महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”
एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच #ThanksDrAmbedkar
[3]
एक माणूस म्हणून जगता यावं त्यासाठी हवे असणारे तुमचे हक्क तुम्हाला दिले. त्या हक्कांची पायमल्ली होवू नये म्हणून त्याला कायदेशीर सरंक्षण आवश्यक असते ते फक्त कायदा देवू शकतो.
स्त्रीयांच्या हक्काची पायमल्ली करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करणे👇
पहिल्यांदा सभेसमोर चर्चेसाठी आणणारे आणि स्त्रियांना बाळंतपणासाठी हक्काची वैद्यकीय राजा मिळाली पाहिजे म्हणून आग्रही असणारे बाबासाहेब हे पहिले सदस्य. त्यांच्या प्रयत्नांमुळे मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट अस्तित्वात आला.
स्त्रीवर बालविवाह, केशवपन, परितक्त्या, सती अशा मार्गाने समाज जो अन्याय करत होता तो अन्याय दुर करण्यासाठी बाबासाहेब आग्रही होते.
१९४२ ते१९४६ लेबर मिनिस्टर म्हणून काम करताना “Equal pay for equal work irrespective of sex” ही क्रांतीकारी कल्पना राबवण्याचे श्रेय बाबासाहेबांचेच
[8]
माझे मतदान माझा अधिकार म्हणत कित्येक स्त्रिया अभिमानाने बोटावरची शाही दाखवतात. आज प्रत्येक मतदाराच्या मनात जो अभिमान आहे यापाठीमागे भारतीय संविधानाने आर्टिकल ३२६ नुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री- पुरुष नागरिकाला दिलेला
मतदानाचा अधिकार कारणीभूत आहे जो स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हता.
भारतात स्त्रियांना मतदानाचा अधिकारच नव्हता.
माँटेगयू- चेम्सफर्ड सुधारणा धोरणान्वये १९१८ साली स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी शिफारस करण्यात आली परंतु ती बिनशर्त नव्हती.
एक तर याबाबत कायदा करण्याचे अधिकार भारतातील प्रत्येक राज्याचे हातात सोपवण्यात आले, शिवाय जी स्त्री विवाहित आहे, शिक्षित आहे आणि जिच्याकडे संपत्ती आहे अशाच स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, १९३५ सालच्या Government Act मध्ये
हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीला सर्वोच्च महत्व दिले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या कोड बिलाद्वारे स्त्रीला पहिल्यांदा एक माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार आंबेडकर कायद्यान्वये देवू करत होते.
भारतीय स्त्रीला मिळालेला घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये मुलांबरोबर मुलीला मिळालेला वाटणीचा अधिकार आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर दर्जा हे हिंदू कोड बिलाचे ठळक मुद्दे.
साहजिक हिंदू कोड बिलाला प्रखर विरोध झाला. हा विरोध स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या अनेक हिंदू नेत्यांनी केला.
वर्षानुवर्षे ज्या समाजाने बाईला हवे तसे वापरले,बाई ही भोगवस्तू आहे आणि तिचे काम फक्त चुल आणि मुल अशा मानसिकतेचा तो समाज तिला अधिकार मिळणार म्हटल्यावर खवळून उठणं साहजिकच
[16]
अगदी आंबेडकरांची जात काढून “एका अस्पृश्याला हिंदू धर्माबाबत कायदे बनवण्याचा अधिकार नाही” इतक्या हीन दर्जाचे वक्तव्य कर्मठ नेत्यांकडून केले गेले.
१९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवसात बाबासाहेब यांनी हिंदू कोड बिल तयार केले
आणि २४ फेब्रु१९४९ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक बाजूंनी होणाऱ्या विरोधामुळे १९५१साली आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर नेहरूंनी बिलातील केवळ ४विषय मंजूर करून ते फेटाळून लावले. त्याच्यानंतर २७सप्टें१९५१ रोजी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा नेहरूंकडे पाठविला
[18]
हिंदू कोड बीलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे” असे त्यात त्यांनी नेहरुंना ठणकावून सांगितले.
स्त्रियांना जे कायदेमंडळ अधिकार देत नाही त्या कायदेमंडळातील पद लाथाडून स्वत:च्या तत्वांसाठी स्वत:च्या पदाचा राजीनामा देणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
या घटनेनंतर तब्बल ४ वर्षानी १९५५-५६ नेहरूंच्या नेतृत्वाखालील कायदेमंडळाने
१.हिंदू विवाह कायदा.
२. हिंदू वारसाहक्क कायदा
३.हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
४.हिंदू दत्तकविधान व पोटगीविषयक कायदा
असे ४कायदे संमत केले ज्यात बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलातील तरतुदींचा सामावेश केला
[20]
कुणी मान्य करो अथवा ना करो या कायद्यांपासून समाजामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले.स्त्रीला खऱ्या अर्थाने मुक्त करणारा कायदा म्हणून या कायद्यांकडे पाहता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानातील कलम १४, १५, १७, १८, १९,२१ नुसार स्त्रियांना हक्क मिळवून देणारे अनेक कायदे झाले
[21]
स्त्रीला जातीसंस्थांनी रूढी, परंपरेच्या विळख्यात अडविले होते. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला वेदनाच दिल्यात, कारण पुरुषी अहंकार तिच्यावर वरचढ होतो.
आज परिस्थिती बदललीय किंबहुना कायद्याने, संविधानाने बदललीय याचे श्रेय जाते ते आंबेडकरांना. #ThanksDrAmbedkar #जयभीम
[n/n]
‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून सगळ्यात मोठे उपकार केले आहे.
‘मनुस्मृती’सारख्या प्राचीन ग्रंथांत ज्यांना ‘शूद्र’ संबोधले आहे त्या ‘सेवा करणाऱ्या गावकुसाच्या आत रहाणाऱ्या
[1/n] #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain @MarathiRT
जाती म्हणजे ओबीसी’, असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यामुळे साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, धोबी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, सुतार, लोहार, तांबट अशा सेवाकर्मी शूद्र जाती ओबीसी ठरतात. संविधानाच्या मते,
महाराष्ट्रात वा इतर काही राज्यांत
ज्यांना भटके विमुक्त समजले जाते ते देश पातळीवर ओबीसीच आहेत.या सर्व शूद्र ओबीसींसाठी भारतीय संविधानात कलम३४० आहे.डॉ.आंबेडकरनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यामागे हिंदू कोड बिलासह याच कलम ३४०अन्वये ओबीसी समाजासाठी मागासवर्गीय आयोग न नेमण्याचेही एक प्रमुख कारण होते.
[3]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले 1/n #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain #थ्रेड#Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन विकासाचा पाया रचला. म्हणूनच डॉ.आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.
या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’ 3/n #ThanksDrAmbedkar
25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇
घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. 3/n #ThanksDrAmbedkar
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n