तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७) #म#मराठी#रिम
या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
सारख्या घटनांना चालना देत होता. टेलिग्रामवरिल युजर्स कडून पैसे घेऊन हा ग्रुप त्यांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकत असे. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला आणि २३ मार्च २०२० साली पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख प्रसार माध्यमांद्वारे सार्वजनिक केली. (३/२७)
त्या आरोपीचं नाव आहे 'चो जू बिन' (Cho Joo Bin). हा पंचवीस वर्षीय युवक आहे. जो दक्षिण कोरियाच्या राजधानी 'सोल' (Seoul) जवळील 'इंचियोन' नावाच्या शहरातील 'Inha Technical College' मध्ये Information And Communication शाखेत शिकत होता. चो जु बिन आणि त्याचे पाच साथीदार (४/२७)
फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे मॉडेलिंग मध्ये उज्ज्वल भविष्य बणविण्याच्या खोट्या जाहीराती प्रसिद्ध करून महिला आणि मुलींची वैयक्तिक माहिती गोळा करायचे. टेलिग्राम मॅसेंजर द्वारे हे लोक मुली आणि महिलांकडून कमी वस्त्रांतील किंवा विवस्त्र छायाचित्र मागवायचे. (५/२७)
छायाचित्र मागविल्या नंतर ते लोक महिलांना धमकावत असत आणि जर त्या महिलांनी ऐकलं नाही तर त्याचे अश्लील छायाचित्रे त्यांच्या घरी, शाळा, महाविद्यालयांत सार्वजनिक करू अशी धमकी देत होते. हे सर्व करतच 'चो जू बिन' आणि त्याच्या साथीदारांनी घाणेरडा खेळ करण्यास सुरुवात केली. (६/२७)
एखादी मुलगी अथवा महिला ह्या लोकांच्या जाळ्यात अडकली की हे लोक टेलिग्राम वरून विविध ग्राहकांद्वारे त्या महिलांचं लैंगिक शोषण करायचे. ते इतक्यावरच थांबायचे नाहीत तर लैंगिक अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ बणवून "Nth Room" आणि "Doctor's Room" या नावांचे टेलिग्राम ग्रुप बनवून (७/२७)
ते अश्लील व्हिडिओ या ग्रुपमध्ये शेयर केले जात होते. ह्या दोन ग्रुपचे सदस्य होण्याकरिता अनेक वासनाधीन ग्राहक हजारो डॉलर्समध्ये किम्मत मोजत होते. किमान दहा हजार लोकांनी ह्या ग्रुपचं सदस्यत्व घेतलं होतं आणि हे लोक प्रत्येकी १२०० डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम देत असंत. (८/२७)
२०१८ मध्ये "God God" नावाचं युजरनेम चालू करून त्याद्वारे ८ ग्रुप बणवले गेले होते. ज्यांची नावं १,२,३,४..८ अशी ठेवली होती त्यामुळे या ग्रुप रूमला "Nth Room" असं बोललं जात होतं. २०० ते १२०० डॉलर्स पेक्षा जास्त क्रेप्टोकरन्सी घेऊन अनेक ग्राहकांना सदस्यत्व दिलं जात होतं. (९/२७)
इतकंच नव्हे तर Nth Room चा प्रचार करण्यासाठी Watchman नावाचा युजर "Gotham Room" नावाचा ग्रुप चालवत असे. हे पहात अपराधी चो जु बिन ने देखील आणखी एक "Doctor's Room" नावाचा ग्रुप बणवला आणि आॅनलाईन मानवी तस्करी करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली. (१०/२७)
या घाणेरड्या ग्रुप्स मध्ये चाईल्ड पॉर्न, स्लेव्ह पॉर्न, रेप पॉर्न, अमानविय रानटी पॉर्न सारखे अतिनीच पातळीचे व्हिडीओज आणि छायाचित्रे शेअर केली जात होती. 'चो जू बिन'ने बालिकांची व महिलांची आॅनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. (११/२७)
काही दिवसांनी 'चो जू बिन' या ग्रुप्सचा लिडर बनला व तो "बक्सा" नावाने ओळखला जाऊ लागला. त्याने अनेक ग्राहक जमा करण्यास सुरुवात केली. अगोदर म्हटल्याप्रमाणे १० हजारापेक्षा जास्त ग्राहक या ग्रुपवर होते त्यापैकी फक्त ४० लोकांचीच ओळख काढण्यात यश आलं. (१२/२७)
या ग्रुपवर बालिका व महिलांना अनेक विकृत व अमानविय लैंगिक गोष्टी करण्यास भाग पाडलं जायचं. त्यातील काही प्रकार असे होते,
१] ग्राहकांकडून लैंगिक शोषण व त्याचा व्हिडीओ बनवणे.
२] महिलांना गुप्तांगांमध्ये किडे व अनेक प्रकारच्या गोष्टी घालण्यास भाग पाडणे. (१३/२७)
३] महिलांना स्वतःचंच मलमुत्र प्राशन करण्यास सांगणे.
४] विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा शरीरावर वापर करण्यास सांगणे.
५] महिला व बालिकांचा रानटी प्रकारचा बलात्कार करून त्याचे व्हिडिओ बनवणे.
हे ऐकून हैरान झालात ना!? 😳 (१४/२७)
यापेक्षाही अनेक भयावह कामं करण्यासाठी चो जू बिन महिला व बालिकांना भाग पाडायचा.
२०१८ च्या शेवटपर्यंत हे दोन्ही ग्रुप वासनाधीन पुरुष वर्गांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. तेव्हा एका व्यक्तीने दक्षिण कोरियाच्या आणीबाणी क्रमांक ११२ वर संपर्क साधून या प्रकाराबाबत सूचित केलं. (१५/२७)
परंतु त्या व्यक्तीच्या बोलण्याला गंभीरतेने घेतलं नाही. जानेवारी २०१९ मध्ये 'सोल' शहरातील "Seuol Shinmin" नावाच्या वृत्तसंस्थेने गुप्त पद्धतीने या गैरकृत्याचा छडा लावला व पोलिसांना कळवलं. त्याचसोबत अन्य काही कंपन्यांंनी देखील या सेक्स रॅकेटचा शोध लावून पोलिसांना कळवलं. (१६/२७)
परंतु तेव्हाही पोलिसांनी या गोष्टीला गंभीरपणे घेतलं नाही. अखेर १२ ऑगस्ट २०१९ मध्ये, "Electronics Times" ने प्रथमतः या घटनेचा वृत्तपत्रातून सार्वजनिक प्रसार केला आणि संपूर्ण दक्षिण कोरियात दहशत वाऱ्याच्या वेगाने पसरली. या दरम्यान 'चो जू बिन'ने JTBC नावाच्या (१७/२७)
प्रसार माध्यमाला धमकावलं होतं पण नंतर तो पकडला गेला. त्यांनतर त्याच्या सोबतच्या अन्य पाच साथीदारांना सप्टेंबर २०१९ च्या दरम्यान अटक करण्यात आली. ज्यांची नावं खालील प्रमाणे - 1. Moon Hyung-Wook [ God God of Nth Room ] 2. Jeon [ Watchman of Gotham Room ] (१८/२७)
3. Shin [ Kelly of Nth Room ] 4. Kang [ Butta of Doctor’s Room ] 5. Lee [ Ikiya of Doctor’s Room ]
चो जू बिन पकडला गेल्यानंतर ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याची ओळख सार्वजनिक करण्यासाठी याचिका दाखल केली. दिनांक २३ मार्च २०२० रोजी एका प्रसार माध्यमाने याबाबत खुलासा केला. (१९/२७)
दुसर्याच दिवशी दिनांक २४ मार्च २०२० रोजी Seoul Metropolitan पोलिसांनी देखील या विषयाचं समर्थन केलं. तिसर्या दिवशी दक्षिण कोरियातील क्रेप्टोकरन्सी ऑपरेटर्स देखील या अपराधाची पडताळणी करण्यास तयार झाले. त्यांच्या सहाय्याने पोलिसांनी या ग्रुप्सशी जोडल्या गेलेल्या (२०/२७)
४० सदस्यांचा छडा लावला. जे चो जू बिन इतकेच गंभीर गुन्हेगार होते. यांचा तपास अजूनही चालूच आहे. सप्टेंबर २०१९ च्या शेवटपर्यंत १२४ संशयीतांना अटक करण्यात आली. जे त्या १८ ग्रुप्स मधील सदस्य होते. त्याच्यावर १५ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. (२१/२७)
२६ नोव्हेंबर २०२० ला न्यायालयाने या अक्षम्य अपराधांसाठी चो जू बिनला ४० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली व त्याच्या अन्य साथीदारांना ५ ते अधिक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. २५ मार्च २०२० रोजी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चो जू बिनने लोकांकडे माफी मागताना (२२/२७)
म्हटलं की, "धन्यवाद तुम्ही लोकांनी एका सैतानाला रोकलं ज्याला मी स्वतः थांबवू शकत नव्हतो." ("Thank you for putting a brake on the life of a devil that could not be stopped.") (२३/२७)
मित्रहो टेलिग्राम एक असं अॅप आहे ज्यावर कोणताच सेंसोरशीप नाहीय. मुळात म्हणजे या अॅपद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीशी फोन नंबर न घेताही संपर्क साधता येतो. आणि यातूनच असे गंभीर अपराध घडतात. इतकंच नव्हे तर चित्रपटांची पायरेसी, अम्ली पदार्थांची तस्करी व आधी सांगितल्याप्रमाणे (२४/२७)
मानव तस्करी देखील केली जाते. सध्या नवीन पिढी व पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे व खोट्या अफवा बातम्या दिसतील त्वरित रिपोर्ट केलं पाहिजे. भारत सरकारने देखील "इंडियन साईबर क्राईम कॉर्डीनेशन सेंटर" साठी ४१५.८६ कोटींचं बजेट ठेवलं आहे. (२५/२७)
तरी तुम्हाला समाजमाध्यमांवर कोण धमकावत असेल तर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा तसेच 👇🏻 cybercrime.gov.in या वेबसाईटवर वर रिपोर्ट करा. राष्ट्रीय पोलिस हेल्पलाईन क्रमांक १०० किंवा राष्ट्रीय महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ वर संपर्क करू शकता. (२६/२७)
आपल्या देशात देखील लहान मुलांंची व महिलांची तस्करी केली जाते किंबहुना लाखो मुलं व महिला गायब होतात. याचा कोणाला पत्ताही लागत नाही. सरकार व महिला आयोगाने यावर गंभीरतेनं लक्ष घालण्याची गरज आहे. समाज माध्यमांचा अपव्यय जीवावर देखील बेतू शकतो हे लक्षात असुद्यात! (२७/२७)
-- शुभांगी ✍️
▪️संदर्भ साभार - बीबीसी नेटवर्क आणि ग्राऊंड रिपोर्ट डॉट इन
▪️छायाचित्रे साभार - गुगल
आपल्या भारतात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत बोललं जात नाही, किंबहुना लोक या गोष्टीला नगण्य समजतात. आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाच्या घटना फार घडत नाहीत असा पांचट गैरसमज लोकं करून बसतात. (१/३३)
इंटरनेटचा वापर जितका चांगल्या कामांसाठी होतो त्याहूनही जास्त वाईट कामांसाठी होतो. आधी संगणक आणि आता मोबाईल यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण यांसारख्या घटना समाज माध्यमांद्वारे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलांचा वापर अश्लील दृश्यांसाठी करणं, (२/३३)
लहान मुलांना कामोत्तेजक गोष्टींसाठी प्रवृत्त करणं, बालवेश्या किंवा परदेशातील लोकांच्या वासना शमवण्यासाठी बालकांची विक्री अथवा तस्करी करणे हे प्रकार इतर देशांप्रमाणे भारताच्याही डोक्यावर दगडाप्रमाणे बसून आहेत. अलिकडे हे गुन्हे खूप वाढत चालले आहेत, असंच दिसून येतं. (३/३३)
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.
आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.
परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻 #म#रिम#मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.
तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!
दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.
त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.