डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले 1/n #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain #थ्रेड#Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन विकासाचा पाया रचला. म्हणूनच डॉ.आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.
या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
♦️जलनियोजन
पाण्याचा स्त्रोत व यंत्रसामुग्री यांचा अभ्यास करण्यासाठी एक वीज संशोधन ब्युरो स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली. येथील स्थानिक लोकांना विद्युत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी वीज केंद्राची उभारणी,यंत्रसामुग्री माहिती,देखभाल व दुरूस्ती यादृष्टीने नियोजन केले
[4]
भारतात औद्योगिकरण झाले की, आपोआपच गरिबी दूर होऊन हाताला रोजगार मिळेल असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी जास्तीत जास्त वीज निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते.
[5]
♦️दामोदर, हिराकुंड, सोन प्रकल्पांना चालना...
डॉ.आंबेडकरांकडे जलनियोजन खातेही होते. या खात्यांतर्गत त्यांनी अनेक योजना राबविल्या. आपल्या देशातील जलसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेता यावा म्हणून त्यांनी एक धोरण निश्चित केले. देशातील जलमार्गाचा कसा वापर करता येईल
[6]
हे नियोजन करण्यासाठी केंद्रीय तांत्रिक ऊर्जामंडळ स्थापन केले.दामोदर नदीवर धरण बांधण्याच्यादृष्टीने सर्व्हेक्षण केले. हा बहुउद्देशीय प्रकल्प असल्याने सिंचन,वीजनिर्मिती व जलवाहतूक हे उद्देश समोर ठेऊन कामाला गती दिली. बंगाल व बिहार राज्याच्या सहकार्याने त्यांनी प्रकल्प तडीस नेला
[7]
ओरिसा राज्यातील नद्यांच्या विकासाकरिता त्यांनी बहुउद्देशीय योजना राबविल्या. पुराचे नुकसान टाळण्यासाठी जलसंपत्तीचा वापर, जलाशय बांधणे, नद्यांचे सर्व्हेक्षण करणे, नद्यांचे पाणी साठवून ठेवणे,छोट्या-मोठ्या धरणांची उभारणी करणे. धरणे बांधली की शेतीला पाणी मिळेल,दुष्काळ पडणार नाही.
[8]
वीज निर्मिती होईल. त्यामुळे कारखानदारी वाढेल, रोजगार मिळेल असे उपाय ते ओरिसा सरकारला सुचवितात. ओरिसा सरकारने सहकार्य केल्यावर महानदीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.15 मार्च1946 हिराकुंड धरणाची पायाभरणी झाली. या पाठीमागे डॉ.आंबेडकरांचा भक्कम पाठिंबा होता. दूरदृष्टीचे जल नियोजन होते
[9]
दामोदर प्रकल्प, हिराकुंड प्रकल्पाचा निर्णय झाल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी मध्य प्रदेशातील सोन नदीखोरे प्रकल्प हाती घेतला. त्यांनी 1944 मध्ये श्रमविभागाकडून आराखडा तयार करून घेतला. या प्रकल्पामुळे जलसिंचन, वीजनिर्मिती, कुपनलिकांना वीजपुरवठा,
[10]
औद्योगिक क्षेत्राला वीजपुरवठा, जलवाहतुकीस पाणीपुरवठा, आणि पूरनियंत्रण असे फायदे मिळणार असल्याचे प्राथमिक सर्व्हेक्षणात नमूद केले आणि पुढील काळात धरण बांधण्याची प्रक्रिया सुलभ झाली.
♦️खनिज निर्मिती....
डॉ.आंबेडकर यांच्याकडे खनिजनिर्मिती हे खातेही होते. त्यांनी औद्योगिकीकरणाला चालना दिल्याने खनिजनिर्मिती संदर्भात एक धोरण तयार केले. त्यामुळे सुसुत्रता आली. भूगर्भीयशास्त्र सर्व्हेक्षणाला त्यांनी प्राधान्य देऊन अभियांत्रिकी भूगर्भशास्त्र,
खनिजाचा उद्योगात वापर, ख. निर्मिती मूल्य, त्याच बरोबर खाणकाम परवाने मंजूर करणे, परवान्याचा अटी व शर्ती निश्चित करणे, परवाने रद्द करणे,खनिजाची निर्यात, वाहतूक, कामगारांचे वेतन,भत्ते,अपघात विमा, सुरक्षितता, कोळशाचे उत्खनन, श्रेणीकरण या बाबींकडे लक्ष देऊन देशहिताचे निर्णय घेतले
n/n
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”
एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच #ThanksDrAmbedkar
[3]
पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’ 3/n #ThanksDrAmbedkar
25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇
घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. 3/n #ThanksDrAmbedkar
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n