भाषा काही कधी मरत नसते..तिला मारलं जातं.. तिला वापरणाऱ्याकडून.
भाषा माणसांना एकत्र जरी आणत असली तरी मानसामानसात दरी ही भाषेमुळेच येते.. आपल्याकडील बेळगाव-कारवार वाद असो की जागतिक पातळीवरील ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश वाद असो. #थ्रेड
भाषेचा वापर करून वर्चस्व निर्माण करणे हाच सगळीकडे समान धागा आहे. आपली भाषा संकटात आहे हे ब्रिटिशांनाही आता राहून राहून वाटू लागलंय.. कारण अमेरिकन इंग्लिशचा वाढता पगडा.
आपल्याकडे इंग्रजी यायला हवी यासाठी आटापिटा सुरू असतो..नेमकं त्याच भाषेविषयी काळजी आता ब्रिटिशांना वाटू लागलीय.
भाषा ही काही बाजारू वस्तू नाहीय..की तिचा तुटवडा निर्माण व्हायला..
भाषेच्या बाबतीत एक सरळ तत्व आहे..जी भाषा अधिक उदरनिर्वाह देईल ती भाषा जगभर आपलीशी केली जाईल. उदरनिर्वाह देण्याची क्षमता ही सदृढ अर्थव्यवस्थेत नेहमीच असते..त्याबरहुकूम त्या अर्थव्यवस्थेची भाषा ही जगभर पसरते.
त्यातूनच आज ब्रिटिश अर्थव्यवस्था मागे पडल्याने आणि अमेरिका हे जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन झाल्याने अमेरिकन इंग्लिश वरचढ ठरतीय.
इंग्रजी जगाची भाषा झाली कारण ब्रिटिशांची जगभर सत्ता होती.अगदी सोळाव्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या पहिल्या दोनेक दशकापर्यंत इंग्रज जगाचे कारभारी होते.
1897 ला व्हीकटोरियाच्या राज्यरोहन हिरक महोत्सवात जगभरातील देश प्रतिनिधी हजर होते..इंग्रजीचा प्रसार आणि प्रचार हा असा होत असतो..
आर्थिक हितसंबंध जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत तुमची भाषा तुम्हाला कमीपणाचे लक्षण वाटेल..यात विषय भावनिकतेचा नाहीय..ही सत्य परिस्थिती आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचं केंद्र लंडन वरून वॉशिंग्टनकडे सरकलं.. ती सुरवात होती ब्रिटिश इंग्रज या भाषेच्या महत्व कमी होण्याची.
सांगायचा मुद्दा आहे..भाषा ही सदृढ अर्थव्यवस्थेच्या वळचणीला जातच असते.. तिला रोखायचं असेल तर आपण आपली आर्थिक ताकद आणि रसद वाढवली पाहिजे..
आज इंग्रजी ही भाषा जगभरातील इतर भाषांतील असंख्य शब्द आपल्यात सामावून घेते आहे..त्यामुळेच ती इतरांच्या पुढे आहे.. ही लवचिकता आपल्याला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपण असेच ताठुन अवघडत राहणार हे नक्की आहे.
भाषा हे एक माध्यम आहे ..भाषा ही एक वाहक आहे.. तिच्याद्वारे आपल्याला जे काही सांगायचे आहे त्यात सत्व असायला हवे.. त्या कंटेंट कम सत्वाला जास्त महत्व असते.. मराठी भाषेविषयी आपण कशाला जास्त महत्व देतोय हे जर तपासून पाहिलं..तर आपली चूक लक्षात येऊ शकते. अन्यथा या चुका होतच राहतील.
बळजबरीने दुकानाचे बोर्ड तर मराठीत होतील पण आतील व्यवहार? त्याचं काय? हे प्रत्येकवेळी तपासणार कोण? म्हणून बदल हा आतून यायला हवा.. एकदा का तो बदल घडू लागला की बळजबरी करायचा प्रश्नच नाही..आपसूकच आपली भाषा पसरेल..वाढेल आणि वाचेल ही.
फुकाचा गर्व असणं धोक्याचं असतं.. कारण त्या गर्वात माणूस नवीन काही करायचं विसरतो.. आणि जे जुनं आहे ते ही कालबाह्य होत जातं.. 'गर्वाने घर पार गाडून गेल्यानंतर' मग ही चूक लक्षात येऊन उपयोगाचं नाही..ती सोयरीक भाषेच्या बाबतीत वापरता येण्याजोगी नाहीय.
त्यामुळे आपलं लक्ष हे भाषेच्या थेट संवर्धनाइतकं आपल्या आर्थिक क्षमतेवर ही हवं..तरच चारचौघात आपली भाषा आपल्या पाठीमागे बोलली जाईल..तीच काळाची गरज ही आहे.. बळजबरीने काही होणार नाही..हे लवकर कळलं तर बरं..अन्यथा आपल्या सरणासोबत तिचंही सरण रचावं लागेल. ❤
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
या चार शब्दांच्या वाक्यावर आपण जे आयुष्य काढतो ना.त्या आयुष्याला सरतेशेवटी चार पै ही किंमत राहत नाही.आज आपण जे काही निर्णय चार लोकांना भिऊन घेत नाही ना.त्यामुळे आपल्याच जीवनाचा हिशोब हच्च्याहच्च्याने चुकत जातो आणि शेवटी आपल्या हाती शून्य मिळते. #थ्रेड#म
हे जे चार लोक आपण म्हणतो ना. ते ना आपल्या सुखात असतात ना दुःखात.एकवेळ ते आपल्या सुखात आपल्या सोबत दिसतील पण असतीलच अस नाही.दुःखाचा तर विषयच नाही. मग त्यांचा विचार करून मी माझं जीवन का व्यतीत करावं? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला हवा.अन्यथा आठरा पगड जातीचा आपला समाज असाच राहील.
आज एकुणात माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्याचं आकलन या बाहेरच्या लोकांना किती झालेलं असतं?मी कितीही मेहनत घेऊन काही चांगलं करायचं म्हणलं आणि चांगलं केलं तरीही हा समाज जर मला नावं ठेवणार असेल तर या समाजाची ऐशितैशी करायलाच हवी.हा ठाम निश्चय आता गरजेचा आहे.त्याशिवाय आयुष्य जगायचं कस?
आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड#म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..
अत्याचार आणि मानसिक त्रास स्त्रियांना देणं ही रीत बनलीय आता.खऱ्या समाजात आपण स्त्रियांना जगण्यास लायक ठेवले नाही.याचे महत्वाचे कारण आपण स्त्रीस माणूस म्हणून पहाण्याची दृष्टी हरवली.त्याचा परिपाक स्त्री म्हणजे चॉकलेट.कोणीही त्याचा आस्वाद घ्यावा.इतक्या नीच पातळीवर समाज उतरला. #थ्रेड
एकाच वेळी आपण सध्या दोन समाजात जगत वावरत आहोत..एक खरा समाज आणि दुसरा आभासी म्हणजे समाजमाध्यमीय समाज. पहिल्यात आपण स्त्रीची अवस्था 'न भूतो न भविष्यती' इतकी दयनीय आणि वाईट केलीय.. NCRB चा डेटा आपण पाहिला तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल.. ही वस्तुस्थिती आहे.
खऱ्या समाजातील ही अवस्था इथे समाजमाध्यमातून ही पहायला मिळते..कारण खरा समाज ज्या माणसांचा(?) बनला बनवला गेलाय तीच विकृत माणसं इथंही जगत वावरत आहेत.
गेले काही दिवस ज्या पद्धतीने सिक्रेट मेसेज या नावाखाली तमाशा या समाजमाध्यमातून सुरुय तो पहाता.आपली नैतिकता किती बालिश हा प्रश्न पडतो.
'घराची कळा अंगण सांगतं...!'
फ्लॅट सिस्टिमला अंगण नसतं.. कळा कुठून येईल?
आजही गावाकडं जायचं म्हणलं की मन आसमंतात उधळायला लागतं.. कदाचित ही गावाकडच्या अंगणाची ओढ रक्तातच असते.
आज कोजागिरी.. आज घरचे सगळे हट्टाने अंगणात जमून गप्पाटप्पात रंगतात.. चंद्राची दुधात वाट बघत.❤ #म
एरवीही आम्ही अंगणातच जेवायचो..त्यामुळे त्यावेळी कोजागिरीचं फारसं काही वाटायचं नाही..
आज त्या अंगणात आम्ही नाही.. मी नाही..ताई नाही.. आज्जी तर या जगातच नाही.. मन फार पिळवटून जातं.. त्या आठवणींनी. अंगण ही अशाच दुःखाच्या कोशात आज असणार.
त्याच्या अंगाखांद्यावर बिलगलेलो आम्ही.. लहानाचे मोठे त्याच्याच मांडीवर झालो.. आज त्या अंगणाची आर्त हाक...डोळे ओसंडून वाहायला लावते.
कोजागिरीच्या दिवशी हसत खेळत रात सरायची..आज त्यातील मजा हरवलीय.. व्यस्त झालो आपण सगळे..त्या दुधाळ दिवसांनी आता तावूनसुलाखून व्यस्ततेची साय पांघरलीय.
'जो समाज मांजर आडवी गेली म्हणून कर्मकर्तव्य थांबवतो,त्या समाजाचे भविष्य बोके ठरवतात.'
आपल्या समाजास ज्याला त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला. अलीकडे तर 'माणसात देव पाहण्यासाठी' रिघच लागलेली दिसते. असो #म#थ्रेड
माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी जी आत्मशक्ती असावी लागते..तिचा तुटवडा हल्ली जास्तच जाणवू लागला आहे.. म्हणून आपण त्या आत्मशक्तीस पर्याय म्हणून ही देवत्वाची ढाल समोर केलीय..एकदा का व्यक्ती किंवा वस्तूला देवत्व दिलं की समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासाठी आपण मोकळे असतो.
माणसात देव पहा..या संकल्पनेचा बेधडक चुकीचा तेवढा अर्थ आपण घेतला. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येएवढ्या देवांचाही बाजार इथं भरवला गेला.. ही वस्तुस्थिती आहे. एखादी परंपरा काय? त्यामागे उद्देश काय? आज त्याची उपयुक्तता काय? त्या रूढी परंपरेत बदल हवेत का? असे विचार हल्ली पडत नाहीत.