#Thread
#हनुमान
बुद्धीतील जांबुवंताच्या उपदेशाची गरज..!!!
रावणाने सीतेचे हरण केले.राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधार्थ फिरत असता महारुद्र हनुमानाची भेट झाली.पुढे सुग्रीवाची भेट झाली आणि सगळी वानरसेना सीतेला शोधायला निघाली.अंगद,जांबुवंत,नल,नील
१/
अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
२/
समुद्र ओलांडून लंकेत जावे लागणार. मग सगळ्यात चर्चा चालू झाली की कोण एवढा समर्थ आहे की समुद्र ओलांडून जाऊन सीतेस रामांचा संदेश पोचवू शकेल. ही चर्चा चालू असताना हनुमंतराय मात्र एका बाजूला शांत उभे होते. त्यांच्यात हाच समुद्र काय पण सप्तसमुद्र एकावेळी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य
३/
होत, पण पूर्वीच्या शापामुळे त्यांना त्या सामर्थ्याची जाणीव होत नव्हती. इकडे अंगद,नल,नील,जांबुवंत चर्चा करीत असता आपण हे कार्य करण्यास असमर्थ आहोत असे वाटून खिन्न झाले होते. आपण आता श्रीरामांना कसे सामोरे जायचे हे विचार करत होते. तेवढ्यात जांबुवंत महाराजांना लक्षात आले
४/
की मारुतीमध्ये हा समुद्र ओलांडून जाण्याची क्षमता आहे पण त्याला त्या शक्तीचा विसर पडला आहे त्यामुळे जांबुवंत म्हणाले,
हनूमन्किं रहस्तूष्णीं स्थीयते कार्यगौरवे।
प्राप्तेऽज्ञेनेव सामर्थ्यं दर्षयाद्य महाबल।।
त्वं साक्षाद्वायुतनयो वायुतुल्यपराक्रमः।
५/
हो समुद्र उल्लंघन करायला."आणि पुढील सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहे. तर ही हनुमंताची वृत्ती आहे की, ज्यावेळी खरचं गरज असते त्यावेळी आपल्या सामर्थ्याचा विसर पडणे.ही वृत्ती केवळ हनुमंतरायात नाही तर आपल्या प्रत्येकात थोड्या फार प्रमाणात ती असते.आजची सद्य परिस्थिती ही तशीच झाली
७/
आहे.
आपल्या हिंदूंमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे पण या सर्व मानसिक आणि शारीरिक आक्रमणामुळे त्याचा विसर आपल्याला पडला आहे. त्याला जागा करणारा जांबुवंत हा आपल्या विचारातून निर्माण व्हायला हवा. आज बंगालमध्ये जो काय आंतक आपण पाहत आहोत. तो या आपल्यातील हनुमंतरायाच्या वृत्तीमुळेच आहे.
८/
आज आपल्या राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड सामर्थ्य आहे. नव्हे नव्हे ते सामर्थ्य म्हणूनच आपण त्यांना त्या पदावर पदस्थ केले आहे.
जोपर्यंत जांबुवंत विचारांतून प्रकट होत नाही तोपर्यंत हनुमंतरायांना सर्व इतर लोक तुच्छचं समजणार आणि तोपर्यंत हा संकटांचा समुद्र ओलांडून धर्माचा संदेश
९/
आपण सर्वांप्रत पोहचवू नाही शकणार..!! विचारांतील जांबुवंत जागृत करा जो तुमच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देईल...! तुमच्यात प्रचंड शक्तीचा संग्रह आहे...!! ही सगळी अधर्माची लंका जाळून धर्माचं रामराज्य आणण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे..!!
धन्यवाद..!!
"अरे हनुमंता तू असा का शांत बसला आहेस ? तू साक्षात वायूचा पुत्र आहेस आणि त्यासारखाच तुझा पराक्रम आहे. उठ.! आज तू आपले सामर्थ्य दाखव. अरे महात्म्या तुझा जन्म केवळ आणि केवळ श्रीरामांचे कार्य करण्यासाठीच झाला आहे त्यामुळे उठ आणि
६ क्रमांकाचे ट्विट हे आहे..!!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

29 Apr
#Thread
#KnowYourDharma
#Hindu
Sanatan Hindu Dharma- Real pursuit of happiness...!!!!
These days we hear lot of people saying that we should protect our Hindu Dharma, we should protect our traditions, we should protect scriptures and many more..!
Here question
1/
arises what knowledge do we have about our Dharma,our traditions and our scriptures?In my view if we want to protect our Dharma then we should have basic knowledge about our Dharma,traditions etc. Because if we become knowledgeable about above things then and then only we will
2/
be having real respect about our Dharma. In this series of threads I will try to explain the basics of Hindu Dharma,our traditions,our scriptures etc. according to best of my knowledge. If readers find anything wrong in my writings then feel free to correct me.Before we begin
3/
Read 13 tweets
21 Apr
#Thread
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र - सांप्रत तरुणांसाठी आदर्शद्योतक:-
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
चैत्र शुद्ध नवमीची मध्यान्हाची वेळ होती.अयोध्येत अतीव आनंदाच वातावरण होत.कारण साक्षात जगद्धर्ता महाविष्णूंचं अवतरण अयोध्येत झालं होत.
१/
संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
२/
आजच्या युवकांना कशाप्रकारे आदर्श ठरू शकतं. यात सर्वात सुरुवातीचा मुद्दा येतो की श्रीराम का आदर्श म्हणून बघायचे? तर आदर्श पुत्र,आदर्श पती, आदर्श बंधू,आदर्श राजा,आदर्श मित्र आणि आदर्श पुरुष ह्या सर्वांच ऐक्याने प्राकट्य कुठे होत असेल तर ते श्रीरामांच्या अवतारात आपल्याला होते.
३/
Read 27 tweets
19 Apr
#Thread
आपल्यातले खरे #हिंदू ओळखा...!!
हे असं मी का म्हणत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर मी ह्या थ्रेड मध्ये देत आहे. मागे काही दिवसांपूर्वी सर्वश्रुत असलेले सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडिओ ट्विटर आणि
१/
इतर माध्यमांवर व्हायरल झाला.आपणही तो पाहिला असेल.ज्यात सद्गुरू कृष्ण आणि यशोदेच्या संबंधावर बोलताना दिसतात आणि त्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं.ह्याविषयी जर पाहायला गेलं तर एक तर तो व्हिडिओ छाटून नेमका त्यातील वादग्रस्त भाग घेऊन बनवला आहे.
२/
ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की हा व्हिडिओ केवळ आणि केवळ सद्गुरूंची बदनामी करण्यासाठी बनवला आहे.मग प्रश्न येतो की सद्गुरूंची बदनामी हे लोक का करत आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरू सध्या हिंदू मंदिरे सरकारी
३/
Read 13 tweets
18 Apr
नामस्मरणाचे महत्व :-
आपल्या हिंदू धर्मात नामस्मरणाचे प्रचंड महत्व सांगितले आहे. केवळ भक्तिभावाने केलेल्या नामस्मरणाने अनेक लोकांचं कल्याण झालं, अनेकांची दुर्गम संकटे दूर झाली. आपल्याकडे याची खूप उदाहरणे पाहायला भेटतात. त्यात परत कली युगात नामस्मरण हे अत्यंत+ Image
उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+
वैश्विक महामारीचा प्रकोप आपण पाहतच आहोत. सगळीकडे अत्यंत उदासीन वातावरण झालं आहे. त्यामुळे साहजिकच आपले मन ही उदासीन व निराश होऊन जाते. तर यासाठी आपण सगळ्यांनी यथाशक्ती जर देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच सकारात्मक वातावरणाची अनुभूती आपल्याला नक्की येईल. त्यासाठी फार काही+
Read 7 tweets
15 Apr
-:हिंदू परिसंस्थेची (Ecosystem) आवश्यकता:-
तारीख होती १७ एप्रिल २०२०, त्यादिवशी मी सकाळी उठलो व सवयीप्रमाणे ट्विटर चाळत बसलो असता,दोन ट्रेंड्स ने माझं लक्ष वेधले एक म्हणजे पालघर आणि दुसरा म्हणजे साधू लीचींग.त्या ट्रेण्ड मधले ट्विट बघता बघता तो भयानक
१/
व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं, सगळ्या अंगावर शहारे आले आणि तळपायाची आग मस्तकात गेली.!तुम्हाला वेगळं सांगायला नको की तो व्हिडिओ पालघरमध्ये हत्या झालेल्या साधूंचा होता. किती भयानक आणि हृदयद्रावक होता तो व्हिडिओ.! २ अत्यंत दीन आणि करुण मुखाने इकडे तिकडे
२/
मदतीची याचना करणारे ते साधू आणि त्यांच्यावर अत्यंत क्रूर व त्वेषाने हल्ला करणारे ते नरराक्षस.! होय नरराक्षसच ते त्यांना मानव म्हणणे म्हणजे मानव जातीचा अपमान आहे. त्यात अजून एक धक्का देणारी गोष्ट कुठली होती तर ती ही की त्यातील एक साधू ज्यावेळी याचकभावाने तेथील पोलीसाकडे गेले
३/
Read 23 tweets
11 Apr
#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
Read 31 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!