घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची!

दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे.

तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/

#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी #गुंतवणुक
१/९
वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत.

चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) 😉
२/९
आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची.

पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार.
३/९
पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार.

पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची अंडीच अंडी. दोन-तीन वर्ष हेच रिपीट. आता
४/९
पुढे ही सायकल किती, कशी वाढू द्यायची याचा सर्वस्वी निर्णयही आपलाच. मग कितीही अंडी घरी खा किंवा विका. पैसे हे हमखास मिळणारच.

बरं आपली शेती, नोकरीधंदा बाजूला सुरूच असतो त्यामुळे हे उत्पन्न तसे अतिरिक्तच.

आता हे जे कोंबडी कापून न खाण्याचे मन मारणे, सुरूवातीला अंडीही न खाणे,
५/९
ते २१ दिवस वाट पाहणे, (थोडक्यात या सर्व प्रोसेसचा अभ्यास आणि कष्टही) पुढे या कोंबडीच्या पिल्लांचे रक्षण करून मोठे करणे याला जो संयम लागतो, धीर आणि एकाग्रता लागते तशीच पैशांची गुंतवणूक करताना लागते.

गुंतवणूक करताना बचत, मनावर ताबा, दूरगामी विचार करून वाट पाहण्याची तयारी
६/९
आणि दूरदृष्टीने कष्ट घेतले तरच यश मिळते.

यात स्वत:ला ज्ञान असणे गरजेचे आहे नाहीतर आजूबाजूलाच तुमच्याच कोंबड्या चोरून/फसवून/आमिष देऊन/पोपटपंछी फंडे देऊन स्वत:च गटकवतील असे लोक आहेतच.
(अशा भामट्या/ फसवणाऱ्या सुशिक्षित टोळभैरवांपासून तुम्हाला वाचायचेय, स्वसंरक्षण करायचेय)
७/९
यासाठी वॅारन बफेट यांनी फार सुंदर वाक्य सांगितलेय.
“Never ask the barber whether you need a haircut.”
त्यामुळे इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता,ज्या क्षेत्रात आपल्याला गुंतवणुक करायची आहे त्याचा अभ्यास करा आणि योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. मार्गदर्शक चांगला असणे महत्वाचेच.८/९
तुमच्याकडे हा संयम, ताबा, शिकण्याची, कष्टाची आणि वाट पाहण्याची तयारी, यापैकी काहीच नसेल तर-
सरळ पर्याय नंबर एक,अगदी रविवारचीही वाट न पाहता कोंबडी खसकावून मोकळे व्हा. उगीच नको तो गुंतवणुकीचा अन आर्थिकसाक्षरतेचा त्रास! 😉

धन्यवाद 🙏

#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #गुंतवणूक
९/९

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

6 Mar
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.

पहिला गरीब घरातून आलेला. आईवडील निरक्षर,मोलमजूरी करणारे. त्याने लग्न जरा लवकरच पण
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी #म 👇
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.

हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.

तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.

पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇
Read 16 tweets
13 Feb
पहिल्याच कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करत असताना शामसाहेब (नाव बदललेय) त्या कंपनीचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते.

माझ्यापेक्षा १०/१२ वर्ष मोठे. नागपूरच्या VNIT मधून इंजिनियरींग केलेले.अत्यंत हुशार,तल्लख, आम्हाला लहान भावासारखे
#SaturdayThread #मराठी #BusinessDots #सत्यकथा👇
वागवायचे.

फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.

यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.

त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
Read 25 tweets
30 Jan
माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦‍♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४

#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread #मराठी #म
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.

एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦‍♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
जीव वाचवायला लागणारे पैसे #EmergencyFund.

कोणत्याही प्रवासात सहकुटुंब निघो वा एकटे बाबांनी चोरखिशात कायम एक ठराविक रक्कम ठेवायची सवय लावली. अगदी शेवटच्या वेळीच,कठीण काळातच त्याचा वापर करायचा.

लहाणपणी बऱ्याचवेळा विविध स्पर्धांसाठी तालुक्याच्या, जिल्ह्यांच्या ठिकाणी जायचो ३/१४
Read 14 tweets
26 Jan
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६ Image
मला निःसंशय तेंव्हाची आपली भारतीय पिढी आजपेक्षा वैचारीक दृष्ट्या अधिक प्रगल्भ वाटते.

आजच्या दिवशी आपण भारतीयांनी “स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय यांच्या मुलभूत पायावर उभ्या असलेल्या महान राज्यघटनेचा स्वीकार केला.

खरे पाहता आपली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ही २/६
ब्रिटीशांविरूद्ध तसेच एकाचवेळी इथल्याच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींवर सुरू होती.

ज्या धर्मरूढींनी, राजेशाहीने आणि वर्णवर्चस्ववादी परंपरेने विषमतावाद जोपासला होता त्या विरूद्ध ती चळवळ कडालली आणि जिंकलीही.

आजही आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेतील या मुल्यांचा अंगीकार केला ३/६
Read 7 tweets
23 Jan
मुंबईत येऊन ३/४ वर्ष झाली होती. बऱ्यापैकी स्थिरावलो,सरावलो होतो. पैसे ही गरजेपेक्षा बरे मिळत होते,अगदी आनंदी आनंद!

बरं, आमच्या सुखाच्या व्याख्या मित्रांसोबत विकेंडला नवा सिनेमा पाहणे, नवनवीन हॅाटेलात जेवण करणे यापलीकडे काही नव्हत्या.

#SaturdayThread #समाजसेवा #मराठी #म १/१९
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.

पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रकार.

नंतर नंतर ती मुले आम्हाला ओळखायला लागली
३/१९
Read 19 tweets
20 Jan
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.

मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.

परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..

तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.

१२वी विज्ञान शिक्षण झालेला तो पोतराज, सरकारी ३/६
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!