इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं (#इतिहास)
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आ। हे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
#म #मराठी
बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
१७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.
#म #मराठी
१७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची.
बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर 'गुलशनाबाद उर्फ ना' असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे #नाशिक.
चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता.
पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ #चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची.
सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली.
सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि
दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४०
नंतर व्हीकटोरीया राणीचे चित्र. १८३० साली #मुंबई त जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली.
तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर. #मुंबई च्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली.
आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणीपण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली.
पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली.
इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या.
पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या.
आणि रंगून, #कराची, #ढाका, #कलकत्ता, #लाहोर, #कानपुर, मद्रास, #दिल्ली, #पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. #नाशिक एकतर मुंबईच्या जवळ.
हवामानाच्या बाबतीत #नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान.
साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली #रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला #नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले. शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच #देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे.
त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि
व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि
१९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला. उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली. आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा
आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात.
Via : श्री उपाध्ये विश्वनाथ ( युवी )सर
#rbi @RBI

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with /मराठी, सुरक्षित रहा #महाराष्ट्र

/मराठी, सुरक्षित रहा #महाराष्ट्र Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @BeyondMarathi

22 Apr 20
जे #रामायण बघत आहेत त्यांनी बघितलं असेल की रावण जेव्हा सिंहासनावर बसलेला दाखवत असत तेव्हा त्याच्या पायाखाली एक माणूस हा असा पडलेला असायचा. हा माणूस कोण होता ? रावणाच्या पायाखाली सिंहासनाच्या समोर या अशा अवस्थेत शनिदेव असायचे.
रावणाने फक्त देवांना त्रास दिला नाही, त्याने नवग्रहांनाही आपल्या मुठीत ठेवलं होतं. त्यांना डांबून तो त्यांना लंकेला घेऊन गेला होता.

रावण ज्योतिषविद्येत पारंगत होता. जेव्हा मेघनादचा जन्म होणार होता तेव्हा रावणाने सगळ्या ग्रहांना अशा घरांमध्ये बसवलं की होणारा मुलगा अजय, अमर होईल.
पण शनिदेवांनी एक युक्ती केली, बरोबर मेघनादच्या जन्माच्या आधी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश केला. यामुळे झालं असं की, मेघनाद अजय आणि दीर्घायुषी होऊ शकला नाही. हे बघून रावण प्रचंड चिडला आणि त्याने शनीच्या पायावर गदा प्रहार केला. एवढं करूनही रावणाचा राग शांत झाला नाही.
Read 6 tweets
12 Apr 20
नमस्कार
आज आपल्या सगळ्यांबरोबर मुद्दाम एक प्रसंग शेअर करीत आहे की, जेणेकरुन कोरोनाच्या या भयावह संकट काळात आपण सकारात्मक मानसिकता ठेवून विचार केल्यास प्रशासनास काय सहकार्य करू शकतो हे सर्वांच्या लक्षात यावे .ही कसोटीची वेळ आहे. एकटे सरकार कदाचित याच्याशी लढू शकणार नाही.
जोपर्यंत प्रत्येक नागरिक आपापल्या परीने आपणहून मदत करणार नाही. आपल्याकडे असणाऱ्या बुद्धीचा व उपलब्ध साधनसामुग्रीचा या लढ्यात कशा प्रकारे वापर करता येईल हा विचार प्रत्येक नागरिक, तंत्रज्ञ, उद्योजक , कन्सल्टंट यांनी सतत केल्यास लवकर आपण या संकटातून सुखरूप बाहेर पडू.
काल सकाळी द हिंदू या वर्तमानपत्रातील तमिळनाडू येथील एक बातमी वाचनात आली या बातमीमध्ये covid-19 च्या संशयित रुग्णांचे घशाचे स्वॅप कलेक्ट करण्यासाठी एक किओस्क ( बंदिस्त काचेची केबिन ) बनवण्याची बातमी वाचली ,
Read 14 tweets
8 Aug 19
महत्वाचे

#KolhapurFlood
Hi all
पूरग्रस्तांसाठी काही टेक्निकल गोष्टीच्या अभावी मदत मिळत नाही किंवा एकाच ठिकाणी खूप मदत होत आहे. लोक पोस्ट वर पोस्ट टाकत आहेत. पण Requirements complete झाली की नाही हे समजत नाही.
त्यासाठीच आम्ही 4 friends मिळून 1 technical support घेऊन 1 sqaud तयार केला आहे. आम्ही फक्त कॉल सेंटरच काम करणार आहे. ज्यांना जी काय हेल्प हवी आहे त्यांनी खाली mention केलेल्या कोणत्याही एकाच नंबर la whatup करा. किवा ज्यांच्याकडे जे काय उपलब्ध आहे ते तुम्ही खालील नंबर वर पाठवा.
त्याप्रमाणे दोन्ही गोष्टीचा मेळ घालून ती गोष्ट आम्ही co-ordinate करू.
उदा. एकीकडे 200 लोकांच जेवण तयार आहे आणि एकीकडे 50 लोकांच जेवण हव आहे. तर ती Requirements आम्हाला तुम्हीच whatup द्वारे कळवा.
Read 6 tweets
26 Aug 18
#सत्यनारायण पूजा : काळाची गरज

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले ...
...तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले. काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. (त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात.
कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा,
Read 32 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!