आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वतंत्र; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन #म
देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.❤
राष्ट्रीय सणांच्या दिवशीच न्हवे तर रोजच्या रोज पारायण करायचा ऐवज म्हणजे ही राज्यघटनेची प्रस्तावना..
सध्याचा काळ एक लोकशाही देश म्हणून फार वाईट आहे. त्याला त्यातून फक्त लोकशाही मूल्यांची रुजवणच वाचवू शकते...कळावे..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #HappyRepublicDay2021
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड#म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?
९१च्या अर्थ सुधारणेनंतर भारतीयांच्या डोळ्यावर छान ब्रँडेड चष्मे आले.त्या चष्म्यातून दिसणारी भविष्य चित्रे फारच मोहक होती.त्याच चष्म्यातून काही वस्तुस्थितीदर्शक चित्रे कानाडोळा करून दुर्लक्षली गेली.त्यात महत्वाची दोन.एक जॉबलेस ग्रोथ आणि दोन अगोदरच गटांगळ्या खाणारी शेती. #थ्रेड#म
आज दिसणारी शेतीची अवस्था काही एका रात्रीत झाली नाही.. सत्तरच्या दशकापासून होणाऱ्या अवहेलनेला नव्वदनंतर जागतिक परिमाण भेटलं. त्यानंतरची शेतीची घसरण दिसायला जरी जुजबी वाटली तरी इंफ्लेशन चा विचार करता.. शेती म्हणजे जुगार आणि मरण्याचं तिकीट..ही अवस्था झाली.. सगळ्या जगभर हेच झालं.
अगदी अमेरिका फ्रांस अशा प्रगत राष्ट्रांतही शेती अधोगतीला जातीय..तिथंही सबसिडीज द्याव्या लागतच आहेत शेतकऱ्यांना..त्यातून तिकडेही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतच आहेत..
आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतकाच होता..की आपण कृषिप्रधान असूनही शेतीकडे दुर्लक्ष केलं.