आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
एकमेकांना एकच प्रश्न विचारला - कांदिवलीतच राहता का तुम्ही?
ही वेळ, ही फ्रिक्वेन्सी आमची मैत्री होण्यासाठी पुरेशी होती.दोघेही खळखळून हसलो.
त्या प्रवासात एकमेकांबद्दल बरंच कळलं, तोही महिन्याभरापुर्वीच माझ्यासारखाच गावाहून आलाय…खेडेगावातच वाढला. पुढे शिक्षण जिल्ह्याच्या
👇
ठिकाणी केले…त्याने M.E. नुकतच पुर्ण केले होते आणि मुंबईत डिझाईनमधे कंपनीत नोकरी मिळाली म्हणून इकडे आला.
शेतकरी कुटूंब, बोलीभाषा दोघांचीही गावरान, ट्रेनमधली फजीतीही सारखीच आणि नुकतेच दोघांचेही नवेनवे मुंबई कनेक्शन यामुळे पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली.
मग पुढे ४/६ महिने
👇
बसने सोबत येणे-जाणे व्हायचे, दुपारी दोघेही ॲाफीसला असलो की एकत्र जेवायचो अगदी एकमेकांच्या रूमवरही हक्काने येणे जाणे व्हायचे.
युवराज जरी मितभाषी, शांत असला तरी तो अत्यंत हुशार होता. त्याची कामातील, त्याच्या विषयातली ग्रास्पिंग पॅावर भारी होती पण काही महिन्यातच त्याची हुशारी
👇
त्या कंपनीतील सो कोल्ड “जून्या खोडांना” रुचली नाही आणि याच्यासोबत राजकारण सूरू झाले.
हा पण भारी होता, ताबडतोप राजीनामा तर दिलाच, वर मॅनेजमेंटला खरं काय ते सगळं लिहून कळवलं. पुढे लगेच आठवड्याभरात त्याला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीही मिळाली. पुढे ४/५ वर्षात
👇
त्याने खूप चांगली प्रगती केली. घर घेतलं. गाडी घेतली, लग्नही झाले. बायको इंटेरीयर डेकोरेशन करणाऱ्या मोठ्या कंपनीत कामाला. सुखवस्तू कुटूंब झाले.
या सर्व प्रवासात आमची मैत्री चांगली घट्ट झाली होती. युवराजचा भाऊ सरकारी नोकरीत त्यामुळे त्याला आता घरची अशी काही जबाबदारी नव्हती.
👇
तो हुशार होता, सगळं काही तोलून मापून आणि प्लानिंग करून करायचा.
असाच एक दिवस त्याचा फोन आला म्हणाला रविवारी सकाळी गोरेगावला अमुक अमुक ठिकाणी ये.
मी काय किंवा कशासाठी असे काही विचारले नाही. सहसा आम्ही मित्र रविवारी नाष्ट्यासाठी भेटायचो मी म्हटले “असेल कोणता खाण्याचा अड्डा”
👇
मग २/३ जण आम्ही तिकडे पोहचलो. त्या पत्त्यावर गेलो तर आश्चर्याचा धक्काच बसला, आमच्या युवराजने चक्क स्वतःचा व्यवसाय सूरू केलेला आणि त्या दिवशी ॲाफीसची पूजा होती.
आम्हाला खूप आनंद झाला… हा आश्चर्याचा धक्का खूप सुखकारक तर होताच पण खुप अभिमानस्पदही. त्याचे त्याच्या कुटूबांचे
👇
सर्वांचे अभिनंदन करून आम्ही अगदी सर्व पुजा उरकून रात्रीच घरी आलो.
२००५-०६ च्या काळात बांधकाम क्षेत्र खूपच तेजीत होते. एकंदर सर्वच क्षेत्रात भरभराटीचे ते दिवस होते.
त्यात याने बांधकामासाठीच्या अत्यंत आधूनिक मशिनच्या काही डीलरशिप्स मिळवल्या होत्या आणि त्यांना मागणीही प्रचंड
👇
होती. आमचा सर्वांचा युवराजबद्दल आदर आणि अभिमान खूप वाढला होता.
पुढे आठवडा-पंधरा दिवसातून तो भेटायचा तसेच नेहमी काही ना काही कारणाने बोलणेही व्हायचे. पहिले तीन ते चार महिने तसे बरे गेले पण पुढे पुढे त्याच्याशी बोलताना तो तणावात जाणवायचा. तसा त्याने धंद्यासाठी सहा महिन्यांचा
👇
पैशांचा जुगाड करून ठेवलेला, पत्नी नोकरीला असल्याने आणि भावाचीही नोकरी असल्याने एवढी काही बिकट परिस्थिती नव्हती.
पण तरीही तो नीट काही सांगत नव्हता. एक दिवस संध्याकाळी मीच मुद्दाम त्याच्या ॲाफीसला गेलो. त्याच्या स्टाफची लोकं निघून गेलेली.त्यामुळे आम्ही दोघेच होतो. मी त्याला
👇
त्याचे तणावात असल्याचे काय कारण ते स्पष्ट विचारले.
तो तसा माझा चांगला मित्र त्यामुळे कोणताही संकोच न करता त्याने सांगितले की - सेल म्हणावा असा होत नाहीये या मशीन्सचा. मला जो अंदाज होता तो चुकलाय. व्यवसाय सूरू केल्यापासून आजपर्यंत एकाही महिन्यात साधे ॲाफीसच्या भाड्याचे,
👇
वीजेचे, फोनबिल्सचे किंवा लोकांच्या पगाराचे पण पुर्ण पैसे निघत नाहीत. दर महिन्याला मीच टाकतोय. आता पाच महिने होतील पण काही सुचेना.
मी बराच वेळ त्यांच्यासोबत बोललो पण आपण काठावर उभे राहून (पोहायला येत नसताना) उगीचच एखाद्याला कसे काय शहाणपणाने पोहायला शिकवणार म्हणून फक्त ऐकून
👇
घेत होतो. माझं पण डोकं बधीर झालं, मी पण त्याच्या पंक्तीलाच जावून बसलो.
संपुर्ण हॅंग!
मी म्हटल आपण जरा अजून दोन-तीन एक्सपर्ट लोकांशी बोलू मग ठरवू. तोपर्यंत काही पैसे लागले तर हे घे म्हणून माझा एक चेक त्याच्याकडे (तो नको म्हणत असतानाही) ठेवून दिला.
महिनाभर असाच गेला त्याचा
👇
विषय माझ्या आकलन शक्ती पलिकडचा होता. बरं कोणी सल्ला देईल असा तज्ञ माणूस (युवराजपेक्षा) त्याच्या क्षेत्रातला तरी माझ्या परिचयातला नव्हता. त्यामुळे हात टेकण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नव्हते.
पुढे महिन्याभराने मी पुन्हा त्याच्याकडे गेलो. दुपारची वेळ होती. तो ॲाफीसमधेच होता.
👇
एकत्र जेवलो आणि पुन्हा याचे तेच सूरू झाले. म्हणे या महिन्यात तर एकही मशीन विकले गेलेले नाही. मी आपलं सहज विचारले की किती ठिकाणी कोटेशन दिलेले? किती जणांना भेटलास? तूला का आर्डर मिळेनात?
तर तो म्हणे - कोटेशन पाठवतोय, भेटतोय पण, पण का कोण जाणे आपल्याला पुन्हा बोलवतच नाहीत…
👇
मी म्हटलं मग तू परत जातोस का त्यांच्याकडे ? तर तो म्हणे एकाच क्लायंटकडे किती वेळा जायचं ? सारखं सारखं नाक घासायला आपल्याला नाही जमतं. एवढं भारी टेक्निकल प्रॅाडक्ट आहे आपलं चार वेळा दारात जातोय पण कधीकधी तर साधा चहापण विचारत नाही. तो अमूक बिल्डर तर साधा सातवी पास पण नाही पण
👇
काय रुबाब करतो, माझ्या शिक्षणाचा, क्वालिटी प्रोडक्टचा पार कचरा करतो.
एकंदर माझ्या हा प्रकार थोडाफार लक्षात आला….युवराजला सेल्स व मार्केटींग जड जातेय.
आपल्या मराठी माणसांच्यात सेल्स आणि मार्केटिंग बाबतीत अनामिक भीती, दबाव, न्यूनगंड किंवा एक वेगळीच कमीपणाची भावना जाणवते….
👇
ती सर्वांसारखी त्याच्यामधेही होती.
जोपर्यंत याबद्दल नीट जागृती होत नाही तोपर्यंत आपल्या समाजात मग तो जवळचा मित्र असला तरी उद्योगधंद्यावर बोलणे म्हणजे- “पालथ्या घड्यावर पाणी.”
तसा युवराज माझ्यापेक्षा सिनियर आणि फार मॅचुअर्ड, मी त्याला मला जे वाटले ते प्रामाणिकपणे सांगितले.
👇
पुढचे ५/६ महिने हेच सूरू होते… कधी एखादी ॲार्डर यायची, तर कधी दुष्काळ. वर्षभरात युवराजच्या लक्षात आले आपले काही खरे नाही.
गावाकडचे लोकं, मित्र, नातेवाईक, सासरवाडीकडे लोकं आता त्याला टोमणे मारायला लागले होते. त्याच्या बुद्धीला खर तर पैशांपेक्षा याचा जास्त त्रास होत होता.
👇
त्याने जेवढी इज्जत कमावली, मान, सन्मान तो सगळा इथे धुळीस मिळतोय की काय एवढी शंका त्याला वाटायला लागली.
लोकलज्जा वाईट असते. सगळं संपतय हे त्याच्या लक्षात आलं होतं, मग त्याने एक दिवस अचानक सांगितलं - मी हे सगळं बंद करतोय आणि भारतातूनच बाहेर पडतोय.
म्हणाला ॲास्ट्रेलियामधे
👇
त्याला चांगला जॅाब मिळतोय. चांगले पॅकेजही मिळतेय. बायकोही आनंदाने तयार आहे.
मग काय पुढच्या महिन्याभरात इकडचं सगळं गुंडाळून युवराज सरळ तिकडे गेला तो सरळ स्थायिकच झाला.
तो तसा हुशारच, कॅार्पोरेटमधे आता चांगलं करीयर करतोय. आनंदी आहे. भारतात आला की हमखास भेटतो. ऊद्योगाचा विषय
👇
निघाला कि भावूक होतो.
त्याच्याकडे सगळं होतं.
बुद्धी, पैसा, घरचा सपोर्ट, पत्नीची सोबत, इमर्जन्सी फंड, रनिंग कॅपिटल, ॲाफीस, कामासाठी लोकं,सर्वोत्तम शिक्षण,प्रामाणिकपणा तरी तो व्यवसायात फेल झाला कारण त्याच्याकडे “सेल्स आणि मार्केंटिंग” हे उद्योग-व्यवसायाचे बेसिक कौशल्य नव्हते.
👇
आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो, अगदी त्यासाठी जीव ओतून कष्ट करतो, दिवसरात्र काम करतो. पण जर त्याचे योग्य मार्केटिंग करता नाही आले, लोकांना ते नीट समजावून सांगता नाही आले तर तुमचे उत्पादन कितीही सर्वश्रेष्ठ असेल तर ते विकलं जाणे कसे शक्य आहे?
रोज नवनवीन कंपन्या येताहेत,
👇
ग्राहकांना ते करणारच नाही.
२. सेल्स आणि मार्केंटिंग म्हणजे बोलघेवडेपणा किंवा एखाद्याला शेंडी लावणे,फसविणे नव्हे.आपल्यातली ही भावना आपल्या कधीच यशस्वी होऊ देत नाही.
३. याचाच फायदा आपल्या स्पर्धकांना मिळतो आणि आपल्यापेक्षा कमी प्रतीचा मालही ते जास्त किमतींवर किंवा अधिक फायदा
👇
कमवून विकू शकतात. त्यामुळे आपल्याला योग्य वेळी तोंडात साखर ठेऊन बोलता यायला हवे.
४. वेळोवळी मार्केट फिडबॅक घेत स्वतःमधे आणि आपल्या स्ट्रॅटजी मधे बदल करत रहायला हवा. जर आपण काळ्याप्रमाणे किंवा मी तर म्हणेन रोज काही सकारात्मक बदल केले नाहीत तर अंत लवकर असतो.
👇
५. हे सेल्स आणि मार्केंटिंग जमले नाही तर कसले रेप्युटेशन आणि कसले गुडविल……हे अवघड वाटो अथवा सोपे आयुष्यात हे शिकायलाच हवे.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची - जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग-व्यवसाय संस्कृती रुजणार नाही.
👇
व्यवसाय करताना आपल्याबद्दल पाठीमागे कोण कायकाय बोलत असेल, नातेवाईक, मित्र, समाज,एखादी चांडाळचौकडी याबद्दल कधीच विचार करायचा नाही.
टिप- मी जो चेक युवराजला दिला होता तो त्याने कधीच एनकॅश केला नाही, त्याने मैत्रीची आठवण म्हणून तसाच जपून ठेवलाय.
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४
भाऊ, बहिण, मामा, मावशी, आत्या, काका, चुलत वगैरे नातेवाईकांचा, भावकीचा गोतावळा माहीत होता…. आपल्या मुलांबाळांना नक्कीच तो तसा मोठा नसेल व माहितही नसेल.
समाजमाध्यमांमुळे तसेच गरजेपोटी (नेटवर्कींच्या) नावाखाली हजारो मित्र हल्ली असतात पण खरे मित्र हे हाताच्या बोटावर मोजता येतील २/४
एवढेच असतात. त्यांना जपायला हवे.
खरं तर जो फरक माहिती आणि ज्ञानामधे आहे तोच फरक ओळख आणि खऱ्या मित्रांमधे आहे.
एकाद्याला मित्र म्हणताना विचार करा, मित्रांची निवड फार काळजी पुर्वक करा. तेच तुमची दशा आणि दिशा ठरविणार असतात. मैत्रीत कधीच काही गुप्त नसते त्यामुळे ठेवला तर ३/४
१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.
मधे तो दिसला, अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटात त्याने ती ॲक्सेप्टही केली.
त्या दिवशी मला वेळ नव्हता,एके दिवशी पुण्याहून परत येत असताना मी त्याची फेसबुकवॅाल चाळली… काय फोटो होते त्याचे. अवाक् करणारे, BMW/Merc, सारख्या देशी विदेशी कार, पंचतारांकीत
२/१६
हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्यावेळासाठी का होईना पण मला फार असुया निर्माण झाली….. पण उत्सुकता मात्र जागी झाली की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसे काय कमावले असेल.