एक सामान्य माणूस ज्यावेळेस आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो त्यावेळेस अस गुहीत धरतो कि आर्थिक नियोजन करणे खुप कठीण काम आहे कोण बेरीज ,बाजाबाकी ,महागाई यांचे आकडेमोड करत बसणार
2) तसेच यासाठी खुप महागडे SOFTWARE पण आपल्याकडे असायला लागते बरोबर त्यासाठी मी खुप सोप्या भाषेत आर्थिक नियोजन कसे करायचे हे सांगत आहे .
आपण असे गृहीत धरू कि एखादा व्यक्ती सरासरी १०००० रु प्रत्येक महिन्याला वाचवतो तर तो त्याचे आर्थिक नियोजन कसे करू शकतो ?
3) चला तर पाहूया
#आर्थिक_नियोजन करण्यासाठी आपल्याजवळ काही माहिती असणे गरजेचे आहे ती माहिती आपण खालील उदाहरणावरून पाहू :-
4) रुपेश नावाच्या व्यक्तीचे वय ४० असून पत्नी आणि एक छोटा मुलगा असे त्याचे कुटुंब आहे . रुपेश हा निर्व्यसनी असून ( Non –Smoker & Drinker ) प्रत्येक महिन्याला भविष्यासाठी दहा हजार रुपयाची बचत करत आहे म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार रुपये.
5) रुपेश वाचवलेले १०००० रुपये एकतर विमा policy , भिशी , महागाई पेक्षा कमी परतावा देणारे पर्याय किवा लालच दाखवून 1 ते २ वर्षात तुमचा पैसा दुप्पट यासारख्या फसव्या योजनेत टाकू शकतो किवा खालील प्रमाणे एक स्मार्ट #आर्थिक_नियोजन करू शकतो .
6) #स्टेप 1 ) रुपेश वर्षाला ८९०९ ( महिन्याला ७४२ ) रुपये भरून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक चांगला ५० लाख coverअसलेला एक टर्म न्शुरस खरेदी करू शकतो म्हणजे तरुण वयात कुटुंबाची जबाबदारी असताना जर रुपेश च्या शरीराने साथ सोडली ( मृत्यू ) तर त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये भेटतील
7) #स्टेप २ रुपेश वर्षाला १३५६८ ( महिन्याला ११३० ) रुपये भरून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक चांगला ५ लाख cover असलेला एक हेंल्थ इन्शुरस खरेदी करत आहे ज्याचा फायदा कधी Covid-१९ , अपघात ,गंभीर आजार किवा एखादी surgery यामुळे हॉस्पिटल मध्ये भारती झालो तर
8) रुपयांचा होणारा यावर खर्च आपला वाचेल . #स्टेप ३ ) आता रुपेशकडे जवळपास वर्षाला ९७५२३ रु ( = १२०००० – ८९०९ - १३५६८ ) म्हणजे महिन्याला ८१२७ रुपये त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी आहे . रुपेश एका चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने ८१२७ रु महिन्याला SIP ( Systematic Investment Plan )
9) मध्ये गुंतवत आहे आणि आपण असे गुहीत धरू शकतो कि रुपेश ला सरासरी १२% वार्षिक परतावा जर पुढील २० वर्षासाठी भेटला तर रुपेश कडे जवळपास ७५००००० ( ७५ लाख रुपये ) जमा होतील . इथे एक लक्षात ठेवायला हवे कि रूपेशने २० वर्षामध्ये नाही SIP वाढवली म्हणजे ८१२७ जेवढी आहे तेवढीच ठेवली आणि नाही
10)कमी केली पण जर रूपेशने जसा त्याचा पगार आणि महागाई वाढत आहे तशी SIP जर १०% ने प्रत्येक वर्षी वाढवली असती तर त्याच्याकडे जवळपास चक्रवाढ व्याजामुळे १६१६३५५० ( एक करोड ६१ लाख ) जमा होतात हीच तर जादू आहे योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करण्याची .
11) "गुंतवणूक करणे एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे."
"जर तुमच्याकडे कोणतेही कुटुंबासाठी संरक्षण नसेल ( टर्म + हेल्थ ) आणि तुमची SIP किवा कोठेही गुंतवणूक चालू असेल तर नेहमी लक्षात ठेवा कदाचित तुमच्याकडे आर्थिक अभ्यास असेल पण आर्थिक नियोजन नाहीये "
12) रूपेश चे आर्थिक नियोजन – १०००० रुपये महिन्याला गुंतवणूक
☑️५० लाखाचे संरक्षण असलेला एक टर्म इन्शुरस ( Family Protection )
☑️ ५ लाखाचा आरोग्य विमा ( Income Protection )
☑️ SIP पद्धतीने भविष्यासाठी गुंतवणुकीच्या सर्वात चांगल्या पर्यायामध्ये गुंतवणूक
धन्यवाद.
13) Disclaimer - Mutual funds are subject to market risk please read all documents carefully before investing )
Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?
कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread
जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .
एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी
✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨👩👧👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात 1) #Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर
खर्या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.