२००० रुपये भांडवल ते ५०० कोटी रेव्हेन्यू - प्रवास विजय सेल्सचा
नानू गुप्ता. हे नाव बऱ्याच जणांना माहित नसेल. अनेकजणांना हा थ्रेड वाचून पहिल्यांदा हे नाव माहित होईल. पण याच नानू गुप्तांनी विजय सेल्स सुरु केलं असं सांगितलं तर लिंक लागेल. #म#मराठी#VijaySales
तर हे नानू गुप्ता १९५४ साली हरयाणा सोडून मुंबईला नोकरीच्या शोधात आले. आलेल्या माणसाला आपल्यात सामावून घेते तसंच मुंबईने त्यांनाही सामावून घेतलं. शिवणयंत्र आणि फॅन्स बनवणाऱ्या ऊषा कंपनीच्या एका डिस्ट्रिब्युटरकडे नानू सेल्समन म्हणून नोकरी करू लागले. #म#मराठी#VijaySales
काही दिवस नोकरी करून नानू कस्टमर लोकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसे करायचे हे शिकले. ते झाल्यावर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडली. मित्रांकडून २००० रुपये भांडवल उधार घेऊन माटुंग्यामध्ये एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं #म#मराठी#VijaySales
आणि त्याला नाव दिलं 'विजय सेल्स'. आता नानू स्वतः शिवणयंत्रे, फॅन्स, ट्रान्झिस्टर्स विकू लागले.
प्रॉडक्ट्सला असलेली मागणी आणि नानूंची सचोटी याच्या जोरावर व्यवसाय बहरला. लवकरच नानू थेट कंपन्यांकडून माल उचलू लागले आणि ठरलेल्या काळात त्यांना पेमेंट करू लागले. #म#मराठी#VijaySales
यामुळे एरवी मध्ये असणारे डिस्ट्रिब्युटर कमी झाले आणि नानूंना माल तुलनेने स्वस्त मिळू लागला. त्यामुळे इतरांपेक्षा नानू आपल्या ग्राहकांना स्वस्तात प्रॉडक्टस देऊ शकले. साहजिकच त्यांचा खप आणि व्यवसाय वाढत गेला. #म#मराठी#VijaySales
याशिवाय एखाद्या कस्टमरला प्रॉडक्टमध्ये काही तक्रार असेल तर नानू स्वतः त्याच्या घरी जाऊन ते बघू लागले. त्यांची ही सर्व्हिस पाहून लोकांना विश्वास बसू लागला आणि हळूहळू विजय सेल्सचे नाव होऊ लागले. #म#मराठी#VijaySales
१९७२ मध्ये त्यांनी आपल्या दुकानात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही विक्रीसाठी ठेवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या बाजूला व्यवसाय वाढतच होता. त्यामुळे नानू यांनी कंपनी रजिस्टर केली आणि १९७६ मध्ये माहीमध्येसुद्धा दुकान सुरु केले. #म#मराठी#VijaySales
दरम्यान ऐंशीच्या दशकात भारतात ओनिडा, व्हिडीओकॉन, बीपीएल सारख्या ब्रँड्सने कलर टीव्ही लाँच केले. नानूभाईंना त्यातही व्यवसायाची संधी दिसली आणि त्यांनी कलर टीव्ही आपल्या दुकानात विकायला सुरुवात केली. #म#मराठी#VijaySales
हळूहळू विजय सेल्सची बांद्रा, सायन, शिवाजी पार्क या ठिकाणीसुद्धा दुकाने सुरु झाली.
जसजसा काळ पुढे सरकत होता तसेच विजय सेल्समध्ये फ्रिज सारख्या वस्तूसुद्धा विकल्या जाऊ लागल्या. व्यवसायाचा हा सगळा पसारा वाढत वाढत २००७ मध्ये एकूण १४ दुकानांवर जाऊन पोहोचला. #म#मराठी#VijaySales
त्याच दरम्यान क्रोमा, रिलायन्स रिटेल, फ्युचर ग्रूपसारखे मोठे प्लेयर या इंडस्ट्रीमध्ये उतरले. बऱ्याच जाणकारांनी नानूभाईंना त्यांचा व्यवसाय यापैकी एखाद्या कंपनीला विकून टाकण्याचा सल्ला दिला. #म#मराठी#VijaySales
त्यांनी मात्र हा सल्ला न ऐकता पुणे, सुरत, अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणी आपली दुकाने सुरु केली. कालानुरूप बदल करत त्यांनी आपल्या दुकानात टीव्ही, फ्रिजबरोबर वॉशिंग मशिन्स, मोबाईल फोन्स, लॅपटॉप यांचीसुद्धा विक्री करायला सुरुवात केली. #म#मराठी#VijaySales
विजय सेल्सचा २००० सालातला रेव्हेन्यू १०० कोटी ते २००८ साली ५०० कोटींवर जाऊन पोहोचला. आता हाच रेव्हेन्यू ५००० कोटींपेक्षा जास्त आहे. सध्या विजय सेल्सची देशभरात १०० हुन अधिक दुकाने असून ९ वेअरहाऊस आहेत. #म#मराठी#VijaySales
आता सध्याच्या काळात प्रॉफिट मार्जिन कमी असल्याचा फटका विजय सेल्सला सुद्धा बसला आहे. पण एक छोटंसं भाड्याचं दुकान ते आजवरचा एवढा मोठा व्यवसाय ही प्रगती निश्चितच स्तुत्य आहे. #म#मराठी#VijaySales
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हा थ्रेड काहीजणांनी इंग्रजीत वाचला असेल. पण खास आपल्या मराठी वाचकांसाठी मुद्दाम हा थ्रेड तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडतो आहोत.
बाजारात एखादी अवाढव्य कंपनी असते. तिला आपला पसारा आणखी वाढवायचा असतो. त्यासाठी ती कंपनी छोट्याछोट्या कंपन्या टेकओव्हर करत जाते. #म#मराठी#एचयूएल
आपला व्यवसाय वाढवण्याची ही मार्केटमधील जुनी स्ट्रॅटेजी आहे.
नव्वदच्या दशकात हिंदुस्थान लिव्हरने (आताची एचयूएल) हीच स्ट्रॅटेजी वापरून टाटा ऑइल मिल्स कंपनी टेकओव्हर केली. #मारिको#एचयूएल
त्यामुळे टाटाचं हेअर ऑइल टाटा निहार आता हिंदुस्थान लिव्हरकडे आलं. या निमित्ताने हेअर ऑइल मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
त्यावेळी निहार ऑइलचा मार्केट शेअर होता जेमतेम ७% आणि हेअर ऑइल मार्केटचे दादा होते, पॅराशूट ऑइल. त्यांचा मार्केट शेअर होता ४८%. #निहार
आयटीसीसारखी बलाढ्य कंपनी आपल्या प्रॉडक्टसच्या पॅकेजिंगवर किती बारीक लक्ष देते याचं एक उदाहरण.
परवा फ्लाईटमध्ये आयटीसीच्या 'बी नॅचरल' ब्रँडचा ज्यूस घेतला. ज्यूस संपवल्यानंतर साहजिकच रिकाम्या बाटलीवरील डिटेल्सवर लक्ष गेलं. तेव्हा आयटीसीच्या पॅकेजिंगमागील कल्पकता लक्षात आली. #ITC
Use the alphabets from the blanks to know that B Natural is made with 100% _ _ _ _ _ N fruit, 0% concentrate.
गोष्ट तशी छोटी आणि साधी. पण आयटीसीच्या पॅकेजिंग विभागाने यातही कल्पकता पणाला लावलेली दिसते. साहजिकच ज्युसची बाटली वापरणारा माणूस ह्या रिकाम्या जागा भरून त्यातून 'इंडिया' हा शब्द तयार करणार. #म#मराठी#ITC
इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी
एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी