हे वाक्य आहे जॉन ऍडम यांचं.
सांप्रतकाळी ऍडम जर जिवंत असता तर त्याने भारतीय लोकशाही बघून स्वतःस देहदंडाचे प्रायश्चित घेतले असते. कारण आपली लोकशाही ऐपत.
लोकशाहीचे पॅरोडी अकाउंट असते तर त्याचेही पॅरोडी अकाउंट म्हणजे आपली लोकशाही.
हल्ली एक बरंय.. रिअल आणि ओथेंटीक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नसल्याने सर्व काही सुखेनैव चाललं असल्याचं स्वप्न भारतीय जनमनात आहे. ते स्वप्न पडलं कारण भारतीय जन गुंगीत आहेत.. ती गुंगी आहे एकामागून एक येत असलेल्या आणि भारतीयांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेल्या प्रॉपगेंडा शृंखलेची.
भारतीय समाज हा असमाधानी आहे..त्यास आता कितीतरी दशके लोटली.. या असमाधानाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम गेले दशकभर अविरत सुरू झाले.. त्यातही काहीएक नियमितपणा ठेवला गेला.. आपण किती लायक आहोत हे दाखवण्यासाठी समोरचा किती नालायक आहे..हे दाखवणे भारतात क्रमप्राप्त असते.
सध्याच्या सरकारने 2014 पासून तेच केलं.. तुलनेने मनमोहन सिंग यांची मूक कारकीर्द आणि 2014 चा मोदी नामक गोंगाट.. समाजाचे भानच हरपले एवढ्याने.
'विलक्षण शांतता भोगलेल्यास आता काही डीजे डॉल्बीची तल्लफ व्हावी.' तसे भारतीय समाजाचे 2014 ला झाले. त्यातून एक लाट निर्माण झाली..
त्या लाटेने राज्योराज्जी असलेले हौशे नवशे गवशे ही तिराला लावले..आणि त्यातून एक नवाच संघराज्यवाद जन्माला आला.. केंद्र आणि बहुतांश राज्य दोन्हीकडे भाजप असल्याने केंद्र म्हणेल त्यास फक्त हाताला हात लावून मम् म्हणणे एवढेच या भाजप शासित राज्यांचे कर्तव्य झाले..
हे सगळं तोपर्यंत ठीक होतं जोपर्यंत केंद्राच्या तिजोरीत काही रोकड पडून होती..आणि बहुतांश राज्ये आजन्म गाठ बांधल्यासारखे वागत होते..
पण सध्या कोरोना आणि राजकीय परिस्थिती या दोन्ही आघाडीवर केंद्राकडे आणि त्यांच्या रोज्योराज्जीच्या 'मी पुन्हा येईन' या आशेवर असणाऱ्या सरदारांकडे शनी
वक्र दृष्टीने पहात असल्याचा फील दोघांनाही येत असणार.
दिवसेंदिवस बिघडत चाललेली आर्थिक घडी..महागाई आणि बेरोजगारी यांनी खाल्लेली उचल..कोरोनासोबत हरलेली लढाई, सांगून काही नवीन उत्पन्नाची सोयरीक जमेना.. या सगळ्यांवर उतारा म्हणून खेळला जातोय जीवघेणा खेळ.
'डिव्हाईड अँड रुल' हा तो खेळ.
'असमाधानी मनुष्यास नेहमीच रकरकीपणा असतो त्यातून विवेकास तिलांजली देण्याची चूक तो करतो.'
असमाधानी भारतीय समाज.ती चूक नेहमीच करत राहिला.आणि सूड(Revenge)नाट्य रंगवण्यात समाजकंटक नेहमीच अग्रभागी राहिले.त्यासाठी अगदी पाठ्यपुस्तकांचाही बेमालूम वापर झाला.
सुडाची भावना एकदा का चेतवली की माणूस मागचा पुढचा विचार करत नाही..इथं नेमकं तेच घडलं..अलीकडे निमित्त घडलं 2G, A राजा, लोकपाल, स्वदेशी, नोटबंदी(श्रीमंतांवर सूड),CAA-NRC, 370, काश्मीर आणि लिस्ट सुरूच आहे..सध्या कृषी बिल्स..
या सगळ्यात एक सामान्य माणूस म्हणून किंवा लोकशाही समाज म्हणून आपल्या हाती काय लागलं हा प्रश्न ही आपल्याला हल्ली पडेनासा झालाय.. 'आपलं विचार करणारं इंद्रिय आपणच इतकं बेदखल करून टाकलंय की त्यास आता काही कामच उरलं नाही.' आपण आपल्या त्या इंद्रियास आता काम द्यायला हवं.
हल्ली ट्विटरसारख्या समाजमाध्यमात सुडाची भावना चेतवणारे ट्विट्स काही मंडळी सतत मांडत राहतात.. त्यास कस भिडायचं हा यक्षप्रश्न आहे सध्या.. कारण त्या ब्रेनवॉश करून घेतलेल्या 'खर' मंडळींना सभ्य भाषा झेपत नाही.. आणि वाद प्रतिवाद त्यांना पेलतही नाही.
टीप- 'खर' म्हणजे गाढव.
मुळात त्यांना अनुल्लेखाने मारणे हेच त्यांच्या विचारांना यमसदनी धाडण्याचे औषध आहे.. कारण, 'मूर्खांशी वाद घालायचा नसतो..त्यांची संख्या एकने वाढते.'
मग त्यांची विषवल्ली तोपर्यंत अशीच पसरू द्यायची का? हा प्रश्न पडू शकतो.. तर इतिहासात त्याचं उत्तर आहे..
अगदी बसवेश्वर, ज्ञानदेव, तुकोबाराय, छत्रपती ते अलीकडे राजा राममोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.आंबेडकर या मंडळींनाही अशाच प्रकारे समाजकंटकानीं त्रास दिला ..त्यास ही मंडळी कसे पुरून उरले याचा अभ्यास आपण करायला हवा..तो आत्मसात करायला हवा.. हाच योग्य मार्ग आहे या समस्येवर.
अरे ला कारे म्हणल्याने एक कुत्सित आनंद मिळेल पण समस्येवर उपाय नाही.. उलट ही मंडळी त्यांना हवा तो प्रॉपगेंडा आपल्या वादाच्या निमित्ताने पसरवायला उभे ठाकतात..त्यांची ती फळी गारद करण्याचे कार्य आपल्या सुज्ञांचे आहे. ते त्यांनी इमानेइतबारे करायला हवं..कळावे..❤
अलीकडे पंतप्रधानपदाला असत्य बोलणे हा शापच आहे..!
गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हात जोडून विनंती करताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती धडधडीत असत्य कशी काय बोलू शकते?
'आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार खर्च + ५०℅ नफा असा हमीभाव दिला.' हे ते असत्य. #थ्रेड#म
वास्तविक स्वामिनाथन आयोगात जो खर्च नमूद आहे त्यास C2 कॉस्ट म्हणतात.ज्यात सर्व खर्च नमूद असतात आणि केंद्राने हल्ली सांगितलेला हमीभाव आहे त्यात खर्च म्हणून फक्त 'मजुरी + निविष्ठा' हाच खर्च धरला आहे..या बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर असा हा खेळ. हे सरकार तो खेळ बिनदिक्कतपणे खेळत आहे.
दुसरी धादांत खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जातीय ती म्हणजे हमीभाव खरेदी फक्त पंजाब,हरियाणा आणि उत्तरप्रदेश इथंच होते.. आणि आत्ता फक्त 6 टक्के शेतकरी त्याचा लाभ उठवत आहेत..नव्या कायद्याने मुक्त बाजारपेठ आली की सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजार समितीसाठी नवीन कायदा करणे हा तोडगा निघू शकतो.पण सरकार फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून आला दिवस ढकलत आहे.दुसरीकडे आंदोलकात फूट पाडणे किंवा आंदोलनाचा जनाधार संपवणेसाठी सरकार प्रयत्नात आहे.केंद्राचे महाराष्ट्रातील ऊस पॅकेज हे त्याचे उदाहरण. #थ्रेड#म
दुसरीकडे फेसबुक सारख्या भाट समाजमाध्यमांस हाताशी धरून वेगळाच द्वेष भारतीय समाजात पसरवण्याचे काम सुरुय. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे हे त्याचं उदाहरण..
चर्चा आणि शास्त्रशुद्धता याबाबत सदर सरकारचा वकुब हा अतिशय गंभीर आहे. हे 2014 पासून देश पहातच आहे.
आपल्या देशातील संविधानिक संस्थांची जी काही मोडतोड झालीय त्याबद्दल कुठेही वाच्यता होणार नाही याची दखल सरकारने मीडियाला हाताशी धरून घेतलेलीच आहे.. आज जागतिक बाजारात इंधन दर कमी असूनही आपण त्यासाठी पेट्रोलला 90₹/लिटर तर डिझेलला 80 ₹/लिटर मोजत आहोत.
"या देशाचे संविधानकर्ते इतिहासात कोणासमोर झुकले नाहीत, वर्तमानात आम्हीही उद्योगसम्राटांसमोर झुकू हे शक्य नाही." अमेरिकेत रिपब्लिकनचे सिसिलिन बोलत होते.
जगातल्या चार बड्या उद्योगपतींना अक्षरशः 'घेण्याचा' कार्यक्रम सुरू होता.
हे भांडवलशाही देशात होत होतं. #मानवाधिकार#थ्रेड#म
एरवी ते चार उद्योगमहारथी साधे शिंकले जरी तरी जागतिक बाजारास थंड ताप येईल. ते काही अघटित बोलले तर जागतिक बाजार अंथरून धरेल..एवढी ताकद त्या चौघांकडे.
पण त्यादिवशीच्या कार्यक्रमात ते स्वतःस कपाळकरंटे बनवून..कपाळावरील घाम टिपण्यात व्यस्त होते. तोंडात मूग होते ते निराळच..
ते चौघे.टिम कुक, सुंदर पिचाई,जेफ बेझोस आणि मार्क झुकेरबर्ग, त्यांचे उद्योग अनुक्रमे ऍपल, गुगल, अमेझॉन, फेसबुक.
या चारांनी आपल्या ताकदीचा वापर प्रतिस्पर्ध्याला संपवणे आणि स्वतःची मोनोपॉली तयार करण्यासाठी केला का? याची यथासांग चौकशी सुरू होती.अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या उपसमिती समोर.
'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' हा अहं एकदा का मनाने घेतला. की,माणसास काळ,वेळ आणि दशदिशा यांचे भान रहात नाही.
कृषी बिलावरून सुरू असलेले भाजप आणि त्याच्या धुरीणांचे(?)राजकारण हे त्या अहं चे सर्वोत्तम अवसानघातकी उदाहरण.
पक्ष म्हणून त्यांचे जे काही होईल ते होईल.पण काळ सोकावतोय. #थ्रेड#म
राजकारण आणि क्रिकेट पाठोपाठ आता कृषी क्षेत्रात ही लोकसंख्येएवढे तज्ञ तयार झालेत. त्यामुळे सध्याच्या कृषी बिलांचा यथेच्छ आर्थिक खिस पडला आहेच.. ही बिलं योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहेच.. त्याहून वादाचा मुद्दा आहे ती ज्या प्रकारे पारित केली गेली.
सध्याच्या सरकारने ती ज्या प्रकारे आणली.त्यास पारित म्हणणं चुकीचंच.ती बिलं भारतीयांवर लादली म्हणणं योग्य होईल. कारण या सरकारचा हुकूमशाहीचा कंड आणि तत्पर बहुमताचा माज.
एकुणातच या सरकारचा 2014 पासूनचा आलेख पाहिल्यास सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वर्तन अगदी गल्ली ते दिल्ली झालं.
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड#म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.
जगाचा बाप त्याच्या आईला यशोदाआईला विचारत होता.
जगाचा बाप..परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण उद्या गोकुळ सोडून जाणार असतो..आकृरजी त्याला न्यायला आलेले असतात.
आपलं लेकरू सुट्टी संपवून उद्या सीमेवर जाणार असेल ना तर आदल्या दिवशी आईचे डोळे सतत पाणावलेले असतात. #थ्रेड#म
यशोदा आई म्हणाली.. नहीं बेटा, रोई नहीं!
फिर ये आसू?
आई म्हणाली चुलीतील धुराने डोळे पाणावलेत..
'तेरे बच्चे तुजको प्यारे...रावण हो या राम..!
ये मा तुझे सलाम..'
यशोदा आई ने खरं सांगितलं... हो मी रडले.!
तो बाहेर दाढीवाला आलाय ना तो तुला न्यायला आलाय.
बस् इतनी सी बात है?
लहान कान्हा पळतच बाहेर गेला..आकृरजी आणि नंद बाबा बसले होते तिथं.. आणि म्हणाला..
"काका मी काय तुमच्या सोबत येणार नाही, आमची आई रडायली..!"
एवढं बोलून तो जगाचा बाप आत यशोदा आईच्या मांडीवर जाऊन बसला.
ही गोष्ट त्याने आई ला सांगितली.. यशोदा आईने कडकडून मिठी मारली श्रीकृष्णाला.