आम्ही हमीभावात ऐतिहासिक वाढ केली..असे पंतप्रधान म्हणत आहेत..आपण थेट आकडेवारी पहाणारच आहोत..त्याअगोदर त्यांच्या बोलण्याची पार्श्वभूमी पाहू.
APMC सुधारणा, MSP आणि कंत्राटी शेतीची सुरक्षितता यांचा नवीन कायद्यात समावेश या मागण्यांसाठी जवळपास ९० दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. #थ्रेड#म
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेते जिथं जागा मिळेल तिथे नवीन कायद्याच्या समर्थनार्थ भाषण ठोकत आहेत. जवळपास चर्चेच्या १०+ फेऱ्या होऊनही तोडगा नाही..तरीही आम्ही सकारात्मक चर्चेस तयार आहोत असंही सांगत आहेत.
पंतप्रधान म्हणतात ती ऐतिहासिक वाढ याचा अर्थ इतिहासात प्रथमच झालेली वाढ असा आहे.
आता आपण तुलनात्मक इतिहास पाहू.
UPA सरकारच्या २ऱ्या कालखंडात हमीभावाची सरासरी वाढ ११.२८% होती. तर आत्ताच्या NDA च्या पहिल्या कालखंडात ती ४.९१% आहे.
पिकाबाबत बोलायचं तर UPA मध्ये सर्वात कमी वाढ कापूस पिकास ६.१५% होती तर जास्तीत जास्त वाढ भुईमुगाची १४.४१% होती.
त्याच बाबतीत NDA च्या पहिल्या कालखंडात कमीतकमी वाढ भुईमुगात १.५३% होती तर जास्तीत जास्त वाढ ताग या पिकात ११.१९% आहे.
ऊसाच्या FRP मध्येही UPA-2 कालखंडात म्हणजे मनमोहन सिंग यांच्या २ऱ्या कालखंडात २२.४२% होती..तर हीच वाढ NDA च्या म्हणजे आत्ताच्या सरकारच्या काळात ५.०४% आहे.
या सध्याच्या सरकारची आकडेवारीबाबतची कार्यपद्धती नेहमीच शंकास्पद राहिली आहे. आकडेवारी सादर करताना सादरीकरण पद्धत बदलणे जेणेकरून आकडे फुगवून दिसतील अशी राहिली आहे. GDP बद्दल तेच आणि स्वामिनाथन शिफारशी बद्दलही तेच सुरुय.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीत तर फारच घोळ घातला गेला आहे.
यापूर्वी मी अनेक थ्रेड मधून ते सांगितलं आहेच की, इनपुट कॉस्ट ही पूर्ण न धरता फक्त निम्म्या निविष्ठा धरून त्याच्या दीडपट हमीभाव देऊन.सगळीकडे हमीभावाचा डंका हे सरकार पिटत आहे.
आत्ताही २०१४ ते २०२० पर्यंतची तकलादू हमीभाव वाढ एकत्रित करून थेट एकूण आकडे दाखवले गेल्याने आकडे फुगत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत डबल करू हा जुगारी डाव २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खेळला गेला.. त्याबद्दल एक चकार शब्द आज ही मंडळी काढत नाहीत.. ५ ट्रीलीयन इकॉनॉमीचेही तशाच पद्धतीने स्वप्न दाखवलं गेलं.. पण वस्तुस्थिती काय आहे? हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे.
देशातील मेन्स्ट्रीम मीडिया दखल घेवो अगर न घेवो.. आपल्या हाताशी असलेल्या समाजमाध्यमिय आयुधांचा वापर आपण खुबीने करून खरी वस्तुस्थिती सगळ्यांना सांगायला हवी..तरच भविष्यात काही बदल घडेल अन्यथा आत्ता सुरुय हेच अवैज्ञानिकपण भारताचा भविष्य उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही..कळावे..!❤️
गेल्या वर्षभरातील ही unemployment आकडेवारी.
निव्वळ कृषी क्षेत्रात कार्यरत असणारं मनुष्यबळ हे सिजनल बेरोजगारी म्हणून गणलेलं असतं.खरंतर ते बेरोजगारच असतात.
ही आकडेवारी ज्यांनी आपल्याला दाखवायला हवी आणि सरकारला धारेवर धरायला हवे..तेच आज वाजंत्र्याच्या भूमिकेत आहेत. #modi_job_do#म
Disguised unemployment शेतीत खूप दिसते.म्हणजे एखादं शेती उत्पादन घेताना २ व्यक्ती पुरेशा असतात तिथं त्याच कार्यात ४ व्यक्ती गुंतल्या असतील तर २ व्यक्ती या बेरोजगारच म्हणायला हव्यात.
डिसेंबर महिन्यात शेतीकाम कमी असत म्हणून कागदोपत्री बेरोजगारी जास्त दिसते असं कोणी मंत्री म्हणाले.
पण खरंतर शेतीसारख्या क्षेत्रात कार्यात्मक मनुष्यबळ सामावण्याची क्षमताच तुटपुंजी आहे.कारण त्या क्षेत्रातून येणारं उत्पन्न त्यावर निर्भर असणाऱ्या मनुष्यबळास उदरनिर्वाह देऊ शकत नाही.
लॉकडाऊन काळात प्रायमरी सेक्टर जरी वाढते दिसलं तरी वस्तुस्थितीत फार काही फरक दिसला नाही तो त्यामुळेच.
इतिहासात आत्ममग्न होणारा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' मधील भीमा यांच्यात फार काही सकस आणि तुलनात्मक फरक नसतो.
आला दिवस ढकलणं एवढीच काय ती त्यांची इतिकर्तव्यता असते.
भीमा मेलेल्या मढ्यावर गुजराण करायचा..आणि आजचा समाज मेलेली मढी उकरून.
'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणताना आज महाराष्ट्रवासीयांच्या पोलादी छात्या अभिमानाने थरारत नाहीत.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र..' असं म्हणण्याचीही सोय आता राहिली नाही.
कारण पहिल्यात पहिल्यासारखी छाताडं राहिली नाहीत आणि दुसऱ्यात तख्त.
छत्रपती शिवाजी महाराज यांच कार्यकर्तृत्व काय? तेच आज पर्यंत आपण उगाळत बसलो..त्यावर पुस्तके, नाटकं, चित्रपट..गेलाबाजार डीजे डॉल्बीवर गाणी बडवतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्यामुळं आबासाहेबांची जीवन पद्धती सांगणे हे काही या थ्रेडचं प्रयोजन नाही.
प्रयोजन आहे. आत्ता आणि पुढं काय? हे.
'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.