समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
एक पायी दिंडी चाललेली असते पंढरपूरला..एकजण विचारतो मी येऊ का? दिंडीतील लोक म्हणतात चल.. तो म्हणतो मला चालणं होत नाही..मी माझा घोडा सोबत घेतो..त्यावर बसेन मी..
पुढच्या गावात आणखी एकजण येतो.. त्याला झोपायला गादी लागते..तो ती गादी डोक्यावर घेऊन दिंडी सोबत चालू लागतो..
आता रस्त्याने जाताना लोक पाहत असतात..आणि चर्चा करतात..तो घोड्यावर बसलेला मालक असेल आणि गादी घेऊन चालणारा त्याचा नोकर.
रात्रीच्या मुक्कामास गादीवाला निवांत गादीवर बसलेला दिसतो..तर घोडेवाला घोड्याला चारापाणी करत असतो.. तिथं लोक म्हणतात तो गादीवर बसलेला मालक असेल आणि दुसरा नोकर.
लोकांनी मालक कोण? नोकर कोण? यावर पैजा लावल्या अक्षरशः.. पण त्याविषयीची सत्यता कोणालाच माहिती न्हवती.
सांगायचं तात्पर्य एवढंच की..लोक काय चर्चा करतात यावर सत्य काही अवलंबून नसत. त्यामुळे आपण त्यास किती महत्व द्यायचे हे ठरवण्याची ही वेळ आहे.
आज भारतात ज्याच्याकडे बहुमत तो विचार बरोबर मानण्याची सुपीक खुळी कल्पना पोसावत आहे..त्यास पहिला तडा आपण युथ कधी देणार हा प्रश्न आहे.कारण तो तडा आपण जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत तर्कशुद्ध विचारांचा घडा काही घडणार नाही..तो बिघडेलच.
मी मागे एकदा म्हणलं तसं.. सुधारणा नेमक्या शेजारच्यांच्या घरातून हव्या असतात आपल्या समाजाला.
खरतर,या असल्या आत्मघातकी विचारसरणीस मागेच आपण मूठमाती द्यायला हवी होती.. पण आपला एकूणच वकुब 'बघू परत करू..' किंवा 'आपल्याला काय? ज्याचं तो बघून घेईल' असा आहे.
हे अडेलतट्टू विचार आहेत आपले.
अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा याविषयी लोकमान्य आणि आगरकर यांच्यात मतभेद होते.. आजही ते मिटलेत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा..
आज आपण प्रत्येक सामाजिक गोष्टीत राजकारण करतो..आणि राजकारणात समाज सुधारणेचा फक्त आव आणतो. हे कुठपर्यंत चालणार हे आत्ताच ठरवायला हवं.
आपण एक व्यवस्था म्हणून इतके प्रेडीक्टेबल आहोत की कोणत्याही विषयात कसा राजकीय, सामाजिक, आर्थिक हस्तक्षेप होईल याचा यथार्थ अंदाज आपण डोळेझाकून अगोदरच लावू शकतो.. अगदी त्याविषयातील सत्यता आपल्याला माहिती नसेल तरीही.
हे आपण प्रेडिक्ट करू शकतो..कारण आपण निलाजरे झालो आहोत.
अगदी सरकारी कार्यालय..खाजगी कार्यालय ते संसद इथपर्यंत माणूस कोण? जात कोणती? त्याचा पक्ष कोणता? यावरून आपण ठरवतो एखादं काम होईल की नाही.. म्हणजे नियम, कायदेकानून हे फक्त आपण तोंडी लावायला वापरतो..आपली मूळ भूक ही अविवेक, कृतघ्नपणा, विधिनिषेधश्यून्यता ही आहे.
'समाज को बदल डालो..' हा नायकीपणा फक्त चित्रपटात शोभून दिसतो..खऱ्या आयुष्यात आपल्या सुखासाठी आपल्यालाच हातपाय हलवावे लागतात ..हे समाजाने आतातरी ध्यानात घ्यावे.
अजून कितिदिवस आपण 'रामराज्य आणणारा राम' शोधत बसणार आहोत? हा कळीचा प्रश्न आहे.
आपल्याच कृषिप्रधान देशात आपलेच बांधव आज उपाशीपोटी झोपत असतात.. माहिती तरी आहे का आपल्या समाजाला हे?
हे माहिती नसणं हे आत्मक्लेशी आहे..आपल्या समाजासाठी..तरी समाजास त्याच काही सोयरसुतक नाही. हे दुखणं फार गंभीर आहे.
आपला गौरवशाली इतिहास अजून किती गोंजारत बसणार आहोत आपण? प्रश्नच आहे.
राजकारण्यांच्या मागे धावून मेलेली मढी उकरत बसण्यात आता अर्थ नाही.. लोकशाहीत राजकारणास पर्याय नसतो..त्यामुळे राजकारणाचा विटाळ आणि राजकारण्यांचा मत्सर टाळून या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना पर्याय सुज्ञांनी उभा करायला हवा.. काळाची गरज आहे ती..कळावे..!
सुज्ञांस सांगणे न लगे.❤
काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड#म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
"The duty of a true patriot is to protect his country from his Government."
हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड#म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.
प्रेम ही भावना काही एका भौतिक आकर्षणापलीकडे असते..प्रेम आणि लैंगिकता याविषयीचे अवघडलेपण या समाजाचे जुने दुखणे आहे.. असाध्य रोगास जालीम औषध आवश्यक असते..ते देण्यासाठी प्रथम वैद्यक सुदीत असावा लागतो..
सध्याचा समाजिक वैद्यक ही वैद्यकीय जबाबदारी टाळतोय..❤
त्याचे परिणाम रुग्ण दगावण्याबरोबरच.. थेट या वैद्यकाची कारकीर्द संपुष्टात होण्यात होऊ शकतात. हे फार गंभीर आहे.. कारण ही अवघडलेपणाची सेवासुश्रुशा पेलण्याइतपत हा समाज पोक्त होणार कधी हा सवाल अनुत्तरित आहे अजून.. त्या सवलास जबाब ही तगडाच हवा.. तो मिळणे सद्यस्थितीत दुरापास्त आहे.
कारण, या समाजाची दांभिकपणाची क्षमता.. अतिउच्च परमाणू तंत्रज्ञानाने विकसित असलेला अणुबॉम्ब जसे जीवांचे भेदरवून हालहाल करेल.. त्याहून अधिक जीवांचे नुकसान या भारतीय समाजाच्या दांभिकपणाने केले. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी समाजाचे जे काही नुकसान झाले.. त्याचे मोजमाप केवळ अशक्य.
'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'
हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म#थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।
सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।
जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।
नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.