#जागतिक_हास्य_दिन

लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्‍याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻

#म #मराठी Image
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻 Image
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.

परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻 Image
होतेई यांच्या शरीराकडे जर पाहीलं तर ते खूप प्रेमळ, हसतमुख व जाडजूड लठ्ठ पोटाचे होते. भगवं वस्त्र धारण करून व खांद्यावर भिक्षा झोळी घेऊन ते हिंडत असत. होतेई यांनी चीन आणि जपान मध्ये खूप यात्रा केली आहे. लहान मुलांमध्ये होतेई खूप प्रसिद्ध होते आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. ४👇🏻
ते आपल्या झोळीतून खाण्याचे गोडाद्य पदार्थ आणि खेळणी घेऊन येत असत आणि जे काही झोळीत असेल ते मुलांमध्ये वाटत असत. मुलांना हास्यकथा आणि विनोद सांगत ते त्यांच्यात रमत असत. इतकंच नव्हे तर प्रौढ आणि वयस्कर लोकांमध्ये जाऊन देखील ते मज्जा मस्करी करत असत. ५👇🏻 Image
त्यांच्या येण्याने सगळीकडे वेगळं चैतन्य निर्माण व्हायचं त्यामुळे चीन मध्ये त्यांना देवतेसम पुजलं जातं. झेन बौद्ध पंथाचा प्रसार करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ६👇🏻
आता तुम्ही म्हणाल, झेन म्हणजे नक्की काय? याचं उत्तर होतेई यांनीच दिलं आहे. होतेई अनेक झेन साधकांकडून काही पैशाची भिक्षा मागत आणि त्यातून खाण्याचे पदार्थ व खेळणी विकत घेत. झेन साधकांना होतेई एक आत्मज्ञानी पुरूष आहे हे ठाऊक होतं. त्यामुळे ते देखील त्यांना निसंकोच दान देत असत.
७👇🏻 Image
एके दिवशी होतेई यांनी एका झेन भिक्षूकडे पैसे मागितले आणि त्या भिक्षुकाने दिले ही परंतू त्याने होतेई यांना एक प्रश्न केला. साधकाने विचारलं 'झेन' चा अर्थ काय तर होतेई यांनी आपली भरलेली झोळी खांद्यावरून खाली उतरवून उघडी केली आणि मौन राहीले. ८👇🏻 Image
साधकांने परत विचारलं "झेन" चा यथार्थ काय? होतेई यांनी काहीही न बोलता झोळी उचलली आणि खांद्याला लावून आपल्या मार्गास लागले. होतेई यांना तात्पर्य सांगायचं होतं ते म्हणजे, आपल्या आयुष्यात जे काही चांगले-वाईट अनुभव किंवा ज्ञान आहे त्याची साठवणूक करणे, हा अर्थ आहे 'झेन' या शब्दाचा. ९👇🏻
यथार्थ म्हणाल तर आपल्याकडे जे ज्ञान आहे ते निःस्वार्थपणे जगाला वाटणे!!

खरंच होतेई एक आत्मज्ञानी योगीच होते. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी लोकांच्या जीवनात सखाचे रंग भरण्यात घालवलं. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी जपान मध्ये घालवले व तेथेच आपली जीवनज्योत विझवली. १०👇🏻 Image
होतेई म्हणजेच बुद्धई यांना आपल्या मृत्युचं ज्ञान अगोदरच झालं होतं. त्यांनी जपानमधील आपल्या सहासात असणार्‍या लोकांकडे इच्छा प्रकट केली होती की, मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं दाहसंस्कार केलं जावं. त्यावर जपान मधील लोक धर्मसंकटात पडले, ११👇🏻
कारण तिथे मृतांचं दाहसंस्कार करण्याची प्रथा नव्हती. परंतू होतेई यांच्या इच्छेनुसार लोकांनी होतेई यांना निर्वाण झाल्यानंतर चितेवर ठेवलं. अग्नी दिल्यांनतर चिंतेतून अचानक फटाक्यांचे आवाज येऊ लागले. हे पाहून मयताला आलेली लोकं देखील हसु लागली. १२👇🏻 Image
होतेई यांनी मरणाअगोदरच आपल्या वस्त्रांमध्ये फटाके लपवून ठेवले होते. मेल्यानंतरही हा योगी लोकांना हसवून गेला. म्हणूनच होतेई यांची प्रतिमा विश्वभरात लाफिंग बुद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. आजही जपान आणि चीन मध्ये यांना पुजलं जातं.
तर हे होते होतेई आणि त्यांचं जीवनकार्य!
१३👇🏻 Image
जागतिक हास्य दिनानिमित्तानं त्यांची एक आठवण.

सर्वांना जागतिक हास्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 😁

होतेई यांनी सांगितल्याप्रमाणे, "हसत रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही हसवत रहा!!"
१४🙏🏻

-- शुभांगी ✍️

छायाचित्रे साभार - गुगल

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with शुभांगी - मी मराठी ❤️

शुभांगी - मी मराठी ❤️ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShubhangiUmaria

6 May
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)

#म #मराठी #रिम Image
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.

आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
Read 11 tweets
26 Feb
मानवतेचा कलंक - लैंगिक हिंसाचार :-
जुनको फुरुटा (Junko Furuta) सोबत घडलेली काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.

विश्वभरात अपराध हे दररोज घडत असतात. पण जर लैंगिक हिंसाचाराबाबत बोलायचं झालंच, तर या संदर्भात भयंकर अपराध घडल्याची साक्ष इतिहास देतो. +👇🏻
हृदयाला चरे पडतील अशीच एक घटना आधुनिक फॉरेंसिक जपान मध्ये १९८८ साली "जुनको फुरुटा" या अवघ्या १६ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत घडली.

जपान मध्ये अपराध्यांसाठी कडक कायदेकानुन तर आहेत, पण असे बरेच अपराध पोलिसांच्या अथवा कायद्याचा दृष्टीस पडत नाहीत. +👇🏻
जपान मध्ये घडलेल्या अश्याच एक सामुहिक बलात्कार किंवा लैंगिक हिंसाचाराबाबत लिहीतानाच डोकं ठणठणतंय.

२५ नोव्हेंबर १८८८ साली सुरु झालेली हि घटना आहे. जपान मधील सायतामा (Saitama) प्रांतातील मिसाटो (Misato) शहरात जुनको फुरुटा या शाळकरी मुलीसमोर +👇🏻
Read 28 tweets
25 Feb
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻
#म #रिम #मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्‍यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्‍याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.
Read 4 tweets
6 Feb
मुलाकरम्

तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!

दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्‍या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.

त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.
Read 23 tweets
21 Dec 20
कोकणात कधीच जातीवादी मनसुबे तग धरू शकणार नाहीत...

दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला.
कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
खेडपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत पण पण तिथं पण लोक हौशीने सण साजरे करतात. एवढच काय सुफी संतांचे दर्गे आहेत लोकं तिथे देखील लोक श्रद्धेने भेट देतात.
Read 9 tweets
19 Nov 20
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता #मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻

#म #मराठी
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्‍या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्‍या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(