इतिहासात आत्ममग्न होणारा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' मधील भीमा यांच्यात फार काही सकस आणि तुलनात्मक फरक नसतो.
आला दिवस ढकलणं एवढीच काय ती त्यांची इतिकर्तव्यता असते.
भीमा मेलेल्या मढ्यावर गुजराण करायचा..आणि आजचा समाज मेलेली मढी उकरून.
'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणताना आज महाराष्ट्रवासीयांच्या पोलादी छात्या अभिमानाने थरारत नाहीत.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र..' असं म्हणण्याचीही सोय आता राहिली नाही.
कारण पहिल्यात पहिल्यासारखी छाताडं राहिली नाहीत आणि दुसऱ्यात तख्त.
छत्रपती शिवाजी महाराज यांच कार्यकर्तृत्व काय? तेच आज पर्यंत आपण उगाळत बसलो..त्यावर पुस्तके, नाटकं, चित्रपट..गेलाबाजार डीजे डॉल्बीवर गाणी बडवतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्यामुळं आबासाहेबांची जीवन पद्धती सांगणे हे काही या थ्रेडचं प्रयोजन नाही.
प्रयोजन आहे. आत्ता आणि पुढं काय? हे.
गेल्या साताठ दशकात एक महाराष्ट्रीयन म्हणून किती लोकांनी आपला 'झेंडा अटकेपार' फडकवला? हा प्रश्न आहे. आपला गौरवशाली इतिहास आणि त्याची परंपरागत कार्यशैली आपण पाळली का? हाही यक्षप्रश्न आज सतावतो आहे.
मी नेहमी सांगतो..आजच्या युगात छत्रपतींचे विचारपाईक होण्यासाठी तलवारीची गरज नाहीय.
पण अलीकडे एक समाज म्हणून आपला सगळा भार आपण तलवार आणि दाढी यावरती टाकला..आणि विचार मात्र वाऱ्यावर सोडले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं तीच तत्व पुढं लोकशाही तत्वे म्हणून जगभर मान्य झाली..भले प्रत्येक देशाचा संदर्भ वेगळा असेल पण मूळ एकच..लोककल्याण.
छत्रपतींची भूमी म्हणून भारतमातेस एक सार्थ अभिमान असणारच,त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राच्या मातीत तो हिरा निपजला म्हणून आपणास तर प्लस अभिमान असणार.त्या अभिमानाच्या स्फुल्लिंगाचे आपण सार्थ वारस बनलो का? हा खरा आजच्या विज्ञानयुगात प्रश्न आपणास पडायला हवा..पण आपण जातीपातीत रंगलो.
आज देशातील आजीमाजी शास्त्रज्ञ किंवा RBI गव्हर्नर यांची यादी पाहिल्यास त्यात किती मेंबर महाराष्ट्रीयन असतात? आज UPSC सारख्या बौद्धिक कसोटीच्या प्रांतात किती छत्रपतींचे वारस बाजी मारतात?
एखादी अल्फाबेट,फेसबुक,ऍपल,अमेझॉन..इथं का बहरू शकली नाही? इथली माती त्या रणांगणात का चितपट झाली?
परवा बातमी आलेली कॅप्टन अमोल यादव यांनी एक विमान बनवलं होतं.. इथल्या समाजास त्याचं आणि त्याच्या बुद्धीचं महत्व कळलंच नाही.. नाईलाजाने कॅप्टननी परदेशाचा रस्ता धरला..
त्यांच्या त्या प्रज्ञेस इथं खतपाणी आपण का घालू शकलो नाही? एक समाज म्हणून आपण आपली मानसिकता काय करून घेतलीय?
आपला समाज हा सतत राजकारण आणि जातीपातीच्या धांदलीत असतो..त्यामुळं आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय? याचीही काळजी राहिली नाही.
असा एकही महिना जात नसेल की देशात कोणत्यातरी मेजर निवडणुका होत आहेत.. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यासाठी 'गुडघ्याला बाशिंग' याच मूडमध्ये असतात. हे कुठवर?
भारत हा युवकांचा देश आहे..ही जगभर आपली ओळख आहे. 'डेमोग्राफीक डिव्हिडंड' अशी ती संकल्पना.. पण या तरुण जनतेचा काय लाभ आपल्याला एक देश म्हणून होईल? याचा विचार तरी आपण आणि पर्यायाने आपल्या सरकारने केला आहे का?
आज निवडणुका, पक्ष, रॅली, प्रोटेस्ट या नावाखाली व्यसनांचा नंगानाच सुरुय.
आपला 'डेमोग्राफीक डिव्हिडंड' या राजकारणात जळून खाक होत चाललाय..याची आपल्याला जाणीव आहे का?
गेल्या साताठ वर्षात देशभरात जे काही विखारी वातावरण जाणीवपूर्वक बनवलं गेलं..त्याला खुद्द येथील समाज म्हणजे आपण जबाबदार आहोत. कारण, आपणच आपल्या भावना, अस्मिता आणि अहं ही शस्त्र निर्माण केलीत.
छत्रपतींचे विचार काय होते हे आपल्याला सांगायला आता कोणी उरलंय असं वाटत नाही..कारण आता 'गाईही शिंगं मोडून वासरात शिरल्यात.' असं चित्र आहे.
अशावेळी आपले विचारच आपल्याला एकतर तारतील किंवा ठेचून मारतील. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
विचारांची पातळी आपण आतातरी सुधारायला हवी..ती गरज आहे.
गौरवशाली इतिहासाचा अभिमान असणं वेगळं आणि त्या अभिमानाचा अतिरेक असणं वेगळं.. आपला अतिरेक होतोय..त्या अतिरेकी वागण्यात विचारांना तिलांजली देण्याचं पातक आजपर्यंत घडत आलं..
आज छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी मानून तर्कशुद्ध विचारांचा संकल्प करू..हीच खरी गोष्ट आहे.. बाकी सब झूठ..!❤️
माझ्या तमाम भारतीय बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..❤️
'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.
'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.
लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड#म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.
जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल... #थ्रेड#म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.