आपल्या भारतात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत बोललं जात नाही, किंबहुना लोक या गोष्टीला नगण्य समजतात. आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाच्या घटना फार घडत नाहीत असा पांचट गैरसमज लोकं करून बसतात. (१/३३)
इंटरनेटचा वापर जितका चांगल्या कामांसाठी होतो त्याहूनही जास्त वाईट कामांसाठी होतो. आधी संगणक आणि आता मोबाईल यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण यांसारख्या घटना समाज माध्यमांद्वारे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलांचा वापर अश्लील दृश्यांसाठी करणं, (२/३३)
लहान मुलांना कामोत्तेजक गोष्टींसाठी प्रवृत्त करणं, बालवेश्या किंवा परदेशातील लोकांच्या वासना शमवण्यासाठी बालकांची विक्री अथवा तस्करी करणे हे प्रकार इतर देशांप्रमाणे भारताच्याही डोक्यावर दगडाप्रमाणे बसून आहेत. अलिकडे हे गुन्हे खूप वाढत चालले आहेत, असंच दिसून येतं. (३/३३)
बहुदा बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये गुन्हेगाराने बालकांचा विश्वास संपादन केलेला असतो. बाल लैंगिक शोषण गुन्ह्यांमध्ये बहुतेक वेळा गुन्हेगार हा परिचयाचा अथवा नातसंबंधातील देखील असू शकतो. (४/३३)
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालानुसार ८० ते ९० टक्के तक्रारींमध्ये गुन्हेगार बालकांना ज्ञात असतो. पण इतरही अनेक घटना आहेत जिथे अपराधी अनोळखी, अज्ञात असतात. जागतिक पातळीवर UN Woman च्या अहवालानुसार मार्च २०२१ पर्यंतचं १५-४९ वयोगटातील लैंगिक शोषण होणार्या (५/३३)
महिलांची संख्या ७३.६ कोटी इतकी आहे. बालविवाहांमध्ये २०२० साली ७८.३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे त्याचसोबत टाळेबंदीच्या पहिल्याच आठवड्यात "चाईल्डलाईन" ला बालहिंसेपासून संरक्षणासाठी ९२ हजार फोन कॉल्स आले. भारतीय सर्वेक्षणानुसार बाल कामगारांची प्रथा अद्यापही फुलत आहे. (६/३३)
उद्योग सर्वेक्षणानुसार; ५ ते १४ वर्षे वयोगटातील ८० लाखांपेक्षा अधिक मुलं शेतात, धोकादायक कारखाने, दुकाने आणि घरे इत्यादी ठिकाणी काम करतात. (७/३३)
लहान मुलांची अश्लिल छायाचित्रे व चित्रफीती तयार करून आंतरराष्ट्रीय तस्करी करण्यासाठी सध्या समाजमाध्यमं आणि इंटरनेट वरील विविध वेबसाईट्सचा उपयोग केला जातोय. गरीब लोकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या लहान मुलांचा गैरवापर केला जातो. काही वेळा पालकही या गोष्टीत सामील असतात. (८/३३)
असे अनेक अपराध बर्याच देशांत या काही वर्षांत जबरदस्त वाढले आहेत. १८ वर्षाखालील कोणतंही मुल हे बालकंच समजलं जातं, मग ते पुरुष लिंगी असो अथवा स्त्री लिंगी. यांच्यावर होणार्या लैंगिक हिंसाचाराबाबत समान कायदा व गुन्हा दाखल होतो. (९/३३)
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, दरवर्षी ४०,००० मुलांना पळवून नेलं जातं. लैंगिक व्यापाराचा एक भाग म्हणून शेजारील राष्ट्रांकडून वर्षाकाठी १२,००० ते ५०,००० महिला आणि मुलं देशात तस्करी करून आणली जातात, असा एनजीओचा अंदाज आहे. (१०/३३)
गेल्या एप्रिल महिन्यात UN Woman च्या अहवालानुसार १.३० कोटी मुलांचा बालविवाह केला जातोय आणि महामारीच्या काळात ५०,००,००० लहानग्यांचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला. 'इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड' म्हणजेच आयसीपीएफने केलेल्या पाहणीत चाईल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड आणि (११/३३)
टीन सेक्स व्हिडिओ यासारख्या शब्दांच्या सर्चमध्ये वाढ झाली आहे. गुगलवर टाळेबंदीच्या काळात या शब्दांचं सर्च १०० टक्के इतकं आहे. आॅनलाईन गेमिंग आणि मोबाईल इंटरनेटमुळे बाल लैंगिक हिंसाचार फार मोठ्या प्रमाणात घडतो. गुन्हेगार केव्हाही पिडीताला संपर्क साधून त्रास देऊ शकतात (१२/३३)
व आॅनलाईन अश्लिल चाळे करण्यास देखील प्रवृत्त करतात. सध्या एक नवीन गोष्ट समोर येते ती, बाल लैंगिक पर्यटन! हो! अनेक गुन्हेगार आपली वासना शमविण्यासाठी एका देशातून/राज्यातून/जिल्ह्यातून इतर ठिकाणी प्रवास करतात व तस्करी करून आणलेल्या बालकांची बोली लावतात. (१३/३३)
हे सर्व प्रकार इतक्या गुप्तपणे घडतात की पोलिस यंत्रणेला देखील याचा ठावठिकाणा सापडत नाही. (१४/३३)
बाल लैंगिक शोषणाची कारणं -
१) लैंगिकतेबाबतच्या अत्याचारांबाबत चर्चा टाळणं. - या विषयावर चर्चा करण्यास प्रौढ खूप लाजिरवाणी गोष्ट समजतात. सांस्कृतिक लाजाळूपणा मुळे बहुदा या विषयावर चर्चा होत नाही आणि त्यामुळे मुलं देखील याबाबत मोकळेपणानं व्यक्त होत नाहीत. (१५/३३)
लैंगिक शोषण झाल्यानंतर बऱ्याचदा याच कारणांमुळे ती मुलं मौन बाळगतात.
२) लिंग आधारीत हिंसेबद्दल असंवेदनशीलपणा - हा मुद्दा अगदी बरोबर ठरतो, कारण मागे मी लिहीलेल्या स्त्रियां आणि लैंगिक हिंसाचाराबाबतच्या विषयावर लोकांनी दिलेली विचित्र उत्तरं किंवा (१६/३३)
बऱ्याचदा लोकांनी त्या विषयावर बोलण्यास केलेली टाळाटाळ त्याच सोबत आम्हाला हे विषय वाचायलाही जमत नाही, अशी कारणं लोकांकडून मिळाली! त्याचसोबत पोर्नोग्राफीची तथाकथित नसलेली चांगली बाजू सांगणे, असे प्रकार पहायला मिळाले. स्त्रिया आणि बालकांवर होणार्या (१७/३३)
अत्याचारांना नगण्य माणणे हे समाजात सर्रासपणे दिसतं. लोकप्रिय माध्यमांमधील स्त्रियांचं प्रतिनिधित्व अथवा लोकप्रिय चित्रपटांमध्ये दाखवले जाणारी रानटी लैंगिकता यांमुळे देखील लोकांत असंवेदनशीलता निर्माण होते. (१८/३३)
सध्या नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन सारखे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म स्त्रिया आणि बालकांवर होणार्या लैंगिक हिंसाचाराबाबत लोकांमध्ये असंवेदनशीलपणा निर्माण करू शकतात. कारण या माध्यमांतून सॉफ्ट पोर्नोग्राफी आणि स्त्रीवाचक शिवीगाळ खूप होते. (१९/३३)
३) बालकांपेक्षा मोठ्यांना महत्व व त्यांच्यावर विश्वास ठेवणारी संस्कृती - बालकांना विकसित नागरिक समजलं जात नाही, त्यामुळे बहुदा त्यांच्यावर होणार्या अत्याचारांना टाळलं जातं. सार्वजनिक संवादांमध्ये बालकांना स्थान नसतं. (२०/३३)
बालकांनी कोणताही मतभेद न करता मोठ्यांच्या बोलण्याचा आदर करावा, अश्या गोष्टींमुळे बालक आपल्या वरील झालेल्या अत्याचाराविषयी मौन बाळगतो. (२१/३३)
२०१२ मध्ये बालकांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी "पोक्सो" कायदा अस्तित्वात आला. पोक्सो म्हणजे "प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल आॅफेन्स". २०१९ मध्ये राज्यसभेतील १४ खासदारांच्या गटाने या विषयावर गंभीरपणे दखल घेत अनेक बदल सुचवले व केले आहेत. (२२/३३)
तसेच सोशल मीडिया व ॲप्ससाठी आचारसंहिता तयार करून त्या माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार होत आहे का? यावर लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. ‘नेटफ्लिक्स’ व ‘फेसबुक’ वर प्रौढांसाठी वेगळी वर्गवारी जरुरीची आहे. हा विभाग लहान मुले पाहू शकणार नाही, अशी व्यवस्था गरजेची आहे. (२३/३३)
हे बदल अमलात आणण्यासाठी सर्व देशांमध्ये सहमती निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह राज्यसभा समितीने धरला आहे. पोक्सो कायद्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सादर केलेली पुस्तिका खाली दिलेल्या लिंक मध्ये तुम्ही पाहू शकता. (२४/३३) mscw.org.in/marathi/public…
बाल लैंगिक शोषणाबाबत पीडित मुलांमध्ये मुलींचं प्रमाण १४ टक्के तर मुलांचं ४ टक्के इतकंच आहे. आॅस्ट्रेलियातील रॉयल कमिशनने असं म्हटलं आहे की, स्त्रिया २० व्या वर्षी तर पुरुष २५ व्या वर्षी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात बोलतात. (२५/३३)
वयात येण्याअगोदर दहापैकी एका मुलावर तरी लैंगिक हिंसाचार होतो. यात सात मुलींपैकी १ मुलगी बालपणीच लैंगिक शोषणाची शिकार झालेली असते, तर २५ पैकी एक मुलगा लैंगिक हिंसाचाराचा शिकार झालेला असतो. जगभरात २ कोटी १० लाख जणांची तस्करी केली जाते. (२६/३३)
त्यापैकी १ कोटी ६० लाख हे कामगार वर्गातील आहेत, तर ३० लाखजण हे १८ वर्षांखालील वयोगटातील आहेत. वासना शमविण्यासाठी जवळपास ५० लाख जणांची तस्करी केली जाते. यामध्ये महिलांचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यापैकी ७० टक्के महिला या आशियामधील आहेत. (२७/३३)
युरोप आणि मध्य आशियातील १४ टक्के, आफ्रिका ८ टक्के, अमेरिका ४ टक्के तर अरब राष्ट्रांमधील १ टक्के प्रमाण आहे. १८ वर्षांखालील मुलींची संख्या लाखाच्या घरात आहे. अमेरिकेत दरवर्षी ८ लाख मुलं गायब होतात, तर जगभरात दरसाल १ कोटी ९० लाख मुलं गायब होतात. (२८/३३)
१८ वर्षाखालील मुलींची संख्या यात खूप असते. अनेक देशांमध्ये मुलींना सेक्स वर्कर्स म्हणून राबवलं जातं. बर्याच मुलींना चांगलं काम, घर, किंवा इतर आर्थिक मदतीचं आमिष दाखवून फसवून गायब केलं जातं. नग्न मसाज पासून अनेक अश्लिल लैंगिक कामं करण्यासाठी बालिकांना भाग पाडलं जातं. (२९/३३)
बाल लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार, पोलिस प्रशासन, संयुक्त सेवाभावी संस्था व नागरीकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महिला व बाल आयोग, न्यायालयीन अधिकारी, सरकारी अधिकारी व कायदा राबविणारे पोलिस अधिकारी यांचे (३०/३३)
संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. यासंबंधी 'International Justice Mission' ही स्वयंसेवी संस्था अनेक देशांत काम करत आहे. त्यांचीही या कामात मदत घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना इतर देशांतील उत्कृष्ट कार्यवाहीची महिती देणे आवश्यक आहे. (३१/३३)
महिला व बालविकास मंत्रालयाला संपर्क कसा साधता येईल किंवा या विभागाने देखील यांवर तत्परता दाखवण्याची गरज आहे. वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्या यात मुख्य भूमिका बजावू शकतात, जनजागृती करू शकतात. बाल लैंगिक हिंसाचार थांबवण्यासाठी भारतीयांना एकत्र यावं लागेल. (३२/३३)
बालकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नव्हे तर पालक व जबाबदार नागरीकांची देखील आहे. मुलांना हिंसामुक्त वातावरणात कसं ठेवता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहीलं पाहीजे. (३३/३३)
- शुभांगी ✍️
संदर्भ साभार - सकाळ, बीबीसी नेटवर्क आणि महाराष्ट्र स्टेट कमीशन फॉर वुमेन.
तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७) #म#मराठी#रिम
या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
सारख्या घटनांना चालना देत होता. टेलिग्रामवरिल युजर्स कडून पैसे घेऊन हा ग्रुप त्यांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकत असे. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला आणि २३ मार्च २०२० साली पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख प्रसार माध्यमांद्वारे सार्वजनिक केली. (३/२७)
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.
आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.
परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻 #म#रिम#मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.
तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!
दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.
त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.