काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
अचानक माझे स्नेही/मित्र एका कार्यक्रमाचं निमंत्रण घेवून आले.
मला जरा कामाचा लोड असल्याने मी नम्रपणे त्यांना नकार दिला. पुढे चहापाणी घेऊन ते निघून गेले.
संध्याकाळी घरी जाताना सहज ती निमंत्रण पत्रिका पाहिली तर त्यात तेच लेखक महाशयही पाहुणे म्हणून येणार होते ज्यांचे पुस्तक
४/१४
रिसेंटली वाचले होते.
मी कपाळावर हात लावला आणि लगेच स्नेह्यांना फोन केला-“मी कार्यक्रमाला येतोय आणि तेही अमूकअमूक लेखकांना भेटायचं म्हणून” त्यांनाही आनंद झाला. दोनच दिवसांनी ते लेखक भेटले.
मला त्यांचे लेखन, पुस्तक आणि एकदंर ते किती किती आवडले हे सर्व सांगितले आणि त्यांनाही
५/१४
ते आवडले.
त्यांनी मनापासून धन्यवाद म्हटले,मी त्यांना ॲाफीसला यायचे निमंत्रण दिले.
पुढच्या साधारण आठवडाभरात त्यांचे काही काम आमच्या भागात होते त्यामुळे ते तिकडे आलेच होते तेंव्हा मला भेटून गेले. येताना त्यांनी मला त्यांची काही पुस्तकं ही भेट दिली.पुढच्या काही दिवसात
६/१४
अगदी जवळच्या अंतरात दोन-तीन वेळा भेटणे झाले.
त्यांच्याशी बोलताना मला जाणवले की त्यांना आर्थिक ताण आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी, तब्येत, गावाकडचे घर, कुटूंब सांभाळता सांभाळता त्यांची तारांबळ उडतेय.
एक दिवस त्यांनी रात्री ११ वाजता मला फोन केला म्हणाले “तुम्हाला उद्या भेटायचे
७/१४
आहे, येऊ का?” मला त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळेपण जाणवले आणि त्यांना मीही लगेच बोलावले.
दुसऱ्या दिवशी ते भेटले आणि त्यांनी समोरूनच मग सर्व प्रकार सांगितला. पैशाची चणचण आणि नवे पुस्तक लिहायचेय पण आता कशा अडचणी आहेत याचा पाढाच वाचला. खरं तर मला याबद्दल शंका वाटतच होती आणि
८/१४
ती खरी ठरली होती.
प्रकाशक असो, दुकानदार असो कि प्रिंटींग प्रेसवाले प्रत्येकजण त्यांची त्यांची कमाई करतोच. फायदा कमवतोच पण लेखकाचे काय?
एक उत्कृष्ट मराठी पुस्तक लिहायला साडेतीन वर्ष गेली…..प्रचंड प्रवास केला, वेळ खर्च केला. होत्या नव्हत्या त्या सर्व सुट्टया खर्च झाल्या.
९/१४
दरम्यान तो लेखक कुटूंब सुखाला तर मुकलाच पण स्वतःचे आर्थिक नुकसानही करून घेतले.
पुढे पुस्तक प्रकाशित झाले, मानसन्मान मिळाला, पण मागच्या तीन वर्षात सर्व मिळून त्यांना फक्त आणि फक्त बावीस हजार पाचशे रूपये मानधन म्हणून मिळाले.
या अशा वातावरणात लेखक चांगली पुस्तकं कशी लिहणार?
१०/१४
मला याचे आत्यंतिक दुःख तर झालेच शिवाय जास्त वाईट याचे वाटत होते की आपण आपल्या मराठी साहित्याचे एवढे कौतूक करतो, भरभरून बोलतो ….
करोडो रूपये खर्चून साहित्यसंमेलनासारखे सोहळे करतो पण या लेखकांना योग्य मानधन, पैसे मिळतात की नाही याब्बद्दल मात्र काहीच चिंता करत नाही. फक्त
११/१४
कोरडे गोडवे गाणारे लोकं.
त्यांनी सकस लिहावे ही अपेक्षा करतो पण पुस्तक विकत घेत नाही. ज्ञान घ्यायचे तर असते पण PDF च्या रूपात फुकट हवे असते.
हेच भारतातील काही किंवा परदेशातील प्रकाशन संस्था लेखकांना लिहिण्याच्या आधी चांगले मानधन देतात आणि मग सकस लिखाणाची अपेक्षा धरतात.
१२/१४
लोकंही भरभरून प्रतिसाद देतात.
आपले सरकारही याकामी ढिम्म असते. काही ठराविक लोकांनाच सपोर्ट मिळतो, त्यातही जातपात, ओळखी आणि प्रकाशक यावर बरेच काही अवलंबून असते. प्रस्थापितांच्या विरूद्ध गेले की अजून पंचाईत.
हे बदलायला हवे, ज्ञानाची किंमत ही अशी व्हायला नको, निदान आपल्या
१३/१४
या महाराष्ट्रात तरी हे थांबायला हवे.
आता साडेतीन वर्षांची मेहनत, कष्ट, खर्च, यातना आणि पुढे तीन-चार वर्षानंतर मिळालेले २२५०० रूपये त्यांनी कोणाकोणाच्या नावाने ओवाळून टाकावे हाच प्रश्न मला पडलाय!
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४
भाऊ, बहिण, मामा, मावशी, आत्या, काका, चुलत वगैरे नातेवाईकांचा, भावकीचा गोतावळा माहीत होता…. आपल्या मुलांबाळांना नक्कीच तो तसा मोठा नसेल व माहितही नसेल.
समाजमाध्यमांमुळे तसेच गरजेपोटी (नेटवर्कींच्या) नावाखाली हजारो मित्र हल्ली असतात पण खरे मित्र हे हाताच्या बोटावर मोजता येतील २/४
एवढेच असतात. त्यांना जपायला हवे.
खरं तर जो फरक माहिती आणि ज्ञानामधे आहे तोच फरक ओळख आणि खऱ्या मित्रांमधे आहे.
एकाद्याला मित्र म्हणताना विचार करा, मित्रांची निवड फार काळजी पुर्वक करा. तेच तुमची दशा आणि दिशा ठरविणार असतात. मैत्रीत कधीच काही गुप्त नसते त्यामुळे ठेवला तर ३/४