मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
भूमिकेमुळे आपण त्यांना सहसा काही सांगायच्या भानगडीत पडत नाही.
तर मुद्दा हा की परवा अचानक फोर्ड इंडीयाने भारतातून एक्झिट घेतली, त्यावर बरेच लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताहेत आणि आपला प्रत्येकाचाच वाहनऊद्योगाशी जवळचा संबंध आहे, त्यामुळे त्यावर वेगळ्या दृष्टिकोनातून हे लिखाण! 👇
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.७ % लोकसंख्या भारतात राहते.
दुचाकी, चारचाकी गाड्या असो, मोबाईल, कंप्यूटर, खाद्यपदार्थ, FMCG चे वेगवेगळे प्रॅाडक्ट असो वा माणसांसाठी लागणारी कोणतीही गोष्ट (गरीबासाठी असो की श्रीमंतांसाठी) आपल्याकडे प्रचंड मोठी बाजारपेठ आ वासुन बसलीये…. 👇
त्यामुळे साहजिकच जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या साधारणपणे ९० च्या दशकानंतर भारतात आल्या.
बऱ्याच कंपन्यांना इथे आल्यानंतर आपल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला नक्कीच त्रास होतो. ऊदाहरणच द्यायचे झाले तर अमेरिकेच्याच केलॅाग्जचे घ्या.👇
शंभर वर्षापेक्षा जूनी कंपनी पण भारतात मुळे रोवतां रोवतां नाकी नऊ आले.
भारतात आले तेंव्हा “आम्ही इथली नाष्ट्याची पद्धत बदलू” म्हणाले पण शेवटी त्यांनाही इथे टिकण्यासाठी उपमा बनवावाच लागला.
भारतीय टेस्ट प्रमाणे गोड कॅार्नफ्लेक्स बनवाव्या लागल्या. प्रचंड व्हरायटी आणायला लागली.👇
दुसरे उदाहरण, जॅानडीअर जेंव्हा भारतात आले तेंव्हा त्यांनी अमेरिकेप्रमाणे ट्रॅक्टर इकडेही दिला.
आता आपल्याकडे टायरच्या वर असणाऱ्या गार्ड वर दोन्ही बाजूला सहकुटुंब बसायची संस्कृती आहे हे मान्य नसावे त्यामुळे त्यांनी त्यांचीच अर्धवर्तुळाकार डिझाईन दिली.
शेतात काम करण्यासाठी 👇
ट्रॅक्टर आणि कुटूंबासाठी कार असते असे त्यांचे म्हणणे असावे. पण पुढे काय व्हायचे तेच झाले, धंदा कमी झाला आणि ते आपल्याप्रमाणेच घरगुती बदल करून विकू लागले.
अगदी मॅकडोनाल्ड असो वा डोमिनोज, मॅगी असो की गुगल वा स्टारबक्स वा अजून कोणीही…. सर्वांना भारतीय पद्धतीने बदल करावेच लागले.👇
आता वाहन उद्योगांचे पहा आपल्याकडे मारुती, महिंद्रा, टाटा, हिरो, बजाज या आणि अजून काही भारतीय कंपन्या तर बाहेरून आलेल्या टोयोटा, ह्युंदाई, होंडा,फोर्ड,जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, ॲाडी, स्कोडा, व्हॅाल्वो, किया, निस्सान किंवा अजून काही….
यात ह्युंदाई,मारुती सुझुकी,👇
महिंद्रा, हिरो आणि अशा कंपन्यांना भारतीय मानसिकता बरोबर समजल्याने त्यांनी लहान, कमी टिकीट साईझ किंवा भारतीय माणसांना सुट होतील, मग ती कमी किंमत असो की कमी खर्चात होणारा मेंटेनंन्स असो अशा गाड्या बनवल्या, विकल्या आणि विकताहेत.
जनरल मोटर्स सारखी अमेरिकातील महाकाय कंपनी 👇
ज्यांचाकडे संपुर्ण रेंज होती, सेफ्टी, सिक्युरिटी, ब्रॅंड सर्व काही असूनही त्यांना भारतीय व्हॅल्यू सिस्टीम किंवा इथल्या सारखं हवं तस प्रॅाडक्ट देता आलं नाही.
त्यांचाकडे सर्व काही असूनही, शेवटी ते ही कंटाळून तोटा सहन न झाल्याने निघून गेले.
आपली भारतीय मानसिकता म्हणजे -👇
आखूड शिंगी, कमी चारा खाणारी, जास्त दूध देणारी, पांढऱ्या रंगाची, बहुगुणी, गाय हवी असते.
अगदी तशीच चारचाकी गाडीही हवी असते. आता जनरल मोटर्स घ्या किंवा फोर्ड घ्या यांनी तसे प्रयत्न केले नाहीत का तर नक्की करायचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही.
फोर्डची 👇
किंवा अन्य कोणत्याही कंपनीची असे संपुर्ण ॲापरेशन खाडकन बंद करायची प्रक्रिया एका दिवसात पार पडत नसते.
ती एक अत्यंत लॉंगटर्म प्रोसेस असते. मी नेहमी म्हणतो “ऊद्योग-व्यवसाय भावनांवर चालत नसतात….”
ऊद्योगात फायदा नसेल तर जगातला कोणताही ऊद्योग वा त्यांचे प्रोडक्ट काळ टिकत नाही.👇
टाटाच्या नॅनो कारचेच घ्या, इतके मोठे स्वप्न असताना, इमोशनल विषय असतानाही कधी ना कधी तो निर्णय त्यांनी घेतलाच.
फोर्डच्या बाबतीतही असेच झालेय. सततचा तोटा आणि तोटाच ते सहन करताहेत.
मागचे ३/४ वर्ष वाहनऊद्योगात मंदी होतीच, त्यावर कोरोनाने कहर केला आणि पुढे सेमीकंडक्टरच्या 👇
तुटवड्याने संपुर्ण वाहन ऊद्योगाचे कंबरडेच मोडलेय.
बर यात यांच्याकडे सर्वसामान्य भारतीय घेतील अशा स्वस्त गाड्या नाहीत, जो लोकल सपोर्ट व नेटवर्क मारुती, ह्युंदाई, महिंद्रा किंवा इतरांकडे आहे तसेही ते बनवू शकले नाहीत. त्यात आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हा टिपीकल अमेरिकन दृष्टीकोन 👇
बराच घातक ठरलाय.
आपला भारतीय बाजार हा महाप्रचंड आहे, अत्यंत विशाल प्रदेश, वेगवेगळ्या भौगोलिक, सांस्कृतिक रचना, वेगळी राज्य, विविध आर्थिक स्तर त्यातही राजकिय अनिश्चितता, वेगवेगळे स्थानिक नियम व अटी हा अत्यंत क्लिष्ट प्रकार असतो.
बरं हे सर्व असतानाही इथे टोयोटा यशस्वी होते, 👇
भारतीय, कोरीयन, युरोपियन तसेच इतर अनेक कंपन्या यशस्वी होतात त्यामुळे भारतीय मानसिकतेचा अभ्यास करण्यात फोर्डला अपयश आले हे कटूसत्य आहे. यात उगीचच एकदंर देशाला किंवा व्यवस्थेला दोष देणे मला पटत नाही.
आपण जर तटस्थपणे फोर्डच्या कामगिरीचे सिंहावलोकन केले तर पुढील गोष्टी समोर येतात👇
आणि भविष्यातील गोष्टींचाही उहापोह होतो.
१. मागच्या काही वर्षात कोणतीही नवी गाडी त्यांनी लॉंच केली नव्हती.
२. फोर्ड एंन्डेव्हर ही मागच्या ५ वर्षांपूर्वी आलेली एकच काय ती मोठ्या टिकीट साईझ वा किंमतीची गाडी भारतीय बाजारपेठेत चालली.त्यावरही टोयोटा फॅार्चुनर कायमच वरचढ ठरत होती.👇
३. फोर्ड आयकॅान असेल, फिएस्टा असेल किंवा इकोस्पोर्ट यापलीकडे त्यांना फार काही व्हेरीयशन्स आणता आली नाहीत, स्वस्त कार किंवा आपल्यापैकी एक ते कधी झालेच नाहीत किंवा मेंटेनन्स करताना महाग हा टॅगही तसा फारसा पुसता आला नाही.
४. ह्युंदाई, मारुती सुझुकी, टाटा, महिंद्र, टोयोटा,👇
मर्सिडीझ,रेंज रोव्हर हे जसे कोणत्यातरी एका सेगमेंटमधे स्थिरावले तसा यांना शेवटपर्यंत जम बसवता आला नाही.
५. लक्झरी व स्पोर्टी लूक्समधे जर्मन कार भारतात अनभिषिक्त सम्राट आहेत… यापुर्वी फोर्ड फुलफ्लेज्ड भारतात असताना जर त्यांना त्यांच्या मस्तांग सारख्या गाड्या विकता आल्या नाहीत👇
तर इथून पुढे ते त्यात असं काही खास भरीव करतील असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही.
६. कोणताही एक माणूस बॅग उचलून लगेच विमानात बसून अमेरीकेस गेला असं करू शकतो पण एक आंतरराष्ट्रीय मोठी कंपनी असे करू शकत नाही. त्याच्या डावपेचांचा भाग आणि चाओस मॅनेजमेंट मधे भरडले जावू नये म्हणून 👇
कामगारांना लगेच काढणार नाही किंवा एक्सपोर्टसाठी एखादा प्लांट चालू ठेवू वगैरे वगैरे त्यांना सांगणे भाग आहे.
७. आंतरराष्ट्रीय करारानुसार आणि भारतातील कायद्याप्रमाणेही ते इथल्या ग्राहकांना लगेच वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आपली सर्व्हिस सेंटर, स्पेअरपार्ट बिझनेस👇
इथे पुढील कमीतकमी ७ वर्षे तरी चालू ठेवावाच लागेल.
८. पण उद्योगाच्या साध्या नियमाप्रमाणे इकडची मागणी कमी त्यामुळे भविष्यात जी अवस्था आता प्रिमीअर पद्मिनी किंवा जनरल मोटर्सच्या कोणत्याही ग्राहकाची, किंवा होंडा सिव्हीक गाडीवाल्यांची आहे तशीच होणार.
९. बरं यात त्यांनी भावनिक👇
न होता आता निर्णय घेतला यात त्यांच्या कंपनीचा फायदाच आहे कारण यावर्षी थांबूनही त्यांनी अजून पाच-सात हजार कोटींचे नुकसानच केले असते ते त्यांचे वाचले.
तोच पैसा ते इतरत्र वापरून कंपनीची प्रगती करू शकतात. नुकसान होत असतानाही उगीचच खुप पैशांचे असल्याचे सोंग आणणे कोणत्याही कंपनीला 👇
परवडणारे नसते. ते स्ट्रेटेजी वगैरे ठिक पण त्यालाही काही मर्यादा असतात. उगीच लोकलज्जेत्सव पांढरा हत्ती पोसणे कोणासही शक्य नाही. त्यात अंत ठरलेलाच.
बरं भविष्यात कधी वाटलेच तर ते पुन्हा येऊ शकतात, लढाई कठिण आहेच पण सकारात्मक राहण्यात तसे गैर काहीच नाही.
जर ती कंपनी आणि आपला देश👇
दोघांनाही आर्थिक लाभ होणार असेल तर कदाचित ते त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या घेऊन भारतात यावे.
आता प्रश्न उरतो इथले त्यांचे स्वत:चे कर्मचारी, वेगवेगळे व्हेंडर्स, डीलर नेटवर्क, तिथले कर्मचारी, इतर अनेक डायरेक्ट - इंडायरेक्ट पद्धतीने अवलंबून असणाऱ्या लोकांचा…..
त्यांच्या कौटुंबिक👇
आर्थिक, सामाजिक आणि मानसिक जीवनाचा…. हा अत्यंत जटिल आणि भावनिक मुद्दा आहे. त्यावर फोर्ड नक्की काय तोडगा काढते हे पाहणे मोठे औत्सुक्याचे आहे.
ज्या पद्धतीने वाहन उद्योग चाललाय त्याप्रमाणे वरील सर्व मुद्दे होंडा, निस्सान, रेनॅाल्ट, आणि बऱ्याच कंपन्यांना लागू होतात.👇
डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे आपण निसर्ग नियमाप्रमाणे बदलत रहायला हवे. फ्लेक्सिबिलीटी हवी आणि कालसुसंगत बदल करायलाच हवेत. यातून खरं तर अजून खुप काही शिकण्यासारखे आहे आणि त्यातून बोध घेत वाटचालही करणे महत्वाचे आहे.
यात जी हायली स्किल्ड मॅनपॅावर आज ना ऊद्या दुसरीकडे काम मिळवेल,👇
कदाचित त्यांचे स्पर्धक त्यांना आनंदाने ओढून घेतील. स्किल्ड/सेमीस्किल्डही काहीतरी करतील पण इतरांची फार वाईट अवस्था होऊ शकते.
ज्या आर्थिक साक्षरतेबद्दल मी नेहमी चर्चा करत असतो त्यात जे पारंगत असतील चार पैसे गाठीशी ठेऊन असतील ते थोडेफार वाचतील इतरांसाठी मात्र लढाई फार कठीण असेल.👇
तशीच अवस्था डिलर्स, व्हेंडर्सची जे पुर्णपणे फोर्डवरच अवलंबून होते त्यांच्यासमोर उद्याचे भविष्य अंधकारमय आहे….ज्यांना थोडेफार इतर ऊद्योगही कळताहेत किंवा केलेत ते वाचू शकतात पण पुर्ण फोर्ड वर विसंबून राहणारे मात्र गलितगात्र झालेत.
ज्यांनी अवाढ्यव कर्ज घेऊन ठेवली असतील नवी घरं,👇
गाड्या, किंवा ऊद्योगासाठी क्रेडीट घेतले वा दिले असेल त्यांच्या पुढे प्रश्नांचा डोंगर असेल.
आज जरी त्यांचे भविष्य अंधकारमय असेल तर पुढच्यास ठेस मागचा शहाणा या प्रमाणे आपण यातून बोध घ्यायचा.
जेव्हा कमवतोय तेंव्हा त्याची बचत करायची.
कर्जांपासून लांब राहता आलं तर उत्तम!👇
साधेपणातलं सुख अशा संकटावेळी फार कामास येते.
अशी संकटं कोणावरही येऊ नयेत पण आली तर गाठीशी पैसे असतील तर त्याची तीव्रता कमी होते.
सूरूवात कितीही चांगली असेल तरी शेवट काय होतो हे जास्त महत्वाचे.
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४
भाऊ, बहिण, मामा, मावशी, आत्या, काका, चुलत वगैरे नातेवाईकांचा, भावकीचा गोतावळा माहीत होता…. आपल्या मुलांबाळांना नक्कीच तो तसा मोठा नसेल व माहितही नसेल.
समाजमाध्यमांमुळे तसेच गरजेपोटी (नेटवर्कींच्या) नावाखाली हजारो मित्र हल्ली असतात पण खरे मित्र हे हाताच्या बोटावर मोजता येतील २/४
एवढेच असतात. त्यांना जपायला हवे.
खरं तर जो फरक माहिती आणि ज्ञानामधे आहे तोच फरक ओळख आणि खऱ्या मित्रांमधे आहे.
एकाद्याला मित्र म्हणताना विचार करा, मित्रांची निवड फार काळजी पुर्वक करा. तेच तुमची दशा आणि दिशा ठरविणार असतात. मैत्रीत कधीच काही गुप्त नसते त्यामुळे ठेवला तर ३/४
१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.
मधे तो दिसला, अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटात त्याने ती ॲक्सेप्टही केली.
त्या दिवशी मला वेळ नव्हता,एके दिवशी पुण्याहून परत येत असताना मी त्याची फेसबुकवॅाल चाळली… काय फोटो होते त्याचे. अवाक् करणारे, BMW/Merc, सारख्या देशी विदेशी कार, पंचतारांकीत
२/१६
हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्यावेळासाठी का होईना पण मला फार असुया निर्माण झाली….. पण उत्सुकता मात्र जागी झाली की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसे काय कमावले असेल.
मागच्या महिन्यात लॅाकडाऊन असताना पुण्याहून एका चांगल्या कंपनीत कामाला असलेल्या मित्राचा फोन आला. त्याचे Work From Home सूरू होते पण त्याचा एकंदर सूर त्रासलेला आणि नाराजीचा होता.
म्हणे - “लॅाकडाऊन लागला की गावी सांगलीला जायचे ठरले होते पण काल कंपनीने नियम काढलाय की पुणे सोडून जायचे नाही, जर रिपोर्टिंग लोकेशन बदलले तर ती सुट्टी म्हणून मोजली जाईल आणि ॲक्शन पण घेऊ शकतात. वैताग आलाय राव या फालतू पॅालिसिजचा.”
त्याचा त्रागा पाहून मी त्याला म्हटले -
२/१४
“तुला माहिती आहे का तू खरं तर किती नशीबवान आहेस?”
माझ्या नशीबवान शब्दाने तर तो एकदम चवताळलाच, त्याला वाटले मी त्याची मस्करी करतोय, एकदम तारस्वरात तो म्हणे - “नशीबवान? का राव विनाकारण खपली काढतोय, तिकडे समीर, सचिन गावी कसली धमाल करताहेत, इतर कित्येक नातेवाईक धमाल करताहेत
३/१४
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते.
अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत मी रात्री १२-१ च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो.
त्यावेळेस मी कांदिवलीत रहायचो. बसने दादरला उतरायच्या ऐवजी चूकून सायनलाच उतरलो,खाली आलो चूक लक्षात आली आणि मग कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली.
रिक्षात बसलो आणि एका लेबर
२/१२
कॅान्ट्रॅक्टरचा पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला. मी फोन उचलला तसा तो तिकडून भयंकर सूरू झाला….
तो अद्वातद्वा बोलत होता,मी त्याला इकडून “आजच घर विकलेय,तूम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून,ओरडून सांगत होतो पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी बराच वेळ
३/१२
२००६ साली कॉर्पोरेटमधे मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्सटर्नल नेटवर्कींग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटोरींगची जबाबदारीही माझ्यावर असायची.
अशातच एक तरूण विजय (नाव बदललेय) आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधे रूजू झाला.
परंतु त्याच आठवड्यात माझे एक महत्वाचे ट्रेनिंग सूरू झाले त्यामुळे मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच दिल्लीला गेलो, त्यामुळे त्याच्यासोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही.
साधारणपणे महिन्याभरानंतर एक दिवस तो मला कॅंटीनमधे जेवताना दिसला.
मग मी
२/१६
त्याच्यासोबतच जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून जावून बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिन्याभराच्या कामाचा फिडबॅक विचारला तर तो फार तणावात जाणवला.
तो म्हणाला,”मला डिपार्टमेण्ट बदलून हवेय. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही,तसेच जॉबरोलही चेंज करून हवाय.
३/१६