25 नोव्हेंबर 2008 ,
इयत्ता आठवीत होतो
दोन दिवसांपूर्वीच तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत आमच्या टीम ने दोन राऊंड जिंकले होते ,
मांगील 2 वर्षाची मेहनत होती यंदा जिल्हास्तर गाठायचच होत , ह्या जिद्दीने आम्ही खेळत होतो .
👇
मी त्या टीम चा कॅप्टन होतो , आज आम्ही मित्र जमून उद्या कसं खेळायचा कोण आणि केव्हा रेड करेल अशी सर्व ठरवून घेत होतो,
व नेहमी प्रमाणे संध्याकाळी सर्व उद्याच आयोजन करून घरी गेलो,
तसच आठच्या सुमारास जेवण व उद्याच्या स्पर्धेची तयारी करून ठेवली,
👇
सकाळी मला 6 वाजेच्या बस ने टीम सोबत बाजूच्या रेल्वे स्टेशन च्या गावी जायचं होत म्हणून लवकरच झोपलो , रात्री तेच मॅच बद्दल विचार करत करत एकदम झोप आली , तितक्यात आई ने सकाळ झाली म्हणून उठवलं , लगेच घाईघाईत तयार झालो , आई ने टिफीन रेडी करून दिलेला आणि निघालो ,
👇
बसस्टॉप ला सर्व मित्र जमले होते ,
काही शेकोटी पेटवून थंडी कमी करण्याचा प्रयत्न करत होते ,
वेळेत बस आली आम्ही सर्व बसलो आत ,
सकाळ ची पहिली बस असल्याने गर्दी कमीच होती .
थोड्या वेळात आमचा स्टॉप आला उतरलो
आणि
ठरल्या प्रमाणे सरांच्या घराकडे जाउ लागलो
👇
पूर्ण अंधार फक्त आमच्या टॉर्च चमकत होत्या ,
आणि तसेच आम्ही एकापाठी एक असे चालत होतो ,
सरांच्या घरी पोहचलो सर, मॅडम जागेच होतें आम्हाला वाटलं आमची वाट पाहत होते दरवाजा उघळाच होता , मित्राला बोललो बघ ,
मी बोललो ना ते वाट बघत असणार ,
आणि आत घरात बसलो.
👇
सर बातम्याच पाहत होते रात्री पासून ,
बातमी पहिली , बॉम्बस्फोट
मुंबई हमला 26/11 .
आम्हीही एकदम सुन्न झालो , कसा झाला हल्ला आता पुढं काय , युद्ध होईल का ? असे अनेक प्रश्न त्या क्षणी मनाला स्पर्श करून गेले .
आम्ही सर्वजण एकमेकांकडे पाहून शांत बसलो होतो ,
👇
थोड्या वेळात मॅडमनी नाश्ता दिला ,
आमचे सर म्हणजे आमचे कोच नेहमीच सकारात्मक आणि अग्रेसिव असणारे
त्या दिवशी जास्तच शांत आणि संयमी वाटत होतें ,
तिथून आम्ही ट्रेन ने तालुक्याच्या ठिकाणी गेलो सर आम्हाला रात्रीच्या बॉम्बस्फोट ची घटनाक्रम सांगत होते ,
👇
आम्हीही आमची जिज्ञासा असणारे प्रश्र्न विचारत होतो ,
त्या पुर्ण प्रवासात त्या बॉम्बस्फोट शिवाय दुसरी चर्चाच झाली नाही ,
आपल्या शाळेसाठी तुम्हीं जिल्हास्तर जायलाच हवं असे वारंवार सांगणारे त्यासाठि दोन वर्षापासून मेहनत घेणारे सर त्या दिवशी त्या बद्दल जराही बोलले नाही .
👇
तालुक्याच्या ठिकाणी उतरून पायी स्पर्धेच्या ठिकाणी पोहचलो , सर्व माहिती व खेळाची वेळ ठरवून आम्ही बाजुला एका कोपऱ्यात आमच्या टीम ची वॉर्म अप करायचा सुरुवात केली ,
आणि स्पर्धेचा वेळ झाला आम्हीं मैदानाकडे पोहचलो ,
👇
त्या दिवशी सर मला बोलावून म्हणाले
सुजित आरामात खेळा , कुणालाही इजा होता कामा नये ,खेळायला सुरुवात झाली आणि आम्हींही चांगला खेळ खेळू लागलो.
पण शेवटी जे नको व्ह्यायच तेचं झाल आम्ही
थोड्या फरकाने मॅच हरलो ,
मी व एक् मित्र आम्हाला पायाला मार लागलेला होता ,
👇
आज मात्र नेहमीप्रमाणे फक्त हरलो नव्हतो , शिकलो होतो , सर्वोत्तम अनुभव अनुभवला होता
त्या दिवशी मात्र देशप्रेम , सर्वोत्तम खेळ , टीम स्पिरीट आणि आतंकवादी हमला कसा असतो हे अनुभवायला मिळालं ,
👇
आपल्या देशावर , राज्यावर , शहरावर हमला झाला तर तळागाळातील माणसांवर कसा परिणाम होतो हे अनुभवायला मिळालं होतं .
ईकडे आम्ही हरलो असलो तरी तिकडे आपले सुरक्षाकर्मी जिंकले होते ,
प्राणाची बाजी लावून एका आतंकवाद्याला आपणं जिवंत पकडले होते ,
बाकीच्यांना यमसदनी धाडले होते ,
👇
आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या दिवसापैकी हा आजचा दिवस एक स्पेशल दिवस होता ,
प्रेरणादायी अनुभव होता ,
अजुनही मुम्बई बॉम्बस्फोट म्हंटल की सर्व घडामोडी आठवतात . #हारणे आठवतेय , #शिकणे आठवते
शेवटीं सर्वात महत्वाचं #लढणे आठवते ..
💐🇮🇳🙏 #Threadकर
भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
👇
यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो. #Romeo_Akbar_Walter
त्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
👇
मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं.
👇
74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” 👇
या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला ,अन तेंव्हा हे तिरंगी 🇮🇳 दृश्य साकार झाले.👇
#थ्रेड #खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔
1/6
ज्या गोष्टींचे जगात कुठेही नवल वाटल नाही अश्या गोष्टी आपण भारतात मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतो
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇: 1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .
2/6
2. रिअॅलिटी शो - यात सर्व ठरवून प्लॅनिंग ने केलं जातं तरीही आपण ते खरं समजून बघत बसतो
व त्या अभिनेत्याला हीरो मानायला लागतो. 3. पदवी - आपल्या कडे अजूनही पदवीला अनन्यसाधारण महत्त्व देतात
म्हणून फक्त आणि फक्त पदवी मिळवण्यासाठी बरेचजण खटाटोप करतांना दिसतात.
3/6
#खेळाडूपणा #थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
#थ्रेड #कर्ण #एक_वेगळा_विचार #जिवन
" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11
महाभारतात कर्ण हि व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा" या तत्वात बसणारी आहे.मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत
तो पर्यंत त्याला कोणीही युद्धात हरवू शकणार नाही याची जाणीव आसताना, त्याने दुर्योधनाने दिलेल्या राजपद स्वीकारण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर मिळवण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याने ठरवले असते तर कितीतरी राज्ये युद्धात जिंकून तो स्वामी होऊ शकला असता, तशी कधी महत्वाकांक्षा दिसली नाही
उद्या एक खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल
ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न
ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत*
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही
ग्रहणात हवा अशुद्ध होते*
सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही.