नेहमीचंच त्याचं गाऱ्हाणं...देवपणाची भीती वाटायला लागलीय म्हणत होता..
फक्त चोच द्यायचं काम माझं आहे..चारा ज्याचा त्याने शोधायचा असतो.. असंही काहीतरी पुटपुटत बसला होता..❤ #थ्रेड#म
मी हसत म्हणलं..भक्तांच्या मांदियाळीत पुरता फसलायस गड्या तू..
मग खजील होत म्हणाला..माझ्या जागी कधीतरी बसून बघ..मी काय भोगतोय तुला कळेल..
मी म्हणलं झालंय काय?
आता मी कुठे राहू? चार सहा महिने मंदिरात निवांत होतो..
मी म्हणलं..तो प्रश्न तू निर्माण केलायस तुझं तू निस्तार.
यावर हसत देव म्हणाला..हे तुझं बरंय.भक्तांच्या दाढेला मला एकट्याला देतोयस तू.
मी- मी तुला मागेच म्हणलं होतं ना..तू काय या दगडांच्या राजकारणात अडकू नको म्हणून..पण तू ऐकलं का त्यावेळी?
मी अडकलो न्हवतो..मला अडकवलं होतं.. भक्तांनी.
भक्तही तुला अडकवतात तर मग सोडून दे तू देवपण.
माझ्या या वाक्यावर..पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या पाठमोऱ्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला..
होय..सोडलंय मी देवपण.
तेच सांगायला आलोय..परवा तुला म्हणलं होत मी..मंदिरात आहे राहायला.. आता उघडलीयत मंदिर..म्हणून तू मला भेटायला तिकडं जाशील म्हणून मीच इकडं आलोय..तुझ्याजवळ राहायला.
आहे का जागा मला राहायला?
या त्याच्या प्रश्नावर माझ्या स्मितहास्यात भर पडली.. रहा..! पण निम्मं भाडं द्यायला लागंल आणि पडल ते काम करायला लागंल..
चालतंय की म्हणला..!
इतक्यात मला जाग आली..दूरवर कुठंतरी गीत निनादत होतं..
'शोधिसी मानवा राऊळी मंदिरी....' ❤
प्रेम ही भावना काही एका भौतिक आकर्षणापलीकडे असते..प्रेम आणि लैंगिकता याविषयीचे अवघडलेपण या समाजाचे जुने दुखणे आहे.. असाध्य रोगास जालीम औषध आवश्यक असते..ते देण्यासाठी प्रथम वैद्यक सुदीत असावा लागतो..
सध्याचा समाजिक वैद्यक ही वैद्यकीय जबाबदारी टाळतोय..❤
त्याचे परिणाम रुग्ण दगावण्याबरोबरच.. थेट या वैद्यकाची कारकीर्द संपुष्टात होण्यात होऊ शकतात. हे फार गंभीर आहे.. कारण ही अवघडलेपणाची सेवासुश्रुशा पेलण्याइतपत हा समाज पोक्त होणार कधी हा सवाल अनुत्तरित आहे अजून.. त्या सवलास जबाब ही तगडाच हवा.. तो मिळणे सद्यस्थितीत दुरापास्त आहे.
कारण, या समाजाची दांभिकपणाची क्षमता.. अतिउच्च परमाणू तंत्रज्ञानाने विकसित असलेला अणुबॉम्ब जसे जीवांचे भेदरवून हालहाल करेल.. त्याहून अधिक जीवांचे नुकसान या भारतीय समाजाच्या दांभिकपणाने केले. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी समाजाचे जे काही नुकसान झाले.. त्याचे मोजमाप केवळ अशक्य.
'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'
हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म#थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।
सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।
जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।
नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
या चार शब्दांच्या वाक्यावर आपण जे आयुष्य काढतो ना.त्या आयुष्याला सरतेशेवटी चार पै ही किंमत राहत नाही.आज आपण जे काही निर्णय चार लोकांना भिऊन घेत नाही ना.त्यामुळे आपल्याच जीवनाचा हिशोब हच्च्याहच्च्याने चुकत जातो आणि शेवटी आपल्या हाती शून्य मिळते. #थ्रेड#म
हे जे चार लोक आपण म्हणतो ना. ते ना आपल्या सुखात असतात ना दुःखात.एकवेळ ते आपल्या सुखात आपल्या सोबत दिसतील पण असतीलच अस नाही.दुःखाचा तर विषयच नाही. मग त्यांचा विचार करून मी माझं जीवन का व्यतीत करावं? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला हवा.अन्यथा आठरा पगड जातीचा आपला समाज असाच राहील.
आज एकुणात माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्याचं आकलन या बाहेरच्या लोकांना किती झालेलं असतं?मी कितीही मेहनत घेऊन काही चांगलं करायचं म्हणलं आणि चांगलं केलं तरीही हा समाज जर मला नावं ठेवणार असेल तर या समाजाची ऐशितैशी करायलाच हवी.हा ठाम निश्चय आता गरजेचा आहे.त्याशिवाय आयुष्य जगायचं कस?
भाषा काही कधी मरत नसते..तिला मारलं जातं.. तिला वापरणाऱ्याकडून.
भाषा माणसांना एकत्र जरी आणत असली तरी मानसामानसात दरी ही भाषेमुळेच येते.. आपल्याकडील बेळगाव-कारवार वाद असो की जागतिक पातळीवरील ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश वाद असो. #थ्रेड
भाषेचा वापर करून वर्चस्व निर्माण करणे हाच सगळीकडे समान धागा आहे. आपली भाषा संकटात आहे हे ब्रिटिशांनाही आता राहून राहून वाटू लागलंय.. कारण अमेरिकन इंग्लिशचा वाढता पगडा.
आपल्याकडे इंग्रजी यायला हवी यासाठी आटापिटा सुरू असतो..नेमकं त्याच भाषेविषयी काळजी आता ब्रिटिशांना वाटू लागलीय.
भाषा ही काही बाजारू वस्तू नाहीय..की तिचा तुटवडा निर्माण व्हायला..
भाषेच्या बाबतीत एक सरळ तत्व आहे..जी भाषा अधिक उदरनिर्वाह देईल ती भाषा जगभर आपलीशी केली जाईल. उदरनिर्वाह देण्याची क्षमता ही सदृढ अर्थव्यवस्थेत नेहमीच असते..त्याबरहुकूम त्या अर्थव्यवस्थेची भाषा ही जगभर पसरते.
आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड#म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..