गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरच्या रात्री व 23च्या पहाटेपर्यंत फडणवीस व अजित दादा यांच्यासोबत राज्यपाल, पंतप्रधान, होम सेक्रेटरी व राष्ट्रपती ई. सगळे उच्चस्थरिय प्रशासन जागे होते.
12 नोव्हेंबर पर्यंत कुणीही सरकार स्थापन करायच्या स्थितीत
नसल्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकार ला केली. असा प्रस्ताव आल्या नंतर कॅबिनेट ची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जातो व राष्ट्रपतींकडे तशी शिफारस केली जाते. मग राष्ट्रपती अनुच्छेद 356 अंतर्गत संबंधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू..
करण्याचे आदेश काढतात. राष्ट्रपती राजवट काढून घेताना सुद्धा अशाच प्रकारची प्रोसिजर फॉलो केली जाते. फरक इतकाच कि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश दोन महिन्यात संसदेत मंजूर करून घ्यावा लागतो, मात्र राष्ट्रपती राजवट काढून घेण्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नसते.
12 नोव्हेंबरला दुपारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता.त्या दिवशी पंतप्रधानांना ब्रिक्स संमेलनाच्या मिटिंग ला जायचे असल्याने तातडीने कॅबिनेट मिटिंग बोलावण्यात आली व राष्ट्रपतींना तशी शिफारस करण्यात आली. राष्ट्रपती त्या दिवशी पंजाब च्या दौऱ्यावर
होते. संध्याकाळी राष्ट्रपती भवनात परत आल्यावर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली.
कट टु 22 ची रात्र.... देवेंद्रजींची अजित दादांशी बोलणी झाल्यानंतर तसे राज्यपालांना कळवण्यात आले व राज्यपालांनी सरकार स्थापन होण्याच्या शक्यते संदर्भात..
केंद्र सरकारला कळवले. फडणवीसांचा शपथविधी घेण्यासाठी राष्ट्रपती राजवट काढणे गरजेचे होते. पण इतक्या रात्री कॅबिनेट मिटिंग घेण्यात दोन अडचणी होत्या. एकतर कॅबिनेट चे काही सदस्य दिल्लीत नव्हते. सिंगापूर च्या दौऱ्यावरून परतून राजनाथ सिंग त्यांच्या लखनऊच्या घरी थांबले होते आणि..
नितीन गडकरी त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी होते. दुसरी अडचण अशी कि कॅबिनेट ची बैठक कधीही घेतली तरी बातमी लपून राहत नाही त्यामुळे देवेंद्रजींचा सिक्रेट प्लॅन यशस्वी होण्यापूर्वीच सगळ्या गावाला कळाला असता 😀
मग यावर उपाय म्हणून एन्ट्री झाली " डिपार्चर रुल" ची....
केंद्रीय मंत्रालये, कॅबिनेट, PMO यांच्या अंतर्गत कामकाज करण्यासंदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया (ट्रांसॅक्शन ऑफ बिजनेस रुल्स), 1961 हा कायदा आहे. यात मंत्रालयांनी कशाप्रकारे काम करायला पाहिजे, कॅबिनेटचे कामकाज कसे होईल, प्रोसिजर काय असेल ई. ई बाबतीत रुल्स दिलेले आहेत.
यात एक इंटरेस्टिंग रुल आहे. रुल 12 ! याचं टायटल आहे डिपार्चर फ्रॉम द रुल्स. या रुल 12 नुसार पंतप्रधान त्यांना गरजेच्या वाटेल अशा केस मधे किंवा केसेस मधे या पुर्ण बिझनेस रुल्स पासून फारकत घेऊन स्वतः निर्णय घेऊ शकतात. पंतप्रधानांनी घेतलेल्या अश्या निर्णयाला नंतर कॅबिनेट..
मधे मंजुरी घेतली जाते. याला कायदेशीर लॅटिन शब्द आहे "Ex Post Facto" म्हणजे आधी सुरू झालेल्या किंवा केलेल्या गोष्टीला नंतर परवानगी देणे. आपत्कालीन परिस्थितीत किंवा तातडीने निर्णय घेण्याची गरज असण्याच्या काळात पंतप्रधानांना तात्काळ निर्णय घेता यावे म्हणून हि तरतूद समाविष्ट केली..
गेलेली आहे. 22च्या रात्री कधीतरी पंतप्रधानांनी रुल 12 अंतर्गत इमर्जन्सी तरतूद वापरून कॅबिनेट मिटिंग बायपास करत महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट काढण्यासंदर्भात राष्ट्रपतींकडे शिफारस केली. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर होम सेक्रेटरी अजयकुमार भल्ला यांनी तसे नोटिफिकेशन..
प्रसिद्ध केले. त्या नोटिफिकेशन वर पहाटेचे 5 वाजून 47 मिनिटे अशी वेळ नमूद आहे. राष्ट्रपती राजवट निघाल्यानंतर राज्यातील जनता झोपेतून उठायच्या वेळी सकाळी 7 वाजून 50 मिनिटाच्या सुमारास देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची व अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
फडणवीसांच्या या पहाटेच्या शपथविधी साठी जी अंत्यत वेगाने निर्णय घेण्याची गरज होती त्यात रुल 12 ने मोलाची भूमिका पार पाडली. या रुल 12 चा वापर यापूर्वी इंदिराजींनी आणीबाणी लागू करताना केला होता. रुल 12 चा अंतर्गत आणीबाणी लागू करण्यासंदर्भातला प्रस्ताव इंदिराजींनी थेट राष्ट्रपती..
फकरुद्दीन अली अहमद यांना पाठवला होता. मोदींजींनी याचा वापर दोनवेळा केला. एकदा जम्मू कश्मीर चे विभाजन करताना तसा प्रस्ताव थेट राष्ट्रपतींकडे देण्यात आला आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट काढताना.
राष्ट्रपती राजवट काढण्यापासून शपथविधी उरकण्यापर्यंत ज्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्यावर असंख्य प्रश्न निर्माण होतात. राज्यपालांनी अजित दादांकडची संख्या व्हेरिफाय केली होती का, त्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव कधी पाठवला, पंतप्रधानांनी सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार केला होता
का, राष्ट्रपतीनी स्वाक्षरी करण्यापूर्वी कायदेशीर व इतर बाबी तपासून घेतल्या होत्या का, इमर्जन्सी तरतूद वापरण्या इतपत गरज होती का ई ई. अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण राज्यपाल, पंतप्रधान व राष्ट्रपतींनी हे सगळे निर्णय महाराष्ट्रा राज्याच्या 'जनहितार्थ' व 'सर्वांगीण विकासासाठी' तसेच..
देशात 'लोकशाही व संविधानिक व्यवस्था बळकट व्हावी' या उद्देशाने घेतलेले असल्याने या प्रश्नांना काही अर्थ उरत नाही 😏🤷🏼♂️
22 व 23 ला जो काही कार्यक्रम झाला तो आपल्या पक्षाचे सरकार आणण्यासाठी संपूर्ण प्रशासनाचा कशाप्रकारे "सुयोग्य" वापर करता येऊ शकतो आणि आपल्या सोयीचे निर्णय..
घेण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीसंदर्भात असलेल्या तरतूद कशाप्रकारे "तत्परतेने" "चलाखीने" वापरता येऊ शकतात याचे क्लासिक, साज सुंदर असे उदाहरण आहे 🙂
23 नोव्हेंबर 2019 ला द टेलिग्राफ वृत्तपत्राची हेडलाईन होती..
" WE THE IDIOTS "
केरळ सरकारने प्रस्तावित केलेल्या पोलीस ऍक्ट अमेंडमेंट अध्यादेशावर राज्यपलांनी स्वाक्षरी केल्याची बातमी आहे.
या नव्या कायद्याद्वारे केरळ पोलीस ऍक्ट मधे 118A हि नवी तरतूद समाविष्ट होईल ज्यात कुठल्याही माध्यमाद्वारे धमकी, Abusive, मानहानी,अपमान करण्याबद्दल 3 वर्षे
तुरूंगवासाची शिक्षा किंवा 10 हजार दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल असे सांगण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा कायदा IT ACT 66A आणि पूर्वीच्या केरळ पोलीस ऍक्ट मधील 118D या तरतूदी सारखाच दिसतो आहे. श्रेया सिंघल निर्णयामधे सर्वोच्च न्यायालयाने 66A व 118D या दोन्ही तरतूदिंना +
अस्पष्ट, अती व्यापक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे आहेत म्हणुन घटनाबाह्य ठरवले होते.
प्रथमदर्शनी 118A हे काहीशा बदलांसाहित आणलेले 66A चे नवीन व्हर्जन दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशाप्रकारे स्टेट कंट्रोल आणणे व सोशल मीडियातील कंटेंटला..
काल मीरा-भाईंदर येथील 'अपक्ष' आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणुन निवडून आलेल्या आहेत. पुढे त्या भाजपच्या सहयोगी सदस्या झाल्या.
इथे अपक्ष सदस्य आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी..
याबद्दल सविस्तर माहिती बघूया.
पाहिली गोष्ट म्हणजे सहयोगी सदस्य अशी कुठली गोष्ट घटनेत किंवा कुठल्या कायद्यात नाहीये. काही सदस्य अपक्ष म्हणुन निवडणूक लढवतात, निवडून येतात आणि संख्याबळ व धोरण ई. बाबींच्या आधारे कुठल्यातरी प्रस्थापित पक्षाला वेळोवेळी समर्थन देत असतात..
अश्या सदस्यांना त्या पक्षाचे सहयोगी सदस्य म्हंटले जाते.
मुळात निवडून आल्यानंतरचे कुठलेही पक्षांतर हे त्या उमेदवाराला पक्ष बघून किंवा अपक्ष म्हणून मत देणाऱ्या मतदारांची फसवणूक असते आणि कुठलेही पक्षांतर हे राजकिय लोकशाहीसाठी चुकीचा पायंडा पाडत असते !
CBI चा उगम बघायचा झाला तर तो स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट जी 1941 मधे स्थापन झाली त्यात सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली होती त्यांचा तपास करण्यासाठी वॉर डिपार्टमेंट अंतर्गत हा विभाग तयार करण्यात आला
होता. युद्ध संपल्यानंतरही या विभागाची गरज भासू लागली म्हणून 1946 दिल्ली स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट ऍक्ट पारित करण्यात आला. या ऍक्ट मुळे हा विभाग गृहखात्याकडे आला आणि केंद्र सरकारचे इतर सर्व खाते, विभाग यांच्या कार्यक्षेत्रात आले. राज्यांमधेही त्यांच्या संमतीने काम करण्याची..
परवानगी होती. 1963 साली या विभागाला सेंट्रल इन्वेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच CBI हे नाव मिळाले. सुरुवातीला CBI चे कार्यक्षेत्र हे केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस पुरतचं मर्यादित होतं. पुढे त्यात केंद्र सरकारच्या कंपन्याना समाविष्ट करण्यात आले. बँकांच्या
सुशांत प्रकरणात होत असलेल्या मिडिया ट्रायल संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीला काही प्रश्न विचारत ताशेरे ओढले आहेत.
"तुम्हीच तपास करणारे, फिर्यादी आणि न्यायाधीश होणार असाल तर आमचा काय उपयोग आहे ? आम्ही इथे कशासाठी आहोत" असा प्रश्न चीफ जस्टीस दिपांकर दत्ता व जस्टीस जी एस कुलकर्णी यांच्या बेंच ने रिपब्लिक टीव्हीला केला.
"जर तुम्हाला सत्य शोधण्यात इतका इंटरेस्ट असेल तर आधी तुम्ही क्रिमीनल प्रोसिजर कोड च्या तरतूदी बघायला हव्यात. कायद्याकडे दुर्लक्ष करणे हे निमित्त असु शकत नाही" असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
सुशांत राजपूत व त्याअनुषंगाने पूढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर काही लोकांना NCB ने अटक केलेली. याप्रकरणी NDPS कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात आले होते. यावर जस्टीस कोतवाल यांनी काल निकाल..
देताना रिया चक्रवर्तीला जामीन दिला आहे. निकालपत्रात जस्टीस कोतवाल यांनी प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आहे.
28 ऑगस्ट ला NCB ने अब्बास लखाणी नामक व्यक्तीला अटक केलेली. त्याच्याकडे 56 ग्राम गांजा आढळुन आलेला. त्याने करन अरोरा कडून खरेदी केला होता. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा सापडला.
दोघांना ncb ने अटक केली.
या दोंघांच्या चौकशीत झैद विलात्राचे नाव पुढे आले. त्याच्याकडे सर्च केले असता साडे नऊ लाख रुपये, सुमारे दोन हजार अमेरिकेत डॉलर, 180 युके पाउंड,15 अरबी दिरम सापडून आले. हे पैसे त्याला ड्रगच्या सेल मधून मिळालेले होते असे त्याने सांगितले.
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केलेला. त्यामुळे सर्व व्यवहार,इंडस्ट्री सगळं ठप्प झालं होतं. यामुळे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. उद्योगांना या आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी राज्य
सरकारांनी काही कामगार तसेच फॅक्टरी कायद्यांमधे सूट दिली होती. वेगवेगळ्या राज्यसरकारांनी तसे नोटिफिकेशन काढले होते ज्यात कामाचे तास, वर्किंग कंडिशन, ओव्हरटाईम ई. संदर्भातल्या नियमांमधे बदल करण्यात आले होते.
गुजरात राज्यसरकरने देखील असेच नोटिफिकेशन काढले होते ज्यात फॅक्टरी ऍक्ट...
नुसार कंपन्यांना कामाचे तास, वर्किंग कंडिशन यामधे सूट देण्यात आलेली तसेच कामगारांना ओव्हरटाईम देण्याच्या नियमात सुद्धा बदल करण्यात आलेला होता.
या नोटिफिकेशन विरोधात गुजरात मजदूर सभा या कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.