तुम्ही कितीही गहिवरून, काहीही लिहिलं तरी भाषा माणसांसाठी असते, माणसं भाषेसाठी जन्मत नाहीत. कितीही गोड वाटलं तरी अमुक भाषा बोलतो म्हणजे काहीतरी दैवी भाग्य आहे वगैरे भूलथापा आहेत. भाषा या माणसांच्या जीवावर जगतात. त्या माणसांच्या डोक्यात जन्मतात. माणसांच्या डोक्यात वाढतात. आणि
बोलणारी-लिहिणारी माणसे संपली की नष्ट होतात. इंग्लिश जगावर राज्य करू लागली, त्यासाठी ब्रिटिशांचा आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दिग्विजय जबाबदार आहे. आज अमेरिकन इंग्लिश डिजिटल जगावर राज्य करते त्याला अमेरिकेच्या तंत्रज्ञानाची ताकद कारणीभूत आहे.
भाषा अमर नसतात. भाषाही मर्त्य असतात.
भाषा जन्म घेतात, मोठ्या होतात, दुसऱ्या भाषांना कवेत घेतात, काळानुसार बदलतात, म्हाताऱ्या होऊन सडत जातात आणि कालांतराने मरतात देखील! इतिहासातल्या अनेक संस्कृती आणि सभ्यता त्यांच्या भाषांसकट नामशेष झाल्या आहेत. म्हणूनच आपल्या मातृभाषेवर भलतं प्रेम, अप्रूप किंवा अभिमान या गोष्टी
मनाला मऊ-मुलायम-मजेच्या वाटल्या तरी त्या बुद्धीच्या शास्त्रकाट्यावर तोलल्या की हास्यास्पद वाटू लागतात!
मराठी भाषेचं आयुष्य वाढवायला सरकारी पैशाच्या खिरापती मागत एकत्र जमून संमेलनांच्या जत्रा भरवणाऱ्या थेरड्यांपेक्षा आज मराठी माणसाच्या हाती आलेल्या स्वस्त स्मार्टफोनच्या तंत्राचा
आणि त्यावरच्या गुगल इंडिक कीबोर्डसारख्या सुविधांचा जास्त महत्त्वाचा वाटा आहे. भाषा पताका, तोरणं आणि दिंड्या काढायची गोष्ट नसते. भाषा ही पायताणासारखी उपयुक्त असते. दिंड्या-पालख्या-झेंडे-पताका हा भपका असतो. पायातली चप्पल ही उपयुक्त असते! भाषा ही देव्हाऱ्यात पुजायची, खांद्यावर घेऊन
नाचायची आणि तिच्या आरत्या करायची गोष्ट बनवणारे एकतर भावनेत वाहून गेलेले मूर्ख असतात किंवा ठराविक राजकीय हेतूने तसे कपट मांडणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचे असतात.
अशांच्या नादी लागून भाषा नांवाची उपयुक्त पायताण डोक्यावर घेऊन नागड्या पायांनी फिरायचा करंटेपणा आपण करू नये यासाठी आजच्या दिवशी एकमेकांना सदिच्छा द्यायला हरकत नसावी!

#मराठी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Makarand Desai

Makarand Desai Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @makmd

22 Dec 20
तर झालं असं की युपीचा शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी हा मस्तीत बोलून गेला की मनीष सिसोदियाला आमंत्रण देतो, युपीतल्या शाळा बघा वगैरे...

त्याची बातमी आली, मनीष सिसोदियाने ट्विट करून आव्हान स्वीकारलं! म्हणाला येतो मी...

त्यानुसार आज मनीष सिसोदिया गाडी काढून युपीत पोचले... तर त्यांना
पोलिसांनी अडवलं आणि शाळा बघू दिल्या नाहीत...

आता केजरीवालांनी ट्विट करून म्हटलंय की तुम्हाला शाळा दाखवायच्या नसतील तर दिल्लीत या, आमच्या चांगल्या शाळा दाखवतो!

याला म्हणतात माजखोर योगीच्या बाष्कळ चेल्यांचा सुशिक्षित आणि हुशार राजकारण्यांनी व्यवस्थित, पद्धतशीर कार्यक्रम करणे!!
हे केजरीवाल -सिसोदियांनी घालून दिलेलं उदाहरण आहे, सुशासन,नागरी सुविधांना केंद्रबिंदू मानून केलेल्या राजकीय लढाईचं...

भाजपला ठिकठिकाणी, प्रत्येक राज्यात असे लोक भेटत राहिले पाहिजेत! ही लढाई फक्त भाजपच्या लाडक्या विखारी मुद्द्यांवर न लढता, नागरी प्रश्न-आर्थिक मुद्दे-सुशासन
Read 7 tweets
20 Dec 20
नवे शेती कायदे: झूठ, सच आणि कुभांड!

सोबत जोडलंय ते भाजपच्या अधिकृत हँडल्सवरून पसरवलं जाणारं पत्रक आहे.

त्यात "सच" म्हणून जे दिलंय त्यातील एकेका मुद्द्याचा थोडक्यात आढावा घेऊ!

१. "MSP सिस्टम जारी रहेगा"- किमान आधारभूत मूल्य या संकल्पनेचा अर्थच हा आहे की कुठल्याही खरेदीविक्रीत Image
ती फ्लोअर प्राईस मेंटेन व्हावी. सरकार APMC बरोबर खासगी खरेदीदारांना जेव्हा परवानगी देत आहे तेच MSP सिस्टम रहेगा हे म्हणणं हे कपटी धोरण आहे! कारण खासगी खरेदीदारांच्या व्यवहारात किमान आधारभूत मूल्य सक्तीचे असल्याची कायद्यात तरतूद नाही.

२,३- जमिनीचा मुद्दाच गौण आहे. शेतकरी
संघटना स्पष्टपणे सांगताहेत की तुम्ही कायद्यातच खासगी व्यवहारांनाही किमान आधारभूत मूल्याची तरतूद करा. जशी MRP असते त्या धर्तीवर MSP संकल्पना म्हणून कायद्याने सक्तीची करणे अजिबात अशक्य नाही.

४- हे फार्मिंग ऍग्रिमेंट प्रायव्हेट प्लेयर्सनी केले तर त्यात किमान आधारभूत मूल्य असणारच
Read 7 tweets
18 Oct 20
1/ भारत, बांगलादेश आणि जीडीपी पर कॅपिटा!
2/ भारताचे सकल दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या खाली घसरेल असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा होरा आल्यानंतर त्याबाबत खळबळ माजणे साहजिकच होते. मात्र केंद्र सरकारकडून आणि भारताचे भूतपूर्व आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडून मात्र परचेसिंग पॉवर पॅरिटीचा दाखला देत...
3/ ...भारतच कसा पुढे आहे हे ठासून सांगण्यात आले. त्यामुळे यातलं राजकारणापल्याडचं आर्थिक गणित हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.
Read 25 tweets
21 Sep 20
थ्रेड: मोदींची #FarmBills आणि त्यांना आमचा उजव्या भूमिकेतून असलेला विरोध

१. शेतकऱ्यांना मार्केटमध्ये फेयर प्लेग्राउंड मिळावं यात वाद नाही. खाउजा-मध्ये उरलेल्या दोन सेक्टर्सना खुली सूट आणि शेतकऱ्याला मात्र जुनी, अपग्रेड न होणारी व्यवस्था देणं हा प्रायमरी सेक्टरवर होणारा 1/15
अन्याय आहे त्याचे परिणाम आपण प्रायमरी सेक्टरच्या गेल्या काही दशकांतील जीडीपीमधील घसरत्या शेअरच्या रूपाने बघत आहोत. त्यामुळे शेतीसाठी आर्थिक सुधारणांची द्वारे खुली करणे, शेतकऱ्याला संधी देणे, प्रायमरी सेक्टरसाठी फेयर प्लेग्राउंड तयार करणे याला आमचा आधीही पाठिंबा होता, 2/15
पुढेही राहील.

२. पण इथे फक्त तात्त्विक पातळीवर आमची अशी उजवी भूमिका आहे म्हणून भाजप करतंय ते सगळं चालवून घ्यायला आम्ही मूर्ख नाही. मोदींच्या राजवटीचं ट्रॅक रेकॉर्ड हे रिफॉर्म्सबाबतीत अत्यंत सुमार आणि देशाचं नुकसान करणारं राहिलं आहे. एखादा चांगला रिफॉर्मसुद्धा देशाला 3/15
Read 15 tweets
29 Aug 20
आठवण असावी म्हणून-
पीएम केअर्स ना कॅगच्या ऑडिटखाली येतोय, ना आरटीआयखाली आपल्याला माहिती देतोय. भारताचे पंतप्रधान जनतेला अमुक एका ठिकाणी मदत द्या म्हणतात, आणि त्या फंडाचं ना सरकारी ऑडिट होतं ना आरटीआयखाली माहिती मिळते.

राफालेचे कॅग ऑडिट दस्तऐवज हे पब्लिक स्क्रुटिनीपासून 1/5
लपवण्यात आलेत. न्यायालयात याच ऑडिटचा भरवसा ठेवा म्हणत सरकारी पक्षाने बचाव केला होता. त्या खटल्यात सरकारने बंद लिफाफ्यातून गोगोईंना नक्की काय पुरावे किंवा कागद दाखवले याची आपल्याला जनता म्हणून जराही माहिती नाही. राफाले ही तुमच्या-आमच्या पैशाने घेतलेली सरकारी मालमत्ता आहे हे 2/5
लक्षात ठेवा.

त्या पुढची बाब इलेक्टोरल बॉण्ड्सची. इलेक्टोरल बॉण्ड्सवर दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेली काही वर्षे लटकवून ठेवल्या आहेत. हा विषय भारतीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या मार्गाने भाजप सर्वात जास्त पैसे जमवते, इतर सर्व पक्षांचे 3/5
Read 5 tweets
20 Aug 20
दाभोलकर,

एका सामाजिक कार्यकर्त्याची, सुधारकाची खुलेआम रस्त्यावर हत्या होते आणि सात वर्षं लोटूनही महाराष्ट्र त्याचा मारेकरी पकडू शकत नाही, त्याच्या रक्ताला न्याय मिळवून देऊ शकत नाही याची आम्हाला आज शरम वाटते!
#दाभोलकर

माणूस मारून विचार संपत नाही वगैरे फालतू गोष्टी...
आम्ही मानत नाही. पुरेशी माणसं मारली तर विचारही संपतात याची उदाहरणं मध्यपूर्वेच्या, रशियाच्या, चीनच्या आणि भारताच्याही इतिहासात मुबलक आहेत याची आम्हाला जाणीव आहे.

खरं सांगायचं तर तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा मी लहान होतो. तेव्हा हिंदू जनजागृती समिती, सनातन प्रभातमधली
तुमची चित्रे आणि व्यंगचित्रे पाहून मला तुम्ही म्हणजे अंनिस नांवाचा एक मुसलमान दिसणारा, शिंग असलेला राक्षस आहात वगैरे पक्कं पटलेलं होतं! तुम्ही मेलात तेव्हा धर्मांधांनी पेढे वाटले होते तसा मलाही आनंद झालाच होता! अशा शिंगवाल्या अंनिस नांवाच्या राक्षसाचा जर वध झाला
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!