🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Mar 15, 2023, 10 tweets

आज आपण अश्या कंपनीबद्दल जाणुन घेणार आहोत जी बर्याच जणांना माहिती नसेल पण नफ्याच्या बाबतीत ती कंपनी जगातील 'दादा' कंपनी आहे. खासकरून ऑईल मधील!!
या कंपनीचे नाव 'सौदी अरामको'(Saudi Aramco) असुन या कंपनीचा 2022 मधील नफा हा तब्बल १६१ बिलियन डॉलर्स एव्हढा आहे😱
#threadकर #वसुसेन

त्यात नेमकं 'अरामको' च्या पथ्यावर रशिया-युक्रेन युद्ध चांगलच पडलय.तेलाच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती आणि अरामको ची तेल उपसायची क्षमता या सगळ्यामुळे ही कंपनी म्हणजे पैसे छापायचा कारखानाच झालाय. दिवसाला साधारण १.२ करोड बॅरल उपसायची ताकत ही कंपनी ठेवते.🔥
जाळनं धुर्र संगटच!!😅😄

म्हणजे विचार करा की अरामकोचा नफा मागील वर्षीपेक्षा तब्बल ४६% नी वाढला आहे!
आणखी सोप्या भाषेत म्हणल तर या कंपनीचा नफा एका बाजुला आणि अमेझाॅन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला यांचा एकत्रित नफा एका बाजुला😄
आता तुम्हाला समजले असेल की अरामको ला मी सुरूवातीला 'दादा' कंपनी का म्हणलो ते!

थोडं 'सौदी अरामको' बद्दल जाणुन घेऊयात.
ही कंपनी सौदी अरेबियामधील असुन कंपनीचे मुख्यालय देहरान मध्ये आहे. कंपनी state owned आहे. अरामको ची स्थापना १९३३ मध्ये झाली म्हणजेच जवळपास ९० वर्षांचा अनुभव या कंपनीला आहे.सद्यस्थितीला अमीन नासर हे president and CEO म्हणुन कंपनीचे काम पाहतात.

या कंपनीने २०१९ साली आपला IPO(Initial Public Offering) बाजारात आणला. IPO म्हणजे थोडक्यात काय तर खासगी कंपनी पब्लिकमध्ये रूपांतरित करणे म्हणजेच आपल्या कंपनीतील ठराविक समभाग लोकांमध्ये विक्रीस काढणे. तर २०१९ रोजी यांचा जेव्हा IPO आला तेव्हा या IPO ने मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ

घातला.🔥
सौदी अरामकोचा आयपीओ यायच्या आधी चीनचा जगविख्यात 'अलिबाबा ग्रुप' कंपनीच्या आयपीओचा मोठा गाजावाजा होता. अरामको आयपीओने त्यांना पण मागे टाकले. ही झाली अलीकडची माहिती, आता आपण कंपनीचा सुरुवातीचा प्रवास पाहुया ते आणखी रोमांचक ठरेल.
जसे मी म्हणलो की कंपनी १९३३ ला चालु झाली

म्हणजेच १९३३ ला 'सौदी अरेबिया' आणि 'कॅलिफोर्निया' मधील Socal कंपनीच्या करारामधुन 'अरामको' कंपनी अस्तित्वात आली.या करारानुसार कंपनी सौदी अरेबियामधुन तेल extract करणार आणि व्यवसाय करणार असं ठरलेलं.
पुढे १९४४ साली 'The California Arabian Standard Oil Company' चे नामांतरण

'Arabian American Oil Company' अस करण्यात आलं म्हणजेच आत्ताची 'ARAMCO'!
१९६० साली ऐतिहासिक 'OPEC'(Organization of the Petroleum Exporting Countries) संघटना स्थापन करण्यात आली त्यात सध्या १३ सदस्य राष्ट्र आहेत. या संघटनेनुसार सदस्य राष्ट्रांनी आपापल्या देशातल्या नैसर्गिक

स्त्रोतांचे राष्ट्रीयकरण करण्यास प्राधान्य द्यावे अस ठरवण्यात आल. या OPEC चा सौदी अरेबिया सुद्धा सदस्य राष्ट्र असल्याने सौदी अरेबियाने १९८० पर्यंत ARAMCO चा संपूर्ण मालकी हक्क विकत घेतला आणि १९८८ ला 'सौदी अरेबियन ऑईल कंपनी' तयार झाली.
आता सध्या अरामको 'Global 500-Fortune' या

जगातील पहिल्या ५०० कंपन्यांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर विराजमान आहे. 🙌
#threadकर #वसुसेन #Aramco #SaudiArabia #OPEC #USA #california #oil #RussianUkrainianWar #CrudeOil #Tesla #Microsoft #Google #amazon #fortuneglobal500

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling