'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' हा अहं एकदा का मनाने घेतला. की,माणसास काळ,वेळ आणि दशदिशा यांचे भान रहात नाही.
कृषी बिलावरून सुरू असलेले भाजप आणि त्याच्या धुरीणांचे(?)राजकारण हे त्या अहं चे सर्वोत्तम अवसानघातकी उदाहरण.
पक्ष म्हणून त्यांचे जे काही होईल ते होईल.पण काळ सोकावतोय. #थ्रेड#म
राजकारण आणि क्रिकेट पाठोपाठ आता कृषी क्षेत्रात ही लोकसंख्येएवढे तज्ञ तयार झालेत. त्यामुळे सध्याच्या कृषी बिलांचा यथेच्छ आर्थिक खिस पडला आहेच.. ही बिलं योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहेच.. त्याहून वादाचा मुद्दा आहे ती ज्या प्रकारे पारित केली गेली.
सध्याच्या सरकारने ती ज्या प्रकारे आणली.त्यास पारित म्हणणं चुकीचंच.ती बिलं भारतीयांवर लादली म्हणणं योग्य होईल. कारण या सरकारचा हुकूमशाहीचा कंड आणि तत्पर बहुमताचा माज.
एकुणातच या सरकारचा 2014 पासूनचा आलेख पाहिल्यास सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वर्तन अगदी गल्ली ते दिल्ली झालं.
या सरकारचा पूर्वोतिहास माहीतच आहे.. तुघलकी निर्णय घेण्यात एकसेएक मातब्बर त्या पक्षात आणि पर्यायाने सरकारात सामील आहेत. तूर्तास या कृषी बिलावरून जो गोंधळ या सरकारने भारतभर आणि प्रामुख्याने दिल्लीच्या वेशीवर चालवला आहे त्याविषयी.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. असं ज्या कायद्याचं विवेचन सत्ताधारी करतात. त्याच कायद्या विरोधात शेतकरी दिल्ली तटास धडक्या का देत आहेत? या प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांकडे असणार नाही.. कारण तो प्रश्न आहे हे त्यांना मान्यच नाही.
वादासाठी ते त्यांनी मान्य केल्यास त्यावर अगोदर काही विचार केल्याचे अजूनतरी दिसले नाही त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली.
'मला कोणी सांगायचे नाही.मी कोणाचे ऐकणार नाही.' हा अडेलतट्टूपणा वैयक्तिक ठीक पण देश चालवताना सगळ्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते.अन्यथा देशच फुटण्याचा धोका असतो.
खरंतर कृषी क्षेत्राविषयी या कृषिप्रधान देशाचे कारभारी सुरवातीपासून इतके बेदखल राहिलेत की त्यांना आता संसदेत कृषी बिल पारित करण्यास चर्चेचीही गरज वाटेनाशी झालीय. सध्याच्या सरकारचे तोंड यापूर्वी जमीन अधिग्रहण कायद्याने भाजूनही परत तोच अविश्वासाच्या आगीचा खेळ खेळत आहे.
कृषी हा विषय राज्यांचा देखील विषय आहे. तो फक्त केंद्राचा नाही..त्यामुळे राज्यांना विश्वासात घेणे क्रमप्राप्त असताना हुकूमशाही प्रवृत्तीने ही कृती लोकशाही देशास काळिमा फासणारी होती.. त्याविरोधात पीडित घटक आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्यास त्याबाबत त्यांना दोष देता येणार नाही.
सर्वांना विश्वासात न घेता उलट आहे त्यातच खलिस्तान उल्लेख करत परिस्थिती अधिकच कशी बिघडवता येईल आणि बळाचा वापर करून आंदोलन कसे मोडीत काढता येईल याकडे सत्ताधाऱ्यांचा कल दिसतो. तो आत्मघातकी आहे. त्याने काही फुटीर शक्तींना खरोखर बळ मिळून एकूणच सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते.
तो धोका पत्करण्याची खुमखुमी करभाऱ्यांची असेल पण तो धोका निस्तारण्याची ताकद आता समाजात नाही याचा विचार सदर इसमांनी करायला हवा.
सध्याचे आंदोलन यशस्वी होवो किंवा न होवो त्यातून जे निष्पन्न होईल ते दोन्ही अर्थाने भारताचे भविष्य ठरवेल.
ते यशस्वी झाल्यास लोकशाही रुजेल..तसे न झाल्यास आणखी काही ओर्डीनन्स आपली वाट पहात आडवळणावर उभे आहेतच.
सध्याच्या सरकारचा वकुब आणि पिंड चर्चेने मार्ग काढण्याचा आहे असे अजून कुठल्याच प्रकरणात दिसले नाही. त्यामुळे 'ऑपरेशन यशस्वी पण पेशंट दगावला.' अशी परिस्थिती या सरकारची सगळीकडे आहे.
ही परिस्थिती बदलायची असेल तर अगोदर कारभाऱ्यानी आपली कामाची वैचारिक बैठक पक्की करून घेणं गरजेचं आहे.
साम, दाम, दंड, भेद वापरून ते आंदोलन तर शमवतील पण येणारा काळ.. त्याहून मोठं आंदोलन उभं करेल ते निस्तारण्याची ऐपत कोना चाणक्याची नसेल मग छप्पन इंच तर लय लांबची गोष्ट.. कळावे.❤
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड#म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.
जगाचा बाप त्याच्या आईला यशोदाआईला विचारत होता.
जगाचा बाप..परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण उद्या गोकुळ सोडून जाणार असतो..आकृरजी त्याला न्यायला आलेले असतात.
आपलं लेकरू सुट्टी संपवून उद्या सीमेवर जाणार असेल ना तर आदल्या दिवशी आईचे डोळे सतत पाणावलेले असतात. #थ्रेड#म
यशोदा आई म्हणाली.. नहीं बेटा, रोई नहीं!
फिर ये आसू?
आई म्हणाली चुलीतील धुराने डोळे पाणावलेत..
'तेरे बच्चे तुजको प्यारे...रावण हो या राम..!
ये मा तुझे सलाम..'
यशोदा आई ने खरं सांगितलं... हो मी रडले.!
तो बाहेर दाढीवाला आलाय ना तो तुला न्यायला आलाय.
बस् इतनी सी बात है?
लहान कान्हा पळतच बाहेर गेला..आकृरजी आणि नंद बाबा बसले होते तिथं.. आणि म्हणाला..
"काका मी काय तुमच्या सोबत येणार नाही, आमची आई रडायली..!"
एवढं बोलून तो जगाचा बाप आत यशोदा आईच्या मांडीवर जाऊन बसला.
ही गोष्ट त्याने आई ला सांगितली.. यशोदा आईने कडकडून मिठी मारली श्रीकृष्णाला.
"हे हात माझे नाहीत.ते भारत भूच्या मातीचे आहेत.सीमेवर लढताना मी शहीद झालो तर तुला अभागी बनून रहावं लागेल.त्यापेक्षा माझा हातच तू हातात नको घेऊ."
यावर ती उत्तरली 'तस झालं तर तुमच्यामागे मी आपला संसार सांभाळीन आणि तुमचे कपडे घालून सीमेवर जाईन.'
वीर शहीद केशव गोसावी यांची ही गोष्ट.
'भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून जागा मिळत आहे..संधीचे सोनं करा.' हे पत्र आलं. त्यादिवशी धाय मोकलून रडला केशव..
वडिलांनी विचारलं काय झालं बाळा? डबडबल्या डोळ्यांनी नोकरी मिळाली बाबा..पण सीमेवर आणि माझं काही बरं वाईट झालं तिकडं तर?
एवढं बोलला तो.. बाबांनी समजावून सांगितलं.
केशव ला सल होती आपल्या हाताने अपंग असलेल्या बाबांची.. केशव पाचवीला असतानाच त्याची आई देवाघरी गेली. वडील हाताने अपंग.. समाजरीत म्हणून ते दुसरं लग्न सहज करू शकले असते..पण नाही.. त्यांनी स्वतः आपल्या अपंग हाताने भाकरी बनवून केशव ला लहानाचा मोठा केला.
'परब्रह्मतत्वात लिंगीभेद नाही.ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळत नाही तो देश उन्नतावस्थेत पोहचत नाही.-स्वामी विवेकानंद.
आपण सगळेच जाणून आहोत. 'ती चार दिवसांची घुसमट.'
कोण्या स्कॉटलंड देशाने सॅनिटरी उत्पादने मोफत केली,आनंद आहे.पण आपल्या लक्ष्मीची घुसमट? त्याच काय? #थ्रेड#म
स्कॉटलंडला मासिक पाळी उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा पारित झालाय..आता तिथल्या कारभाऱ्यांना ती उत्पादने मोफत उपलब्ध करून द्यावी लागतील.. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ मिलियन पौंड खर्च करतील ते..
पुढारलेला देश तो..अजूनही या बाबतीत मागास होता..
यासंबंधी विधेयक गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मांडलं..म्हणजे वर्ष गेलं ते कार्य सिद्धीस न्यायला त्यांनाही..यातच आपणही आपली मर्यादा समजून घ्यायला हवी..आणि किती प्रयत्न करावे लागतील ओळखायला हवे.आणि आत्तापासून आपापल्या घरातून या 'भेदाभेद अमंगळास' तिलांजली देण्याचे शुभकार्य आटपावे.
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड#म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.