लाल किल्ल्यावर जरी पटका फडकवायचा - शिवछत्रपतींचं हे स्वप्न त्यांच्या मराठ्यांनी पूर्ण केलं.
१० फेब्रुवरी २०२१- पानिपतच्या रणसंग्रामानंतर पुन्हा दिल्लीची सत्ता मराठ्यांनी काबीज केली, या महाप्रतापाला आज २५० वर्ष पूर्ण झाली.
१/१३
१६६६ मध्ये आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अस्मितेचे तेजस्वी दर्शन घडवून मोगल दरबारालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाला थक्क केलं होतं.
शिवछत्रपतींनी औरंगजेबासमोर पेटवलेली अस्मितेची ही मशाल त्यांच्या मराठ्यांनी अशीच प्रज्वलित ठेवली.
२/१३
१७३७ मध्ये थोरल्या राऊसाहेबांनी दिल्लीला धडक देऊन मराठ्यांच्या शक्तिचा परिचय संपूर्ण हिंदुस्तानाला दिला.
१७५४ मध्ये रघुनाथराव तथा दादासाहेब आणि मल्हाराव होळकर ह्यांनी दिल्ली काबीज केली.
मराठ्यांनी बादशाह अहमद शाह बहादूर ला कैद करुन दुसऱ्या आलमगीराला बादशाह बनवलं.
३/१३
इमाद-उल-मुल्क ह्याला वजीर बनवण्यात आलं.
मोगल बादशाहसह दिल्लीवर मराठ्यांचं नियंत्रण होतं.
१७५९ मध्ये इमाद-उल-मुल्क ने दुसऱ्या आलमगीर बादशाह ची हत्या केली आणि तीसऱ्या शाह जहान ला गादीवर बसवलं आणि सत्ता काबीज केली.
१७६० मध्ये भाऊसाहेबांनी ह्या दोघांना हाकलून लावलं.
४/१३
आणि दुसरा शाह आलम ह्याला मराठ्यांच्या नियंत्रणाखाली मोगल बादशाह घोषित केलं.
ह्याच दर्म्यान भाऊसाहेबांनी ‘दिल्लीचा तख्त फोडला’ - अर्थात तख्तावरचं छत फोडून त्याचे रुपे बनवून सरदरांना आणि फौजेला वाटले.
१७६१ मध्ये पानिपानंतर नजीब-उद-दौलाह ने दिल्लीवर सत्ता काबीज केली.
५/१३
पानिपत चा प्रतिशोध - मराठे उत्तरेवर चालून गेले
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्देतला परमोच्च बिंदु म्हणजे दिल्लीच्या तख्तावर दुसऱ्या शाह आलम ला पुन:स्थापित करणे आणि पानिपतात गमावलेला सगळा प्रदेश पुन:हस्तगत करणे.
६/१३
१७६३ मध्ये इंग्रजांनी बक्सर च्या लढाईत शाह आलम आणि अवधचा नवाब शुजा-उद-दौलाह ह्यांचा पराभव केला.
महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर ह्यांना इंग्रजांच्या वाढत्या प्राबल्याची कल्पना होती.
त्यांनी पेशव्यांना दुसऱ्या शाह आलम ला दिल्लीत पुन:स्थापित करण्यास सांगितले.
७/१३
थोरल्या माधवरावांनी १७६८ मध्ये महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले ह्यांना ५०,००० पेक्षा जास्तं फौज देऊन उत्तरेकडे रवाना केलं.
एप्रिल १७७० मध्ये गोवर्धन च्या लढाईत नवल सिंहाचा पराभव करुन मराठ्यांनी आग्रा आणि मथुरा काबीज केली.
८/१३
दिल्लीत बसलेला नजीब मराठ्यांच्या भितीपोटी सहकार्याची भाषा बोलू लागला.
यमुनेपलिकडचा मुलुख जो पनिपतापूर्वी मराठ्यांकडे होता तो पुन्हा मिळवून देण्यास नजीब ने तयारी दाखवली.
नजीब ने मराठ्यांना यमुना देखील पार करवली. पण नजीब चा कपटी स्वभाव आता मराठ्यांना चांगलाच ठाऊक होता.
९/१३
मराठे नजीबच्या सांगण्यावरुन रामघाटात थांबलेले. नजीब ने पूर्वपदावर येऊन फारुखाबादच्या अहमद शाह बंगश बरोबर हात मिळवणी केली.
हे कळताच थोरल्या माधवरावांनी तातडीने दुसरी मोठी फौज उत्तरेकडे रवाना केली.
ह्या वेळी काय मराठे नजीबच्या डावात फसले नाहीत.
१०/१३
३१ ओक्टोबर १७७० मध्ये नजीब मरण पावला. मराठ्यांनी त्याच्या मुलाला (झबेता खान) ह्याला कैद केलं.
फारुखाबाद वर स्वारी करुन धुमाकूळ घातला. ह्या धक्कयाने अहमद शाह बंगश पण मरण पावला.
ह्या मोहीमेत सर्व सरदारांनी स्वत:चे वयक्तिक हेतु व हेवे-दावे बाजूला ठेवले.
११/१३
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कठोर शिस्तप्रिय आखणीचे यश म्हणजे हे सगळे सरदार एक दिलाने लढले आणि विजयश्री मिळवली.
ह्याचा परिणाम असा झाला की उत्तरेत मराठ्यांची सत्ता पुन:प्रस्थापित झाली.
महादजी शिंदे ह्यांच्या रक्षणाखाली दुसऱ्या शाह आलम ला पुन: मोगल बादशाह घोषित केलं गेलं.
१२/१३
पानिपतात गमावलेला सगळा प्रांत मराठ्यांनी पुन:हस्तगत केला.
दिल्लीवर पुन्हा भगवा फडकला.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या इच्छेप्रमाणे महादजी शिंदे, विसाजी कृष्ण, रामचंद्र कानडे व मराठा फौजेचं स्वागत पुण्यात सोन्याच्या फुलांचा वर्षाव करुन करण्यात आलं.
१३/१३
संदर्भ:
1) New History of the Marathas by G.S Sardesai.
2) The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa by @MulaMutha.
3) A History of the Marathas by James Grant Duff.
4) Selections from the Peshwa Daftar 27 - Balajirao Peshwa and events in the north (Suppl) by G.S Sardesai.
ज्येष्ठ इतिहासकार मा.श्री. पांडुरंग बलकवडे ह्यांनी सकाळ वृत्तपत्रात लिहीलेला लेख - ‘मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला’
Lokmanya Tilak’s death in 1920 lead to the rise of Mohandas #Gandhi, Jawaharlal #Nehru, Sardar Patel, Netaji Bose, etc. within the Indian National #Congress.
Subhas Chandra Bose belonged from an influential and wealthy family in Calcutta.
2/18
He went to London in 1919 to fulfil the promise he made to his father to appear for the ICS examination.
He excelled in the ICS examination securing the 4th rank. But soon in 1921, he resigned from it and came back to #India as he did not want to work for the #British.
It was great to interact with a man whose work in combating #COVID19 in Pune is unparalleled. And this is a fact that people across all party lines will accept.
The Mayor reiterated PM Modi’s Mantra of precaution against this pandemic.
2/4
This meeting was mostly apolitical. It was an one-to-one interaction on social issues in Pune City.
The Hon’ble Mayor guided us on how social media can be used to bring a change in peoples’ lives. He also made sure to answer each and every query directed to him by us.
न्या. रानड्यांचा ‘The Rise of Maratha Power’ हा ग्रंथ कोण विसरेल?
इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवछत्रपती दरोडेखोर होते म्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं आवश्यक होतं.
1/9
ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजी महाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.
इ.स.१८९१ मध्ये न्या. रानडे यांनी इतिहास लेखनाची एक योजना आखली.
2/9
या योजनेप्रमाणे बा. प्र. मोडक यांनी बहामनीकाळ, कीर्तने यांनी शिवकाळ आणि का.ना. साने यांनी पेशवेकाळावर लिखाण करावे, न्या. तेलंगानी ते तपासावे असे ठरले होते.
परंतू काही कारणामुळे ही योजना पूर्ण झाली नाही.
3/9