माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.
एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
कोणत्याही प्रवासात सहकुटुंब निघो वा एकटे बाबांनी चोरखिशात कायम एक ठराविक रक्कम ठेवायची सवय लावली. अगदी शेवटच्या वेळीच,कठीण काळातच त्याचा वापर करायचा.
लहाणपणी बऱ्याचवेळा विविध स्पर्धांसाठी तालुक्याच्या, जिल्ह्यांच्या ठिकाणी जायचो ३/१४
आईबाबा जाताना २० ते ५० पन्नास रूपये द्यायचे. (त्यात महत्वाची सुचना असायची - जास्तीत जास्त बचत करून परत घरी आणायचे)
त्यात सुट्टे ५ -१० रूपये वेगळे असायचे, काही खाऊ वाटले तर खर्च करण्यासाठी. मग बाकीचे पॅंटच्या खिशात, पाकिटात, बॅगेत आणि महत्वाचा Emergency fund चोरखिशात... ४/१४
ती सवय लहानपणी लागली ती आजतागायत... अगदी कोणत्याही व्यावसायिक प्रवासाची सूरूवातही आम्ही अशाच प्रकारे करतो.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण कोणत्याही जागतिक दर्जाच्या Wealth Management कंपनीचा आणि #आर्थिकसाक्षरता या विषयांमधील #गुंतवणुक या सदराचा हाच महत्वाचा पाया आहे. ५/१४
आपल्याकडे जे पैसे असतात ते कधीही एकाच ठिकाणी न ठेवता किंवा गुंतवता ते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या प्रकारात गुंतवायला हवेत. जर आपण एकाच ठिकाणी ते ठेवले/गुंतवले आणि न जाणो काही संकट आले तर तुमचे १००% खुप वाईट पद्धतीने नुकसान होते.
या कोरोना संकटात कित्येक उद्योग जे फक्त ६/१४
एकाच प्रकारच्या व्यवसायावर अवलंबून होते त्यांचे आतोनात हाल झाले.
उदाहरणादाखल पर्यटन क्षेत्र अथवा हॅाटेल व्यवसाय घ्या अगदी शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात (कुक्कुटपालन) अशा एकाच प्रकारच्या उत्पन्नात खुप धोके असतात..
हे नुकसान टाळायचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे ७/१४
“Don’t Put all your eggs in one basket” हे कायम लक्षात असूद्या. हे करताना सर्वप्रथम आपल्याकडे असलेल्या पैशांमधून Emergency Fund, Family Health Insurance, Self Term insurance आणि काही फिक्स्ड डिपॉझीट झाल्यानंतर बरेच गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध असतात.
त्यात कोणी सोनेचांदी,जमीन ८/१४
शेती, फळबागा, दुकाने किंवा इतर मालमत्ता विकत घेतात. कोणी म्युचुअल फंड,शेअरमार्केट, ब्रोकर, सरकारी बॅांडस किंवा अगदी स्टार्टअप फंड मध्येही हल्ली गुंतवणुक करतात.
जर तुमच्या व्यवसाय असेल तर कधीच एकाच प्रोडक्टवर, एकाच ठराविक माणसावर, सप्लायरवर किंवा कस्टमरवर अवलंबून राहू नये. ९/१४
हे तत्व जर तुम्ही पाळले नाही तर एक ना एक दिवस संकट तुम्हाला खिंडीत गाठतेच!
कोणी कशात गुंतवणुक करावी हा खरतर फार वैयक्तिक आणि स्वत:कडे असलेल्या “धोके पत्करण्याची क्षमता” आणि ते “पचविण्याच्या मानसिक व आर्थिक बळावर” अवलंबून असते. यात महत्वाचा मुद्दा हाच की यापैकी किंवा इतर
१०/१४
कोणत्याही ठिकाणी पैसे लावताना ते एकाच ठिकाणी न लावता दोन - तीन वा अधिक ठिकाणी गुंतवावे म्हणजे अगदी कोणत्याही एका क्षेत्रात मंदी अथवा नुकसान झाले तरी फारसा फरक पडत नाही.
Diversification आणि मोठे निर्णय घेताना तज्ञांची मदत घ्यायलाच हवी आणि जर एकाच क्षेत्रात आपल्याला सर्व ११/१४
पैसे गुंतवायचे असतील तर त्या क्षेत्रात संपुर्णपणे झोकून देऊन, ज्ञान घेऊन, प्रसंगी सिंहगडाच्या लढाईसारखे “कड्यावरील परतीचे दोर कापल्याने कड्यावरून उडी मारून जीव द्यायचा किंवा शत्रूसैन्यांना कापून विजयी व्हायचे”असा एकमेव मार्ग उरतो.
यात जेवढा मोठा धोका, तेवढाचा मोठा फायदाही १२/१४
असतो. अशा कामांसाठी प्रचंड जिद्द, प्रखर आशावाद, फोकस, सतत २४ तास कामात गर्क, कुशाग्र बुद्धी आणि सोबत नशीबाची साथ असावी लागते.
पुढील काही आठवड्यात आपण यापैकी नक्की कोणती गुंतवणुक कधी आणि कशी करावी याबद्दल चर्चा करूच तोपर्यंत आहेत त्या पैशांचे किंवा जे येतील त्याची वर्गवारी १३/१४
करून ठेवा.
हे पैशांचे नियोजन करायला एकदा शिकलो कि #आर्थिकसाक्षरता आणि गुंतवणुकीचा महत्वाचा धडा आपण सहजच शिकू.
माझ्यासाठी हे लिखाण म्हणजे तरूणांसाठी #GiveItBack आहे, तुम्हाला भावले, रूचले तर इतरांनाही आर्थिक नियोजनाचे महत्व जरूर सांगा. 🙏
१४/१४
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.
मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.
परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..
तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.
साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो.
इकडचे जागेचे दर ऐकून आम्हाला हादरा बसत होता, ROI यायलाही पाच वर्षाचा काळ त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती. #SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/१२
फॅक्टरी, मशीनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि “आपली २४ उपलब्धतता” यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असणे याला प्राथमिकता देत होतो पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नव्हते या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आणि तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प
२/१२
पुण्यात जर टाकला तर बराच खर्च कमी होईल.
तेंव्हा पुण्याला फॅक्टरी ही तशी परीक्षाच होती. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरींग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी जरी चूक घडली तरी तुम्ही सहज संपून जावू शकता.
वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.
मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने #SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/२१
मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती.
काय करावे?कसे करावे? अशा विचारात सर्वच होते, आजूबाजूचेही जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही बॅचलर!
लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच 😉 विचित्र त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही याची खात्री!
२/२१
बरं नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला कि आपण वर्गणी काढून टिव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया!