छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही कोनांना जोडणारी एकच रेषा म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
शहाजीराजे भोसले हे नाव जिथं जिथं घेतलं जातं त्यामागे राजमाता जिजाऊ आईचा त्याग आणि समर्पण याचा सिहांचा वाटा आहे.
ही शक्ती असते एका सहचारिणीची.
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यकर्ते झाले त्यासाठी त्यांना कधीही न मावळणारी प्रेरणास्त्रोत म्हणून राजमाता जिजाऊ आईचे बळ अखंडपणे मिळालं..ही ताकद असते एका आईची.
इतिहास गवाह है, जिजाऊ आई होती म्हणून छत्रपती स्वराज्य स्थापू शकले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विषय आला की स्वराज्यासाठी दुसरा छत्रपती घडवणारी एक वात्सल्याची मंगलमूर्ती, आज्जी म्हणजे काळजाचा विषय..त्याच आज्जीच्या ज्वाजल्य शिकवणीतून तावूनसुलाखून निघालेलं अस्सल रत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.
एखाद्या कार्यात तुला मरण आलं तरी मागे हटू नको असं सांगायला आईचं हृदय कोणत्या धातूंच असावं? अफजल भेटीवेळी ते जिजामाता छत्रपतींना सांगत्या झाल्या.." तुम्ही स्वराज्याच्या कामी आला तरी भीती बाळगू नका..तुमच्या पाठी मी शंभूराजेना छत्रपती बनविण आणि स्वराज्याची निर्मिती करीन."
हे पराकोटीचं धाडस व्याघ्रमुलाच्या ठायी यायला आईही त्याच धाडसाची वाघीण असायला हवी.
'प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच असते..जे पारतंत्र्यात आहेत त्यांना स्वातंत्र्य देणे.' ही शिकवण दोन्ही छत्रपतींच्या संस्कारात उतरवली.
त्यानंतरचा इतिहास हा सुवर्ण इतिहास बनला तो या संस्कारांनीच.
सदाचार,प्रेम आणि कर्तृत्व या तिन्ही आघाडीवर राजमाता तत्कालीन परिस्थितीला पुरून उरल्या..त्यामुळेच अखंड भारतीय उपखंडाचा इतिहास बदलवू शकणाऱ्या तिन्ही महापराक्रमी पुरुषांना त्यांचं कार्य शिताफीने पार पाडता आलं.
राजमाता जिजाऊ आई हे सगळं त्याकाळी करू शकल्या कारण आपण एक स्त्री आहोत हा न्यूनगंड न बाळगता ती एक शक्ती आहे हे त्यांनी ओळखलं.
मी वर म्हणलं तसं..राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, रमाआई, सरोजिनी, इंदिरा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स,
पिटी उषा लिस्ट बरीच मोठी आहे. या आजच्या युगातल्या जिजाऊच म्हणायला हव्यात.. पुरुषप्रधान संस्कृती असूनही त्यांनी कधी त्याचा अडसर होऊ घेतला नाही. ही तर त्याहून मोठी गोष्ट.
म्हणतात की भारतीय महिलांचं विश्व हे तीन 'प' पलीकडे नसतं.. हे सगळं वर उल्लेखलेल्या स्त्री ने खोटं ठरवलं.
ते तीन 'प' म्हणजे 'पिता, पती, पुत्र'.
मी नेहमी सांगतो.'स्त्रीला देवी मानण्याआगोदर तिला माणूस मानायला हवं.' तरच तिला मुक्त अवकाश मिळून अखंड समाजाचं जीवन 'बिगर आणि बेटर' असेल.
महिला दिन, मातृ दिन, बालिका दिन, जननी सुरक्षा अस बरंचस करून फारसा फरक पडत नाही हे आता पुरेसं सिद्ध झालंय.
गेले २-४ दिवस एक मुद्दा समाजमाध्यमातून गाजतोय..त्यातून एक गोष्ट नक्की झाली..आपण एक समाज म्हणून काही पुढारलेलो वगैरे नाही..स्त्री-पुरुष समानता यावर काम करण्यागोदर आपल्याला एक मूलभूत काम करावं लागेल.. ते म्हणजे 'तत्वांची मांडणी'
एक लोकशाही देश म्हणून काही तत्व असतात.
आपण योग्य मार्गाने लोकशाही स्थापन तर केली मात्र आपली मानसिकता तीच जुनी बुरसटलेली राहिली.त्यानं झालं काय?तर हातघाईवर येण्याची वृत्ती बळ धरती झाली.दुसरीकडे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून रहावं लागलं.कारण आपला मेंदू आपल्याला ऐकेनासा झाला.हे आत्ताच झालं असं नाही.
ती एक परंपराच होऊन गेलीय हे आपल्याला कळलं सुद्धा नाही.
आपल्याला गरज आहे म्हणून छत्रपती जन्माला येऊ शकत नाहीत..मुळात छत्रपती जन्माला येत नसतात..ते घडवावे लागत असतात ..कसे? ते राजमाता जिजाऊ आईने दाखवून दिलंय.
परवा आई ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली..व्हायला हवी ही ती.
पण, पुढे काय? हा प्रश्न आपण उत्तर मिळेपर्यंत विचारायला हवा स्वतःलाच.
एखाद्या गोष्टीचं उत्सवात रूपांतर झालं की त्यामागचा हेतू हा शुद्ध बाजारी होतो.हे इतिहास सांगतो.. आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वातून आपण काही शिकलो नाही तर ते कर्तृत्व असंच नामशेष होऊन आपल्या माथी फक्त उत्सव राहतील.
तसं घडू द्यायचं नसेल तर वेळीच सावध होऊन आपण पूर्वजांच्या कर्तृत्ववान कारकिर्दीतून योग्य तो धडा घ्यायला हवा.अन्यथा येणारा काळच आपल्याला अद्दल आणि धडा दोन्ही बेदरकारपणे शिकवेल.
त्यावेळी आपण आपली अब्रू वाचवू शकणार नाही.कारण तेंव्हा जिजाऊ आई नसेल..ती आपण अगोदरच मारलेली असेल.❤️
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड#म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?
९१च्या अर्थ सुधारणेनंतर भारतीयांच्या डोळ्यावर छान ब्रँडेड चष्मे आले.त्या चष्म्यातून दिसणारी भविष्य चित्रे फारच मोहक होती.त्याच चष्म्यातून काही वस्तुस्थितीदर्शक चित्रे कानाडोळा करून दुर्लक्षली गेली.त्यात महत्वाची दोन.एक जॉबलेस ग्रोथ आणि दोन अगोदरच गटांगळ्या खाणारी शेती. #थ्रेड#म
आज दिसणारी शेतीची अवस्था काही एका रात्रीत झाली नाही.. सत्तरच्या दशकापासून होणाऱ्या अवहेलनेला नव्वदनंतर जागतिक परिमाण भेटलं. त्यानंतरची शेतीची घसरण दिसायला जरी जुजबी वाटली तरी इंफ्लेशन चा विचार करता.. शेती म्हणजे जुगार आणि मरण्याचं तिकीट..ही अवस्था झाली.. सगळ्या जगभर हेच झालं.
अगदी अमेरिका फ्रांस अशा प्रगत राष्ट्रांतही शेती अधोगतीला जातीय..तिथंही सबसिडीज द्याव्या लागतच आहेत शेतकऱ्यांना..त्यातून तिकडेही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतच आहेत..
आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतकाच होता..की आपण कृषिप्रधान असूनही शेतीकडे दुर्लक्ष केलं.
पहाटेचा पहिला प्रहर..बेडरूममध्ये कोणाची तरी चाहूल लागली.. उघड्या खिडकीतून चंद्राची शीतल छाया..त्या छायेत माझ्याकडे पाठमोरा उभा होता तो.. अगोदर किलकिले असलेले माझे डोळे खाडकन उघडले..
मी विचारलं..आण्णा आलेत का?
हो, अंधारात बोट केलं..
अंधारात गडद आण्णा मला पाठमोरे दिसले.. #थ्रेड#म
खिडकीत उभा होता तो केशा.. आणि अंधारात होते ते आण्णा. हो, तेच देऊळ मधले..!
मी सरळ मुद्द्याला हात घातला..
काय केशा? कसं सुरुय शहरात? आणि आण्णा तुमचं बेंगलोर काय म्हणतंय?
मंगळूरात आणि शिटीत काय फरक न्हाय लगा.केशा बोलला,अण्णांनी केश्याला दुजोरा दिला.माझा प्रश्न कळला होता त्यांना.
मी म्हणलं होत तुम्हाला..मंगरूळ सोडू नका.भायर काय फरक न्हाय.उलट तुम्हाला त्रासच होईल.
हं बरोबर, आण्णा हताश वाटले.
पण मग हे सगळं एकसारखं..इथंबी तेच तिथंबी तेच,कुठवर चालणार? केशा संतापला.
मी त्याहून शांत मुद्रेनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणलं..
देवाचा बाजार उठत न्हाई तोवर हे असंच.
'No race can prosper till it learns there is as much dignity in tilling a field as in writing a poem.'
शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व या शब्दात सांगितलं होतं बुकर टी वॉशिंग्टनी.
'जय जवान जय किसान' हा आपला आवडता खेळ..जवान आणि किसान यांची अवस्था बरी म्हणावी अशीही नाही. #थ्रेड#म
भारतीय समाज कमालीचा भावनिक प्राणी..अगदी पहिल्यापासून.. याच भावनिकतेतून त्याने ज्याला ज्याला राजा किंवा देव/देवी संबोधलं त्याची वाताहत त्यानेच मन लावून केली..
इतिहास गवाह है..!
त्याने अखंड निसर्गाशी देवत्वाचं नातं जोडलं, पुढे निसर्ग कोपला हे ही त्यानेच ठरवलं..
यथावकाश स्त्रीला देवी मानण्याचे सत्कार्य त्याने उभारले.. आज जगाच्या पाठीवर धर्मांधळ्या मुस्लिम देशांनंतर भारतभूमीत स्त्रीस जास्तीत जास्त बेअब्रू केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
अलीकडे पंतप्रधानपदाला असत्य बोलणे हा शापच आहे..!
गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हात जोडून विनंती करताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती धडधडीत असत्य कशी काय बोलू शकते?
'आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार खर्च + ५०℅ नफा असा हमीभाव दिला.' हे ते असत्य. #थ्रेड#म
वास्तविक स्वामिनाथन आयोगात जो खर्च नमूद आहे त्यास C2 कॉस्ट म्हणतात.ज्यात सर्व खर्च नमूद असतात आणि केंद्राने हल्ली सांगितलेला हमीभाव आहे त्यात खर्च म्हणून फक्त 'मजुरी + निविष्ठा' हाच खर्च धरला आहे..या बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर असा हा खेळ. हे सरकार तो खेळ बिनदिक्कतपणे खेळत आहे.
दुसरी धादांत खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जातीय ती म्हणजे हमीभाव खरेदी फक्त पंजाब,हरियाणा आणि उत्तरप्रदेश इथंच होते.. आणि आत्ता फक्त 6 टक्के शेतकरी त्याचा लाभ उठवत आहेत..नव्या कायद्याने मुक्त बाजारपेठ आली की सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.