाही.. मी नाही..ताई नाही.. आज्जी तर या जगातच नाही.. मन फार पिळवटून जातं.. त्या आठवणींनी. अंगण ही अशाच दुःखाच्या कोशात आज असणार.
त्याच्या अंगाखांद्यावर बिलगलेलो आम्ही.. लहानाचे मोठे त्याच्याच मांडीवर झालो.. आज त्या अंगणाची आर्त हाक...डोळे ओसंडून वाहायला लावते.
कोजागिरीच्या दिवशी हसत खेळत रात सरायची..आज त्यातील मजा हरवलीय.. व्यस्त झालो आपण सगळे..त्या दुधाळ दिवसांनी आता तावूनसुलाखून व्यस्ततेची साय पांघरलीय.