जशी बिग बझार, पँटालून या कंपनीजची मालकी किशोर बियाणींच्या "फ्युचर ग्रुप"ची होती (होती : कारण पँटालून आदित्य बिर्लांच्या आदित्य बिर्ला ग्रूपने विकत घेतलं) तसंच हे.
हे फेसबुक चं मेटा नामांतर या कॉर्पोरेट ब्रँडचं नामांतर आहे. म्हणजेच फेसबुक इन्क आता मेटा झालंय.
२+
फेसबुक हे प्रोडक्ट तूर्तास तरी फेसबुकच असणार आहे.
२ - या नामांतराचा फेसबुकवर होणाऱ्या अनंत आरोपांशी काहीही संबंध नाही.
अवाढव्य व्याप्ती, त्यातून मिळालेली जवळजवळ अमर्याद शक्ती, डेटा प्रायव्हसी, इन्फर्मेशन शेअरिंग : या मुद्द्यांवर गेल्या काही वर्षांत फेसबुक सतत रडारखाली आहे.
३+
गेल्या आठवड्यात "फेसबुक नाव बदलणार" ही बातमी व्हायरल झाली, तेव्हापासून "सतत आरोपांचा सामना करावा लागत असल्याने फेसबुक रिब्रान्डींग करण्याचा प्रयत्न करत आहे" असा एक सार्वत्रिक समज रुजला होता.
जो चुकीचा आहे.
४+
अनेक स्टार्टअप सुरुवातीला ब्रँड आणि प्रोडक्ट/सर्व्हिस यात भेद करत नाहीत. नंतर बिझनेस मोठा झाला, इतर व्हर्टीकल्स सुरु केले किंवा अक्वायर केले की बिझनेस बदलत जातो, अधिक व्यापक होत जातो -
५+
अश्यावेळी एका स्वतंत्र छत्राखाली विविध प्रोडक्ट / सर्व्हिस ब्रॅण्ड्स ठेवणं योग्य अन आवश्यक ठरतं. तेच फेसबुकने केलंय.
गुगल जन्मलं १९९८ मध्ये. त्यांची पॅरेण्ट कंपनी अल्फाबेट इन्क जन्मली २०१५ मध्ये. 😀
३ - फेसबुक आपलं वर्तमान आहे तर मेटा आणि मेटाव्हर्स आपलं भविष्य असणार आहे.
६+
फेसबुकचा मूळ बिझनेस स्थिरसावर झाल्यानंतर मार्क आणि टीमने २ व्हिजन्स ठेवले होते.
इतर स्पर्धक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हस्तगत करणे हे पहिलं. इंस्टाग्राम, व्हाट्सअप विकत घेणं त्याच व्हिजनचा परिपाक.
७+
दुसरं - भविष्यकेंद्रीत R&D करणे किंवा असा रिसर्च करणाऱ्या छोट्या छोट्या कंपनीज विकत घेणे. यात ऑटोमेशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिअॅलिटी यांवर भर असणार होता. गेल्या काही वर्षांत जगभर पसरलेले या क्षेत्रांतील विविध स्टार्टअप्स विकत घेण्याचा सपाटा फेसबुकने लावला होता.
८+
त्याचा परिपाक म्हणजे मेटा आणि मेटाव्हर्स.
रिब्रान्डींग करताना मार्क अँड टीमने लावलेलं डोकं आणि निवडलेलं नाव निव्वळ लाजवाब आहे. मेटा हे ब्रँड नाव आणि त्यातून निर्माण होणारं नवं ब्रह्मांड म्हणजे "universe" - म्हणजे मेटाव्हर्स...!
९+
सायन्स फिक्शनच्या जगात मेटाव्हर्स ही संकल्पना गेली काही दशकं लोकप्रिय झालीये. फेसबुक इन्कने हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढचं पाऊल टाकलं आहे. हे पाऊल समजून घेण्यासाठी meta.com वर जा एकदा. आपलं भविष्य कसा आकार घेतंय याची झलक बघायला मिळेल.
१०+
जाता जाता - एकीकडे क्रिप्टो करन्सीज, एनएफटी "द वर्ल्ड अॅज वूई नो" बदलत नेताहेत. दुसरीकडे एआय, व्हीआर, ऑटोमेशन्स नवं ब्रह्मांड घडवताहेत. मस्ती म्हणून मार्क च्या डीपी, पोस्ट्सवर मराठीत दंगा करताना -
११+
जग बदलत जातंय, एक नवं युनिव्हर्स आकार घेतंय - ही जाणीव पुसट होऊ देऊ नका. 🙂
शेअर मार्केटमध्ये संभाव्य करेक्शनचं वारं वहात असताना, वैचारिक मार्केटमध्ये शेफाली वैद्यंच्या #NoBindiNoBusiness चा धुमाकूळ सुरु आहे. पुरोगामी विश्वाने ज्याप्रकारे हा झंझावात हॅन्डल केलाय त्यावरून त्यांच्यात कसलंही करेक्शन होण्याची अजूनही चिन्हं दिसत नसल्याचं सिद्ध झालंय.
१+
भारतातील सेक्युलर फ्रॅगमेंट तुटतोय, हिंदूंमध्ये असहिष्णुता वाढत जातीये म्हणून कळवळून उठणाऱ्या लोकांमध्ये "हे असं का घडतंय?" यावर विचार करून कसलंही कोर्स करेक्शन करण्याची कुवतच दिसत नाही.
२+
@ShefVaidya चांगल्या आहेत की वाईट, त्यांचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य हे मुद्दे दुय्यम आहेत. त्यांच्या एका साध्या ट्विटला मिळणारा जोरदार प्रतिसाद, ऐतिहसिक दृष्ट्या इन्क्लुजिव्ह, ब्रॉड माईंडेड असणाऱ्या हिंदू समाजातील एका मोठ्या समूहाला त्यांचं म्हणणं पटणं, आवडणं आणि -
पैश्याने पैसा बनतो हे वाक्य सर्वांना माहितीये. पण त्या तत्वावर चालण्याची मानसिकता सिस्टिमॅटिकली डेव्हलप होत नाही.
आपण नोकरी करत असतो - ठराविक पगार मिळत असतो - तो वाढावा असं वाटत असतं - त्यासाठी अॅन्यूअल अप्रेजल किंवा नोकरी बदलणे हे २ पर्याय माहिती असतात - पण -
१+
अप्रेजल असो वा स्विच, कोणत्याही पर्यायातून मॅग्झिमम आऊटपुट मिळण्यासाठी पैसा खर्च करून करिअर ग्रोथ करण्याचा विचार कितीसा करतो आपण?!
प्रमोशन मिळवण्यासाठी माझ्यात कोणत्या स्किल्स हव्यात, त्या डेव्हलप करायला काय लागेल - इतकंच नाही, मला माझं अपियरन्स सुधारावं लागेल का?
२+
चकचकीत रहावं लागेल का? बाकी सगळं सोडा - फक्त चटकदार इंग्रजी येत नाही म्हणून मी अडकलोय - मग इंग्रजी शिकायला जरा पैसे खर्च करावेत का?
हा विचारच करत नाही आपण.
एमबीएत कॉलेजात आलेल्या पहिल्याच कंपनीत जॉब मिळाला. छान पॅकेज होतं.
३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.
यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.
अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.
१+
२०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.
टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.
२+
कोणत्या सेलिब्रिटीच्या घरात नेमकं काय घडलंय, कोणत्या राजकीय पक्षात कोणतं नवं वादळ उभारलंय, बिग बॉस मध्ये काय होतंय - मोदी ठाकरे सध्या काय करताहेत (आणि जोडीला उकडीचे की तळलेले!) या सर्व गदारोळात पर्सनल डेव्हलपमेंट -
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.