#स्थलांतर
#आत्महत्या
#विकास
#मराठवाडा_खान्देश_विदर्भ
#नक्षलवाद
शाळेत असताना आपल्याला 'कोलंबसाचे गर्वगीत' हि कुसुमाग्रजांची कविता कधीतरी अभ्यासाला होती. त्या कवितेतील खवळलेल्या महासागराला आव्हान देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी माझ्या अंतर्मनाला नेहमीच स्पर्श करतात;👇
अनंत आमुची ध्येयासक्ती,अनंत अन आशा, किनारा तुला पामराला! निसर्गावर मात करण्याची जिद्द मनात चेतवणाऱ्या या ओळी दुष्काळासमोर हाय खाणाऱ्या मराठवाड्यातील पोरांच्या डोळ्यातले अश्रू बघितले कि या कोलंबसाच्या गर्वगीताकडून ८०-९० सालच्या दुःखद गीतांकडे मोर्चा न्यावासा वाटतो.👇
आणि मग "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे अवतरण अधिकच पटायला लागते. मराठवाडा,खान्देश,विदर्भ या भागातील दुष्काळी प्रदेशातील हजारो मुलं-मुली पुण्या-मुंबईसारख्या शहरात जीवाचं रान करताना दिसतात.पण आम्ही पुण्या-मुंबईची पोरं कधी हा विचार करतो का कि;👇
आपलं गाव-गणगोत सोडून शहरात येऊन टाचणीच्या टोकावरच टोचणारं आयुष्य का स्वीकारत असतील हि विशी-पंचविशीतली मुलं-मुली? मित्रांनो माझ्या मते याचा शहर आणि गाव या चौकटीपलीकडे विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. आजवर आपल्या नेतेमंडळींनी 'विकास' या शब्दाचा सरळ अर्थ समजावून सांगितला👇
मात्र याच सरळ विकासाची उलट्या हाताची सणसणीत चापट आपल्या थोबाडावर बसत आली आहे.हे सगळं पाहिलं कि आधुनिक जग,एकविसावं शतक,जागतिकीकरण,शासनाचं सर्वसमावेशक विकासाचं धोरण,बाया-बापड्यांचे सुखी राहा म्हणणारे पाठीवरचे हात, हे सगळं एका क्षणार्धात निरर्थक वाटायला लागत.👇
माझं आपण ट्विटरवर असणाऱ्या समस्त मराठी मंडळींना अगदी कळकळीच निवेदन आहे कि; आपण या मुलामुलींना आपल्या वैयक्तिक पातळीवर का होईना थोडी थोडकी मदत करत राहुयात. हि मदत आर्थिकच असायला हवी असे काही नाही. शासनस्तरावर असेल, मानसिक आधाराच्या स्तरावर असेल,शैक्षणिक स्तरावर असेल👇
किंवा अगदी कौटुंबिक पातळीवर असेल पण या काठावर उभ्या असणाऱ्या आपल्याच मराठी भावा-बहिणींना आपण अलगदपणे आपल्या मिठीत घ्यायला हवं. कारण मित्रांनो या कोरड्या आणि सुट्या सुट्या झालेल्या काळ्या मातीच्या लेकरांना एकदा का, आपल्या प्रेमाचा ओलावा मिळाला कि मग बघाच हीच लेकरं पुन्हा👇
एकदा स्वतःच्या जमिनीशी कशी घट्ट बांधली जातात ती. कारण या लेकरांना ओलावा कशाशी खातात हेच माहित नाही हो. सततच्या कडक उन्हामुळे हवेत रानोमाळ भरकटलेले काळ्या मातीचे कण पावसाचा हलकासा शिडकावा होताच जसे पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरतात अगदी तसेच समाज,शासन, यांच्या प्रेमाच्या👇
शिडकाव्याची या आपल्या भावा-बहिणींना आज नितांत गरज आहे. आपण सगळे मिळून त्यांची हि गरज भागविण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.म्हणूनच हे आव्हान करण्याचा माझ्याकडून छोटासा प्रयत्न.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Siddharth Naik

Siddharth Naik Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @siddharthsuffi4

26 Dec
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
चंद्रपूर,रायपूर,ईस्ट गोदावरी वैगेरे जिल्हे म्हणजे आदिवासीबहुल क्षेत्र. अगदी पुरातन काळापासून या भागात राजगोंड,माडिया,बडा माडिया यांसारख्या कैक आदिवासी जमातींची वस्ती आहे. साधारण १९७१ सालापासून या भागात नक्षलवाद फोफावला आणि या भागातील
आदिवासी जमाती तशा दुर्लक्षितच राहिल्या.परंतु या आदिवासी जमातींचा सातासमुद्रापार नावाजला गेलेला एक विशेष गुणधर्म म्हणजे या आदिवासी जमातींचे शिकार करण्याचे पद्धती तंत्र. हे आदिवासी सर्वप्रथम जंगलातल्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात शिकार करायची आहे ते क्षेत्र निश्चित करतात.
मग त्या ठरलेल्या क्षेत्राला अशा रीतीने वेढा देतात कि वेढा आवळल्या गेल्यावर जनावराला पुढे जायला एकच लहानसा मार्ग उरेल. चारही बाजूने घेरून त्या जनावराला खिंडीत पकडून शेवटाला बांधलेल्या दोरांच्या मजबूत जाळीत अडकवायचं आणि अखेर त्या जनावराचे सगळे मार्ग बंद करून त्याची शिकार करायची.
Read 14 tweets
20 Dec
अगदी बालपणापासूनच अमेरिकेत राहणारी माझी एक मैत्रीण आहे. ती वंशाने जरी भारतीय असली तरी अमेरिकन म्हणावी इतपत ती आता अमेरिकेच्या संस्कृतीत मिसळल्या गेली आहे. मध्यंतरी कोरोनाचा अमेरिकेत मोठा कहर चालू असतानाहि आंदोलन करण्यासाठी अमेरिकन नागरिक मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.👇
कारण होते 'जॉर्ज फ्लॉइड' या ब्लॅक अमेरिकन कलाकाराची एका पोलीस अधिकाऱ्याकडून वंशद्वेषातून झालेली हत्या. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी ऐन कोरोनाकाळातही समस्त अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली होती. त्यात जसे अमेरिकन ब्लॅक होते अगदी तसेच अमेरिकन व्हाईटही👇
त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी झाले होते. या अमेरिकेतील घटनेनंतर भारतात अशी अनेक प्रकरणे कमी अधिक प्रमाणात घडून गेली. परंतु त्यातही क्रौर्याची परिसीमा गाठलेले प्रकरण म्हणजे; 'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण'. या प्रकरणानंतर संबंध देश👇
Read 14 tweets
15 Dec
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
#JohnHowardGriffin
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार या लेखमालेत काल आपण महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली.त्यातून असे लक्षात आले कि खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या जोखडातून मुक्तता असे नसून बऱ्याचदा स्वकीयांच्या👇
जोखडातून मुक्तता असाही त्याचा अर्थ होतो.आणि विशेष म्हणजे ह्या स्वातंत्र्याचा व्याप केवळ एका देशापुरता मर्यादित नसून तो विश्वव्यापी असा असतो. त्यामुळे मी आज अशाच एका खऱ्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.त्याच नाव आहे 'जॉन हॉवर्ड ग्रिफिन'.👇
मला ग्रिफिनची ओळख त्याचं 'ब्लॅक लाईक मी' हे पुस्तक वाचल्यावर झाली. आपल्या दलित साहित्यात मैलाचा दगड ठरलेलं शरण कुमार लिंबाळे यांचं अक्करमाशी जस आपल्या सर्वांगाला झिणझिण्या आणत अगदी तशाच झिणझिण्या ग्रिफिनच ब्लॅक लाईक मी वाचल्यावर येतात. मुळात जॉन ग्रिफिन हा एक अमेरिकन👇
Read 14 tweets
14 Dec
नुकतंच व्हॅलरी स्टील हीच पॅरिस फॅशन हे पुस्तक वाचण्यात आलं.मूळची अमेरिकन असलेली ही लेखिका पॅरिस आणि फ्रांसबद्दल लिहिताना तिच्या नागरिकत्वाबाबत आपला सपशेल गोंधळ उडावा इतक्या सराईतपणे फ्रान्सच्या अंतरंगात शिरते.पुस्तकाचं शीर्षक पाहता प्रथमदर्शनी आपला असा (गैर)समज होण्याची शक्यता👇
आहे की; या पुस्तकात सरधोपटपणे केवळ फॅशन या विषयावर काथ्याकूट केला असेल. पण या समजाला फाटा देत लेखिकेने सुमारे ५०० वर्षांच्या कपड्यांच्या फॅशन्समधून फ्रांसचा सांस्कृतिक इतिहास अलगदपणे उलगडत नेला आहे. खरं तर मला ही कल्पनाच खूप महत्वाची आणि समर्पकही वाटली. कारण बघा ना कपड्यांच्या👇
फॅशन्स जसजशा बदलत गेल्या, त्या बदलांना बारकाईने टिपून पुन्हा त्याच्याच सहाय्याने एखाद्या राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासाचा सबंध पट जगासमोर मांडणं. Alison Lurie हीच The Language Of Clothes हे तसं याच धाटणीच असलं तरी त्यातून ऐतिहासिक दृष्टिकोनापेक्षा मानसिक दृष्टिकोन जास्त झिरपतो.👇
Read 4 tweets
13 Dec
साधारण वीस एक वर्षांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सने अशी तक्रार केली होती की, हल्ली इंग्लंडमध्ये शेक्सपिअर फारसा वाचला जात नाही. प्रिन्स चार्ल्सचे हे विधान तसे धक्कादायकच म्हणायला हवं, कारण एकीकडे ब्रिटनचे भलेमोठे साम्राज्य आणि दुसरीकडे शेक्सपिअर यातून एकाची निवड करायची👇
झाल्यास; आम्ही एखादवेळेस साम्राज्यावर पाणी सोडू परंतु शेक्सपिअर कदापी सोडणार नाही अशा म्हणणाऱ्या ब्रिटिशांवर आज शब्दांचा साक्षात पंडित शेक्सपिअरला सोडण्याची वेळ येत असेल तर भारतातील शब्द पुजाऱ्यांची काय स्थिती असेल याबाबत मौन बाळगलेलच बर.पण ब्रिटिशांच्या या शेक्सपिअर प्रेमावरून👇
आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की शब्दांच सामर्थ्य ते किती. जर तुम्ही 'गली बॉय' हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातल्या अपना टाइम आयेगा या गाण्यातली एक ओळ आहे बघा 'ये शब्दोका ज्वाला मेरी बेढिया पिघलायेगा' म्हणजे अशी वज्रहून कठीण जोखड वितळविण्याची क्षमताही शब्दांमध्ये असते👇
Read 13 tweets
11 Dec
साधारण २०१५ च्या आसपास मी माझे ट्विटर अकाउंट उघडले होते. पण फेसबुक चा जोर जरा जास्त होता म्हणून ट्विटरकडे फारसे फिरकणे होत न्हवते. अगदी मागच्या वर्षापर्यंत ट्विटर मी गांभीर्याने घेत नव्हतो. परंतु मागील वर्ष अखेरीस ट्विटर वर बरेच मटणप्रेमी, साहेबाप्रेमी, काही चळवळे कार्यकर्ते,👇
खास ट्रोलर यांची मांदियाळीच दिसली. आणि त्यात विशेष म्हणजे हि सगळी मराठी मंडळी. त्यामुळे आपलेपणा जाणवला. त्यातल्या अनेक जणांशी वैयक्तिक संपर्कही झाला. काहीजण प्रत्यक्ष भेटलेही. पण खास ट्विट करायला अशी सवड होत नव्हती. मनातून इच्छा खूप असायची पण ट्विटर कसं वापरायचं याबद्दलच घोर👇
अज्ञान आणि वेळेची मारामार या धबडग्यात कधी व्यक्त होण्याची संधी मिळालीच नाही. पण माझा मित्र @Digvijay_004 याने मला बरेच प्रोत्साहन दिले. ट्विटर चे बारकावे समजावून सांगितले. दिग्विजयच्या प्रोत्साहनामुळेच मी आज लिहू शकलो,व्यक्त होऊ शकलो. आणि विशेष म्हणजे ना भूतो ना भविष्यती!👇
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!