नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
आजकालच्या आपल्या तरूणांमधे विविध विषयांवरील चौफेर वाचन, नव्या खाजगी/कॉर्पोरेट जगाशी जोडून घेताना येणाऱ्या भाषेच्या अडचणी तसेच प्रोडक्टिव्हीटी Vs स्वत:ची प्रगती याबद्दल बऱ्याच अंशी फारशी जागृकता किंवा फार चर्चा दिसत नाही.
यापुढच्या काळात आपले जे तरूण नुकतेच कॅार्पोरेट किंवा
४/१९
खाजगी क्षेत्रात पदार्पण करत आहेत त्यांनी प्रोडक्टिव्हीटी कशी वाढवावी यावर अधिकाधिक लिखाण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
यात वेगळेवेगळे विषय,त्यात होणाऱ्या चूका यावर भर असेल, काही बाबी आपल्याला अनुभव आल्यानंतर साध्यासुध्या वाटत असल्या तरी आपण नविन असताना ते फार मोठे संकट असते.
५/१९
१. वेळेचे महत्व समजून घ्या!
आपण दिवसभरातला किती वेळ समाजमाध्यमांवर देतोय, किती वेळ इमेल, व्हॅाट्सॲप आणि नॅानप्रोडक्टिव्ह कामांसाठी देतोय याची नोंद करा….
टाईम बॅाक्सिंग हा वेगळा आणि खुप चांगला प्रकार आहे त्यावर काम करा.
आणि सर्वात महत्वाचे डिजीटल स्क्रिन टाईम कमी करा!
६/१९
२. दिलेली वेळ पाळा!
कोणत्याही कामाची सहकारी, कस्टमर, अगदी स्वत:लाही दिलेली वेळ पाळा किंवा इतर कोणतीही कमिटमेंट त्याच वेळेला पार पडेल हे पहा. करू, पाहू, थोड्यावेळाने करू हा रोग होऊ देऊ नका!
यामुळे तुमचे स्वत:चे गुडविल तर वाढेलच शिवाय कंपनीला त्याचा खुप फायदा होईल.
७/१९
३. चुका मान्य करायला शिका!
प्रगती करायची असेल तर “मला सर्व कळते,हे तर मला माहिती होते” वगैरे वगैरे चुकीचा ॲटीट्यूड टाळायला हवा.
प्रत्येकामधे सुधारणेला वाव असतो, जो रोज शिकत राहतो तोच या जीवघेण्या स्पर्धेत टिकतो आणि पुढे जातो. काहीही चुकले तर लगेच मान्य करून मोकळे व्हायचे.
८/१९
४. वाचन आणि वाचन!
आपल्या क्षेत्रासंबंधात जेवढे जास्तीत जास्त वाचता येईल ते वाचा, दर आठवड्याला विविध लेख, जुने बेसिक रेफरंन्स बुक्स, नव्या घडामोडी, शोध तसेच कमीतकमी एक तरी पुस्तक वाचायचे हा ध्यास हवा आणि तशी कृती हवी.
बाकी जो वाचत नाही तो जे वाचतात त्यांना फॅालो करतो किंवा
९/१९
माझ्यासोबत राजकारण होतेय हे सर्वमान्य कारण सांगत मागे पडतो. तुमच्याकडे ज्ञान आणि कृती असेल तर तुम्हाला यशस्वी व्हायला फार अडचणी येत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो.
वाचनाने अगदी सर्वसामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो हे लक्षात घ्या.आजपासूनच वाचनाला सूरूवात करा
१०/१९
५. कोण काय विचार करतात याची चिंता करू नका!
प्रोफेशनल आयुष्य असो की खाजगी आपली स्वप्न जेंव्हा लाखो करोंडोंची असतात, त्यासाठी कष्ट घ्यायची, जयपराजय पचवायची ताकद असते तेंव्हा कवडीमोल लोकांच्या टोमण्यांमुळे मागे हटायचं नसतं…..आपले काम करत पुढे ध्येयाचा पाठलाग करत पुढे जायचे.
११/१९
६. संपुर्ण लक्ष कामावरच द्या!
कामाच्या वेळी फक्त आणि फक्त कामावरच फोकस करायचे. अगदी चूकूनही समाजमाध्यमं,फालतू व्हाट्सॲप फॅारवर्डस किंवा गॅासिप्स यामधे अडकायचे नाही.
कोणत्याही अंतर्गत राजकारणात अडकायचे नाही, प्रामाणिकपणे आणि लक्षपूर्वक आपण जेवढे काम करू तेवढा आपला कामाचा
१२/१९
उरक वाढत जातो आणि कामात एक चांगली धार येते.
हळूहळू तुम्हाला त्या यशाची नशा यायला सुरूवात होते आणि तीच खरी या वयात गरजेची नशा असते.
७. सहकारी,मित्र आणि साथसंगत!
हा खर प्रत्येकाच्याच आयुष्यातला अत्यंत महत्वाचा भाग असतो, कोणतेही वय असो, शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसाय काहीही
१३/१९
करत असलो तरी आपण आपल्या आयुष्यात कोणाच्या सानिध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खुप मोठा परिणाम होत असतो.
आपल्या आयुष्याला दिशा देणारी माणसं बऱ्याचदा आपल्या कामाच्या ठिकाणी भेटतात त्यामुळे अशी माणसं शोधायची तीच आपल्यासाठी खरी संपत्ती असते.
१४/१९
८. सतत स्वत:ला प्रश्न विचारत रहा!
इतर कोणी आपल्याला सांगेल किंवा फक्त पुस्तक वाचून आपल्याला ज्ञान मिळेल हा सर्वात मोठा भ्रम आहे.
आपल्याला सेल्फ इव्ह्यॅल्यूएशन करायला जमले पाहिजे…
आपल्या चुका आणि आपण करत असलेला टाईमपास आपल्यालाच अधिक चांगल्या प्रकारे कळतो….त्याचे उपायही
१५/१९
आपल्याला माहिती असतात, त्यावर कृती करण्याची मात्र तयारी हवी…. थॅामस एडीसन म्हणतात - The value of good idea is in using it. त्यामुळे ज्या नव्या कल्पना सुचतील त्यावर विचार करा, वापरा आणि योग्य कृती करा.
स्वत:ला प्रश्न विचारायला सुरूवात झाली की खऱ्या प्रगतीला सूरूवात होते.
१६/१९
९. व्यसनांपासून दूर रहा!
तूम्ही कोणत्याही फॅमिली बॅकग्राऊंडमधून येत असाल तरी व्यसनांपासून दूर रहा…. रात्री उशीरापर्यंत दारूच्या पार्ट्या करून किंवा सिगारेटचे झुरके घेतले की फार मोठे यश मिळते किंवा नेटवर्कींग होते, हा फार मोठा गैरसमज आहे.
कोणत्या वेळी काय होईल आणि या
१७/१९
व्यसनाचे अतिव्यसनात कधी रूपांतर होईल याची खात्री नसते.
जर आपले आईवडील खुप श्रीमंत असतील तर तुम्ही स्वत: गरीब व्हाल किंवा आपल्या घरची परिस्थिती गरीब असेल तर अजून जास्त दारिद्र्य आपल्या कुटुंबाला भोगायला लागू शकते.
आपले ध्येय कधीच विसरायचे नसेल तर कोणत्याही परिस्थितीत या
१८/१९
विनाशकारी बाबींपासून दूर राहता आले तर सर्वोत्तम!
मराठी बोला, मराठीचा अभिमानही बाळगा पण इंग्रजी हमखास शिका, इंग्रजी साहित्य वाचा, त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल.
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४
भाऊ, बहिण, मामा, मावशी, आत्या, काका, चुलत वगैरे नातेवाईकांचा, भावकीचा गोतावळा माहीत होता…. आपल्या मुलांबाळांना नक्कीच तो तसा मोठा नसेल व माहितही नसेल.
समाजमाध्यमांमुळे तसेच गरजेपोटी (नेटवर्कींच्या) नावाखाली हजारो मित्र हल्ली असतात पण खरे मित्र हे हाताच्या बोटावर मोजता येतील २/४
एवढेच असतात. त्यांना जपायला हवे.
खरं तर जो फरक माहिती आणि ज्ञानामधे आहे तोच फरक ओळख आणि खऱ्या मित्रांमधे आहे.
एकाद्याला मित्र म्हणताना विचार करा, मित्रांची निवड फार काळजी पुर्वक करा. तेच तुमची दशा आणि दिशा ठरविणार असतात. मैत्रीत कधीच काही गुप्त नसते त्यामुळे ठेवला तर ३/४
१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.
मधे तो दिसला, अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटात त्याने ती ॲक्सेप्टही केली.
त्या दिवशी मला वेळ नव्हता,एके दिवशी पुण्याहून परत येत असताना मी त्याची फेसबुकवॅाल चाळली… काय फोटो होते त्याचे. अवाक् करणारे, BMW/Merc, सारख्या देशी विदेशी कार, पंचतारांकीत
२/१६
हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्यावेळासाठी का होईना पण मला फार असुया निर्माण झाली….. पण उत्सुकता मात्र जागी झाली की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसे काय कमावले असेल.
मागच्या महिन्यात लॅाकडाऊन असताना पुण्याहून एका चांगल्या कंपनीत कामाला असलेल्या मित्राचा फोन आला. त्याचे Work From Home सूरू होते पण त्याचा एकंदर सूर त्रासलेला आणि नाराजीचा होता.
म्हणे - “लॅाकडाऊन लागला की गावी सांगलीला जायचे ठरले होते पण काल कंपनीने नियम काढलाय की पुणे सोडून जायचे नाही, जर रिपोर्टिंग लोकेशन बदलले तर ती सुट्टी म्हणून मोजली जाईल आणि ॲक्शन पण घेऊ शकतात. वैताग आलाय राव या फालतू पॅालिसिजचा.”
त्याचा त्रागा पाहून मी त्याला म्हटले -
२/१४
“तुला माहिती आहे का तू खरं तर किती नशीबवान आहेस?”
माझ्या नशीबवान शब्दाने तर तो एकदम चवताळलाच, त्याला वाटले मी त्याची मस्करी करतोय, एकदम तारस्वरात तो म्हणे - “नशीबवान? का राव विनाकारण खपली काढतोय, तिकडे समीर, सचिन गावी कसली धमाल करताहेत, इतर कित्येक नातेवाईक धमाल करताहेत
३/१४
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते.
अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत मी रात्री १२-१ च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो.
त्यावेळेस मी कांदिवलीत रहायचो. बसने दादरला उतरायच्या ऐवजी चूकून सायनलाच उतरलो,खाली आलो चूक लक्षात आली आणि मग कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली.
रिक्षात बसलो आणि एका लेबर
२/१२
कॅान्ट्रॅक्टरचा पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला. मी फोन उचलला तसा तो तिकडून भयंकर सूरू झाला….
तो अद्वातद्वा बोलत होता,मी त्याला इकडून “आजच घर विकलेय,तूम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून,ओरडून सांगत होतो पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी बराच वेळ
३/१२