शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजार समितीसाठी नवीन कायदा करणे हा तोडगा निघू शकतो.पण सरकार फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून आला दिवस ढकलत आहे.दुसरीकडे आंदोलकात फूट पाडणे किंवा आंदोलनाचा जनाधार संपवणेसाठी सरकार प्रयत्नात आहे.केंद्राचे महाराष्ट्रातील ऊस पॅकेज हे त्याचे उदाहरण. #थ्रेड#म
दुसरीकडे फेसबुक सारख्या भाट समाजमाध्यमांस हाताशी धरून वेगळाच द्वेष भारतीय समाजात पसरवण्याचे काम सुरुय. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे हे त्याचं उदाहरण..
चर्चा आणि शास्त्रशुद्धता याबाबत सदर सरकारचा वकुब हा अतिशय गंभीर आहे. हे 2014 पासून देश पहातच आहे.
आपल्या देशातील संविधानिक संस्थांची जी काही मोडतोड झालीय त्याबद्दल कुठेही वाच्यता होणार नाही याची दखल सरकारने मीडियाला हाताशी धरून घेतलेलीच आहे.. आज जागतिक बाजारात इंधन दर कमी असूनही आपण त्यासाठी पेट्रोलला 90₹/लिटर तर डिझेलला 80 ₹/लिटर मोजत आहोत.
महाराष्ट्रात सर्वसामान्यांना गरजेची असलेली जिन्नस म्हणजे रॉकेल.. ते ही बंद झालं..दुसरीकडे गॅस इंधन दर विक्रम करत आहेत.. अशात ऊर्जा स्रोत म्हणून वृक्षतोड करण्याकडे ग्रामीण आणि निमशहरी कल राहिल्यास नवाच प्रश्न निर्माण होणार आहे.
महागाई, बेरोजगारी, भिकेचे डोहाळे लागलेली तिजोरी यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सरकार शेतकरी आंदोलनाचा खुबीने वापर करत आहे.. दुसरीकडे निर्गुंतवणूक आणि खाजगिकरण या गोंडस नावाखाली सरकार दोन पाच उद्योगपतीना मोठं करत आहे.. रशियात पुतीनने ज्याप्रमाणे सूत्र एकवटून आपल्या हाती सत्ता घेतली..
नेमकं तेच इथं घडताना दिसत आहे. पुतीनने खाजगीकरण करताना अख्खी मंत्रालय आणि सरकारी उद्योग आपल्या बगलबच्च्याना सुपूर्त केली.. आपल्याकडे त्याची सुरवात झालीय अशी रास्त शंका घेण्यास वाव आहे.
भारतीय जनमानसात एक समज अशी असते की हे सगळं एवढं सोपं आहे का?
आजपर्यंत ज्या ज्या अघटित घटना घडल्या त्या घडेपर्यंत घडणार नाहीतच अस वाटत होतं..पण त्या घडल्या. काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहचू दिल्या जात नाहीत.. आणि ज्या पोहचतात ते फक्त हिमनगाचे टोक असते..
देशात सध्या काय सुरुय याचा अंदाज सहजासहजी बांधताच येणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे..
भारत तरुणांचा देश..या तरुणांनी आता प्रॉपगेंडा ला बळी न पडता सारासार विचार करून परिस्थितीचे योग्य आकलन करून घ्यायला हवं ते आकलन आपल्याला माहिती(इन्फॉर्मेशन) शिवाय होणार नाही.देशात घडत असलेल्या घटनांची एक शृंखला असते.ती शृंखला शोधणे आणि समाजकंटक धुरीणांना मात देणे हे आपलं कर्तव्य.
'No race can prosper till it learns there is as much dignity in tilling a field as in writing a poem.'
शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व या शब्दात सांगितलं होतं बुकर टी वॉशिंग्टनी.
'जय जवान जय किसान' हा आपला आवडता खेळ..जवान आणि किसान यांची अवस्था बरी म्हणावी अशीही नाही. #थ्रेड#म
भारतीय समाज कमालीचा भावनिक प्राणी..अगदी पहिल्यापासून.. याच भावनिकतेतून त्याने ज्याला ज्याला राजा किंवा देव/देवी संबोधलं त्याची वाताहत त्यानेच मन लावून केली..
इतिहास गवाह है..!
त्याने अखंड निसर्गाशी देवत्वाचं नातं जोडलं, पुढे निसर्ग कोपला हे ही त्यानेच ठरवलं..
यथावकाश स्त्रीला देवी मानण्याचे सत्कार्य त्याने उभारले.. आज जगाच्या पाठीवर धर्मांधळ्या मुस्लिम देशांनंतर भारतभूमीत स्त्रीस जास्तीत जास्त बेअब्रू केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
अलीकडे पंतप्रधानपदाला असत्य बोलणे हा शापच आहे..!
गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हात जोडून विनंती करताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती धडधडीत असत्य कशी काय बोलू शकते?
'आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार खर्च + ५०℅ नफा असा हमीभाव दिला.' हे ते असत्य. #थ्रेड#म
वास्तविक स्वामिनाथन आयोगात जो खर्च नमूद आहे त्यास C2 कॉस्ट म्हणतात.ज्यात सर्व खर्च नमूद असतात आणि केंद्राने हल्ली सांगितलेला हमीभाव आहे त्यात खर्च म्हणून फक्त 'मजुरी + निविष्ठा' हाच खर्च धरला आहे..या बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर असा हा खेळ. हे सरकार तो खेळ बिनदिक्कतपणे खेळत आहे.
दुसरी धादांत खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जातीय ती म्हणजे हमीभाव खरेदी फक्त पंजाब,हरियाणा आणि उत्तरप्रदेश इथंच होते.. आणि आत्ता फक्त 6 टक्के शेतकरी त्याचा लाभ उठवत आहेत..नव्या कायद्याने मुक्त बाजारपेठ आली की सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
हे वाक्य आहे जॉन ऍडम यांचं.
सांप्रतकाळी ऍडम जर जिवंत असता तर त्याने भारतीय लोकशाही बघून स्वतःस देहदंडाचे प्रायश्चित घेतले असते. कारण आपली लोकशाही ऐपत.
लोकशाहीचे पॅरोडी अकाउंट असते तर त्याचेही पॅरोडी अकाउंट म्हणजे आपली लोकशाही.
हल्ली एक बरंय.. रिअल आणि ओथेंटीक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नसल्याने सर्व काही सुखेनैव चाललं असल्याचं स्वप्न भारतीय जनमनात आहे. ते स्वप्न पडलं कारण भारतीय जन गुंगीत आहेत.. ती गुंगी आहे एकामागून एक येत असलेल्या आणि भारतीयांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेल्या प्रॉपगेंडा शृंखलेची.
भारतीय समाज हा असमाधानी आहे..त्यास आता कितीतरी दशके लोटली.. या असमाधानाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम गेले दशकभर अविरत सुरू झाले.. त्यातही काहीएक नियमितपणा ठेवला गेला.. आपण किती लायक आहोत हे दाखवण्यासाठी समोरचा किती नालायक आहे..हे दाखवणे भारतात क्रमप्राप्त असते.
"या देशाचे संविधानकर्ते इतिहासात कोणासमोर झुकले नाहीत, वर्तमानात आम्हीही उद्योगसम्राटांसमोर झुकू हे शक्य नाही." अमेरिकेत रिपब्लिकनचे सिसिलिन बोलत होते.
जगातल्या चार बड्या उद्योगपतींना अक्षरशः 'घेण्याचा' कार्यक्रम सुरू होता.
हे भांडवलशाही देशात होत होतं. #मानवाधिकार#थ्रेड#म
एरवी ते चार उद्योगमहारथी साधे शिंकले जरी तरी जागतिक बाजारास थंड ताप येईल. ते काही अघटित बोलले तर जागतिक बाजार अंथरून धरेल..एवढी ताकद त्या चौघांकडे.
पण त्यादिवशीच्या कार्यक्रमात ते स्वतःस कपाळकरंटे बनवून..कपाळावरील घाम टिपण्यात व्यस्त होते. तोंडात मूग होते ते निराळच..
ते चौघे.टिम कुक, सुंदर पिचाई,जेफ बेझोस आणि मार्क झुकेरबर्ग, त्यांचे उद्योग अनुक्रमे ऍपल, गुगल, अमेझॉन, फेसबुक.
या चारांनी आपल्या ताकदीचा वापर प्रतिस्पर्ध्याला संपवणे आणि स्वतःची मोनोपॉली तयार करण्यासाठी केला का? याची यथासांग चौकशी सुरू होती.अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या उपसमिती समोर.
'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' हा अहं एकदा का मनाने घेतला. की,माणसास काळ,वेळ आणि दशदिशा यांचे भान रहात नाही.
कृषी बिलावरून सुरू असलेले भाजप आणि त्याच्या धुरीणांचे(?)राजकारण हे त्या अहं चे सर्वोत्तम अवसानघातकी उदाहरण.
पक्ष म्हणून त्यांचे जे काही होईल ते होईल.पण काळ सोकावतोय. #थ्रेड#म
राजकारण आणि क्रिकेट पाठोपाठ आता कृषी क्षेत्रात ही लोकसंख्येएवढे तज्ञ तयार झालेत. त्यामुळे सध्याच्या कृषी बिलांचा यथेच्छ आर्थिक खिस पडला आहेच.. ही बिलं योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहेच.. त्याहून वादाचा मुद्दा आहे ती ज्या प्रकारे पारित केली गेली.
सध्याच्या सरकारने ती ज्या प्रकारे आणली.त्यास पारित म्हणणं चुकीचंच.ती बिलं भारतीयांवर लादली म्हणणं योग्य होईल. कारण या सरकारचा हुकूमशाहीचा कंड आणि तत्पर बहुमताचा माज.
एकुणातच या सरकारचा 2014 पासूनचा आलेख पाहिल्यास सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वर्तन अगदी गल्ली ते दिल्ली झालं.
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड#म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.