‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून सगळ्यात मोठे उपकार केले आहे.
‘मनुस्मृती’सारख्या प्राचीन ग्रंथांत ज्यांना ‘शूद्र’ संबोधले आहे त्या ‘सेवा करणाऱ्या गावकुसाच्या आत रहाणाऱ्या
[1/n] #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain @MarathiRT
जाती म्हणजे ओबीसी’, असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यामुळे साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, धोबी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, सुतार, लोहार, तांबट अशा सेवाकर्मी शूद्र जाती ओबीसी ठरतात. संविधानाच्या मते,
महाराष्ट्रात वा इतर काही राज्यांत
ज्यांना भटके विमुक्त समजले जाते ते देश पातळीवर ओबीसीच आहेत.या सर्व शूद्र ओबीसींसाठी भारतीय संविधानात कलम३४० आहे.डॉ.आंबेडकरनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यामागे हिंदू कोड बिलासह याच कलम ३४०अन्वये ओबीसी समाजासाठी मागासवर्गीय आयोग न नेमण्याचेही एक प्रमुख कारण होते.
[3]
इंग्रजांच्या काळात जंगलावर आधारित आपले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय जीवन जगणाऱ्या आदीवासींच्या हक्कांना नाकारले गेले होते. देश स्वतंत्र झाल्यावर आदीवासींच्या या परंपरागत हक्कांना पुर्ववत बहाल करत जंगलांचे संरक्षण, #ThanksDrAmbedkar
[4]
संवर्धन व नियमन केले जाईल अशी खरे तर अपेक्षा होती. मात्र स्वतंत्र भारताच्या मायबाप सरकारने इंग्रजांनी स्थापन केलेल्या वनखात्याला जसेच्या तसे स्विकारत आदीवासींच्या हक्कांना पुन्हा डावलले.
परंतु भारतीय राज्यघटनेतील तरतुदींमुळे ही लढाई विधायक #ThanksDrAmbedkar
[5]
व सनदशीर मार्गाने लढण्यासाठीचा मार्गही मोकळा झाला हेही तेवढेच खरे आहे.
भारतीय राज्यघटनेत आदीवासी समुहासाठी अनेक महत्वपूर्ण तरतुदी केल्या गेल्या आहेत. घटनेत आदीवासी हा शब्द 'शेड्यूल्ड ट्राईबज' (अनुसूचित जनजाती) या नावाने समाविष्ट करून त्याची व्याख्या दिलीय
आदीवासी समुहांना राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी देशाच्या व राज्याच्या विधी मंडळामध्ये विशेष आरक्षण दिले गेले आहे. त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार यांना प्रतिबंध करण्यात आला असून त्यासाठी विशेष कायदा केला गेला आहे. #ThanksDrAmbedkar
[7]
'राष्ट्रीय शेड्यूल्ड ट्राईबज' आदीवासींच्या विकासासाठी त्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंबंधी अहवाल सादर करून शासनास व प्रशासनाला योग्य शिफारशी करण्याचा अधिकार या आयोगास आहे व हा आयोग स्वायत्त आहे. #ThanksDrAmbedkar
[8]
सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे घटनेच्या 5व्या व 6व्या अनुसूचीद्वारे आदीवासी समुहाच्या स्वतंत्र चालीरीती, त्यांची संस्कृती, परंपरा यांचे जतन करत त्यांना त्यांच्या विकासासाठीचे स्वायत्त अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. #ThanksDrAmbedkar
[9]
आदीवासी हक्काबाबत जो वनकायदा सन 2006 आणि पेसा कायदा सरकारने लागु केला त्याचे महत्त्व घटनेच्या महत्त्वपूर्ण तरतुदींच्या पार्श्वभूमीवर म्हणूनच मोलाचे आहे.
केंद्र शासनाच्या वनकायद्यामुळे आता 2005 पर्यंत आदीवासींच्या ताब्यात असलेल्या
शेतजमिनी, त्यांची गावठाणे, त्यांची वहीवाटीची साधने, जे वनखात्याने अद्याप मान्य केले नव्हते त्यावर आता कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. याशिवाय त्यांची सामुहिक जीवन पद्धती लक्षात घेता गावाच्या परिसरात असलेले जंगल, पाणवठे व खनिजे यांच्या
संरक्षणाचे, संवर्धनाचे व समुचित वापराचे सामुहिक हक्क देखील त्या गावसमुहांना बहाल केले आहे. पेसा कायद्यामुळे आपली संस्कृती, परंपरा आणि रितीरिवाजांचे संरक्षण करत आपला विकास साध्य करण्यासाठी स्वयंशासनाचा अधिकारही आदिवासी समुहांना प्राप्त झाला आहे #ThanksDrAmbedkar
[n/n]
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
📌➏ डॉ.बा.आंबेडकर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी......
‘न शूद्राय यतिविद्ध्यात’ (शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही) या मनुस्मृतीच्या कायद्याला धिक्कारून, बाबासाहेबांनी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, चळवळीच्या बलबुत्यावर निर्माण केली.
भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे. #ThanksDrAmbedkar
[2]
बाबासाहेब हे स्वत: उच्च विद्या विभूषित होते. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महत्वाचा संदेश दिला. भारतातील बहुजन वर्ग अज्ञानात व गुलामगिरित जगत होता. शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो . #ThanksDrAmbedkar
[3]
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”
एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच #ThanksDrAmbedkar
[3]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले 1/n #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain #थ्रेड#Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन विकासाचा पाया रचला. म्हणूनच डॉ.आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.
या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’ 3/n #ThanksDrAmbedkar
25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇
घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. 3/n #ThanksDrAmbedkar
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n