"या देशाचे संविधानकर्ते इतिहासात कोणासमोर झुकले नाहीत, वर्तमानात आम्हीही उद्योगसम्राटांसमोर झुकू हे शक्य नाही." अमेरिकेत रिपब्लिकनचे सिसिलिन बोलत होते.
जगातल्या चार बड्या उद्योगपतींना अक्षरशः 'घेण्याचा' कार्यक्रम सुरू होता.
हे भांडवलशाही देशात होत होतं. #मानवाधिकार#थ्रेड#म
एरवी ते चार उद्योगमहारथी साधे शिंकले जरी तरी जागतिक बाजारास थंड ताप येईल. ते काही अघटित बोलले तर जागतिक बाजार अंथरून धरेल..एवढी ताकद त्या चौघांकडे.
पण त्यादिवशीच्या कार्यक्रमात ते स्वतःस कपाळकरंटे बनवून..कपाळावरील घाम टिपण्यात व्यस्त होते. तोंडात मूग होते ते निराळच..
ते चौघे.टिम कुक, सुंदर पिचाई,जेफ बेझोस आणि मार्क झुकेरबर्ग, त्यांचे उद्योग अनुक्रमे ऍपल, गुगल, अमेझॉन, फेसबुक.
या चारांनी आपल्या ताकदीचा वापर प्रतिस्पर्ध्याला संपवणे आणि स्वतःची मोनोपॉली तयार करण्यासाठी केला का? याची यथासांग चौकशी सुरू होती.अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या उपसमिती समोर.
तू कोणीही आस..'दुनिया मुठ्ठी मे घेणारा किंवा साहेब, कुठलासा हृद्यसम्राट की अन्य कोणी..' म्हणजे उद्योगपती किंवा संसद प्रतिनिधी.तुला बोलायला ५ मिनिटेच मिळतील.तेवढ्यात तुझं म्हणणं मांडायचं. तिथले सगळे नियम पाळतात.. त्याबरहुकूम समितीच्या सदस्यांनी आपलं म्हणणं ५ मिनिटाच लिहून आणलेलं.
तुम्ही डेमॉक्रॅटिक असा की रिपब्लिकन.. सगळ्या प्रतिनिधींनी एकजात या चौघांना राउंडात घेतलं..यथेच्छ धुतलं.
सुंदर पिचाई ला..गुगलच्या चीन मधील कांडावर प्रश्न विचारले. रिपब्लिकन केन बक यांनी.
मॅट यांनी ऍपलच्या ऍपस्टोअर विषयी कुक यांना घेतलं.
रोस्किन हे डेमोक्रॅटिक.ते ही अग्रभागी होते.
नाडलर आणि नेग्यूस अनुक्रमे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक.झुकेरबर्ग ला घाम फोडला यांनी.त्यांनी झुकेर चे मेल च आणलेले.वॉट्सऍप आणि इंस्टा कसं फेसबुक ने गिळंकृत केलं हा आरोप होता दोघांचा.
प्रमिला जयपाल डेमोक्रॅटिक आणि चेन्नईच्या. जेफ बेझोस ला.'तुम्ही ग्राहकांचा डेटा चोरता का?' म्हणाल्या.
बेझोस 'नाही चोरत आम्ही' असं छातीठोकपणे म्हणू शकलाच नाही.
लोकशाही असते ती अशी..!
दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन पोस्ट पेपर मधून या चौघांची कशी थासली याचा वृत्तांत आलेला.. त्याखाली टीप होती.. वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक जेफ बेझोस यांच्या मालकीचे आहे..
लोकशाही समाज असतो तो असा..!!
आपल्या इकडं दुनिया मुठ्ठीमे घेऊ पाहणाऱ्याची बायको(तो स्वतः न्हवे..बायको) एका कार्यक्रमात आलेली..आपले व्हाइट कॉलर प्रतिनिधी तिच्यासमोर फक्त दंडवत घालायचे बाकी होते.. ते लवलवून मुजरे करत होते.
सांगायचा मुद्दा आहे.. मानवाधिकार फक्त तोंडाची गोष्ट नाहीय.. ती तत्वांची गोष्ट आहे.
तत्वे संस्काराचे पाईक असतात.. संस्कार मनाच्या अंकित असतात.. मन मानसिकतेचे गुलाम असते.. मानसिकता विचारांनी सुधारता येते.. विचार सकस वाचनाचे साथीदार असतात. सकस वाचन ही कृती आहे.. ते वाचन करणं आपलं कर्म. यापद्धतीने आपापलं कर्म सुधारलं तर मानवाधिकार तत्वे आपसूकच निपजतात.
ती एकमेकांना सांगावी लागणार नाहीत.. सध्या आपलं नेमकं उलट सुरुय.. ओरडून दंगल करून हक्क घ्यायचं काम सुरुय.. अगदी परंपरा बनलीय..पण हक्क काही मिळत नाहीयत.. कारण, मानसिकता नवीन काही करण्याची नाही.. उलट जुन्याच्या कर्तबगारीत सुख मानायचं सुरुय.
काळ बदलतोय आपण कधी? हा प्रश्न आहे.
हे सगळे ट्रेंड वगैरे 'जनहितार्थ जारी' साठी ठीक आहेत..नियतीला उज्वल भविष्यासाठी आपल्याकडून त्यापेक्षा जास्तीचं काही हवंय.. ते जास्तीचं काहीतरी म्हणजे वर सांगितलेलं कर्म.. ते कर्म जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत 'मानव आणि अधिकार' हे दोन्ही भारतीयांसाठी चेष्टेचाच विषय असतील..कळावे!❤
'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' हा अहं एकदा का मनाने घेतला. की,माणसास काळ,वेळ आणि दशदिशा यांचे भान रहात नाही.
कृषी बिलावरून सुरू असलेले भाजप आणि त्याच्या धुरीणांचे(?)राजकारण हे त्या अहं चे सर्वोत्तम अवसानघातकी उदाहरण.
पक्ष म्हणून त्यांचे जे काही होईल ते होईल.पण काळ सोकावतोय. #थ्रेड#म
राजकारण आणि क्रिकेट पाठोपाठ आता कृषी क्षेत्रात ही लोकसंख्येएवढे तज्ञ तयार झालेत. त्यामुळे सध्याच्या कृषी बिलांचा यथेच्छ आर्थिक खिस पडला आहेच.. ही बिलं योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहेच.. त्याहून वादाचा मुद्दा आहे ती ज्या प्रकारे पारित केली गेली.
सध्याच्या सरकारने ती ज्या प्रकारे आणली.त्यास पारित म्हणणं चुकीचंच.ती बिलं भारतीयांवर लादली म्हणणं योग्य होईल. कारण या सरकारचा हुकूमशाहीचा कंड आणि तत्पर बहुमताचा माज.
एकुणातच या सरकारचा 2014 पासूनचा आलेख पाहिल्यास सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वर्तन अगदी गल्ली ते दिल्ली झालं.
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड#म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.
जगाचा बाप त्याच्या आईला यशोदाआईला विचारत होता.
जगाचा बाप..परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण उद्या गोकुळ सोडून जाणार असतो..आकृरजी त्याला न्यायला आलेले असतात.
आपलं लेकरू सुट्टी संपवून उद्या सीमेवर जाणार असेल ना तर आदल्या दिवशी आईचे डोळे सतत पाणावलेले असतात. #थ्रेड#म
यशोदा आई म्हणाली.. नहीं बेटा, रोई नहीं!
फिर ये आसू?
आई म्हणाली चुलीतील धुराने डोळे पाणावलेत..
'तेरे बच्चे तुजको प्यारे...रावण हो या राम..!
ये मा तुझे सलाम..'
यशोदा आई ने खरं सांगितलं... हो मी रडले.!
तो बाहेर दाढीवाला आलाय ना तो तुला न्यायला आलाय.
बस् इतनी सी बात है?
लहान कान्हा पळतच बाहेर गेला..आकृरजी आणि नंद बाबा बसले होते तिथं.. आणि म्हणाला..
"काका मी काय तुमच्या सोबत येणार नाही, आमची आई रडायली..!"
एवढं बोलून तो जगाचा बाप आत यशोदा आईच्या मांडीवर जाऊन बसला.
ही गोष्ट त्याने आई ला सांगितली.. यशोदा आईने कडकडून मिठी मारली श्रीकृष्णाला.
"हे हात माझे नाहीत.ते भारत भूच्या मातीचे आहेत.सीमेवर लढताना मी शहीद झालो तर तुला अभागी बनून रहावं लागेल.त्यापेक्षा माझा हातच तू हातात नको घेऊ."
यावर ती उत्तरली 'तस झालं तर तुमच्यामागे मी आपला संसार सांभाळीन आणि तुमचे कपडे घालून सीमेवर जाईन.'
वीर शहीद केशव गोसावी यांची ही गोष्ट.
'भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून जागा मिळत आहे..संधीचे सोनं करा.' हे पत्र आलं. त्यादिवशी धाय मोकलून रडला केशव..
वडिलांनी विचारलं काय झालं बाळा? डबडबल्या डोळ्यांनी नोकरी मिळाली बाबा..पण सीमेवर आणि माझं काही बरं वाईट झालं तिकडं तर?
एवढं बोलला तो.. बाबांनी समजावून सांगितलं.
केशव ला सल होती आपल्या हाताने अपंग असलेल्या बाबांची.. केशव पाचवीला असतानाच त्याची आई देवाघरी गेली. वडील हाताने अपंग.. समाजरीत म्हणून ते दुसरं लग्न सहज करू शकले असते..पण नाही.. त्यांनी स्वतः आपल्या अपंग हाताने भाकरी बनवून केशव ला लहानाचा मोठा केला.
'परब्रह्मतत्वात लिंगीभेद नाही.ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळत नाही तो देश उन्नतावस्थेत पोहचत नाही.-स्वामी विवेकानंद.
आपण सगळेच जाणून आहोत. 'ती चार दिवसांची घुसमट.'
कोण्या स्कॉटलंड देशाने सॅनिटरी उत्पादने मोफत केली,आनंद आहे.पण आपल्या लक्ष्मीची घुसमट? त्याच काय? #थ्रेड#म
स्कॉटलंडला मासिक पाळी उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा पारित झालाय..आता तिथल्या कारभाऱ्यांना ती उत्पादने मोफत उपलब्ध करून द्यावी लागतील.. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ मिलियन पौंड खर्च करतील ते..
पुढारलेला देश तो..अजूनही या बाबतीत मागास होता..
यासंबंधी विधेयक गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मांडलं..म्हणजे वर्ष गेलं ते कार्य सिद्धीस न्यायला त्यांनाही..यातच आपणही आपली मर्यादा समजून घ्यायला हवी..आणि किती प्रयत्न करावे लागतील ओळखायला हवे.आणि आत्तापासून आपापल्या घरातून या 'भेदाभेद अमंगळास' तिलांजली देण्याचे शुभकार्य आटपावे.
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.