'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
कोरोनाकाळात डिजिटल राहणीला सरावल्या गेलेल्या जनतेला कळलं ही नाही की, 'डिजिटल डिव्हायड' ला आपण हातभार लावतोय ते. या असमानते विरुद्ध काही ठोस पावले न उचलल्यास भविष्यात ही दरी अधिकच वाढत जाऊन गंभीर रूप धारण करेल. ऍपलचे कुक मागे म्हणाले त्याप्रमाणे डिजिटल यंत्रणा दुधारी तलवार आहे.
सामान्य माणसाच्या विचारशक्तीवर प्रभाव टाकण्याची क्षमता आजच्या डिजिटल यंत्रणेत आहे. त्याच यंत्रणेची सूत्रं काही 'दुनिया मुठ्ठीमे' घेऊ पाहणाऱ्याच्या आणि त्याच्या चौकीदाराच्या हातात गेल्यावर काय होऊ शकतं याची झलक शेतकरी आंदोलनाच्या(इंटरनेटबंदी) निमित्ताने भारतीयांनी अनुभवली आहे.
हा रिपोर्ट अजून एका आगामी धोक्याकडे लक्ष वेधून घेतो. त्यात हातघाईवर आलेले धोके आणि दूरगामी धोके अशी वर्गवारी आहे.
येत्या काही वर्षात डिजिटलायझेशनमुळे येणारी बेरोजगारी हा अल्पमुदतीचा धोका आहे. जवळपास ८.५ कोटी रोजगार नाहीसे होणार आहेत. त्यातही महिलांवर अन्याय वाढणार आहे.
WFH पध्दतीने काम करताना महिलांना ऑफिस आणि घर या दोन्ही आघाडीवर अत्याचार सहन करावा लागल्याचे हा रिपोर्ट म्हणतो.. येत्या काळात ही असमानता आणि अत्याचाराची मालिका अजूनच लांब-रुंद होईल.
दूरगामी धोक्यात हवामान बदल होत आहेत त्यावर हा रिपोर्ट यथेच्छ भाष्य करतो. त्याचा धोका आपल्याला आहेच.
हवामान हा विषय भारतीयांना वर्ज्य आहे.तरीही त्याचा धोका मात्र भारतीयांना जबरदस्त असणार आहे. कारण भारतीय कृषिप्रधानता.
जगभरातील ६५० नामांकित सदस्य आपापल्या देशांचे धोके आणि आव्हाने यांचा पाढा वाचतात.त्यातून WEF चा अभ्यासगट जगासमोरील धोकेनिश्चिती करत असतो..यंदाचा हा १६ वा अहवाल आहे.
आपल्याकडे हल्ली नवीनच जमात उतू आलेली आहे. त्यांना लोकशाही मूल्यांशी काही देणंघेणं नाही.ब्रेनवॉश केलेली ही भक्त मंडळी एकाच व्यक्तीला देवत्व बहाल करण्याकामी स्वतःला जुंपून घेत आहेत. प्रश्न त्यांच्यापुरता मर्यादित असता तर एकवेळ क्षम्य म्हणून त्यांना त्यांच्या मरणाने मरू द्यायला हवे.
पण ही भक्त मंडळी प्रत्येक समस्या चिघळेल कशी आणि त्यातून आपल्या टुकार नेत्याला त्याचा फायदा कसा होईल हेच पहात असते. हे झालं प्रत्यक्षात.
दुसरीकडे हेच समाजमाध्यमिय टोळभैरव सदैव जिथंतिथं Hatred पसरवण्यात दंग असतात..त्यांना आवर घालणे हे महत्वाचे कार्य भारतीयांना करावे लागणार आहे.
तरच भारतीयांचे हात या WEF ने सुचवलेल्या धोक्यांशी दोन हात करायला मोकळे होतील. तसे करणे न जमल्यास हे जागतिक धोके आपलं वाईट करू शकणार नाहीत कारण ते वाईट आपलं आपण अगोदरच करून घेतलेलं असेल. कळावे..!❤️
एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड#म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?