एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.
नेमका तोच गोंधळ नोटबंदी,GST आणि कोरोना पश्चात अर्थ हाताळणीत सरकारने घातला हे आता पुरेसं सिद्ध झालंय.
त्या गोंधळाचा परिपाक म्हणजे खपाटीला गेलेली सरकारी तिजोरी आणि तीच तिजोरी भरण्यासाठी सरकारने सामान्यांच्या खिशावर मारलेला इंधन डल्ला.
जागतिक स्तरावर दर ढासळले तरी ही परिस्थिती आहे.
काल परभणीत पेट्रोल ९६.५८₹ तर डिझेल ८५.७२₹ प्रतिलीटर होतं.
देशात गेल्या दहा महिन्यात पेट्रोल जवळपास १८₹ आणि डिझेल जवळपास १६₹ प्रतिलीटर महागलंय.
एवढं महाग होऊनही केंद्र आणि राज्य सरकारचा इंधन दर आवाक्यात आणण्याचा कुठलाही विचार नाहीय. कारण स्वकर्माने भिकेस लागलेली सरकारं.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दर पूर्वरत होतायत, ते $६१ प्रति पिंप आलेत.त्यात अजून वाढच होण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत दर कमी करणे सरकारला परवडणार नाही आणि त्यास ते झेपणार ही नाही. कारण, इतर मार्गाने येणारं सरकारी उत्पन्न हे पुरेसं नाही.त्यासाठी ही इंधन दरवाढ.
'आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणा'(IEA)ने परवा इंधन भविष्य आणि भारत याबाबत माहिती दिली ती भारतासाठी धक्कादायक असेल.जर असे निर्बुद्ध कारभारी देश चालवणार असतील तर.
भारत आपली ऊर्जा भूक भागवण्यासाठी कोळसा आणि खनिजतेलावर अवलंबून आहे.माहितीनुसार त्यात २०३० सालापर्यंत थेट ३५ टक्के वाढ होईल.
आत्ता जागतिक तेल उत्पादन आहे प्रतिदिन ८०.७ लाख बॅरेल्स.. २०४० साली एकट्या भारताला ८० लाख बॅरेल्स एवढं तेल लागेल असं IEA म्हणते. सध्या आपल्या तेल भुकेच्या ८०% तेल आयात करतो.. २०४० पर्यंत ती आयात ९०% होईल. तेंव्हाचे दर जरी आत्ताप्रमाणे $६०/बॅरेल राहिला तरी आपल्याला अंदाज येईल.
आपली नैसर्गिक वायू भूक ही या काळात तिप्पट वाढेल ती २०१०० कोटी m^३ वर्षाला असेल. सध्या २०% आयातीची गरजही या काळात ६०% पर्यंत वाढेल.
येत्या २० वर्षात भारतात मुंबईच्या आकाराची अजून १३ शहरं तयार होतील. त्यांची इंधन भूक महाकाय असेल..
ती भागवण्यासाठी आपलं सरकार काय करतंय?
ती इंधन भूक भागवायला आपल्याला $८.६ लाख कोटीची गरज लागेल.. सरकारकडे काय योजना आहे तो पैसा उभा करण्याची?
आपला विकासदर चढा राहणार ही खरी गोष्ट..त्यासाठी आपल्याला भविष्यात जगातील तेलाच्या २५% वाटा फस्त करावा लागणार असाही हा अभ्यास सांगतो. एकेकाळी अमेरिका तेवढा वाटा खायची..
पण आपल्यात आणि अमेरिकेत मूलभूत फरक हा की, अमेरिका त्याकाळी जागतिक औद्योगिक उत्पादनात एकहाती २५% भर ही घालत होती.आज आपण कितीही कुंथलो तरी आपली आर्थिक आघाडीवर आणि जागतिक स्तरावर दखलपात्र ताकद किती हे जगजाहीर आहे.
आजपर्यंत जो काळ गेला तो गेला इथून पुढं काय नियोजन? हा आता प्रश्न आहे.
निर्गुंतवणूक आणि खाजगीकरण याबाबत भांडवली अर्थशास्त्र सकारात्मकच आहे..पण सध्या देशात जे काही वातावरण आहे.. त्यातून जो काही बोध घ्यावा..तो निश्चितच लोकशाही देशास भूषणावह म्हणता येणार नाही.. याची सुज्ञांनी दखल घ्यायला हवी.
सरकार काही आकाशातून पडले नाही..ते जनतेने निवडले आहे.
आता सरकार मागे न लागता..जनतेस व्यवहारसाक्षर करणे ही काळाची गरज आहे. ती साक्षरता शिकवण्यासाठी सध्याचा काळ सर्वोत्तम असेल.. सगळ्या आघाड्यावर सरकार उघडं पडत असताना आणि ओथेन्टिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन सरकारकडून बंद असताना आपली जबाबदारी अजूनच वाढते. कळावे.❤️
'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड#म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?