पहाटेचा पहिला प्रहर..बेडरूममध्ये कोणाची तरी चाहूल लागली.. उघड्या खिडकीतून चंद्राची शीतल छाया..त्या छायेत माझ्याकडे पाठमोरा उभा होता तो.. अगोदर किलकिले असलेले माझे डोळे खाडकन उघडले..
मी विचारलं..आण्णा आलेत का?
हो, अंधारात बोट केलं..
अंधारात गडद आण्णा मला पाठमोरे दिसले.. #थ्रेड#म
खिडकीत उभा होता तो केशा.. आणि अंधारात होते ते आण्णा. हो, तेच देऊळ मधले..!
मी सरळ मुद्द्याला हात घातला..
काय केशा? कसं सुरुय शहरात? आणि आण्णा तुमचं बेंगलोर काय म्हणतंय?
मंगळूरात आणि शिटीत काय फरक न्हाय लगा.केशा बोलला,अण्णांनी केश्याला दुजोरा दिला.माझा प्रश्न कळला होता त्यांना.
मी म्हणलं होत तुम्हाला..मंगरूळ सोडू नका.भायर काय फरक न्हाय.उलट तुम्हाला त्रासच होईल.
हं बरोबर, आण्णा हताश वाटले.
पण मग हे सगळं एकसारखं..इथंबी तेच तिथंबी तेच,कुठवर चालणार? केशा संतापला.
मी त्याहून शांत मुद्रेनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणलं..
देवाचा बाजार उठत न्हाई तोवर हे असंच.
आरं पण ह्यो बाजार उठवायचा कुणी? केशा जास्तच संतापला.
मी काही बोलणार इतक्यात..परिस्थिती बघून आण्णा पुढं झाले..
केशा मी म्हणलवत ना.. 'श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप बारीक रेष असते..ती रेष ज्याला दिसते त्याने तो बाजार उठवायचा..'
केशा थोडासा इरमला..
अण्णांनी मला खुनवलं,मी पुढं झालो.
केशा,आज तुला तिथं नेलं तर खोडात खरंच देव दिसतील का? मी केशाच्या खांद्यावर हात टाकत बोललो..
केशाने माझ्याकडं पाहिलं..आण्णाकडे पाहिलं.. खाली मान घालत नाही म्हणला.
'तुला ते आता तिथं दिसणार नाहीत.कारण, तुला तुझा देव अगोदरच सापडलाय.' मी पुढं बोलू लागलो..तुझ्या डोळस श्रद्धेने झालं हे.
पहिल्यापासून हेच सांगतोय मी यांना.. आण्णा उद्गारले.
'बरोबर होतं आण्णा तुमचं.. पण शंभर टक्के नाही.'
आण्णा आणि केशा विस्फारलेल्या नजरेनं बघू लागले माझ्याकडं..
'भाऊ म्हणले होते तुम्हाला..सगळीकडं समान डेव्हलपमेंटचा समतोल राखायला पायजेल.' तुम्ही बेंगलोरला गेला..बाकी गावकऱ्यांचं काय?
त्यांच्या उदरनिर्वाहाच काय? आण्णा माझे शब्द तोडत..बोलले..' पण देव देव करून त्याच बाजारात रूपांतर..' मी हात केला..आण्णा थांबले..
'तेच घासून गुळगुळीत झालेली शब्दसेवा कुठवर करायची आण्णा..देवाचा बाजार करायचा नाही हे बरोबर पण दुसरा पर्याय काय?' माझ्या प्रश्नाने आण्णा स्तब्ध झाले.
केशाला हायस वाटलं.आता त्याची चूक कशामुळ मानली हे आता त्याला कळत होतं.कान देऊन तो ऐकू लागला.
'आण्णा एकूण सामाजिक स्तर जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत पर्याय उभं राहणं कठीण..लोकांकडे योग्य आणि किफायतशीर दुसरा पर्याय नाही म्हणून लोकं अंधश्रद्धा पाळतात.' अण्णांनी सहमतीदर्शक मान डोलवली.
'लोकांना त्यांच्या श्रद्धेचा उपयोग अंधश्रद्धेसाठी न करता मानसिक पाठबळ मिळवण्यासाठी कसा करावा हे शिकवलं पाहिजे..' केशा उत्साहात बोलला.. आम्ही दोघांनी मान डोलवली.
'सुरुय बरं..'
मी स्मित करत उद्गारलो..अण्णांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मला छातीशी कवटाळलं..डोक्यावर मायेचा हात फिरवत म्हणले..'तुला देव सापडलाय..तुझं वाईट चाललेलं असलं तरी तुला बरंच वाटणार नेहमी..'
मी हसत राहिलो.
केश्याला कळेना देव सापडला म्हणजे काय?
मला कळलं ते.
मी आण्णाकडे बघितलं.
आण्णा बोलले..' केशव, देवाला न शोधणे म्हणजेच देव सापडणे होय..!'
'ह्येजा आयला..' केशा डोकं खाजवत हसू लागला..
अण्णांनी पोवा काढला..डोळे बंद करत अण्णांनी छातीच्या पिंजऱ्यात हवा भरली..हळुवारपणे ओठातून फुंकर बाहेर पडली..पहिल्याच सुराने मनभरून ओसंडून वहायला लागलं..
मला त्यातच मंत्रमुग्ध होत डोळा लागला.. पाचचा अलार्म वाजू लागला..मला जाग आली..घरासमोरील देवळात जागर सुरू झालेला.. त्याचा नाद आसमंतात घुमत राहिला..
९१च्या अर्थ सुधारणेनंतर भारतीयांच्या डोळ्यावर छान ब्रँडेड चष्मे आले.त्या चष्म्यातून दिसणारी भविष्य चित्रे फारच मोहक होती.त्याच चष्म्यातून काही वस्तुस्थितीदर्शक चित्रे कानाडोळा करून दुर्लक्षली गेली.त्यात महत्वाची दोन.एक जॉबलेस ग्रोथ आणि दोन अगोदरच गटांगळ्या खाणारी शेती. #थ्रेड#म
आज दिसणारी शेतीची अवस्था काही एका रात्रीत झाली नाही.. सत्तरच्या दशकापासून होणाऱ्या अवहेलनेला नव्वदनंतर जागतिक परिमाण भेटलं. त्यानंतरची शेतीची घसरण दिसायला जरी जुजबी वाटली तरी इंफ्लेशन चा विचार करता.. शेती म्हणजे जुगार आणि मरण्याचं तिकीट..ही अवस्था झाली.. सगळ्या जगभर हेच झालं.
अगदी अमेरिका फ्रांस अशा प्रगत राष्ट्रांतही शेती अधोगतीला जातीय..तिथंही सबसिडीज द्याव्या लागतच आहेत शेतकऱ्यांना..त्यातून तिकडेही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतच आहेत..
आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतकाच होता..की आपण कृषिप्रधान असूनही शेतीकडे दुर्लक्ष केलं.
'No race can prosper till it learns there is as much dignity in tilling a field as in writing a poem.'
शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व या शब्दात सांगितलं होतं बुकर टी वॉशिंग्टनी.
'जय जवान जय किसान' हा आपला आवडता खेळ..जवान आणि किसान यांची अवस्था बरी म्हणावी अशीही नाही. #थ्रेड#म
भारतीय समाज कमालीचा भावनिक प्राणी..अगदी पहिल्यापासून.. याच भावनिकतेतून त्याने ज्याला ज्याला राजा किंवा देव/देवी संबोधलं त्याची वाताहत त्यानेच मन लावून केली..
इतिहास गवाह है..!
त्याने अखंड निसर्गाशी देवत्वाचं नातं जोडलं, पुढे निसर्ग कोपला हे ही त्यानेच ठरवलं..
यथावकाश स्त्रीला देवी मानण्याचे सत्कार्य त्याने उभारले.. आज जगाच्या पाठीवर धर्मांधळ्या मुस्लिम देशांनंतर भारतभूमीत स्त्रीस जास्तीत जास्त बेअब्रू केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
अलीकडे पंतप्रधानपदाला असत्य बोलणे हा शापच आहे..!
गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हात जोडून विनंती करताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती धडधडीत असत्य कशी काय बोलू शकते?
'आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार खर्च + ५०℅ नफा असा हमीभाव दिला.' हे ते असत्य. #थ्रेड#म
वास्तविक स्वामिनाथन आयोगात जो खर्च नमूद आहे त्यास C2 कॉस्ट म्हणतात.ज्यात सर्व खर्च नमूद असतात आणि केंद्राने हल्ली सांगितलेला हमीभाव आहे त्यात खर्च म्हणून फक्त 'मजुरी + निविष्ठा' हाच खर्च धरला आहे..या बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर असा हा खेळ. हे सरकार तो खेळ बिनदिक्कतपणे खेळत आहे.
दुसरी धादांत खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जातीय ती म्हणजे हमीभाव खरेदी फक्त पंजाब,हरियाणा आणि उत्तरप्रदेश इथंच होते.. आणि आत्ता फक्त 6 टक्के शेतकरी त्याचा लाभ उठवत आहेत..नव्या कायद्याने मुक्त बाजारपेठ आली की सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजार समितीसाठी नवीन कायदा करणे हा तोडगा निघू शकतो.पण सरकार फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून आला दिवस ढकलत आहे.दुसरीकडे आंदोलकात फूट पाडणे किंवा आंदोलनाचा जनाधार संपवणेसाठी सरकार प्रयत्नात आहे.केंद्राचे महाराष्ट्रातील ऊस पॅकेज हे त्याचे उदाहरण. #थ्रेड#म
दुसरीकडे फेसबुक सारख्या भाट समाजमाध्यमांस हाताशी धरून वेगळाच द्वेष भारतीय समाजात पसरवण्याचे काम सुरुय. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे हे त्याचं उदाहरण..
चर्चा आणि शास्त्रशुद्धता याबाबत सदर सरकारचा वकुब हा अतिशय गंभीर आहे. हे 2014 पासून देश पहातच आहे.
आपल्या देशातील संविधानिक संस्थांची जी काही मोडतोड झालीय त्याबद्दल कुठेही वाच्यता होणार नाही याची दखल सरकारने मीडियाला हाताशी धरून घेतलेलीच आहे.. आज जागतिक बाजारात इंधन दर कमी असूनही आपण त्यासाठी पेट्रोलला 90₹/लिटर तर डिझेलला 80 ₹/लिटर मोजत आहोत.
हे वाक्य आहे जॉन ऍडम यांचं.
सांप्रतकाळी ऍडम जर जिवंत असता तर त्याने भारतीय लोकशाही बघून स्वतःस देहदंडाचे प्रायश्चित घेतले असते. कारण आपली लोकशाही ऐपत.
लोकशाहीचे पॅरोडी अकाउंट असते तर त्याचेही पॅरोडी अकाउंट म्हणजे आपली लोकशाही.
हल्ली एक बरंय.. रिअल आणि ओथेंटीक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नसल्याने सर्व काही सुखेनैव चाललं असल्याचं स्वप्न भारतीय जनमनात आहे. ते स्वप्न पडलं कारण भारतीय जन गुंगीत आहेत.. ती गुंगी आहे एकामागून एक येत असलेल्या आणि भारतीयांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेल्या प्रॉपगेंडा शृंखलेची.
भारतीय समाज हा असमाधानी आहे..त्यास आता कितीतरी दशके लोटली.. या असमाधानाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम गेले दशकभर अविरत सुरू झाले.. त्यातही काहीएक नियमितपणा ठेवला गेला.. आपण किती लायक आहोत हे दाखवण्यासाठी समोरचा किती नालायक आहे..हे दाखवणे भारतात क्रमप्राप्त असते.
"या देशाचे संविधानकर्ते इतिहासात कोणासमोर झुकले नाहीत, वर्तमानात आम्हीही उद्योगसम्राटांसमोर झुकू हे शक्य नाही." अमेरिकेत रिपब्लिकनचे सिसिलिन बोलत होते.
जगातल्या चार बड्या उद्योगपतींना अक्षरशः 'घेण्याचा' कार्यक्रम सुरू होता.
हे भांडवलशाही देशात होत होतं. #मानवाधिकार#थ्रेड#म
एरवी ते चार उद्योगमहारथी साधे शिंकले जरी तरी जागतिक बाजारास थंड ताप येईल. ते काही अघटित बोलले तर जागतिक बाजार अंथरून धरेल..एवढी ताकद त्या चौघांकडे.
पण त्यादिवशीच्या कार्यक्रमात ते स्वतःस कपाळकरंटे बनवून..कपाळावरील घाम टिपण्यात व्यस्त होते. तोंडात मूग होते ते निराळच..
ते चौघे.टिम कुक, सुंदर पिचाई,जेफ बेझोस आणि मार्क झुकेरबर्ग, त्यांचे उद्योग अनुक्रमे ऍपल, गुगल, अमेझॉन, फेसबुक.
या चारांनी आपल्या ताकदीचा वापर प्रतिस्पर्ध्याला संपवणे आणि स्वतःची मोनोपॉली तयार करण्यासाठी केला का? याची यथासांग चौकशी सुरू होती.अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या उपसमिती समोर.