"अश्मयुग काही दगड संपले म्हणून संपले नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या अगोदर संपेल." हे गाजलेलं वाक्य त्यांचं.
एखाद्या व्यक्तीचं असामान्यत्व काळच अबाधित राखतो.
आत्ता फेब्रुवारीच्या २३ व्या दिवशी त्यांनी आपला निरोप घेतला.
बरोबर,ते आहेत शेख अहमद झाकी यामानी..!❤️ #थ्रेड#म
प्रत्येक कार्यप्रवण हाताच्या भाग्यरेषेचा इतिहास हा जळमटांनी व्यापलेलाच असतो.
झाकी जन्मले १९३० ला..मक्का, सौदी अरेबियात जन्माला आलेलं लेकरू ते..वडील हसन यामानी धार्मिक गुरू..आई साहित्यप्रेमी..सगळीकडं तांडे करून बोंबलत फिरणारे अरब..गरिबी पाचवीला पुजलेली..त्यावेळी देश ही ओळख न्हवती.
तरीही झाकीच्या पालकांनी त्याला शिकायला परदेशी पाठवलं..इजिप्तच्या कैरोत. तिथं ५१ ला लॉ केला. पुढं ५५ ला लॉ मास्टरकी मिळवली न्यूयॉर्कमध्ये.. ५६ ला Harvard लॉ स्कुलमधून ग्रॅज्युएट झाले..त्यानंतरच त्यांचं कार्यकर्तृत्व असं काही झळाळलं की, ६९ ला जपान, Osmania university भारताने ७५ ला.
ऑस्ट्रियाने आणि ऍरिझोना ने ७९ ला मानद पदव्या देऊ केल्या..अंगभूत गुणवत्तेचं सोनं होतं ते असं.
परदेशातून शिकून मायदेशी आला तेंव्हा मायदेशाला नाव मिळालं होतं..सौदी अरेबिया. आजही तिथं लोकशाही नाही. ती तेंव्हा असण्याचा प्रश्नच न्हवता.
झाकी तसा प्रज्ञावान गडी. तरी छोटी कामं करत राहिला.
गड्याला लिहायची भारी हौस..त्यावेळी तो वर्तमानपत्रात लिहायचा..कोणताही विषय वर्ज्य न्हवता लिहायला.सगळं आधुनिक विषयांवर लिहायचा मात्र मातृभाषेतून.
त्यावेळी तिथले राजे होते फैजल. फैजलना झाकी ही काय चीज आहे हे एव्हाना कळालं होतं आणि सौदी म्हणजे तेलाची खाण एव्हाना हे जगालाही कळलं होतं.
जगाच्या ज्वाजल्य इतिहासात ज्वलनशील तेल आता भविष्यवेधक ठरणार होतं.. आणि तशातच राजे फैजलनी जागतिक वाऱ्याची दिशा आणि दशा ओळखून आपला तेलमंत्री निवडला..शेख अहमद झाकी यामानी.
तोपर्यंत हे असली महत्वाची खाती ही राजघराण्यातील व्यक्तीलाच मिळायची.. आता याला अपवाद झाला होता तो म्हणजे झाकी.
शेख ही बिरुदावली त्यामुळेच त्याला नंतर चिटकली ती तहहयात राहिली. झाकी तेलमंत्री झाला ही घटना तेलाच्या आणि जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.. कारण, आता अमेरिकणांना आणि युरोपीयांना तेलासाठी झाकीसोबत टकरा घ्याव्या लागणार होत्या.
चर्चा, वाटाघाटी यात झाकीचा हातखंडा..
झाकी आता एका तेलसंपन्न राष्ट्राचा तेलमंत्री होता. थंड डोकं, त्याहून निरागस चेहरा, डोक्यात साक्षात सरस्वती. फ़्रेंच,अरेबिक,इंग्रजी,फारसी अशा अनेक भाषेवर प्रभुत्व..देशदेशांचे कायदे कोळून प्यायल्याने जो युक्तिवाद तोंडून वदेल नेमका तसा चर्चा वाटाघाटीचा सुप्रसन्न युक्तिवाद तो करायचा.
जेवढी क्लिष्ट आणि खोल चर्चा तेवढे यामानी शांत आणि अथांग व्हायचे.तेलाचं बार्गेनिंग करताना अमेरिकन असो की युरोपियन..यामानी कधीही थकत नसत.
एखादा विषय पटवून देण्यातला त्यांचा हातखंडा लाजवाब म्हणूनच स्वतःच अपहरण झाल्यानंतरही ते सहीसलामत सुटले ते कुख्यात कार्लोस दि जॅकेल च्या तावडीतून.
१९८६ च्या न्यूयॉर्क टाइम्सने लिहून ठेवलं.. 'He came to embody Arab oil power' त्यावेळी जवळपास दोन दशकाहून अधिक काळ जगाचं अर्थकारण झाकी भोवती फिरत राहिलं..
फैजल यांच्यानंतर आलेल्या फाहद यांनी अविवेकी वागण्याने त्यांना अपमानितरित्या पदावरून दूर केलं.. कारण होतं.. राजाचा हव्यास.
त्यानंतर त्यांना स्थानबद्ध केलं.. तरीही झाकी अतीव शांत राहिला.. पुढं त्यांनी स्वित्झर्लंडला घर केलं..
'तेलातून येणाऱ्या पैशामागे अरब धावत सुटले तर ते श्रीमंत होण्याऐवजी भिकेस लागतील..' इतके खणखणीत विचार ते मांडत राहिले.
अशा या शांत, संयमी आणि कुल सूर्याची आठवण परवाच झालेली..जेंव्हा जागतिक इंधन दर शून्याच्याही खाली गेले होते.. जगभरातील ज्ञानी लोकं त्यांना ऐकण्यासाठी आतुर असायचे.. पण ते बोलणं आणि ऐकणं आता कायमचं मूकं आणि बहिरं झालं..
तेलाची हौस कर्ज काढून भागवणाऱ्या आपल्याला तर झाकीची उणीव जास्तच भासेल.. असो..!
शेख अहमद झाकी यामानी हे नाव जगाच्या इतिहासात शेवटपर्यंत अढळ असेल.. हे त्रिकालाबाधित सत्य असेल.. आदरांजली..!❤️ #खूपप्रेम#खूपआदर
टीप- कोणाला झाकी यांचा आवाका वाचायचा असेल तर 'एका तेलियाने' हा गिरीश कुबेर सरांचा ऐवज आपल्या दिमतीला आहेच..❤️
साभार:-लोकसत्ता, the guardian, The New York Times.
आम्ही हमीभावात ऐतिहासिक वाढ केली..असे पंतप्रधान म्हणत आहेत..आपण थेट आकडेवारी पहाणारच आहोत..त्याअगोदर त्यांच्या बोलण्याची पार्श्वभूमी पाहू.
APMC सुधारणा, MSP आणि कंत्राटी शेतीची सुरक्षितता यांचा नवीन कायद्यात समावेश या मागण्यांसाठी जवळपास ९० दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. #थ्रेड#म
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेते जिथं जागा मिळेल तिथे नवीन कायद्याच्या समर्थनार्थ भाषण ठोकत आहेत. जवळपास चर्चेच्या १०+ फेऱ्या होऊनही तोडगा नाही..तरीही आम्ही सकारात्मक चर्चेस तयार आहोत असंही सांगत आहेत.
पंतप्रधान म्हणतात ती ऐतिहासिक वाढ याचा अर्थ इतिहासात प्रथमच झालेली वाढ असा आहे.
आता आपण तुलनात्मक इतिहास पाहू.
UPA सरकारच्या २ऱ्या कालखंडात हमीभावाची सरासरी वाढ ११.२८% होती. तर आत्ताच्या NDA च्या पहिल्या कालखंडात ती ४.९१% आहे.
पिकाबाबत बोलायचं तर UPA मध्ये सर्वात कमी वाढ कापूस पिकास ६.१५% होती तर जास्तीत जास्त वाढ भुईमुगाची १४.४१% होती.
गेल्या वर्षभरातील ही unemployment आकडेवारी.
निव्वळ कृषी क्षेत्रात कार्यरत असणारं मनुष्यबळ हे सिजनल बेरोजगारी म्हणून गणलेलं असतं.खरंतर ते बेरोजगारच असतात.
ही आकडेवारी ज्यांनी आपल्याला दाखवायला हवी आणि सरकारला धारेवर धरायला हवे..तेच आज वाजंत्र्याच्या भूमिकेत आहेत. #modi_job_do#म
Disguised unemployment शेतीत खूप दिसते.म्हणजे एखादं शेती उत्पादन घेताना २ व्यक्ती पुरेशा असतात तिथं त्याच कार्यात ४ व्यक्ती गुंतल्या असतील तर २ व्यक्ती या बेरोजगारच म्हणायला हव्यात.
डिसेंबर महिन्यात शेतीकाम कमी असत म्हणून कागदोपत्री बेरोजगारी जास्त दिसते असं कोणी मंत्री म्हणाले.
पण खरंतर शेतीसारख्या क्षेत्रात कार्यात्मक मनुष्यबळ सामावण्याची क्षमताच तुटपुंजी आहे.कारण त्या क्षेत्रातून येणारं उत्पन्न त्यावर निर्भर असणाऱ्या मनुष्यबळास उदरनिर्वाह देऊ शकत नाही.
लॉकडाऊन काळात प्रायमरी सेक्टर जरी वाढते दिसलं तरी वस्तुस्थितीत फार काही फरक दिसला नाही तो त्यामुळेच.
इतिहासात आत्ममग्न होणारा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' मधील भीमा यांच्यात फार काही सकस आणि तुलनात्मक फरक नसतो.
आला दिवस ढकलणं एवढीच काय ती त्यांची इतिकर्तव्यता असते.
भीमा मेलेल्या मढ्यावर गुजराण करायचा..आणि आजचा समाज मेलेली मढी उकरून.
'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणताना आज महाराष्ट्रवासीयांच्या पोलादी छात्या अभिमानाने थरारत नाहीत.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र..' असं म्हणण्याचीही सोय आता राहिली नाही.
कारण पहिल्यात पहिल्यासारखी छाताडं राहिली नाहीत आणि दुसऱ्यात तख्त.
छत्रपती शिवाजी महाराज यांच कार्यकर्तृत्व काय? तेच आज पर्यंत आपण उगाळत बसलो..त्यावर पुस्तके, नाटकं, चित्रपट..गेलाबाजार डीजे डॉल्बीवर गाणी बडवतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्यामुळं आबासाहेबांची जीवन पद्धती सांगणे हे काही या थ्रेडचं प्रयोजन नाही.
प्रयोजन आहे. आत्ता आणि पुढं काय? हे.
'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.
ADM, Bunge, Cargill, Dreyfus अर्थात ABCD या चौघी जागतिक पटलावर बड्या खेळाडू आहेत.अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ बाजारात ८० ते ९० टक्के हिस्सा या चौघींकडे आहे.
आत्ता परवाच्या वर्षी त्यांनी Glencore agri ltd आणि COFCO ला सोबत घेतलं.
आपण आणि आपले नवीन कायदे कुठं आहोत यात? #थ्रेड#म
“This effort is growing, and the reason is clear: we’re offering clear and tangible benefits for the industry, created by the industry,” असं त्या कंपन्या म्हणाल्या.
पोस्ट हार्वेस्टिंग चेन मध्ये टेक्नॉलॉजी वापरून क्रांतिकारक बदल आणि पारदर्शकतेसाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणतात.
Archer Daniels Midland अर्थात ADM.
गेले शतकभर ही कंपनी अन्नधान्य सप्लाय उद्योग करते. जवळपास २०० देशातून ४५० ठिकाणाहून खरेदी होते..त्यांच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग द्वारे ते जगभर पोहचते.याकामी ४०हजार एम्प्लॉय, ६०भर इनोव्हेशन सेंटर आणि साडेतीनशे फूड आणि फीड बनवणारी सेंटर आहेत.