'परब्रह्मतत्वात लिंगीभेद नाही.ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळत नाही तो देश उन्नतावस्थेत पोहचत नाही.-स्वामी विवेकानंद.
आपण सगळेच जाणून आहोत. 'ती चार दिवसांची घुसमट.'
कोण्या स्कॉटलंड देशाने सॅनिटरी उत्पादने मोफत केली,आनंद आहे.पण आपल्या लक्ष्मीची घुसमट? त्याच काय? #थ्रेड#म
स्कॉटलंडला मासिक पाळी उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा पारित झालाय..आता तिथल्या कारभाऱ्यांना ती उत्पादने मोफत उपलब्ध करून द्यावी लागतील.. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ मिलियन पौंड खर्च करतील ते..
पुढारलेला देश तो..अजूनही या बाबतीत मागास होता..
यासंबंधी विधेयक गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मांडलं..म्हणजे वर्ष गेलं ते कार्य सिद्धीस न्यायला त्यांनाही..यातच आपणही आपली मर्यादा समजून घ्यायला हवी..आणि किती प्रयत्न करावे लागतील ओळखायला हवे.आणि आत्तापासून आपापल्या घरातून या 'भेदाभेद अमंगळास' तिलांजली देण्याचे शुभकार्य आटपावे.
आपला सख्खा शेजारी..नेपाळ. त्यांच्यात एक प्रथा होती..म्हणजे आहे..कारण कागदोपत्री ती प्रथा बंद केलीय सरकारने पण लोकं ऐकत नाहीत..ती प्रथा अजूनही सुरुय. त्या प्रथेचं नाव 'छोपाडी'. त्यात चार दिवस स्त्रियांनी घराबाहेर, गावाबाहेर, एका छोट्या खोलीत रहायचं.. 'छोपाडी' म्हणतात त्या खोलीला.
काही जणींना गुरांच्या गोठ्यात ठेवलं जातं..तर काहीजणी तळघरात अंधाऱ्या खोलीत ते चार दिवस भोगतात.
इकडं आपल्यात आदिवासी भागात 'कुमराघर' असतात..ती त्यासाठीच.
किती हे डिस्क्रीमिनेशन? यावर उपाय काय? उपाय आहे आपली मानसिकता.आजही मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देतात..हे प्रतीक.
या मानसिकतेस कुठलाच धर्म-जात अपवाद असण्याचं कारण नाही..कारण, 'स्रीशोषण हा पाया आहे जगभरातील पितृसत्ताक संस्कृतीचा.'..स्त्रियांना हीन मानायचं म्हणलं की सगळे धर्म एक होतात..ही वर्तमान वस्तुस्थिती आहे.. इतिहासही हेच सांगतो...आणि आपण हातावरहात ठेवून बसणार असू तर भविष्यही तेच असेल.
भारतात स्त्री मंदिर प्रवेश आणि हा मासिक धर्म हा वाद नेहमीचाच.. खरंतर एखादा नैसर्गिक व्यवहार हा मला एखाद्या व्यक्तीला अपवित्र मानायला लावतोच कसा? हा सात्विक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारणार? हा प्रश्न आहे. धर्म कोणताही असो..कमीअधिक प्रमाणात स्त्रीस दुय्यम स्थान हे पाचवीलाच पुजलेले.
आज स्कॉटलंड सारखा देश हे करू शकतो तर आपण का नाही? याचं आत्मपरीक्षण आपण करायला हवं.
काहीजण 'परंपरा आणि पूर्वजांना काही कळत असेल की'..असा युक्तिवाद करतात स्त्रीप्रश्नांविषयी.त्यांना माझं एकच सांगणं आहे.. 'धर्म हा प्रवाही आणि कालसापेक्ष असावा.' तर तो टिकतो..वाढतो..जगायला सोपा जातो.
आज थायलंड सारखा देश..तिथल्या ३७ टक्के स्त्रिया नोकरी व्यवसाय करतात..४० टक्के CEO आहेत..३४ टक्के CFO आहेत. उच्चशिक्षित महिला आघाडीवर आहेत. फक्त पुरुषांनी त्यांना राजकारण या प्रांतात येऊ दिल नाहीय अजून..२४० पैकी फक्त १३ जणी तिकडं आहेत.
सांगायचा मुद्दा आहे..सुधारणा एकांगी होत नसते.
आज किती घरातील सदस्य आपल्याच घरातील स्त्रीस 'अर्थ आणि निर्णय स्वातंत्र्य' देतील किंवा स्त्रिया हक्काने ते स्वातंत्र्य मिळवतील? वादासाठी कोणीतरी हे मान्य करेल.पण अंमलबजावणी अवघड असेल.कारण,यात पहिल्या घासाला पहिला खडा एखादी स्त्रीच घालेल. कितीही नाही म्हणलं तरी हीच वस्तुस्थिती आहे.
या सगळ्या नैसर्गिक मासिक धर्माच्या कर्मकांडाचा दोष फक्त पुरुषांचा नाहीय. या सगळ्या मंगल-अमंगल कार्यात एक स्त्रीच स्त्रीला जसं अडकवते..तसं स्त्रीच स्त्रीला यातून बाहेर काढू शकते..गरज आहे याकामी स्त्रीने आता पदर खोचून 'समर्थ' म्हणून उभं राहण्याची.
बघू कोणीतरी सुरवात करेल 'आपण फक्त हातालाहात लावून मम् म्हणू' ही मानसिकता स्त्रियांनी सोडावी.स्त्री जे भोग आजपर्यंत भोगत आलीय.ते भोग लोकसंख्येचा थेट निम्मा हिस्सा भोगत आहे.स्त्रीने ते ओळखून एकजुटीने उभं रहावं.उरलेल्या पन्नास टक्के लोकसंख्येचा घासच नाही तुमच्याविरोधात ब्र काढायचा.
स्कॉटलंड मध्ये जे झालं..त्यातून बळ घ्यावं भारतीयांनी. गरजेचं आहेच ते..
जाताजाता एक सांगतो समस्त स्त्रियांना आणि पुरुषांना..'हक्काने जगायला शिकायचं असेल तर अगोदर हक्क मिळवायला शिका.', 'हक्क म्हणजे काय चॉकलेट नाही..मागून मिळायला.' ते हिसकावूनच घ्यावे लागतील.
ते हिसकावण्याचे बळ आपल्याला या स्कॉटलंडी रसदीने मिळावे याच शुभेच्छा...!❤
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड#म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
"The duty of a true patriot is to protect his country from his Government."
हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड#म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.
प्रेम ही भावना काही एका भौतिक आकर्षणापलीकडे असते..प्रेम आणि लैंगिकता याविषयीचे अवघडलेपण या समाजाचे जुने दुखणे आहे.. असाध्य रोगास जालीम औषध आवश्यक असते..ते देण्यासाठी प्रथम वैद्यक सुदीत असावा लागतो..
सध्याचा समाजिक वैद्यक ही वैद्यकीय जबाबदारी टाळतोय..❤
त्याचे परिणाम रुग्ण दगावण्याबरोबरच.. थेट या वैद्यकाची कारकीर्द संपुष्टात होण्यात होऊ शकतात. हे फार गंभीर आहे.. कारण ही अवघडलेपणाची सेवासुश्रुशा पेलण्याइतपत हा समाज पोक्त होणार कधी हा सवाल अनुत्तरित आहे अजून.. त्या सवलास जबाब ही तगडाच हवा.. तो मिळणे सद्यस्थितीत दुरापास्त आहे.
कारण, या समाजाची दांभिकपणाची क्षमता.. अतिउच्च परमाणू तंत्रज्ञानाने विकसित असलेला अणुबॉम्ब जसे जीवांचे भेदरवून हालहाल करेल.. त्याहून अधिक जीवांचे नुकसान या भारतीय समाजाच्या दांभिकपणाने केले. त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी समाजाचे जे काही नुकसान झाले.. त्याचे मोजमाप केवळ अशक्य.
'वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी...वेडी झाली राधा ऐकून बासरी..!!'
हल्ली भल्या पहाटे ही गवळण काळीज जिंकून घेतेय.
सध्या मी सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात वास्तव्यास आहे.. तिथल्या डोंगराच्या कुशीत एक मंदिर आहे.. त्या मंदिरात राधाकृष्णाच्या गवळणी रतीब घालत असतात.❤ #म#थ्रेड
गावाकडची माणसं इतकी मऊसूत का असतात? त्याचं कारण हेच असावं बहुतेक.. पहाटेचा पिन ड्रॉप सायलेन्स.. त्यात या मंजुळ गवळणींचा संगीतनाद.. हृदयात प्रेमाचा पाझर नसानसांत भिनस्तोवर घालत असतो.
गेल्या महिन्यात असाच एका खेडेगावात होतो..तिथं एक एकनाथ महाराजांच भारुड रोजच्या रोज ऐकायला मिळायचं.
सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।
सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।
जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।
नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।