एवढी महान संतसाहित्य परंपरा, ब्रिटिशकालीन समाजसुधारकांचा वारसा आणि महापुरुषांची अखंड फौज वारसरूपी पाठीशी असताना.. आज आपल्याला एका श्वासाच्या ऑक्सिजनसाठी तडफडावं लागत असेल तर त्या परंपरेचे खरे वारस आपण आहोत का..?
येत्या चार दिवसात महाराष्ट्र दिन आहे..
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥
इति संत शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय.
महाराष्ट्रसमाज आणि एकूणच भारतवर्षात गेली सताठशे वर्ष जी काही सामाजिक कूस बदल घडली. त्यात सिंहाचा वाटा हा संत साहित्यास जातो.
जवळपास १३व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हा समाज एका अंदाधुंदीस सामोरा गेला, आजही जातोच आहे.त्यातून मार्ग दाखवण्याचे काम संत साहित्य इमानेइतबारे करत आहे.अगदी आजही.
संत साहित्याचा आवाका भला थोरला आहे. त्यातील प्राणप्रिय असणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकोबारायांविषयी सुरवातीला चार शब्द.
तुका म्हणजे परिस्थितीने रंजलेला-गांजलेला आणि समाजकंटकांना भिलेला, त्यात आपल्या कजाग बायकोला त्रासलेला वगैरे अशी जी पूर्वग्रहदूषित प्रतिमा निर्माण केली गेली..ती पहिल्यांदा आपण पुसायला हवी.
तत्कालीन काळात दांभिक आणि छळवादी पुरोहितशाही विरोधात बंड करण्याचं सामर्थ्य म्हणजे तुकाराम.
उजळावया आलो वाटा। खरा खोटा निवाडा॥
अशा आत्मबळाने व्यवस्थेशी उभा दावा मांडणारा प्रत्येकजण तुकाराम आहे.
आम्ही झालों गावगुंड। अवघ्या पुंड भुतांसी॥
हे करायला जी ताकद लागते ती ताकद आहे तुकाराम.
त्याकाळी आपल्या साहित्यातून समाजाला दिशा देणारा तुकाराम आजही दीपस्तंभासारखा दिशादर्शक आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू॥
असे म्हणत साडेचार हजार अभंग आणि कवितेतून सामाजिक सुधारणेचा, नैतिकतेचा आणि बंडखोरीचा वसा लीलया पेलणारे जगद्गुरू म्हणजे संत श्री तुकोबाराय.
संतसाहित्य हा काही फक्त धार्मिक अंगाने विचार करून लिहलेला ऐवज नाही हे सत्य आहे.
संतसाहित्य हा एक भाग आहे संतचळवळीचा आणि संतांच्या समाजसुधारनेचा.
१३ व्या शतकाच्या उत्तरार्धातही महाराष्ट्राची परिस्थिती काही बरी वाटावी अशी न्हवतीच..त्याकाळी यादवांची सत्ता होती.. म्हणायला फक्त मोठे राजे.. प्रजा ही नेहमीच वंचित आणि जातीपातीच्या उतरंडीत पिचलेली हे नेहमीच चित्र.
ज्ञानेश्वर माऊलींनी तेंव्हाच लिहून ठेवलंय.. 'जे अवृष्टीचेनि उपद्रवे। गावलें विश्व आघवें॥' म्हणजे दुष्काळाचा सोस तेंव्हाही होताच आणि कुळवाडीना कर हा भरावाच लागायचा.
'कुळवाडी रिणे दाटीली।' हा तो उल्लेख.
तत्कालीन परिस्थितीत ज्ञानोबा आणि लेकरांची हालत समाजाने कशी केली सर्वश्रुत आहे.
पुढे १७ व्या शतकात तुकोबाराय म्हणतात.. 'अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली॥' म्हणजे जातीव्यवस्था आणि समाजरीत ही अजूनपर्यंत तशीच सोसत राहिला होता हा समाज.
पुढे अनेक समाजसुधारकांना समाजसुधारणेचं बाळकडू पाजण्याचं आणि संतसाहित्याचे परिस्थिती निर्माणाचे कार्य ते.
त्याही अगोदर १३ व्या शतकात चक्रधरांनी चातुर्वर्ण्य, समाजास बाधित व्रतवैकल्य, स्त्री शोषण, अस्पृश्यता यावर विपुल लेखन केलं.. 'लीळाचरित्र' हा ऐवज आजही वाचनीय आहे. कारण २१ व्या शतकात भारतात पचायला जड जाणारा विचार या संतांनी १३ व्या शतकापासून मांडले..यातच त्याचं मोठेपण आहे.
ज्ञानोबांच्या काळातील नामदेव महाराज ही पट्टीचे संत साहित्यिक.. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताई-एकनाथ-नामदेव-तुकाराम. हा अखंड वारसा जपणारी ही शृंखला आजही वैयक्तिक आणि सामाजिक जीवन योग्य मार्गावर आणल्याशिवाय रहात नाही.
नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यात ३ शतकांची लांबी आहे.
या ३०० वर्षात समाजाचा पुरता ऱ्हासच झालेला पहायला मिळतो.
तुकाराम महाराजांचा जन्म १६०८ चा.. सगळीकडे अंदाधुंदी माजलेला तो काळ.. जुलूम जबरदस्ती, बलात्कार, खंडणी, धर्मांतर यास उत आलेला तो काळ.. सगळं काही सत्तेसाठी करण्याचा विचार त्याही काळी होता.ब्राम्हण क्षत्रियही सत्तापिपासू बनले.
अशा वातावरणात कसला धर्म, कसली माणुसकी आणि कसली नैतिकता? तेंव्हा ते लिहतात.
'संता नाही मान। देव मानी मुसलमान॥
ऐसें पोटाचे मारिले। देवा आशा विटंबीले॥
घाली लोटांगण। वंदी नीचाचे चरण॥'
आज २१ व्या शतकातील आपली परिस्थिती आणि त्यातल्या त्यात अलीकडचा काळ जर पाहिला तर अंगावर काटा येईल.
अंधश्रद्धेस वाहिलेला हा समाज आहे की काय? अस वाटावं अशी परिस्थिती गेल्या साताठ वर्षात उभी राहिली..यास जबाबदार कोण?
'एकदा का लाज खुंटीला टांगून ठेवली की, नेसुचे फेडून डोक्याला गुंडाळायला वेळ लागत नाही.'
हे आत्ता आठवलं, कारण भारतवर्षात काल-परवा दोन गोष्टी घडल्या..निवृत्तीच्या.
त्यातील एक म्हणजे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि दुसरे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा. या दोघांत देशास अधिक अधोगतीला नेणारी कारकीर्द कोणाची? याबद्दल फार काही चर्चेचा खल करावा लागणार नाही.. कारण गेली वर्षभर या दोघांचे कारकीर्द एकास झाकावे आणि दुसर्यास काढावे अशीच आहे.
त्याबद्दलचा वृत्तांत आजच्या लोकसत्तात आलेलाच आहे.
वरती म्हनलं तो वारसा मिरवण्यास आपण पात्र आहोत का? या प्रश्नाचं उत्तर म्हणून हे निवृतीचं उदाहरण दिलं.
कारण सध्याच्या परिस्थितीस जबाबदार कोण?तर अंतिमतः सरकार आणि जनता यांच्यात जो जबाबदारी झटकण्यास टाळाटाळ करेल तो जबाबदार असेल.
समाजात नुसतं श्रेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत जन्माला आले म्हणून समाज प्रगल्भ होत नसतो.. हे सत्य ठरविण्यास जगास भारताइतकं उत्तम उदाहरण शोधूनही सापडणार नाही.. हा नाकर्तेपणा आपण आपल्या कपाळकरंट्या भूमिकेने मिळवलेला आहे..त्याबद्दल आता कपाळमोक्ष न करता अंग झटकून काम करणं गरजेचं आहे.
आपल्या भूमीत निर्माण झालेलं साहित्य आतातरी आपण कोळून प्यायला हवं..त्यातून जो सकस विचारी खुराक बुद्धीस मिळेल त्यातूनच आपल्याला २१ व्या शतकाची ऊर्जा अनुभवायला मिळेल.. न पेक्षा आपण २१ व्या शतकातील २१ वर्ष वाया घालवलीच आहेत.. ती पुढची अजून २१ शतकं अशीच वाया जातील.. कळावे..!❤️
@LetsReadIndia आणि चमूने एक आगळा वेगळा उपक्रम समाजमाध्यमातून #महाराष्ट्रदिन निमित्ताने सुरू केलेला आहे.. त्यास खूप खूप शुभेच्छा.. आणि आजच्या विषयास अनुसरून संतसाहित्य आणि समाजसुधारणा याविषयी हा छोटासा धागा समर्पित.. #खूपप्रेम ❤️
"अश्मयुग काही दगड संपले म्हणून संपले नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या अगोदर संपेल." हे गाजलेलं वाक्य त्यांचं.
एखाद्या व्यक्तीचं असामान्यत्व काळच अबाधित राखतो.
आत्ता फेब्रुवारीच्या २३ व्या दिवशी त्यांनी आपला निरोप घेतला.
बरोबर,ते आहेत शेख अहमद झाकी यामानी..!❤️ #थ्रेड#म
प्रत्येक कार्यप्रवण हाताच्या भाग्यरेषेचा इतिहास हा जळमटांनी व्यापलेलाच असतो.
झाकी जन्मले १९३० ला..मक्का, सौदी अरेबियात जन्माला आलेलं लेकरू ते..वडील हसन यामानी धार्मिक गुरू..आई साहित्यप्रेमी..सगळीकडं तांडे करून बोंबलत फिरणारे अरब..गरिबी पाचवीला पुजलेली..त्यावेळी देश ही ओळख न्हवती.
तरीही झाकीच्या पालकांनी त्याला शिकायला परदेशी पाठवलं..इजिप्तच्या कैरोत. तिथं ५१ ला लॉ केला. पुढं ५५ ला लॉ मास्टरकी मिळवली न्यूयॉर्कमध्ये.. ५६ ला Harvard लॉ स्कुलमधून ग्रॅज्युएट झाले..त्यानंतरच त्यांचं कार्यकर्तृत्व असं काही झळाळलं की, ६९ ला जपान, Osmania university भारताने ७५ ला.
आम्ही हमीभावात ऐतिहासिक वाढ केली..असे पंतप्रधान म्हणत आहेत..आपण थेट आकडेवारी पहाणारच आहोत..त्याअगोदर त्यांच्या बोलण्याची पार्श्वभूमी पाहू.
APMC सुधारणा, MSP आणि कंत्राटी शेतीची सुरक्षितता यांचा नवीन कायद्यात समावेश या मागण्यांसाठी जवळपास ९० दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. #थ्रेड#म
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेते जिथं जागा मिळेल तिथे नवीन कायद्याच्या समर्थनार्थ भाषण ठोकत आहेत. जवळपास चर्चेच्या १०+ फेऱ्या होऊनही तोडगा नाही..तरीही आम्ही सकारात्मक चर्चेस तयार आहोत असंही सांगत आहेत.
पंतप्रधान म्हणतात ती ऐतिहासिक वाढ याचा अर्थ इतिहासात प्रथमच झालेली वाढ असा आहे.
आता आपण तुलनात्मक इतिहास पाहू.
UPA सरकारच्या २ऱ्या कालखंडात हमीभावाची सरासरी वाढ ११.२८% होती. तर आत्ताच्या NDA च्या पहिल्या कालखंडात ती ४.९१% आहे.
पिकाबाबत बोलायचं तर UPA मध्ये सर्वात कमी वाढ कापूस पिकास ६.१५% होती तर जास्तीत जास्त वाढ भुईमुगाची १४.४१% होती.
गेल्या वर्षभरातील ही unemployment आकडेवारी.
निव्वळ कृषी क्षेत्रात कार्यरत असणारं मनुष्यबळ हे सिजनल बेरोजगारी म्हणून गणलेलं असतं.खरंतर ते बेरोजगारच असतात.
ही आकडेवारी ज्यांनी आपल्याला दाखवायला हवी आणि सरकारला धारेवर धरायला हवे..तेच आज वाजंत्र्याच्या भूमिकेत आहेत. #modi_job_do#म
Disguised unemployment शेतीत खूप दिसते.म्हणजे एखादं शेती उत्पादन घेताना २ व्यक्ती पुरेशा असतात तिथं त्याच कार्यात ४ व्यक्ती गुंतल्या असतील तर २ व्यक्ती या बेरोजगारच म्हणायला हव्यात.
डिसेंबर महिन्यात शेतीकाम कमी असत म्हणून कागदोपत्री बेरोजगारी जास्त दिसते असं कोणी मंत्री म्हणाले.
पण खरंतर शेतीसारख्या क्षेत्रात कार्यात्मक मनुष्यबळ सामावण्याची क्षमताच तुटपुंजी आहे.कारण त्या क्षेत्रातून येणारं उत्पन्न त्यावर निर्भर असणाऱ्या मनुष्यबळास उदरनिर्वाह देऊ शकत नाही.
लॉकडाऊन काळात प्रायमरी सेक्टर जरी वाढते दिसलं तरी वस्तुस्थितीत फार काही फरक दिसला नाही तो त्यामुळेच.
इतिहासात आत्ममग्न होणारा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' मधील भीमा यांच्यात फार काही सकस आणि तुलनात्मक फरक नसतो.
आला दिवस ढकलणं एवढीच काय ती त्यांची इतिकर्तव्यता असते.
भीमा मेलेल्या मढ्यावर गुजराण करायचा..आणि आजचा समाज मेलेली मढी उकरून.
'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणताना आज महाराष्ट्रवासीयांच्या पोलादी छात्या अभिमानाने थरारत नाहीत.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र..' असं म्हणण्याचीही सोय आता राहिली नाही.
कारण पहिल्यात पहिल्यासारखी छाताडं राहिली नाहीत आणि दुसऱ्यात तख्त.
छत्रपती शिवाजी महाराज यांच कार्यकर्तृत्व काय? तेच आज पर्यंत आपण उगाळत बसलो..त्यावर पुस्तके, नाटकं, चित्रपट..गेलाबाजार डीजे डॉल्बीवर गाणी बडवतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्यामुळं आबासाहेबांची जीवन पद्धती सांगणे हे काही या थ्रेडचं प्रयोजन नाही.
प्रयोजन आहे. आत्ता आणि पुढं काय? हे.
'आत्ममग्न समाजास भविष्य कंटाळते' हा इतिहास आहे.आपलं त्याकडे लक्ष आहे का?
गोष्ट २००६ ची.
'येत्या दशकभरात जगास जिवघेण्या फ्लूचा आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागेल.' हे भाकीत झालं होतं दाओस येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मध्ये. इबोला, सार्स, कोविड ने पुढं सिद्ध झालंही. #थ्रेड#म
परवा त्याच WEF ने पुढील काळात जगास जाणवणाऱ्या धोक्यासाठी 'ग्लोबल रिस्क रिपोर्ट' सादर केलाय.
एक भारतीय म्हणून आपला घरातील भांडणं आणि कुरापतीतच आला दिवस जातोय. या असल्या जागतिक रिपोर्टकडे आपण कधी लक्ष द्यायचं? प्रश्नच आहे.
त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष ठीक तरीही धोका आपल्याला शोधेलेच.
परवा मुंबईत लाईट गेलेली. आठवतं? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तेंव्हा म्हणलं 'ही इंटरनेटवरील दहशतवादी कृती आहे.'
हा रिपोर्ट नेमकंपणे हा धोका सांगतो. येत्या काळात 'मूठभराहाती डिजिटल नियंत्रण आणि डिजिटल असमानता' हे ते दोन्ही धोके.
ते मूठभर कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही.
एक देश म्हणून आपली लोकसंख्या, आपली भूक आणि आपलं उत्पन्न याचा विचार करता इंधनासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचं गांभीर्य आपणास आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आणि एक समाज म्हणून त्याचं उत्तर जर होकारार्थी असतं. तर, ही जनता नको त्या धर्मकंटकांच्या नादी लागलीच नसती. #थ्रेड#म
एकदा का भिकेचे डोहाळे लागले. की, वर्तमानात पोट भरण्यासाठी लाजलज्जा सोडणारे भविष्याबाबत फार काही आशावादी राहत नाहीत.
भारत देशाची इंधन भूक त्यावर भारत सरकारची भविष्यातील इंधन योजना यांची सध्याची परिस्थिती हे त्या भिकेचे डोहाळे आहेत.
भारतीयांसाठी अर्थ वाढीचा काळ आहे सध्या.
जसं लेकरांना वयवाढीच्या काळात जास्तीच्या खुराकाची तजवीज पालक करतात तस भारतासाठी अर्थवाढीच्या काळात खुराक म्हणून इंधन जरुरी आहे.
पण या आघाडीवर सरकारची असणारी साग्रसंगीत बोंब काही लपून राहिली नाही.
अर्थ हा विषय कशाशी खातात याचीच माहिती नसलेली मंडळी अर्थ हाताळताना जो अनर्थ होईल.