ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
Bunge Ltd.
१८१८ ला जन्मलेली..हिचं हेडक्वार्टर आहे NY ला. जगभरात जवळपास तीसेक हजार एम्प्लॉय आहेत हिचे. ऑइलसीड आणि ग्रेन्स यांचं काढणीनंतर नियोजन करते ही. ७० हजार शेतकऱ्यांकडून पीक घेते आणि जगभर आपल्या नेटवर्कद्वारे पोहचवते. साडेतीनशे पोर्ट टर्मिनलवरून पॅकेजिंग सेवा असते हिची.
Cargill ltd.
जवळपास दीडेकशे वर्ष ही कंपनी काम करते agril आणि मार्केटिंग क्षेत्रात.७० देशातून दीड लाख कर्मचारी राबतात हिच्या हाताखाली.सव्वाशेहुन जास्त देशात हिचे ग्राहक आहेत.शेतकऱ्यांना मार्केटशी आणि ग्राहकाला अन्नाशी गाठ घालून देणे हे कर्तव्य मानते ती.सेफ नरीशिंग हे काम मानते ती.
Louis Dreyfus ltd.
१८५१ पासून ही कंपनी हे उद्योग करते. इकडून घ्यायचं - इकडे द्यायचं. Grains & Oilseeds, Coffee, Cotton, Juice, Rice, Sugar इ. अन्नधान्याचा बाजार करते ही. एका वर्षभरात जवळपास ५०० मिलियन लोकांना ८० मिलियन टन अन्नधान्य पुरवते ती. यासाठी शंभरेक देशात १८ हजारजन राबतात.
COFCO int ltd.
चायनीज कंपनी आहे ही. पन्नासेक देशात व्यापार करते ही. ३५ देशातून ११००० लोकं राबतात हिच्यासाठी. आत्ता २०१८ ला १०० मिलियन टन कमोडिटीज पुरवल्या हिने.. $ ३१ बिलीयन एवढा महसूल गोळा केला हिने.
विशेषतः अमेरिका आणि युरोप खंडात हि व्यापार उदीम करते.
Glencore ltd.
३५ देशांत तेरा हजार एम्प्लॉय आहेत हिचेही.. इतरांसारखं ही ही तेच उद्योग करते.
वर सांगितलेल्या सगळ्या कंपन्या कमीजास्त प्रमाणात origination, handling, processing and marketing हाच उद्योग करतात. थेट शेती या करत नाहीत. तरीही जगाच्या ८० ते ९० टक्के पुरवठा या करतात.
आपल्या भारतात नवीन कृषी कायद्याची धडपड ही यासाठी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक कार्पोरेटला भिडण्यासाठी भारतीय कंपन्यांचे हात बळकट करावे लागतील.. ते हात अदानी, अंबानीचे आहेत कारण तेच कार्पोरेट मध्ये मोनोपॉली बनवून ठाण मांडून बसलेले आहेत.
भारतात येऊ घातलेल्या लाखो कोटी डॉलरची गुंतवणूक ही शेती क्षेत्राला संजीवनी ठरू शकते पण त्याअगोदर शेती क्षेत्र हे कार्पोरेटला जोडण्याचे ध्येय गाठण्यासाठी हे कायदे सरकारने आणल्याचं दिसतं.कारण भारतातील शेती तुकडीकरनामुळे थेट गुंतवणूक येथे शक्य नाही दुसरीकडे कार्पोरेटला जमीन ही मिळेल.
गुंतवणुकीला लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून जबरदस्ती घेऊ शकत नाही.त्यामुळे शेतीच पिकवण्यासाठी लायक नाही ठेवली तर शेतकरी जमिनी विकतील. त्यातून कार्पोरेटला जमीन आणि उद्योगात राबण्यासाठी स्वस्त मनुष्यबळ हे दोन्ही उपलब्ध होईल हाही तर्क असू शकतो.त्यामुळेच MSP ची अट मान्य होताना दिसत नाही.
वर उल्लेखलेल्या कंपन्यांची जोखीम क्षमता, साठवणूक क्षमता, वाहतूक व्यवस्था आणि सर्वात महत्वाचं किंमती मॅनिप्युलेट करण्याची ताकद या सगळ्यामुळे अन्नधान्य बाजारात या कंपन्या स्वस्त धान्य विकू शकतात.. त्यामुळे इतर लहानसहान शेतकरी यांच्यासमोर टिकाव धरत नाहीत. आफ्रिकन देशात हेच झालंय.
आपल्यात दर पाच वर्षात येणारी निवडणूक आणि त्यामुळे अपवादाने येणारे नवीन सरकार यातील धोरणसातत्य राखू शकत नाहीत. आत्ता आलेलं सरकार यांच्याकडे कुठल्याही क्षेत्राबाबत कुठलेही धोरण निश्चित नाही.. मागच्या सरकारचा धोरण विरोध हेच एकमेव धोरण गेली ७ वर्ष देश अनुभवतोय.
या सगळ्या घडामोडींचा सुज्ञांनी अर्थान्वय मांडायला हवा. वर सांगितल्याप्रमाणे या कंपन्यांची मोनोपॉली एकदा का तयार झाली की बाजारातील विविधता आणि ग्राहकांचे निवड स्वातंत्र्यही धोक्यातच येणार आहे.
सदरचे कायदे निर्माण करताना या सगळ्याचा सारासार विचार झाल्याचं दिसलंच नाही.
हल्लीचे कायदे काही प्रमाणात योग्य होते..पण त्यामागील हेतू दृष्ट असल्यानं आणि त्यातील सुरक्षिततेला कायद्याचं अधिष्ठान नसल्याने सरकारने जंगजंग पछाडूनही शेतकरी बधले नाहीत.
आत्ताचे कायदे लोकशाही मार्गाने संसदेत साधकबाधक चर्चा घडवून पास करावेत तरच ते जनताही आपलेसे करील.
मी म्हणेल तीच पूर्वदिशा हा अहंभाव काहीकाळ ठीक..इतर सहकारीही तो अहंभाव फारकाळ खपवून घेणार नाहीत..हे NDA तील घटकपक्षांनी दाखवून दिले आहे.
तुमच्या पूर्वाश्रमीच्या कृतज्ञतेची वाहवा वर्तमानात ठीक पण तुम्ही तेच गुगळत बसलात तर भविष्यकाळ स्वतः नियतीच्या रूपाने सूड उगवल्याशिवाय रहात नाही.
समाजात तेढ-दुही बद्दल ही तेच होऊ शकतं.दुसऱ्याचं तोंड काळे करण्यापूर्वी आपले हात काळे होतात हा धडा आहे सरकारला.त्यातून बोध नाही घेतला तर काळवंडून गेलेला चेहरा स्वतःची पत तर ढासळवेलच आणि त्यावेळी तुम्ही कुठल्याही धर्माचे रक्षक म्हणवून जरी घेतले तरी जनता त्यास केराची टोपली दाखवेल.❤️
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड#म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?
९१च्या अर्थ सुधारणेनंतर भारतीयांच्या डोळ्यावर छान ब्रँडेड चष्मे आले.त्या चष्म्यातून दिसणारी भविष्य चित्रे फारच मोहक होती.त्याच चष्म्यातून काही वस्तुस्थितीदर्शक चित्रे कानाडोळा करून दुर्लक्षली गेली.त्यात महत्वाची दोन.एक जॉबलेस ग्रोथ आणि दोन अगोदरच गटांगळ्या खाणारी शेती. #थ्रेड#म
आज दिसणारी शेतीची अवस्था काही एका रात्रीत झाली नाही.. सत्तरच्या दशकापासून होणाऱ्या अवहेलनेला नव्वदनंतर जागतिक परिमाण भेटलं. त्यानंतरची शेतीची घसरण दिसायला जरी जुजबी वाटली तरी इंफ्लेशन चा विचार करता.. शेती म्हणजे जुगार आणि मरण्याचं तिकीट..ही अवस्था झाली.. सगळ्या जगभर हेच झालं.
अगदी अमेरिका फ्रांस अशा प्रगत राष्ट्रांतही शेती अधोगतीला जातीय..तिथंही सबसिडीज द्याव्या लागतच आहेत शेतकऱ्यांना..त्यातून तिकडेही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतच आहेत..
आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतकाच होता..की आपण कृषिप्रधान असूनही शेतीकडे दुर्लक्ष केलं.
पहाटेचा पहिला प्रहर..बेडरूममध्ये कोणाची तरी चाहूल लागली.. उघड्या खिडकीतून चंद्राची शीतल छाया..त्या छायेत माझ्याकडे पाठमोरा उभा होता तो.. अगोदर किलकिले असलेले माझे डोळे खाडकन उघडले..
मी विचारलं..आण्णा आलेत का?
हो, अंधारात बोट केलं..
अंधारात गडद आण्णा मला पाठमोरे दिसले.. #थ्रेड#म
खिडकीत उभा होता तो केशा.. आणि अंधारात होते ते आण्णा. हो, तेच देऊळ मधले..!
मी सरळ मुद्द्याला हात घातला..
काय केशा? कसं सुरुय शहरात? आणि आण्णा तुमचं बेंगलोर काय म्हणतंय?
मंगळूरात आणि शिटीत काय फरक न्हाय लगा.केशा बोलला,अण्णांनी केश्याला दुजोरा दिला.माझा प्रश्न कळला होता त्यांना.
मी म्हणलं होत तुम्हाला..मंगरूळ सोडू नका.भायर काय फरक न्हाय.उलट तुम्हाला त्रासच होईल.
हं बरोबर, आण्णा हताश वाटले.
पण मग हे सगळं एकसारखं..इथंबी तेच तिथंबी तेच,कुठवर चालणार? केशा संतापला.
मी त्याहून शांत मुद्रेनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणलं..
देवाचा बाजार उठत न्हाई तोवर हे असंच.