या चार शब्दांच्या वाक्यावर आपण जे आयुष्य काढतो ना.त्या आयुष्याला सरतेशेवटी चार पै ही किंमत राहत नाही.आज आपण जे काही निर्णय चार लोकांना भिऊन घेत नाही ना.त्यामुळे आपल्याच जीवनाचा हिशोब हच्च्याहच्च्याने चुकत जातो आणि शेवटी आपल्या हाती शून्य मिळते. #थ्रेड#म
हे जे चार लोक आपण म्हणतो ना. ते ना आपल्या सुखात असतात ना दुःखात.एकवेळ ते आपल्या सुखात आपल्या सोबत दिसतील पण असतीलच अस नाही.दुःखाचा तर विषयच नाही. मग त्यांचा विचार करून मी माझं जीवन का व्यतीत करावं? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला हवा.अन्यथा आठरा पगड जातीचा आपला समाज असाच राहील.
आज एकुणात माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्याचं आकलन या बाहेरच्या लोकांना किती झालेलं असतं?मी कितीही मेहनत घेऊन काही चांगलं करायचं म्हणलं आणि चांगलं केलं तरीही हा समाज जर मला नावं ठेवणार असेल तर या समाजाची ऐशितैशी करायलाच हवी.हा ठाम निश्चय आता गरजेचा आहे.त्याशिवाय आयुष्य जगायचं कस?
'लोक काय म्हणतील?' हा प्रश्न आपल्या भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला.त्यास आता कितीतरी शतके लोटली.या प्रश्नाने समाजाचं किती भलं झालं? या प्रश्नाला प्रामाणिकपणे आतातरी आपण भिडणार की नाही हा सवाल आहे.असंच मन मारत जगणं या समाजाने अजून कुठपर्यंत सहन करायचं? यक्ष प्रश्न आहे!
'या जगात असा कोणताच मनुष्य नाही ज्याच्या वर्तनावर कधी टीका झाली नाही.' लोक काय म्हणतील हा विचार हा आपल्या जीवनातील कम्फर्टनेससाठी सगळ्यात मोठा स्पीडब्रेकर आहे. काही वेळा आपण तो पार ही करू शकत नाही..कारण आपली इच्छाशक्ती ही आपल्या सामाजिक इज्जतीच्या खोट्या बुरख्याखाली दबलेली असते.
'रस्त्याने जाताना पाय घसरून पडल्यानंतर उठताना माणूस आपल्याला किती,काही लागलं का? हे पाहण्याआधी आपल्याला पडताना कोणी पाहिलं का? हे पाहतो.' ही आहे आपली सामाजिक इज्जतीची मानसिकता.. या मानसिकतेतून आता आपण बाहेर पडायला हवं..बिनधास्तपणे स्वतःचा कम्फर्ट शोधून त्याचा आनंद घ्यायला हवा.
माझ्या अगदी जवळचे काही नातलग आणि व्यक्ती यांचा फक्त मी विचार करायला हवा.. कारण त्यांना आपली परिस्थिती माहिती असते आणि त्यावरून ते आपल्या यशापयशाचे योग्य समीक्षण करतील. आपण त्यांचाच तेवढा विचार करून आपली निर्णयक्षमता वापरायला हवी. बाकी समाजाचा आपल्याशी संबंध काडीचाही नसतो.
लोकांचा विचार करायचा नाही याचा अर्थ अगदीच तारतम्य सोडून वागणं असा न्हवे.
एखादी गोष्ट करत असताना मी काही समाजविघातक करत नाही ना..चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत नाही ना..कोणावर अन्याय, अतिक्रमण, सक्ती, फसवणूक करत नाही ना. या गोष्टी हजारदा पडताळायला हव्यात.
आपण घेतलेला निर्णय एकवेळ चुकला तरी चालेल.पण तो कोणास घाबरून घेतलेला नसावा.निर्णय चुकला तरी तो सर्वस्वी आपला होता.त्याची जबाबदारी माझीच आहे.हा विचार मनात रुजला तर आणि तरच आपण आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी कारण शोधणार नाही.अन्यथा आज सामाजिक आघाडीवर एकमेकांना दोष देणं सुरूच राहील.
ही एकमेकांना दोष देण्याची परंपरा आता आपण खंडित करायला हवी..कारण आज आपल्या भारतीय समाजात जो काही सामाजिक, राजकीय, आर्थिक गोंधळ सुरुय तो एक असमाधानी समाजाचा परिपाक आहे.. भारतीय समाज असमाधानी आहे त्याचं मूळ आहे आपली स्वतंत्र विचारशक्ती आणि निर्णयक्षमता आपण गहाण ठेवली.
'आज आत्तापासून एक एकसंध संघटित समाज म्हणून मी माझ्या समाजबांधवांना पूर्ण स्वातंत्र्य आचार, विचार ,उच्चार यांचे देईन.' या शपथेची गरज आहे. खरंतर हे आपल्या संविधानातील तत्व आपण जगतो का? पाळतो का? आत्मपरीक्षण करायला हवं आपण..काळाची गरज आहे ती. तरच आपण माणूस म्हणून या समाजात राहू शकू.
आज सामाजिक पातळीवर आपण अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवलेला आहे.त्यास भिडण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक आंतरिक बळ असायला हवं.ते आंतरिक बळ आपल्याला आपल्या स्वच्छ विचारातूनच मिळेल.विचार सुधारण्यासाठी तसा प्रयत्न तरी आपला व्हायला हवा.अन्यथा आपलं जीवन 'लोक काय म्हणतील?' या प्रश्नाने संपेल.❤
भाजपचे जे काही 'विकास आणि खतरा' या नावाखाली राजकारण सुरू आहे..त्यास मॅच्युर म्हणता येणार नाही.. तो पक्ष निव्वळ वयाने वाढला आहे..बुद्धी कुठेतरी मागेच सोडून ते घाईगडबडीत पुढे आले आहेत..असंच दिसतं.
सध्या कारण आहे कांजूर येथील मेट्रोची प्रस्थावीत जागा आणि मालकी हक्क.
या प्रकरणी भाजप जे काही क्षुद्र राजकारण करत आहे..त्यास तोड नाही. त्यांच्या एकूणच वकुबानुसारच सुरुय म्हणा ते.
महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प कांजूर येथे प्रस्थावीत केल्यानंतर लगेच त्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला जाग आली आणि त्यांनी मालकी हक्क सांगितला.
कांजूर येथील जमिनीवर मिठागरे होती.. आणि सदर जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचे केंद्राने म्हणले.. ही नोटीस महाराष्ट्रात पोहचायच्या आत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जो काही गलिच्छ कालवा सुरू केला..यावरून त्यांची नियत कोणत्या दर्जाची होती आणि आहे हे कळायला फार अवघड नाही.
भाषा काही कधी मरत नसते..तिला मारलं जातं.. तिला वापरणाऱ्याकडून.
भाषा माणसांना एकत्र जरी आणत असली तरी मानसामानसात दरी ही भाषेमुळेच येते.. आपल्याकडील बेळगाव-कारवार वाद असो की जागतिक पातळीवरील ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश वाद असो. #थ्रेड
भाषेचा वापर करून वर्चस्व निर्माण करणे हाच सगळीकडे समान धागा आहे. आपली भाषा संकटात आहे हे ब्रिटिशांनाही आता राहून राहून वाटू लागलंय.. कारण अमेरिकन इंग्लिशचा वाढता पगडा.
आपल्याकडे इंग्रजी यायला हवी यासाठी आटापिटा सुरू असतो..नेमकं त्याच भाषेविषयी काळजी आता ब्रिटिशांना वाटू लागलीय.
भाषा ही काही बाजारू वस्तू नाहीय..की तिचा तुटवडा निर्माण व्हायला..
भाषेच्या बाबतीत एक सरळ तत्व आहे..जी भाषा अधिक उदरनिर्वाह देईल ती भाषा जगभर आपलीशी केली जाईल. उदरनिर्वाह देण्याची क्षमता ही सदृढ अर्थव्यवस्थेत नेहमीच असते..त्याबरहुकूम त्या अर्थव्यवस्थेची भाषा ही जगभर पसरते.
आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड#म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..
अत्याचार आणि मानसिक त्रास स्त्रियांना देणं ही रीत बनलीय आता.खऱ्या समाजात आपण स्त्रियांना जगण्यास लायक ठेवले नाही.याचे महत्वाचे कारण आपण स्त्रीस माणूस म्हणून पहाण्याची दृष्टी हरवली.त्याचा परिपाक स्त्री म्हणजे चॉकलेट.कोणीही त्याचा आस्वाद घ्यावा.इतक्या नीच पातळीवर समाज उतरला. #थ्रेड
एकाच वेळी आपण सध्या दोन समाजात जगत वावरत आहोत..एक खरा समाज आणि दुसरा आभासी म्हणजे समाजमाध्यमीय समाज. पहिल्यात आपण स्त्रीची अवस्था 'न भूतो न भविष्यती' इतकी दयनीय आणि वाईट केलीय.. NCRB चा डेटा आपण पाहिला तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल.. ही वस्तुस्थिती आहे.
खऱ्या समाजातील ही अवस्था इथे समाजमाध्यमातून ही पहायला मिळते..कारण खरा समाज ज्या माणसांचा(?) बनला बनवला गेलाय तीच विकृत माणसं इथंही जगत वावरत आहेत.
गेले काही दिवस ज्या पद्धतीने सिक्रेट मेसेज या नावाखाली तमाशा या समाजमाध्यमातून सुरुय तो पहाता.आपली नैतिकता किती बालिश हा प्रश्न पडतो.
'घराची कळा अंगण सांगतं...!'
फ्लॅट सिस्टिमला अंगण नसतं.. कळा कुठून येईल?
आजही गावाकडं जायचं म्हणलं की मन आसमंतात उधळायला लागतं.. कदाचित ही गावाकडच्या अंगणाची ओढ रक्तातच असते.
आज कोजागिरी.. आज घरचे सगळे हट्टाने अंगणात जमून गप्पाटप्पात रंगतात.. चंद्राची दुधात वाट बघत.❤ #म
एरवीही आम्ही अंगणातच जेवायचो..त्यामुळे त्यावेळी कोजागिरीचं फारसं काही वाटायचं नाही..
आज त्या अंगणात आम्ही नाही.. मी नाही..ताई नाही.. आज्जी तर या जगातच नाही.. मन फार पिळवटून जातं.. त्या आठवणींनी. अंगण ही अशाच दुःखाच्या कोशात आज असणार.
त्याच्या अंगाखांद्यावर बिलगलेलो आम्ही.. लहानाचे मोठे त्याच्याच मांडीवर झालो.. आज त्या अंगणाची आर्त हाक...डोळे ओसंडून वाहायला लावते.
कोजागिरीच्या दिवशी हसत खेळत रात सरायची..आज त्यातील मजा हरवलीय.. व्यस्त झालो आपण सगळे..त्या दुधाळ दिवसांनी आता तावूनसुलाखून व्यस्ततेची साय पांघरलीय.
'जो समाज मांजर आडवी गेली म्हणून कर्मकर्तव्य थांबवतो,त्या समाजाचे भविष्य बोके ठरवतात.'
आपल्या समाजास ज्याला त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला. अलीकडे तर 'माणसात देव पाहण्यासाठी' रिघच लागलेली दिसते. असो #म#थ्रेड
माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी जी आत्मशक्ती असावी लागते..तिचा तुटवडा हल्ली जास्तच जाणवू लागला आहे.. म्हणून आपण त्या आत्मशक्तीस पर्याय म्हणून ही देवत्वाची ढाल समोर केलीय..एकदा का व्यक्ती किंवा वस्तूला देवत्व दिलं की समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासाठी आपण मोकळे असतो.
माणसात देव पहा..या संकल्पनेचा बेधडक चुकीचा तेवढा अर्थ आपण घेतला. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येएवढ्या देवांचाही बाजार इथं भरवला गेला.. ही वस्तुस्थिती आहे. एखादी परंपरा काय? त्यामागे उद्देश काय? आज त्याची उपयुक्तता काय? त्या रूढी परंपरेत बदल हवेत का? असे विचार हल्ली पडत नाहीत.