'बलविर पाशा को एड्स होगा क्या?'

काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड #म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
हा असला सगळा प्रकार वेळ गेल्यानंतर लक्षात येत असतो.. हा प्रकार वेळीच आपल्या लक्षात येत नाही कारण आपल्यावर आदळणाऱ्या भरमसाठ जाहिराती.. आणि त्याआड असणारा प्रोपगंडा.
आत्ता मागे मॅगी आणि त्यातील अजिनोमोटो बद्दल काहीतरी दंगल झाली..त्यात फायदा कोणाचा झाला? स्वदेशी म्हणजे नेमकं काय?
हल्ली तर फिजिटल ही नवीच संकल्पना उदयास येतीय.. म्हणजे 'फिजिकल प्लस डिजिटल' यात आपण फिजिकली ज्या ज्या गोष्टींनी दैनंदिन व्यवहार करतो ते सगळे डिजिटल या संकल्पनेत सामावले जातील.
सांगायचा मुद्दा आहे..हे सगळं दिसतंय तस नाहीय.आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे.आपल्या वर्तनात बदल घडवत आहे
जाहिरातींचा वापर करून आपल्याला भावनिक साद घातली जातीय..भारतीय समाज हा भावनेच्या तबकडीने तोलून धरलेला आहे..हे प्रत्येक घटकाला माहितीय..त्यामुळे राजकारण ते समाजकारण आणि स्वदेशी ते विदेशी असे सगळे घटक सर्रास भावनिक जाहिरातींच्या मागे धावत आहेत.
एक समाज म्हणून या टप्प्यावर आपण अधिक जागरूक असणं गरजेचं आहे..रवी आमले सरांचं एक पुस्तक आहे प्रोपगंडा वर.. ते वाचायला हवं आपण सर्वांनी..मग कळेल आपला पोपट कोण कसा कधी बनवत ते.. असो..❤

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

24 Nov
'काळ इतका मोठा असतो. की, काळाच्या पटावर तू आणि मी एक ठिपका आहोत ठिपका.!'

बरोबर..देऊळ मध्ये आण्णा केश्याला सांगत असतात.

या ठिपक्यांना जोडण्यात माणूस आपलं आयुष्य खर्च करतो..अगदी निर्भयपणे.
तरीही त्याला एक भीती असतेच..लोक काय म्हणतील.!

तू बदललायस! गर्भित अर्थ आहे यात. #थ्रेड #म
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
Read 15 tweets
22 Nov
"The duty of a true patriot is to protect his country from his Government."

हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड #म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.
Read 13 tweets
18 Nov
प्रेम ही भावना काही एका भौतिक आकर्षणापलीकडे असते..प्रेम आणि लैंगिकता याविषयीचे अवघडलेपण या समाजाचे जुने दुखणे आहे.. असाध्य रोगास जालीम औषध आवश्यक असते..ते देण्यासाठी प्रथम वैद्यक सुदीत असावा लागतो..
सध्याचा समाजिक वैद्यक ही वैद्यकीय जबाबदारी टाळतोय..❤
त्याचे परिणाम रुग्ण दगावण्याबरोबरच.. थेट या वैद्यकाची कारकीर्द संपुष्टात होण्यात होऊ शकतात. हे फार गंभीर आहे.. कारण ही अवघडलेपणाची सेवासुश्रुशा पेलण्याइतपत हा समाज पोक्त होणार कधी हा सवाल अनुत्तरित आहे अजून.. त्या सवलास जबाब ही तगडाच हवा.. तो मिळणे सद्यस्थितीत दुरापास्त आहे.
कारण, या समाजाची दांभिकपणाची क्षमता.. अतिउच्च परमाणू तंत्रज्ञानाने विकसित असलेला अणुबॉम्ब जसे जीवांचे भेदरवून हालहाल करेल.. त्याहून अधिक जीवांचे नुकसान या भारतीय समाजाच्या दांभिकपणाने केले. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी समाजाचे जे काही नुकसान झाले.. त्याचे मोजमाप केवळ अशक्य.
Read 4 tweets
15 Nov
काल देव स्वप्नात आला होता..!

नेहमीचंच त्याचं गाऱ्हाणं...देवपणाची भीती वाटायला लागलीय म्हणत होता..
फक्त चोच द्यायचं काम माझं आहे..चारा ज्याचा त्याने शोधायचा असतो.. असंही काहीतरी पुटपुटत बसला होता..❤ #थ्रेड #म
मी हसत म्हणलं..भक्तांच्या मांदियाळीत पुरता फसलायस गड्या तू..
मग खजील होत म्हणाला..माझ्या जागी कधीतरी बसून बघ..मी काय भोगतोय तुला कळेल..

मी म्हणलं झालंय काय?
आता मी कुठे राहू? चार सहा महिने मंदिरात निवांत होतो..
मी म्हणलं..तो प्रश्न तू निर्माण केलायस तुझं तू निस्तार.
यावर हसत देव म्हणाला..हे तुझं बरंय.भक्तांच्या दाढेला मला एकट्याला देतोयस तू.

मी- मी तुला मागेच म्हणलं होतं ना..तू काय या दगडांच्या राजकारणात अडकू नको म्हणून..पण तू ऐकलं का त्यावेळी?

मी अडकलो न्हवतो..मला अडकवलं होतं.. भक्तांनी.

भक्तही तुला अडकवतात तर मग सोडून दे तू देवपण.
Read 6 tweets
12 Nov
'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'

हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म #थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।

सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।

सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।

जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।

नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
Read 13 tweets
6 Nov
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!