भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.
आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
शाहू महाराज खरंच प्रतिभावंत आणि दुरचा विचार करणारे महामानव होते. म्हणूनच की काय, डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांना आपल्या सामाजिक कार्याचा वारसदार म्हणून सर्वांसमोर त्यांनी आणलं आणि त्यांना शिक्षणाने संपन्न केलं.
(४/११)
शेतकरी मजूर यांमध्ये राहून कांदा भाकरी खाण्यातही शाहूंनी केव्हा कमीपणाचं मानलं नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतील कामगार मेळाव्यात महाराज म्हणतात, "मी कोल्हापुरच्या राजपदावर असाताही शिपाई, शेतकरी किंवा मजूर म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो.
(५/११)
माझी जनक आई, दत्तक आई, दत्तक वडील असे शेतकरी वर्गातीलच होते. हलक्या दर्जाच्या अशिक्षित लोकांशी सहवास ठेवणे बरोबर नाही, अशी पुष्कळांची समजूत आहे. मलाही तसाच उपदेश होत असे; परंतु ज्या शेतकरी व मजूर वर्गात माझे कूळ वाढले, त्यांच्याविषयी प्रेम व अगत्य हे जन्मसिद्ध असल्याने
(६/११)
अशा शिकवणींचा माझ्यावर परिणाम होणार नाही. कारण माझ्या हाडीमासी शिपाईगीरी, शेतकरी यांचे रक्त खेळत आहे. म्हणून मला आपल्यात मिसळण्यास आनंद वाटतो. एका थोर इंग्रज साधु पुरुषाने म्हंटलं आहे की, राजवाड्यापेक्षा गरिबांच्या झोपडीत सद्गुण जास्त सापडतात. माझाही अनुभव तसाच आहे.
(७/११)
इमानीपणा, बंधुप्रेम, देशप्रीती, राजनिष्ठा, मत्सराचा अभाव असे अनेक सद्गुण मला आपल्या ठायी दिसतात. म्हणून आपल्याविषयी माझ्या मनात फार पुज्यबुद्धी आहे. आपणही मला आपल्यापैकीच एक समजावे असे आपणांकडे माझे मागणे आहे."
(८/११)
शाहू महारांजांची ही वाक्य काही सर्वसामान्य गोष्ट नव्हतीच नव्हती. तर ती आत्मस्तुती नसून वस्तुस्थितीच होती. त्यांच्या महान कार्यातून ते दिसून येते.
शाहुंचे सामाजिक कार्याचे वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व कारणांमुळेच
(९/११)
राजर्षींना "भारतीय सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ" म्हणून गौरव करतात. आजची नवी पिढी शाहुंना विसरत चाललीय ही शोकांतिका आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं कार्य अध्ययन, आमलात आणूनच त्यांना खरी श्रद्धांजली वाहता येईल.
(१०/११)
असे लोकराजा आणि दलित बहुजनांचे कैवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!! 🙏🏻💐
लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.
परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻 #म#रिम#मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.
तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!
दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.
त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.
दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला.
कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
खेडपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत पण पण तिथं पण लोक हौशीने सण साजरे करतात. एवढच काय सुफी संतांचे दर्गे आहेत लोकं तिथे देखील लोक श्रद्धेने भेट देतात.
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता#मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻