माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.
तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.
पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇
पत्नी शिकलेली असल्याने बॅंकेचे व्यवहार ती चांगले सांभाळायची. तिनेही हातभार लावला. लोन घेऊन शेतातच गोठा उभारला. १२-१५ गायी पाळून दुधाचाही चांगला जम बसलाय. पुढे काही वर्षात शेती अन पुरक व्यवसायात बऱ्यापैकी पैसे गुंतवले. आईवडीलांची साथ आहेच.
मुलांचे शिक्षणही चांगले सूरू आहे.👇
कंपनीतील पगार आणि हे बऱ्यापैकी चांगले उत्पन्न तरीही कायम लो-प्रोफाईल जगणे यामुळे त्याचे खर्च कमी असतात. तो अत्यंत साधा दिसतो, वागतो.
अगदी बऱ्याचदा कंपनीतल्या जुन्या निळ्या शर्टमधेच गावभर फिरत असतो. १५वर्ष जुन्या स्प्लेंडरवर.
पण आज तो पुर्णपणे “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र” आहे.
👇
आता दुसरा इंजिनियर-त्याने शिक्षणानंतर पुण्यात नोकरी धरली,पुढे स्विच आणि जास्त पगाराच्या अपेक्षेने काही दिवस पंजाब, पुन्हा मुंबई आणि शेवटी रितीनुसार सर्वांसारखे पुण्यात येऊन बस्तान बसविले.
हे सर्व करता करता २००८/९ साल उजाडले.
तो इंजिनियर त्यामुळे लग्नही फार जोरात, खर्चिक झाले 👇
दोन्ही बाजूंनी भव्य कार्य पार पडले. अगदी तीन-चार आमदार, सात-आठ नगरसेवक आणि पाचएक हजार माणसांच्या उपस्थितीत ते लग्न धुमधडाक्यात पार पडले. खर्च इतका झाला की याला तर हनिमूनला जायला पर्सनल लोनच काढायला लागले.
पुढे, पहिल्या मुलाचा नामकरण सोहळा असो. गावाकडे टोलेजंग घर बांधणे असो,👇
वास्तूशांत की पूजा असो. सर्व कार्यक्रम जंगीच.
जेवनाचा मेन्यूही एकदम भारी असतो यांचा. पुण्यातून काय तर नाशिकहून काय,तर साताऱ्यावरून कायकाय मेन्यू मागवायचे.
तो मित्र, नेहमीच ब्रांडेड कपडे, घड्याळे आणि चकचकित राहतो. मस्त मोठी कारही घेतलीये. गावाला आला कि राजकारणावर, समाजकारणावर👇
शेती, गावाकडच्या शिक्षणाच्या दर्जावर टोमणे मारून जायला मात्र विसरत नाही.
पण एक गोष्ट नक्की चांगली ती म्हणजे तो दरमहा आईवडीलांना पैसे पाठवितो 🙏
त्याची मुलं पुण्याच्या चांगल्या शाळेत शिकायला आहेत. तसे तोही आनंदी जीवन जगतो आहे असेच वाटते. पण गावाकडचा बंगला आणि या सर्व कौटुंबिक👇
(दिखावा) कार्यक्रमावरील सतत येणारा खर्च तसेच आता मुलांचे शिक्षण त्यामुळे त्याला घर खरेदी किंवा इतर गुंतवणुक करायला जमली नाही.
गेल्यावर्षी शेतीचा एखाद एकर तुकडा विकून पुण्यात चांगला तीन बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा विचार सुरू केला होता.
सध्या तो पत्नी व मुलांसह पुण्यात चांगल्या 👇
सोसायटीत भाड्याने राहतो. बाजूचा रिकामा फ्लॅटही घरमालकाचा असल्याने तोही हा थोडफार वापरतो.
या कोविडमधे मात्र याचे कंबरडेच मोडले. मोठे संकट आले. त्याच्या कंपनीने खर्च कपात म्हणून बऱ्याच लोकांना कमी केले यात यालाही अचानक कामावरून काढले. हा अक्षरश: मेटाकुटीला आला.मुलांची फी,गावचा
👇
खर्च, इथला घरखर्च हे सर्व कसेबसे चालवले. बर,लाजेमुळे गावालाही जाता येत नव्हते.
नातेवाईकांनाही काहीच सांगू शकत नव्हता. नोकरी गेली हे कळले असते तरी इभ्रतीचा पंचनामा आणि कित्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली असती,असे याला वाटायचे.
मित्रांनी यादरम्यान थोडीफार मदत केली. काही उधाऱ्या👇
झाल्या.
पण चांगली बाब म्हणजे आता दोन महिन्यांपूर्वी त्याला दुसरा जॅाब मिळालाय त्यामुळे तो थोडा सावरतोय.
पण खरे उपकार झाले त्याच्या घरमालकाचे. त्यांनी या काळात संपुर्ण ७-८ महिन्याचे भाडे माफ केले. (जवळपास २ ते २.५ लाख रूपये) घरमालक याच्यासाठी देवमाणूस ठरला नाहीतर याला बाहेर 👇
काढले असते तर याची सगळीकडे इज्जत गेली असती.
आता गंमत अशी की तो ज्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधे राहतो, तो माझ्या ITI झालेल्या मित्राचा आहे.😉 हो त्याचा तो देवमाणूस, मोठ्या मनाचा, गर्भश्रीमंत, घरमालक माझा दुसरा मित्र आहे.
तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखविणे👇
या मधला फरक ओळखा.😊
मित्रहो, शिक्षण आणि आर्थिकसाक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या. चांगल्या शिक्षणासोबत भपका टाळायचे संस्कार रूजायला हवेत.
पैशांच्या योग्य नियोजनाचे महत्व ओळखा. आजमितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. 👇
योग्य वेळी केलेली पैशाची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा.
फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.
यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.
त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.
एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.
मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.
परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..
तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.