"हे हात माझे नाहीत.ते भारत भूच्या मातीचे आहेत.सीमेवर लढताना मी शहीद झालो तर तुला अभागी बनून रहावं लागेल.त्यापेक्षा माझा हातच तू हातात नको घेऊ."
यावर ती उत्तरली 'तस झालं तर तुमच्यामागे मी आपला संसार सांभाळीन आणि तुमचे कपडे घालून सीमेवर जाईन.'
वीर शहीद केशव गोसावी यांची ही गोष्ट.
'भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून जागा मिळत आहे..संधीचे सोनं करा.' हे पत्र आलं. त्यादिवशी धाय मोकलून रडला केशव..
वडिलांनी विचारलं काय झालं बाळा? डबडबल्या डोळ्यांनी नोकरी मिळाली बाबा..पण सीमेवर आणि माझं काही बरं वाईट झालं तिकडं तर?
एवढं बोलला तो.. बाबांनी समजावून सांगितलं.
केशव ला सल होती आपल्या हाताने अपंग असलेल्या बाबांची.. केशव पाचवीला असतानाच त्याची आई देवाघरी गेली. वडील हाताने अपंग.. समाजरीत म्हणून ते दुसरं लग्न सहज करू शकले असते..पण नाही.. त्यांनी स्वतः आपल्या अपंग हाताने भाकरी बनवून केशव ला लहानाचा मोठा केला.
केशवला वाटलं आपलं सीमेवर जर बरेवाईट झालं तर बाबांना आयुष्यभर परत त्याच हाताने भाकरी कराव्या लागतील.. तो म्हणाला त्यापेक्षा मी दुसरी नोकरी करतो.. बाबांनी छत्रपतींची उदाहरणं दिली..ते जर घाबरले असते तर आपण राहिलो नसतो. तू जा सीमेवर..जा..!
हे वडिलांचे बोल केशवला बळ देते झाले.
2011 साली केशव सीमेवर रुजू झाला.तो 2015 पर्यंत सीमेवरती लढत राहिला..त्यानंतर त्याची नियुक्ती जम्मू काश्मीरमधील मराठा बटालियन मध्ये मेजर म्हणून झाली.पंचविशीत आलेला गडी तोपर्यंत.दोनाचे चार हात करायची हीच योग्य वेळ आहे.यशोदा चे हात हातात घेताना वरच्या पहिल्या ट्विट मधील बोलणं झालं.
डिसेंबर 2015 ला लग्न झालं.. केशव ,यशोदा आणि त्याचे वडील अतीव आनंदी होते. पुढच्या 2-3 महिन्यात सुट्टी संपवून केशव देशसेवा करायला रुजू झाला. 2018 पर्यंत उन्हाळे पावसाळे येत जात तस केशव सुट्टीला यायचा परत सेवेस तत्पर बनून रुजू व्हायचा.
2018 ची भाऊबीज होती.. यशोदा गर्भवती होती.. 9 महिन्यांची.. सगळीकडे प्रफुल्लित वातावरण.. त्यादिवशी तिची ओटी भरण कार्यक्रम होता. यशोदाचे वडील तिला माहेरी न्यायला आले होते.
लेकरू जन्माला येणार आहे.. केशव तिकडे सीमेवर याच आनंदात होता..
येणारी रात्र काळरात्र असणार आहे.. याची पुसटशी ही कल्पना केशव आणि यशोदेला न्हवती. त्या रात्री पाकिस्तानी गोळीने केशवच्या छातीचा ठाव घेतला. केशव धारातीर्थी पडला..हॉस्पिटलमध्ये काहीही चाललं नाही. वीर केशव गेला.. आपल्यासाठी गेला.. शहीद झाला.
केशव अमर रहे..! घोषणेने शिंदेवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक परिसर दुमदुमून गेला.
वडील आणि बायको ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो फोडत राहिले..धाय मोकलून रडू लागले.
यशोदा बेशुद्ध झाली.. 9 महिन्यांची गर्भवती यशोदा.. हॉस्पिटलमध्ये सहाव्या दिवशी कन्यारत्न तिच्या कुशीत आले.
त्या दिवसानंतर 2019 च्या भाऊबीजेपर्यंत यशोदा माहेरीच गेली न्हवती.. नेटाने कुटुंब सांभाळलं तिने.. लहान मूल.. अपंग सासरा..
यशोदेचं वय काही 24-25 वर्षे असेल. विराची पत्नी असते ती अशी. एक लाखांचं स्मारक तिने आपल्या नवऱ्याचं बनवलं.. ❤
टीप- सदर घटना आज माझ्या ऐकण्यात आली..सगळ्यांसोबत शेअर करावी वाटली म्हणून हा प्रयत्न.. ऐकीव माहितीवर लिहलं असल्याने काही चूक असल्यास मोठ्या मनाने क्षमा असावी. @Omkara_Mali@SahilVastad@Nilesh_P_Z@DrVidyaDeshmukh
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड#म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.
जगाचा बाप त्याच्या आईला यशोदाआईला विचारत होता.
जगाचा बाप..परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण उद्या गोकुळ सोडून जाणार असतो..आकृरजी त्याला न्यायला आलेले असतात.
आपलं लेकरू सुट्टी संपवून उद्या सीमेवर जाणार असेल ना तर आदल्या दिवशी आईचे डोळे सतत पाणावलेले असतात. #थ्रेड#म
यशोदा आई म्हणाली.. नहीं बेटा, रोई नहीं!
फिर ये आसू?
आई म्हणाली चुलीतील धुराने डोळे पाणावलेत..
'तेरे बच्चे तुजको प्यारे...रावण हो या राम..!
ये मा तुझे सलाम..'
यशोदा आई ने खरं सांगितलं... हो मी रडले.!
तो बाहेर दाढीवाला आलाय ना तो तुला न्यायला आलाय.
बस् इतनी सी बात है?
लहान कान्हा पळतच बाहेर गेला..आकृरजी आणि नंद बाबा बसले होते तिथं.. आणि म्हणाला..
"काका मी काय तुमच्या सोबत येणार नाही, आमची आई रडायली..!"
एवढं बोलून तो जगाचा बाप आत यशोदा आईच्या मांडीवर जाऊन बसला.
ही गोष्ट त्याने आई ला सांगितली.. यशोदा आईने कडकडून मिठी मारली श्रीकृष्णाला.
'परब्रह्मतत्वात लिंगीभेद नाही.ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळत नाही तो देश उन्नतावस्थेत पोहचत नाही.-स्वामी विवेकानंद.
आपण सगळेच जाणून आहोत. 'ती चार दिवसांची घुसमट.'
कोण्या स्कॉटलंड देशाने सॅनिटरी उत्पादने मोफत केली,आनंद आहे.पण आपल्या लक्ष्मीची घुसमट? त्याच काय? #थ्रेड#म
स्कॉटलंडला मासिक पाळी उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा पारित झालाय..आता तिथल्या कारभाऱ्यांना ती उत्पादने मोफत उपलब्ध करून द्यावी लागतील.. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ मिलियन पौंड खर्च करतील ते..
पुढारलेला देश तो..अजूनही या बाबतीत मागास होता..
यासंबंधी विधेयक गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मांडलं..म्हणजे वर्ष गेलं ते कार्य सिद्धीस न्यायला त्यांनाही..यातच आपणही आपली मर्यादा समजून घ्यायला हवी..आणि किती प्रयत्न करावे लागतील ओळखायला हवे.आणि आत्तापासून आपापल्या घरातून या 'भेदाभेद अमंगळास' तिलांजली देण्याचे शुभकार्य आटपावे.
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड#म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
"The duty of a true patriot is to protect his country from his Government."
हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड#म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.